Pages Menu
Facebook
Categories Menu

Posted by on Jan 1, 2018 in जीवन प्रकाश

आपण बायबल वाचणे का सोडून देतो?

लेखक: ब्राईस यंग

यावर्षी तुम्ही बायबल वाचायचा निश्चय केला आहे तर ! देवाची स्तुती असो.

कदाचित ह्या वर्षाचा हा निश्चय तुमच्यासाठी नवा असेल. किंवा तुम्ही एक अनुभवी वाचक असाल आणि देवाने कित्येक वर्षे तुम्हाला आशीर्वाद दिल्याने हा नमुना तुम्हाला जीवनात टिकवून ठेवायचाय.

तुम्ही पूर्वी किती जास्त किंवा कमी वाचले त्यामुळे  जे आता लवकरच किंवा येत्या आठवड्यात घडणार आहे त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. कदाचित ते घडलेही असेल. देवाचे वचन वाचण्यास तुम्ही बसणार. अर्धा तास उत्पत्ती व गणना किंवा स्तोत्रात किंवा रोमकरांस पत्रात घालवणार, पुस्तक बंद करणार आणि आता जे काय वाचले त्याचे काय करायचे याची तुम्हाला काहीही कल्पना नाही.
बायबल वाचन जर जीवनाला लागू करता येत नसेल तर काय करायचे? – तुम्ही बायबल वाचलेत पण तुम्हाला फारसे समजले नाही, काही खोल जाणीव झाली नाही किवा अवाक करणारा काही अनुभवही आला नाही तर नंतर काय करायचे? हा अनुभव आपल्याला कित्येकदा येतो आणि तो आपल्याला दुर्बल करतो. मी आताच देवाचे ऐकले पण निराळे असे काहीच वाटत नाही.
तुमचे बायबलवाचन सध्यासाठी नाही किंवा महत्त्वाचे वाटत नाही तेव्हा काय करायचे?

सैतान सांगत असलेल्या दोन लबाड्या

आपण कसे जगावे यावर जेव्हा बायबल वाचनानंतर नवी तत्वे मिळाली नाहीत तर काय करायचे? जर वैयक्तिक लागूकरण नसेल तर बायबल वाचनात काही हेतू राहतो का?
सैतानाला आपला विश्वास आपल्या जीवनातून चाळून घेऊन आपल्याला गिळून टाकायला त्याला आवडते (लूक२२:३१, १ पेत्र ५:८) आपण बायबल वाचत असताना सैतान आपल्याला दोन लबाड्या सांगतो. पहिली म्हणजे आपला देवाच्या वचनातील वेळ निष्फळ ठरला. आपल्या अर्ध्या तासाच्या वाचनात आपल्याला काय मिळाले तर ‘अमुक अमुक दुष्ट राजा होता. त्याने या लोकांबरोबर लढाई केली. तो मेला आणि त्याचा पुत्र त्याच्या जागी राजा झाला…’ कदाचित मनोरंजन करणारे असेल पण बायबल वाचल्यानंतर आपल्याला इतकेच मिळते तर त्यापेक्षा टी व्ही पहिला असता. ही संभ्रमाची लबाडी आहे. मला इथे काहीही लागूकरण  दिसत नाही म्हणून हा वेळ व्यर्थ गेला. जसजसा वेळ जाईल तसतसे आपण बायबल कमी वाचू आणि कमी महत्त्वाचे भाग कमी मोलाचे व आपल्यासाठी नसणारे म्हणून वगळत राहू.

संभ्रमामुळे आपण जर बायबलचे अध्याय किंवा पुस्तके वगळली तर देव ते चालू देतो. तरीही अशा काही वेळा असतील की आपण जे वाचले त्यासंबंधी काय करायचे हे आपल्याला समजत नाही. यावेळी आपण ही समस्या आपली आहे असे समजतो . ही दुसरी लबाडी आपल्या शंकेची आहे.

