Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on Jun 13, 2016 in जीवन प्रकाश

स्वर्गाची उत्कट इच्छा

स्वर्गाची उत्कट इच्छा

 

(iii) आम्ही ‘अनंतकाळात’ आहे त्याच अवस्थेत जाऊ.त्यात कोणताही बदल होणे शक्य नाही! देवाच्या दृष्टीने’नीतीमान असणारे सर्वजण (ख्रिस्तामधील प्रत्येक विश्वासी)  स्वर्गात जातील व सदैव त्याच स्थितीत रहातील त्याठिकाणी ‘वेळ’ नाही परंतु फक्त ‘अनंतकाळ’ आहे व त्याचप्रमाणे तेथे पाप करावयाचे कोणतेही निमित्त नसेल! म्हणून या समयी स्वर्गात ‘नीतिमान’ व ‘परिपूर्ण’ केलेल्यांचे आत्मे आहेत.

“…… नीतीमान माणूस नैतीक आचरण करत राहो; पवित्राचरणी माणूस स्वत:ला पवित्र करत राहो.” (प्रकटीकरण २२:११ ).

तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणाली: लिही; प्रभूमध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत. आत्मा म्हणतो: खरेच, आपल्या कष्टांपासून सुटून त्यांना विसावा मिळेल; त्यांची कृत्ये तर त्यांच्याबरोबर जातात”(प्रकटीकरण १४: १३).

(3) (अ) पहिले पुनरुत्थान, जे आधीच मृत आणि ख्रिस्ताबरोबर आहेत त्यांचेवजे अजूनही पृथ्वीवर जिवंत आहेत त्यांच्याबरोबर, ज्यावेळी प्रभू गुप्तपणे ‘त्याच्या लोकांना’ स्वर्गात घेऊन जाईल त्या वेळी होईल (तथापि जुन्या करारातील संतजणांचे पुनरुत्थान ७ वर्षांच्या क्लेशमय काळाच्या समाप्तीच्या वेळी होईल.) परंतु हे ‘परिवर्तन’ कसे घडेल हे एक ‘गूढ’ आहे जे देवाने आम्हाला येथे पृथ्वीवर प्रगट केलेले नाही!

गुप्त गोष्टी आपला देव परमेश्वर ह्याच्या स्वाधीन आहेत …… ” (अनुवाद २९:२९).

पाहा, मी तुम्हांला एक रहस्य सांगतो; आपण सर्वच महानिद्रा घेणार नाहीतरी आपण सर्व जण बदलून जाऊक्षणात, निषिमात शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा; कारण कर्णा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपणा परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहेअसा जो शास्त्रलेख आहे तो पू्र्ण होईल.  “(१ करिंथ १५: ५१-५४).

भूमीतील मातीत निजलेल्यांचा मोठा समुदाय उठेल. कित्येक सर्वकाळचे जीवन मिळविण्यास  …… उठतील.” (दानीएल १२: २).

ब) हे पुनरुत्थान फक्त ‘शरीराच्या’बाबतीतच मर्यादित आहे. पुनरुत्थानाच्या वेळेस  विश्वासीव्यक्तीला स्वर्गात वास्तव करण्यास असे ‘नवीन शरीर’ प्राप्त होईल. आत्मा हा सदोदीत जिवंत असतो! (फक्त शरीर म्हणजे ‘संपूर्ण माणूस’ नव्हे–त्या मध्ये आत्मा, जीव आणि शरीर यांचा तिघांचाही समावेश आहे. म्हणून मृत्यूच्या वेळी मनुष्याचे ‘संपूर्ण अस्तित्व’ समाप्त होत नाही. आत्मा आणि  जीव  देवाकडे परततात व शरीर परत मातीला जाउन मिळते).

थडगी उघडली, आणि निजलेल्या अनेक पवित्र जनांची शरीरे उठविली गेली.” (मत्तय २७:५२).

“……वासना निमेलकारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजाधामास चालला आहे…… तेव्हा माती पूर्ववत मातीस मिळेल; आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल” (उपदेशक १२: ५ आणि ७).

इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्मा हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वत: दत्तकपणाची म्हणजे  आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असतां आपल्या ठायी कण्हत आहोत..” (रोम ८: २३).

(क) पहिल्या पुनरुत्थानाच्या समयी, विश्वासणाऱ्याचे शरीर अमरत्व धारण करते.’नवीन शरीर’ हे एक गौरवी शरीर असेल. पुनरुत्थानाच्या वेळी, मृत्यू’पूर्णपणे’ गिळून टाकला जाईल!

