Pages Menu
Facebook
Categories Menu

Posted by on Mar 6, 2018 in जीवन प्रकाश

तू माझा त्याग का केलास?

तू माझा त्याग का केलास?

लेखक: डॉनल्ड मॅकलॉड

नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून म्हणाला, ‘एलोई, एलोई, लमा सबखथनी,’ म्हणजे ‘माझ्या देवा, माझ्या देवा, माझा त्याग तू का केलास?’ मार्क १५:३४.

इथपर्यंत येशूला क्रूसावर खिळण्याचा वृत्तांत त्याच्या शारीरिक दु:खसहनाकडे केंद्रित झाला आहे: त्याला फटके मारणे, काट्यांचा मुगुट घालणे, आणि त्याला वधस्तंभी खिळणे. त्याला खिळे मारून सहा तास उलटले आहेत. लोकसमुदाय उपहास करत आहेत,  देशावर अंधार पडलेला आहे आणि आता अचानक दीर्घ शांततेनंतर तारणाऱ्याने जिवाच्या आकांताने ही यातनापूर्ण आरोळी केलेली आहे.
हे शब्द अरेमिक भाषेतील असून २२व्या स्तोत्रामधले आहेत.  मत्तय व मार्क दोघेही विदेशी वाचकांना समजण्यासाठी त्याच अर्थ देतात. तथापि येशू अक्षरशः जे शब्द बोलला ते आपण ऐकावे अशी त्यांची इच्छा आहे.

त्याच्या अखेरच्या क्षणी त्याचे मन आपोआप स्तोत्र म्हणत आहे आणि त्याच्या वेदना व्यक्त करणारे शब्द तो घेतो. पण ह्या वेदना शारीरिक नसून त्या त्याच्या जिवाच्या आहेत. कॅलविनने लिहिले: “त्याने त्याच्या जिवामध्ये भयानक यातना सोसल्या.” पण आपण जे इतक्या पोकळ ठिकाणी आहोत त्या आपण यावर आणखी प्रकाश कसा पडावा?

सर्व आशेविरुद्ध
येथे निश्चितच काही नकारात्मक बाबी स्पष्ट दिसतात. येथे ‘त्याग’ याचा अर्थ देवबाप देवपुत्र व पवित्र आत्मा यांच्यातील अनंतकालिक सहभागिता तुटली असा अर्थ होत नाही. देवाचे त्र्येकत्व थांबू शकत नाही. याचा असाही अर्थ होत नाही की देवाने त्याच्यावर प्रेम करणे थांबवले : खास करून  इथे तर मुळीच नाही – जेव्हा पुत्र पित्याला महान खंडणी देऊन कधी नाही एवढा त्याचा पवित्र सन्मान करत होता.
येशूला फक्त त्याग केला असे वाटले नाही त्याचा त्याग केलाच होता. आणि तो त्याच्या शिष्यांनी नव्हे तर खुद्द देवानेच.
याचा अर्थ असाही होत नाही की पवित्र आत्म्याने त्याची सेवा करण्याचे सोडून दिले होते. बाप्तिस्म्याच्या वेळेला तो त्याच्यावर येऊन राहिला होता तो तात्पुरत्या  क्षणासाठी नाही तर त्याच्यावर राहण्यासाठी (योहान १:१२). आणि तो शेवटपर्यंत तेथेच  राहणार होता कारण “ख्रिस्ताने सदाजीवी आत्म्याद्वारे आपल्या स्वत:चे डागविरहित आणि परिपूर्ण असे अर्पण केले” (इब्री ९:१४).
आणि शेवटची बाब म्हणजे ही निराशेची आरोळी नव्हती. निराशा हे पाप झाले असते. त्या अंधकारात सुद्धा देव हा “माझा देव” होता. आणि जरी वेदनांमुळे अभिवचने अस्पष्ट दिसत होती तरी त्याच्या जिवामध्ये खोलवर एक खात्री होती की देवाने त्याला  धरलेले  आहे. जे अब्राहामाच्या बाबतीत सत्य होते ते येशूच्या बाबतीत अधिक सत्य होते.  “आशेला जागा नसतानाही त्याने आशेने विश्वास धरला” (रोम ४:१८).
खरोखर त्याग केलेला
आणि या सर्व मर्यादा होत्या तरीही त्याचा खराखुरा त्याग केला गेला होता. त्याला फक्त तसे वाटले नाही. त्याचा त्याग केला होता शिष्यांनी नव्हे तर खुद्द देवाने. पित्यानेच त्याला धरून देण्यासाठी यहूदाच्या स्वाधीन केले होते, आणि मग यहूद्यांच्या, पिलाताच्या आणि अखेरीस क्रूसावर.
आणि आता जेव्हा त्याने ही आरोळी मारली तेव्हा देवाने त्याचे कान बंद केले. लोकसमुदायाने उपहास करणे थांबवले नव्हते, भुतांनी त्याला छळणे थांबवले नव्हते, वेदनाचा जोर यत्किंचितही कमी झाला नव्हता.