बायबल वाचनामधून मला काहीच का बरे मिळाले नाही? आपल्याला माहीत आहे की हे देवाचे वचन पुरेसे नाही हे त्याचे कारण नाही. मग हे अशामुळे असेल की आपण पुरेसे बुध्दिमान नाहीत, हवे तसे आध्यात्मिक नाहीत, किंवा आपल्याला योग्य प्रशिक्षण मिळालेले नाही.  आपला सकाळचा निवांत वेळ खूप आशावादाने , ठरावाने सुरू झाला तो आत्मपरीक्षणात , काळजीत संपला की “माझे काय चुकत आहे की मला आज काहीच नवीन दिसले नाही?

फायलींचे कपाट नाही

जर तुम्हाला बायबल वाचनात संभ्रम किंवा स्वत:बद्दल शंका घेण्याचा अनुभव आला असेल तर धीर धरा. जेव्हा आपण स्वत:ला आणि बायबल नीट समजून घेतो तेव्हा आपल्याला दिसेल की कमी महत्त्वाचा अथवा व्यर्थ असा बायबलचा वेळ नसतोच.
समस्येचा पहिला भाग हा आहे की देवाने मानवांना काय बनवले आहे याबद्दलची गैरसमजूत. मानव ही काही काही प्रथमत: माहितीची बौद्धिक फायलिंची यंत्रणा नाही. आपल्यापैकी कोणीच दिवसभर जे करतो ते आपल्या मेंदूत साठवलेल्या माहितीतून घेवून त्याचे तर्काने विश्लेषण करून त्याचे त्या विशिष्ट क्षेत्रात वापर करून निष्कर्ष काढत नाही.

जीवनामध्ये तुम्हाला पुढे नेणारी मुख्य यंत्रणा म्हणजे तुम्हाला असलेली माहिती नाही तर तुम्हाला ज्याबद्दल प्रेम वाटते त्या गोष्टी. आपल्याला प्रिय वाटणाऱ्या (आवडणाऱ्या) गोष्टींच्या दिशेने आपण नेहमीच सहजतेने पुढे जात असतो.. (बहुधा आपल्याला न समजता)- आपल्या ह्रदयावर पगडा बसवणाऱ्या – आपली खोलवर प्रवृत्ती, इच्छा, अपेक्षा या गोष्टी.

आपण का वाचतो?

यामुळेच दाविदाने म्हटले, तुझ्या नियमशास्त्रात मला आनंद नसता तर माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. (स्तोत्र ११९:९२). खरंच? अंत झाला असता?
दावीद हा काव्यात्मक लिहीत असे पण ही अतिशयोक्ती नाही. तुम्ही जरी देवाच्या वचनावर रात्रंदिवस मनन केले (स्तोत्र १:२) तुमच्या बायबल वाचनातून अगदी गहन लागूकरण उघड केले , देवाच्या ज्ञानाच्या व गूढ गोष्टीतून त्याची इच्छा समजून घेतली (१ करिंथ १३:२) पण जर तुमचे ह्र्दय देवाच्या पुत्राच्या प्रतिमेनुसार घडवले जात नसेल तर तुमचे बायबल वाचन व्यर्थ आहे.
आपल्या बायबल वाचनातून आपण केवळ काही गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत नाही पण एका विशिष्ट प्रकारचे लोक बनण्याची इच्छा बाळगतो. देवाचे सौदर्य,  उत्कृष्ठ्ता, पावित्र्य ह्याने आपल्या जीवनाला  खोलवर व सर्वत्र व्यापून टाकावे अशी आपली इच्छा असते —फक्त आमच्या विचारातच नव्हे तर आमच्या भावना , कृती व प्रीतीमध्ये. देवाचे वचन आपल्या मनात समजावे , त्याचे लागूकरण आपल्या जीवनात व्हावे  आणि ख्रिस्ताच्या रहस्याचे  ज्ञान आम्हाला समजावे ही  इच्छा आम्ही बाळगतो पण येथेच  थांबत नाही कारण त्याच्या पुत्राच्या प्रतिमेसारखे होण्यासाठी देवाने दिलेल्या या वाटा आहेत ( रोम ८:२९).

