Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जनवरी 1, 2018 in जीवन प्रकाश

तंदुरुस्तीसाठी नव वर्षाचे ध्येय

तंदुरुस्तीसाठी नव वर्षाचे ध्येय

लेखक: ट्रीलीया न्यूबेल

नव्या वर्षासाठी नवे निश्चय केले जातात आणि बहुतेक लोकांसाठी तंदुरुस्ती हे नव वर्षाच्या घ्येयांमध्ये वरच्या क्रमांकावर असते. मी स्वत: एका जिममध्ये जवळजवळ आठ वर्षे काम केले आहे. दर जानेवारी महिन्यात जिममध्ये नव्यासदस्यांची गर्दी होते.
याचे कारण असावे गेला महिना आपण भरपूर खाण्यापिण्यात व उत्सवात घालवलेले असतात. आणि दुसरे कारण म्हणजे प्रत्येक नवे वर्ष हा नवी सुरवात करण्याची वेळ असते.

थोडक्या किंमतीचे
मी या ध्येयाच्या विरुद्ध नाही. आपल्या शरीराची काळजी घेणे हे एका प्रकारे देवाला मान देणे आहे. आपल्या शरीराचे हवे तसे चोचले पुरवून त्याचा नाश करण्यासाठी देवाने ते निर्माण केले नाही तर त्याच्या गौरवासाठी व त्याच्या हेतूंसाठी ते वापरावे म्हणून केले आहे.  आणि जरी देवभिरूपण हे देवाला सर्वात मोलवान आहे तरी शारीरिक प्रशिक्षणालाही देव काही किंमत देतो. पौल आपल्याला यासंबंधी खोटी विभागणी करण्याचे समजण्यास मदत करताना लिहितो, “कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे,सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे ; तिला आताच्या व पुढच्या जीवनाचे अभिवचन मिळाले आहे (१ तीम. ४:८).
यामुळे आपण गृहीत धरू शकतो की निरोगी राहण्यासाठी व्यायाम ह्या ध्येयाचा पाठपुरावा करणे हे योग्य आहे आणि देवभिरू राहण्यासाठीही हे महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे सेवा करण्यास शक्ती मिळते , ते प्रकृती सुधारते आणि तजेला मिळवून देते.
आपल्याला व्यायामची गरज आहे हे सत्य आपल्याला आठवण करून देते की आपण पतन झालेल्या जगात आपल्या पतित शरीरासह राहत आहोत. जर नवे वर्ष आपण व्यायाम करा अशी आपल्याला आठवण करून देते तर ते त्याहून अधिक आठवण करून देते की आपल्याला देवाची गरज आहे.

पतन
मानवजातीच्या पतनामुळे संपूर्ण जगावर लक्षणीय बदल घडवून आणले. त्यामुळे जगात फक्त पापच आणले नाही पण आपल्या चांगल्या कामावर शाप आणून रोग व मरण आणले. आपण जन्माला येण्याच्या क्षणीच आपल्यामध्ये बिघडण्याची प्रक्रिया सुरू होते. आपण मोठे होतो वाढतो आणि आपला ऱ्हास होऊ लागतो. ३४व्या वर्षी मला अनेक जण तरुण समजत असतील पण पूर्वीसारखी उंच उडी मारणे किंवा वेगाने धावणे मला आता जमत नाही. आणि पूर्वी नाही ती दुखणी आता सुरू आहेत.
देवाने आदामाला सांगितले की, त्यांच्या पापाची शिक्षा म्हणून मानवजात मातीला मिळेल (उत्पत्ती ३:१९). ज्या शुद्ध व दोष नसलेल्या जमिनीतून त्याला निर्माण केले तिच्यामध्येच तो माती म्हणून परतला जाईल.

आपली शरीरे गळून जातात, बदलतात आणि आपण थकून जातो. जे न टळणार त्याला प्रतिबंध करण्यासाठी आपण प्रत्येक तऱ्हेची नवनवीन औषधे वापरतो निरनिराळ्या प्रकारचे व्यायाम करतो. श्वसनपद्धती, प्लास्टिक सर्जरी, मॅराथॉन इ. सर्वांमुळे आपले न टाळता येणारे भविष्य वाचवले जाणार नाही. आदामाप्रमाणेच आपण माती आहोत आणि आपण मातीला जाऊन मिळणार आहोत (उपत्ती३:१९)
हे कितीही व्यायामाने वाचवले जाणार नाही.

पुनरुत्थित शरीरे आणि ख्रिस्ताचे सौंदर्य
जरी या पृथ्वीवर अशी कोणतीच गोष्ट नाही की जिची आपण अनंतकाळासाठी इच्छा करू शकू तरी देवाच्या दयेने आपला क्षय होताना आपण एकटेच नसतो. आपल्याला ठाऊक आहे की योग्य वेळी तो सर्व काही नवे करणार आहे. आणि जे आजार आणि दु:खाने नाश पावले होते ते ख्रिस्ताबरोबर गौरवाने उठले जाईल (१ करिंथ १५:२२-२३) असे लिहिताना पौल आपल्यासाठी पतन व पुनरुत्थान यांना जोडतो.

ही जर पुरेसी चांगली बातमी नसेल तर तो पुढे आपल्याला आठवण करून देतो की आपण फक्त ख्रिस्तासह असणार एवढेच नाही तर आपण त्यासारखे होणार. “आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाटपाहत आहोत. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे तो तुमचे आमचे दैन्यावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्याचे रूपांतर करील (फिली.३:२०-२१).
होय! देव ते नवे करणार आहे. ह्या ज्या शरीरांना आपण ताणतो, वाकवतो, उपास घडवतो व ते सुंदर करण्यासाठी सर्व प्रयत्न करतो  त्या शरीराचे तो रूपांतर करील – होय जेव्हा तो परत येईल तेव्हा तो आपली शरीरे सुंदर ,शुद्ध, आणि वैभवी करील. आपली शरीरे पुन्हा कधीही मरणार नाहीत. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण पापविरहीत असू.

केवळ उपासना
हे नवे वर्ष सुरु होताना आपले पतित आणि अपूर्ण शरीर हे येशूकडे पाहण्याचा दुसरा मार्ग आहे. त्याच्या कृपेने आपण आपली दृष्टी आपल्या स्वत:वरून काढून पूर्णपणे येशूकडे लावू शकतो.
आपली शरीरे ही उपासनेसाठी घडवली गेली आहेत आणि जर देवाने आपल्याला दीर्घायुष्य दिले तर आपली शरीरे अशी असतील की उपासनेशिवाय दुसरे काही करण्यास ती असमर्थ ठरतील.