त्याऐवजी प्रत्येक घटना देवाच्या क्रोधाब्द्द्लच बोलत होती आणि याला विरोध करणारा एकही आवाज नव्हता. यावेळी स्वर्गातून कोणतीच वाणी आली नाही की तो देवाचा पुत्र आहे आणि परमप्रिय आहे. कोणतेही कबुतर त्याच्यावर येऊन उतरून आत्म्याच्या सेवेची त्याला खात्री दिली नाही. त्याला बल देण्यास कोणताही देवदूत आला नाही. एकही उद्धारलेल्या पाप्याने गुडघे टेकून त्याचे आभार मानले नाहीत.

शाप वाहक
तो कोण होता? त्याने अरेमिक भाषेत आरोळी मारली. पण अरेमिक भाषेतला अतिमहान शब्द “अब्बा” तो त्याने वापरला नाही. गेथशेमानेच्या दु:खात, तापात आणि ओझ्याखाली दबून गेलेला असतानाही त्याने हे शब्द वापरले (मार्क १४:३६) पण इथे नाही. अब्राहाम आणि इसहाक जसे मोरिया डोंगरावर एकत्र चढले तसे तो आणि पिता कालवरीवर एकत्र चढून गेले . पण आता अब्बा येथे नाही. फक्त एल येथे आहे: देव सर्वमर्थ, देव सर्वपवित्र. आणि त्या एल पुढे तो उभा आहे. त्याचा प्रिय पुत्र म्हणून नाही तर जगाचे पाप म्हणून. तीच येथे त्याची ओळख आहे: ज्या परिपूर्णतेपुढे तो उभा आहे त्याच्या समोर हे त्याचे शील आहे.

येथे त्याचे पाप्यांशी एक केवळ अस्पष्ट नाते नाही. तो त्यांच्यापैकीच एक आहे. त्याची गणना अपराध्यांमध्ये करण्यात आली. तो निश्चितच त्या सर्वांनी युक्त होता. तो पाप झाला (२ करिंथ ५:२१). त्या पापाचा शाप भोगण्यासाठी दोषी ठरवला गेलेला. त्याची कोणीही वकिली करू शकणार नव्हते. त्याचे प्रायश्चित्त कोणीही भरू शकणार नव्हता. त्यानेच ते सर्व भोगायचे होते. आणि त्याने खंडणी पूर्णपणे भरेपर्यंत एल त्याला सोडणार नव्हता आणि सोडू शकत नव्हता. ह्या बिंदूला तो कधी पोचणार होता का? समजा त्याच्या या जीवितकार्यात त्याला अपयश आले तर काय?

