जनवरी 2, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो…”

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” योहान ७:३८.

येशूने असे म्हटले नाही की,जोमाझ्यावर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या परिपूर्ण आशीर्वादाचा अनुभव येईल. तर जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून त्याला जे काही मिळाले आहे ते बाहेर पडेल. आपल्या प्रभूचे शिक्षण हे नेहमी स्व-परिपूर्ती  होण्याच्या विरुध्द असते. मानवाचा विकास हा त्याचा हेतू  नसतो तर मानवाने अगदी त्याच्यासारखे बनावे हा त्याचा हेतू आहे;आणि देवाच्या पुत्राचे गुणवैशिष्ट्य म्हणजे स्वत:ला देऊन टाकणे. जर आपण येशूवर विश्वास ठेवतो तर आपल्याला काय मिळेल यापेक्षा तो आपल्यामधून काय देणार आहे याला जास्त किंमत आहे. देव आपल्याला सुंदर गरगरीत द्राक्षाचे घोस बनवणार नाही तर आपल्याला चिरडून, पिळून काढून त्यातून गोडवा बाहेर आणील. आध्यात्मिक दृष्ट्या आपण आपले जीवन आपल्या यशस्वीपणावर मोजू शकत नाही तर देव आपल्यामधून काय वर्षाव करतो यावर ते  अवलंबून राहील आणि ते आपण मोजू शकत नाही.

जेव्हा बेथानी मधील मरियेने ते मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या मस्तकावर त्याचा अभ्यंग केला तेव्हा त्या कृतीला साजेशी वेळ कोणालाच दिसली नाही. शिष्यांना तर तो  व्यर्थ अपव्यय वाटला. पण येशूने मरीयेच्या याअमर्याद भक्तीच्या कृतीची प्रशंसा केली आणि म्हटले, “सर्व जगात जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जेकेलेते हिच्या स्मरणार्थ सांगतील”मत्तय २६:१३. जेव्हा जेव्हा मरियेने जे केले ते आपण करतो तेव्हा आपल्या प्रभूला अत्यंत आनंद होतो  कारण ते मोजून मापून दिलेले नसते तर त्याच्यासाठी सर्वस्व वाहून देण्याची कृती असते. जग वाचवले जाण्यासाठी देवाने आपल्या पुत्राच्या जीवनाचा यज्ञ केला. आपण आपले जीवन त्याच्यासाठी वाहून द्यायला तयार आहोत का?

जो माझ्यावर विश्वास ठेवतो ..त्याच्यातून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.– शेकडो जीवने त्याद्वारे सतत उत्तेजित होतील. आपले जीवन मोडण्याचा, स्वत:च्या समाधानाची ओढ सोडून देण्याचा आणि सर्वस्व वाहून टाकण्याचा हाच समय आहे. आपला प्रभू विचारत आहे , हे माझ्यासाठी करायला कोण तयार आहे?

Previous Article

संपादकीय

Next Article

कृपेद्वारे घडवले जाणे

You might be interested in …

देवाचे गौरव येशू

जॉन मकआर्थर “परमेश्वराचे गौरव प्रकट होईल” (यशया ४०:५), हा ख्रिस्तजन्माचा संदेश आहे. येशूचा जन्म हा यशयाच्या अभिवचनानुसार देवाच्या गौरवाचे प्रकटीकरण आहे. ख्रिस्तजन्माच्या देखाव्याचा आशय देवाचे गौरव आहे. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव हे गाणे देवदूतांनी गायले, प्रभूचे […]

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ्

( १७२६-१७९८) लेखांक  १२                            पुढील घटनेचा भारताशी संबंध असल्याने ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. प्रशियातील सोनमर्ग गावी १७२६च्या ॲाक्टोबर अखेरीस शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका तरुणीने आपल्या पतीला व पाळकाला बोलावले. आपले बाळ त्यांच्या […]

वधस्तंभ – देवाची वेदी

 डॉनल्ड मॅकलोईड प्रत्येक विश्वासी व्यक्तीचा प्रायश्चित्तासबंधीचा काही तरी सिद्धांत असतो. अखेर विश्वास हा वधस्तंभावर गेलेल्या तारणाऱ्यावर भरवसा आहे आणि ह्यासबंधी काही समजले नाही तर विश्वास हा अशक्य आहे. विश्वासाला पहिल्यापासून माहीत असते की वधस्तंभावर कोणी […]