Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on May 1, 2017 in जीवन प्रकाश

तो आपले अश्रू पुसून टाकील

तो आपले अश्रू पुसून टाकील

 उत्पत्तीची  प्रकटीकरणाशी तुलना

राजासनावर  जो बसला होता तो म्हणाला “पाहा मी सर्व काही नवे करतो!” (प्रकटी२१:५).

उत्पत्ती

 1. बायबलचे पहिले शब्द: “ प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली” (उत्पत्ती १:१).
 2. त्याने जलांच्या संचयास समुद्र म्हटले (उत्पत्ती १:१०).
 3. “त्याने अंधकाराला रात्र म्हटले.” (उत्पत्ती १:५).
 4. “देवाने दोन मोठ्या ज्योती ( सूर्य व चंद्र) केल्या; दिवसावर प्रभुत्व चालवण्यासाठी मोठी ज्योती आणि रात्रीवर प्रभुत्व चालवण्यासाठी लहान ज्योती” ( उत्पत्ती १:१६).
 5. “कारण ज्या दिवशी तू त्याचे फळ खाशील त्या दिवशी तू खास मरशील (उत्पत्ती २;१७).
 6. “तुला बहुत दु:ख होईल व गर्भधारणेचे क्लेश होतील; तू क्लेशाने लेकरे प्रसवशील” (उत्पत्ती ३:१६).
 7. “तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे” (उत्पत्ती ३:१७).
 8. मानवजातीला फसवणारा सैतान येतो (उत्पत्ती ३:१-५).
 9. आदाम व हवेला जीवनाच्या झाडापासून घालवून देण्यात आले (उत्पत्ती ३: २२-२४).
 10. आदाम व हवेला देवाच्या समक्षतेपासून घालवून देण्यात आले (उत्पत्ती ३:२४).
 11. मानवाचे पहिले घर नदीच्या किनारी होते (उत्पत्ती२:१०).
 12. चार नदींपैकी एक (एदेनात उगम पावलेल्या नदीचा फाटा) एका देशाला वेढते तेथे सोने सापडते (उत्पत्ती २:१०-१२).
 13. तारणारा येईल असे अभिवचन (उत्पत्ती ३;१५).
 14. बायबलच्या पहिल्या दोन अध्यायात पापाचे अस्तित्व नाही (उत्पत्ती १,२).

प्रकटीकरण

 1. जवळजवळ अखेरचा शब्द: “आणि मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली” (प्रकटी. २१:१).
 2. “आणि समुद्रही राहिला नाही” (प्रकटी. २१:१).
 3.   “रात्र तर तेथे नाहीच” (प्रकटी. २१:२५).
 4. “नगरावर सूर्याचा किंवा चंद्राचा प्रकाश पडण्याची गरज नाही कारण देवाच्या प्रकाशाने ते प्रकाशित केले आहे. कोकरा त्याचा दीप आहे” (प्रकटी.२१:२३).
 5. “यापुढे मरण नाही” (प्रक. २१:४).
 6. “शोक, रडणे कष्ट हीही नाहीत कारण पहिले होऊन गेले आहे ( प्रकटी. २१:४). _________________
 7. “यापुढे काहीही शापित असणार नाही” (प्रकटी. २२:३).
 8. सैतान कायमचा नाहीसा होणार (प्रकटी.२०:१०).
 9. जीवनाचे झाड पुन्हा दिसले जाते (प्रकटी. २२:२). _________________
 10. “ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्यांच्या कपाळावर असेल” (प्रकटी. २२:४)
 11. मानवाचे अनंतकालिक घर जीवनाच्या नदीजवळ  असेल (प्रकटी.२२:१).
 12. नवे यरूशलेम मोलवान रत्नांनी शृंगारलेले असेल, आणि त्याचे रस्ते शुद्ध सोन्याचे असतील (प्रकटी. २१:१८-२१).
 13. तारणारा राज्य करील (प्रकटी. २१:२२).
 14. बायबलच्या शेवटच्या दोन अध्यायांत पापाचे अस्तित्व नाही (प्रकटी. २१: आणि २२).