त्याच्या जीवाच्या यातना ह्या त्याच्या यातनांचा जीव होता असे पूर्वीच्या संतांनी म्ह्टले आहे. आणि या जिवामध्ये आपण पाहतो पण अंधुकपणे. पाप वाहत असलेला देवाचा पुत्र व त्याच्या स्वर्गीय बापामधल्या प्रखर  तणावाच्या व्यक्तिगत वेदना त्या प्रकट करतात. पापाचे सर्वात भयाण वादळ चालू असताना देवाचा देवाने त्याग केला.
त्याच्या जिवाच्या वेदना
पण येशूच्या जिवाच्या छळाइतकाच आव्हान करणारा त्याचा प्रश्न होता, का?
हा विरोध करणारा: निर्दोष जिवाने अन्यायाने कराव्या लागणाऱ्या दु:खसहनाबद्दल का होता? तो निर्दोष होता हे सत्य आहे. परंतु त्याचे सर्व जीवन तो पापवाह्क आहे आणि त्याला पापासाठी खंडणी भरून द्यायची आहे ह्या जाणीवेनेच  जगला. हे तो आता विसरला की काय?

किंवा हा का आकलन न झाल्यामुळे होता? जसे काही तो इथे का आहे हे त्याला समजत नव्हते? अनंतकालिक करार तो विसरला होता की काय? कदाचित त्याचे मन मानवी मन असल्याने सर्व सत्यांवर एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकत नव्हते आणि क्षणभर त्या वेदनांमध्ये त्या  दैवी क्रोधाची आणि अनंतकालिक  नाशाची भीती त्याच्या मनात व्यापून राहिली होती?
की विचार केला नाही अशा भयानकतेला तोंड देताना विस्मयाने निघालेला तो  का होता? त्याला पहिल्यापासून माहीत होते कि त्याला तीव्र हिंसेचे  मरण सोसावे लागणार आहे (मार्क २:२०) आणि गेथशेमाने मध्ये त्याने त्या मरणाच्या डोळ्यात पहिले आणि त्याचा थरकाप झाला. आणि आता तो त्याचे सर्व कटूपण चाखत होता आणि सत्य हे जे पहिले त्यापेक्षा वाईट होते.
आतापर्यंत पिता आणि त्याच्यामध्ये  काहीच आले नव्हते . आणि आता सर्व जगाचे पाप त्या दोघांमध्ये आले होते. आणि तो आता शापाच्या भयंकर भोवऱ्यात सापडलेला आहे. अब्बा तेथे नाही असे नाही पण तो सर्व पृथ्वीचा न्यायाधीश म्हणून तेथे आहे आणि तो कोणालाही माफ करणार नाही. अगदी त्याचा पुत्रही यातून वगळला जाणार नाही. (रोम ८:३२).

प्याला रिकामा केला

आता येशूचे मन त्याच्या सहनशक्तीच्या परिसीमेला पोचलेले आहे. आपण इतिहासाच्या गच्चीवर बसलेलो आहोत आणि शेवट काय झाला याची खात्री आपल्याला आहे.  मानवी स्वभावामध्ये नरकाचा संताप  सहन करत असताना त्याला तसे वाटत नाही. कोणी कधीही उभे राहिले नाही व राहणार नाही  अशा ठिकाणी तो उभा आहे. विश्वातल्या एका सूक्ष्म स्थळी व सूक्ष्म क्षणी पाप ज्याला पात्र आहे ते भोगत तो उभा आहे: शापाची तीव्रता किंचितही कमी न करता.

पण मग, ते अचानक संपले आहे. बलिदान पूर्ण झाले आहे. पडदा दुभागला आणि परमपवित्राकडे जाण्याचा मार्ग कायमचा खुला झाला. आणि आता येशू दुसऱ्या एका स्त्रोत्रातील वचनाद्वारे म्हणतो, स्तोत्र ३१:५ . अब्बा हा शब्द त्या स्तोत्रात नव्हता तो येशूने वापरला ‘तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला , “(अब्बा) बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” (लूक २३:४६).

या दोन आरोळ्यांमध्ये किती वेळ गेला हे आपल्याला कळण्याचा मार्ग नाही. पण आपल्याला फक्त हेच माहीत आहे की प्याला रिकामा झाला, शाप संपुष्टात आला आणि आता पिता अभिमानाने आपल्या पुत्राचे बाहू धरून ते आत्म्याला देतो.