त्याच्या हातातील तलवार

बायबल वाचनात आपण संभ्रमात पडतो किंवा निराश होतो (?)एवढेच नाही तर बायबल हे देवाचे पुस्तक आहे हे ही आम्ही विसरतो.
देवाचे वचन हे  अग्नीसारखे, खडकाला फोडून तुकडे-तुकडे करणार्‍या हातोड्यासारखे नव्हे काय? (यिर्मया २३:२९). तुम्हाला जीवनासाठी एक नवे तत्त्व मिळाले नाही म्हणून तुम्ही देवाची हातोडी रोखून धरू शकत नाही. आपल्याला देवाच्या वचनातून व्यावहारिक बोध लगेच मिळाला नाही म्हणून देवाचे जिवंत व कार्यकारी वचन आपण बुजवू शकत नाही.
आपल्या बाजूने आपण ते विश्वासूपणे वाचण्याची गरज आहे पण अखेरीस वाढ करणारा हा देवच आहे.(१ करिंथ ३:७). आणि तो त्याला हवे तसे आशीर्वाद देतो त्यासाठी तो आपल्यावर अवलंबून नाही. जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा आपण चांगले विचार करण्यास, चांगली कृती करण्यास मदत व्हावी म्हणून ते काही आपल्यावर शस्त्रक्रिया करत नाही. आपण आपल्याला देवावर सोपवून देतो ज्याची रोगनिवारण करणारी तलवार सजीव, तीक्ष्ण असून, जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाऊन  मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षण करू देतो (इब्री ४:१२). तुमची वाढ आणि पवित्रीकरण तुम्हाल दिसते त्यापेक्षा अधिक खोलवर असते- ते  लगेच दिसत नाही म्हणून निराश होऊ नका. दहा मिनिटांच्या क्षुल्लक बायबल वाचनाद्वारे देव खूप काही करू शकतो जे शक्स्पियर, होमर टॉलस्टॉय यांची सर्व पुस्तके वाचल्याने घडू शकणार नाही.

कधीही वाया जाणार नाही

देवाचे सर्व वचन हे ‘परिपूर्ण, मनाचे पुनरुज्जीवन करणारे आहे” (स्तोत्र १९:७). त्याचा अर्थ तुमचा देवाच्या वचनामध्ये घातलेला वेळ कधीही वाया जाणार नाही. दिलेल्या दिवशी बायबल वाचनानंतर तुम्हाला कितीही अंतर्दृष्टी मिळाली अथवा मिळाली नाही तरी तुम्ही वचन वाचल्यावर अशी प्रार्थना करू शकता:

देवा तुझे वचन हे परिपूर्ण , खरे, शुध्द, स्वच्छ आणि सत्य आहे.
त्याद्वारे तू मनाचे पुनरुज्जीवन करतोस भोळ्यांना समंजस करतोस, आणि हृदयाला आनंदित करतात;,  नेत्रांना प्रकाश देते आणि आम्हाला नितीमत्त्वामध्ये घडवते (स्तोत्र १९:७-९). माझ्यासमोर असलेल्या शब्दांचे माझ्यामध्ये सद्गुण आणि कृपेत रूपांतर कर व तुझ्या पुत्राच्या प्रतिमेमध्ये मला घडव. तुझे वचन माझ्या ह्रदयावर हातोड्याप्रमाणे घाव घालू दे की जे पापी आहे ते मोडले जावू दे आणि जे नितीमत्वाचे नाही ते शुध्द केले जाऊ दे. माझ्या मनालाच नव्हे तर माझ्या सर्वस्वाला आकार दे यासाठी खिस्ताला जे आवडते ते मला आवडू दे आणि ज्याचा तो द्वेष करतो त्याचा मलाही द्वेष करता येऊ दे. आमेन.