Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted by on May 5, 2018 in १ योहान , जीवन प्रकाश

धडा ३.  १ योहान १:४                आनंदाची पूर्णता             – स्टीफन विल्यम्स

धडा ३.  १ योहान १:४ आनंदाची पूर्णता – स्टीफन विल्यम्स

 

 • देवाला तुम्ही आनंदित राहायला हवे आहे की देवाला तुम्ही पवित्र राहायला हवे आहे?
  • अर्थात हा प्रश्न पेचात पाडणारा आहे पण चांगल्या कारणासाठी. आनंद व पावित्र्य ही दोन्ही आपण परस्परांपासून विभक्त करू शकत       नाही.
  ▫         अनेक चांगल्या मंडळ्यांमध्ये तुम्हाला पवित्रतेविषयीचे शिक्षण देत असल्याचे आढळेल. वास्तविक  पवित्र शास्त्रात देवाने स्पष्ट                  सांगितले आहे की जसा तो पवित्र आहे तसे आपण पवित्र असावे अशी देवाची इच्छा आहे. देवाशी नातेसंबंध झाल्याचे                              आज्ञापालन हे आवश्यक फळ आहे  (१ पेत्र १:१४- १६).
  ▫         काही ठिकाणी असे विधान तुमच्या कानावर पडेल की “तुम्ही आनंदी नव्हे तर पवित्र असावे अशी देवाची इच्छा आहे.” या                        शिकवणीमागचा त्यांचा उद्देश चांगला आहे. कारण त्यात देवाच्या पवित्र  स्वभावावर जोर दिला आहे. पण त्यात देवाच्या इच्छेचा                एक मुद्दा विचारात  घेतलेला नाही :  आपला आनंद. देव पूर्णपणे पवित्र आहे, पण आनंदातही परिपूर्ण आहे – आणि या दोन्ही                 गोष्टी तो  आपल्याला देतो.
  ▫         जर तुम्ही डोंगरावरील प्रवचन बारकाईने वाचले तर ते ख्रिस्ताच्या राज्याच्या नियमांनी व देवाचे मूल  असणे म्हणजे काय                          याविषयी भरलेले आहे. पण त्याची सुरुवात कशी होते? तर वारंवार “जो…तो धन्य” या  शब्दप्रयोगाने (शब्दश: याचा अर्थ,                       आनंदी/ सुखी समाधानी; मत्तय ५:१-१२). जेव्हा आपण पवित्र असतो तेव्हा आपण खरोखर आनंदी, सुखी, समाधानी असतो.
  •           योहान यावर जोर देऊ इच्छितो. येशू हा खरा आनंद देणारा आहे.

शास्त्राभ्यास

पूर्ण आनंद

तुमचा आमचा आनंद पूर्ण व्हावा म्हणून आम्ही हे लिहितो (१ योहान १:४).

 •            मागील वचनांमध्ये आपण पाहिले की योहानाने व प्रेषितांनी ख्रिस्ताला प्रत्यक्ष पाहिल्याची साक्ष हातोहात पुढे चालू ठेवली. त्याचे                 कारण असे होते की ख्रिस्ताच्या जीवनाचा आपण अनुभव घेतला तर आपली देवाबरोबर सहभागिता होते आणि त्यामुळे                           इतरांबरोबरही सहभागिता होते.
  •          ४थ्या वचनात ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाचे शेवटचे व अंतिम उद्दिष्ट योहान सांगत आहे – आनंद. हा विचार आत्म्याला आनंद व                   समाधान देणारा आहे. याचा अर्थ आनंदाने वेडेपिसे होऊन उड्या मारणे असा होत नाही. पण त्यामुळे दु:ख , शोक, कटुता,                     दडपणे यावर परिणाम व्हायलाच हवा.
  •          वचन नीट लक्षात घ्या: त्यात आनंदाचे दोन पैलू दिसतात.
  ▫       तो “पूर्ण”  किंवा “पूर्तता करणारा” आनंद आहे. याचा अर्थ देऊ केलेल्या या आनंदाचे स्वरूप अत्यंत  खोल व टिकाऊ                             समाधान देणारे आहे. केवळ ख्रिस्तच असा आनंद देऊ शकतो.
  ▫       तो “आमचा” आनंद आहे – योहान या विधानात त्याचा आनंद आणि तो प्राप्त करणाऱ्याचा आनंद  या दोहोंच्याही आनंदाविषयी               बोलत आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर सुवार्तेच्या घोषणेत व ग्रहण करण्यात ती सुवार्ता सांगणारा आणि त्या सुवार्तेवर विश्वास               ठेवणारा या दोहोंना आनंद हा आशीर्वाद  प्राप्त होतो.
  ۰         ती ग्रहण करणाऱ्याला – आत्मिक समाधान देणारा आनंद
  ۰         सुवार्ता सांगणाऱ्याला – उद्दिष्टपूर्ती झाल्याचा आनंद

आत्मिक समाधान देणारा आनंद

 • मागे आपण पाहिले की आपण पवित्र असावे अशी देवाची इच्छा आहे. तेच आपण आनंद व सुखाविषयी म्हणू शकतो का? आपण असे म्हणू शकतो का, की ख्रिस्ती लोकांनी जितके पवित्र तितकेच आनंदी लोक असावे?  योहान आपल्या हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करीत आहे की आनंद हा खुद्द येशूचा स्वभावच प्रतिबिंबित  करतो – तोच आनंद देणारा आहे.
  •           योहान १५:११ हे येशूमध्ये राहण्याविषयी बोलल्यानंतरचे सुवर्णवचन आहे. ते आपल्याला प्रीती व आज्ञापालनाचे उद्दिष्ट सांगते (ते               योहान १७:१३मध्ये पुन्हा सांगितले आहे):
  ▫        पहिली गोष्ट त्याचा आनंद आपल्यामध्ये असावा – दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर येशू स्वत:चा                                                                   स्वभावच आनंदी असल्याचे सांगतो. तो हर्षाने भरलेला देव आहे. आणि आपल्याला तो जो आनंद  देतो तो “येशूचा” दर्जेदार                     व भरपूर आनंद देतो. देवाचा आनंद!
  ▫         दुसरी गोष्ट, हा “येशूच्या” प्रकारचा आनंद आपल्यामध्ये, त्याच्या शिष्यांमध्ये असायला हवा.
  ▫         तिसरी गोष्ट, “येशूच्या” या आनंदाचा असा परिणाम व्हावा की आपला आनंद पूर्ण व्हावा.
  ۰           येशू आपल्याविषयी बोलताना आनंदासाठीच घडवले आहे असे बोलतो.
  ۰           आणि तो अभिवचन देतो की, जेव्हा तो आणि तोच केवळ आपल्याला आनंद देतो तेव्हा प्रथमच आपण खऱ्या अर्थाने तृप्त होतो.
  ۰           सर्व पाप, सर्व जगिक पाठलाग म्हणजे आनंद व सुख समाधानासाठीची धावाधाव असते. ते सर्व वाटा  शुष्क करून टाकणारे                   उगम आहेत. केवळ येशू जो प्रभू तोच परिपूर्ण आनंदाची हमी देतो.
  •            योहान १६:२४ मघ्ये  पुन्हा आपण येशूची आपल्या शिष्यांविषयीची इच्छा पाहतो.
  •           त्याची इच्छा आहे की आपण अशा प्रकारे मागावे की आपल्याला स्वत:ला आपले समाधान सापडेल – हे समजून घेऊन                           मागायचे  की तोच आपल्याला समाधान पुरवून देईल
  ▫        अर्थातच आपल्याला खरेखुरे समाधान हवे असेल तर आपण निकृष्ट मागणी करणारच नाही. तर सकस दर्जेदारच मागू.
  ▫         म्हणून येशू म्हणतो – माझ्या नामात मागा (योहान १६:२३) – त्याचे चारित्र्य, त्याची इच्छा व  त्याच्या हेतूनुसारच मागणी करायची.
 • या दोन्ही ठिकाणी दिलेले अभिवचन खोल आहे – ” तुमचा आनंद पूर्ण व्हावा”- त्याने स्वत:ला आपल्यासाठी  देऊन टाकण्याने आपण खरोखर आनंदी व्हावे अशी येशूची इच्छा आहे.
  •           आपण आताच आत्म्याच्या परिपूर्ण आनंदाविषयी बोललो. तो पाप व जग जे काही देऊ करते त्याच्या पलीकडचा आहे. पण                    आपण याबाबत निश्चित व व्यावहारिक राहू शकतो का? याबाबत वास्तव हे आहे की हे   जीवन फारच दु:खाने भरलेले व                          अतिशय खडतर आहे. या अभिवचनांचा निरर्थक मंत्र म्हणून वापर न करता येशू   विशिष्ट यातनादायी परिस्थितीतही आपल्याला              आनंद कसा देऊ शकतो?
  ▫         पाप (स्तोत्र ३२:१)
  ▫         परीक्षा व यातना (याकोब १:२-४; रोम ५:२-४)
  ▫         चिंता (योहान १४;२७,  फिलिपै ४:५-७)
  ▫         भौतिक गरजा असताना (फिलिपै ४:११-१३)
  ▫         प्रियजनांना गमावल्यास (१ थेस्सलनी ४:१३-१४)
  ▫         छळाच्या काळात (मत्तय ५:११-१२)
  •           अंतिम व अढळ आनंद देण्यास येशूच कारण आहे.

हेतू पूर्ण झाल्याचा आनंद

 • हे आता स्पष्ट झाले आहे की जेव्हा एखादा पापी, जीवन देणाऱ्या तारणाऱ्याचा व तो आपल्याला देत असलेल्या सर्व दानांचा स्वीकार करतो तेव्हा अवर्णनीय आनंद होतो. पण सुवार्तेची घोषणा होऊन तिचे लक्षपूर्वक ग्रहण       केले जाते तेव्हा “आमचा आनंद” पूर्ण होतो असे म्हणून फक्त त्या सुवार्तेचा स्वीकार करणाऱ्यांनाच नव्हे तर  योहान स्वत:चाही त्यात समावेश करतो.
  •           योहान अप्रत्यक्षपणे सूचित करतो की सुवार्तेची घोषणा करण्याद्वारे प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला प्राप्त झालेला आनंद आपण                           दुसऱ्यांना द्यावा अशी त्याला इच्छा असली पाहिजे. तो आपल्यात मावत नसतो.
  ▫         ३ योहान ४ – पुढारी म्हणून योहानाचा महान उद्देश तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा त्याची आत्मिक मुले  ख्रिस्तात चालतात.
  पौलाच्याही याच भावना प्रतिध्वनित झाल्याचे आपण पाहतो. (२ करिंथ १:२४. – “तुमच्या आनंदात सहाय्यकारी”).
  ▫         हेच कोणत्याही विश्वासी व्यक्तीविषयी आहे – हा आनंद साठवून लपवून ठेवू शकत नाही. त्याची  रचना घोषित करण्यासाठीच                 झाली आहे. जेव्हा इतर जन “परमेश्वर किती चांगला आहे ” याची चव  घेऊन पाहतात तेव्हा त्यासारखी महान दुसरी                                उद्देशपूर्तीच  नाही.

सारांश, ख्रिस्ताचे लोक आनंदाने भरलेले आणि आनंद देणारे असणे हीच ख्रिस्ताला शोभनीय महान गोष्ट आहे. आपली  जीवनशैलीच अशी हवी की आपण ख्रिस्ताकडून घेत राहण्यास कधी पुरे म्हणत नाही आणि तो किती तृप्त करणारा आहे हे देखील सांगत राहणे कधी थांबवत नाही!

 

चर्चेसाठी प्रश्न

 • येथे उल्लेख केल्या नाहीत अशा ख्रिस्त देत असलेल्या परिपूर्ण आनंदाविषयी इतर काही गोष्टी सांगा.
  • खिन्न ख्रिस्ती असणे हा पर्याय आहे का? जेव्हा कोणी (किंवा आपण स्वत:) आनंदी नसलो, तर आपण काय करावे?
  • जेव्हा लोकांचा तुमच्याशी संबंध येतो तेव्हा तुमच्यामधील कोणत्या गोष्टीविषयी लोक फार उत्सुक असतात? –  इतरांची ख्रिस्ताशी            ओळख होण्यात तुम्हाला मोठा आनंद असतो का? आपण अशा प्रकारचे जीवन कसे जगू  शकू?