तसेच मेलेल्यांचे पुनरूत्थान आहे. जे विनाशीपणांत पेरले जाते ते  अविनाशीपणात उठविले जाते. …… प्राणमय शरीर म्हणून पेरले जाते; आध्यात्मिक शरीर असे उठविले जाते. …… कारण हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण  परिधान  केले आणि हे जे मर्त्य  त्याने अमरत्व परिधान  केले, असे जेव्हा होईल, तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहेअसा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.” (१ करिंथकर १५: ४२, ४४, ५३ आणि ५४).

(ड) पहिले पुनरुत्थान हे आमच्या पुनरुत्थित शरीराची ‘गुणवत्ता’ बदलेल (म्हणजे त्याचे दिसणे—उदा. बियाणे व वनस्पती) परंतु त्याची ‘ओळख’ (डीएनए) नव्हे!  (म्हणजेच आता जे पुरुष आहेत ते पुरुष म्हणूनच आणि ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया म्हणूनच असतील व आमची आमच्या सध्याच्या दिसण्याची सर्व वैशिष्ट्ये इ. तशीच असतील) आणि म्हणून आम्ही एकमेकांना ओळखू शकू! आमचे शरीर हे आत्म्याव्दारे प्रेरित असेल आणि म्हणून यापुढे भौतिक मर्यांदाच्या बाहेर असेल.

प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहोत; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रकट झालेले नाही; तरी तो प्रकट होईल  तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल.” (१ योहान ३: २ )

“……तेव्हा दारे बंद असतांना येशू आला व त्यांच्यामध्ये उभा राहून म्हणाला, ‘तुम्हांला शांती असो‘” (योहान २०:२६ ब).

(४) (अ) म्हणून मृत्यूसमयी विश्वासणाऱ्याचा आत्मा स्वर्गात आमच्या त्रैक्य देवाकडे जातो आणि पहिल्या पुनरुत्थानाच्या वेळेस / ज्यावेळेस आम्हांला या पृथ्वीवरून घेऊन जाण्यासाठी  प्रभू येशू येईल त्यावेळी जे एक ‘नवीन शरीर’ आम्हाला प्राप्त होईल त्याची आम्ही उत्सुकतेने वाट पाहत असतो.

 (ब) आमचे तारण आशेमध्ये झाले आहे–जी आशा आम्हाला आमच्या तारणाच्या वेळेस देण्यात आली आहे–अर्थात आमचे स्वर्गामधील अनंतकाळचे जीवन! ही बाब अजून पूर्ण झालेली नाही आणि म्हणून आम्ही विश्वासात याच्या पूर्णतेची अजूनही उत्सुकतेने वाट पाहत आहोत. ज्या प्रकारे देवाची कृपा आमच्यावर आमच्या तारणाच्या समयी ओतण्यात आली(ज्यामुळे आम्ही ‘नीतिमान’ ठरले गेलो) आणि जी कृपा ‘देवाबरोबर’ आमच्या ‘पावित्र्यात’ चालण्याच्या व्दारे वृधिंगत होते, तीच कृपा आमच्या स्वर्गातील ‘गौरवी आगमनाच्या’ वेळेस आमच्या बरोबर असेल.यावेळी आमची प्रभू येशूबरोबर आमच्या मरणाव्दारे अथवा त्याच्या आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्याव्दारेभेट होईल. त्यावळेसयेशू त्याच्या कृपेव्दारे स्वत:ला आम्हाला पूर्णत: ‘प्रकट’ करील व त्या ठिकाणी ‘संपूर्णपणे परिपूर्णता’ असेल–म्हणून आम्ही आमची दृष्टी या ‘भविष्यातील कृपेकडे संपूर्णत: लावून ठेवली पाहिजे!

 “आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो. त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविल्याने जिवंत व नवी आशा दिली आणि ज्याचा कधीही नाश होत नाही व ज्याचावर काही दोष नाही व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे. आणि शेवटच्या काळात प्रगट करण्यात येणारे तारण तुम्हाला मिळावे म्हणून विश्वासाच्या व्दारे देवाच्या सामर्थाने तुमचे रक्षण केले आहे……म्हणून……जेव्हा येशू ख्रिस्त प्रकट होईल तेव्हा तुम्हाला जे आशीर्वाद देण्यात येतील त्याववर तुमची आशा केंद्रित करा.” (१ पेत्र. १: ३ ते ५ व १३ ब).

क्रमश: