दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

असमाधान

लेखक: अॅबीगेल ससाणे

समाधानी नसणे किंवाअतृप्त असणे या समस्येशी आपल्या सर्वांचाच झगडा चालू असतो. ही समस्या कदाचित आपल्या जीवनातील लोकासंबधीअसेल, आरामदायी जीवनशैलीचा अभाव असेल, कामावरची कठीण परिस्थिती असेल, अनपेक्षित आजाराशी करावा लागणारा मुकाबला असेल. अशा कितीतरी गोष्टीआपल्याला असमाधानी करतात.
आपली वैयक्तिक ध्येये प्राप्त करताना किंवाजगिक प्रमाणांशी जुळवण्याचा प्रयत्न करताना असमाधानआपल्याला ख्रिस्तामध्येमिळालेला आनंद व शांती दूर ढकलून टाकते.हे जणू एखाद्या किडीसारखे आपला जीव कुरतडून टाकते आणि आपल्याला रिकामे आणि नकोसे करून टाकते. ते नकळत आपल्यामध्ये शिरते आणि आपण कोरडे आणि निराश कधी झालो हे आपल्याला समजूनही येत नाही.

जग एक चुकीची कल्पना आपल्यामध्ये पसरवते की फक्त जगातील सुखे व आकर्षणेच आपल्याला समाधानदेऊ शकतात.पणप्रेषित पौल आपल्याला पुन्हा आणि पुन्हा ते कोठे मिळेल हे सांगतो: ख्रिस्तामध्ये आणि त्याच्या वचनामध्ये.येशूसाठी तुरुंगात कैदी असताना फिलीपै येथील मंडळीला आत्मविश्वासाने तोहे शब्द लिहितो, “प्रत्येक प्रसंगी व सर्व प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्याचे शिक्षण मला मिळाले आहे. मला सामर्थ्य देणाऱ्याच्या ठायी मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे” (फिली. ४:११ते१३).

अतृप्ततेशी मुकाबला करण्याचे तीन मार्ग
असमाधानाशी लढा देताना त्यामध्ये या पापाला ठार करण्याचा समावेश आहेआणि याची सुरुवात खिस्ताचे सौंदर्य पाहणे आणि त्याच्या पुरवठ्यामध्ये चिंब न्हाऊन जाण्यामध्ये आहे.

१. तुमचे मन येशूकडे लावा
जेव्हा तुम्ही कोणाला किंवा कशालातरी देवासारखे मोठे किंवा अधिकसुख समाधान देणारेपाहता तेव्हा तुमच्या मनात असमाधानी वृत्ती रुजू लागते. प्रथम हे समजून घ्या की समाधान हे फक्त ख्रिस्तामध्येच मिळू शकते. कलसै ३:१-३ आपल्याला आठवण करून देते की आपण आपले लक्ष फक्तख्रिस्तावरच आणि स्वर्गाकडे केंद्रित करायला पाहिजे. “यास्तव जर तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले आहे.”

देवाच्या वचनावर मनन करणे आणि प्रार्थना करणे हे ख्रिस्तावर मन बसवण्याचे वत्याचे वैभव पाहण्याचे दोन आश्चर्यकारक मार्ग आहेत. असमाधानाच्या विचारांशी मुकाबला करताना किंवा एखाद्या परिस्थितीबद्दल तक्रारकरावीशी वाटत असताना देवाने तुम्हाला शक्ती द्यावी म्हणून प्रार्थना करा. त्याच्यावरआपली सर्व चिंता टाकण्याचे (१ पेत्र ५:६) लक्षात ठेवा.असमाधानाला तोंड देताना वचने पाठ करण्याने, देवाच्या वचनाने तुम्ही सुसज्ज केले जाल. माझे एक आवडते वचन मी माझ्या मनात जपून ठेवले आहे ते म्हणजे स्तोत्र १६:११.“जीवनाचामार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे. तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत.”….यामध्ये किती आनंद आहे! आपले असमाधानाचे ओझे दूर सारण्यासाठी “आपल्या विश्वासाचा उत्पादक व  पूर्ण करणारा येशू याकडे आपण पाहत राहायला हवे” (इब्री १२:२).

२. ख्रिस्तामध्ये असलेल्या तुमच्याआशीर्वादांचा आनंद घेण्यास सुरवात करा
दुसऱ्या बाजूला असलेले  गवत नेहमी जास्त हिरवे दिसते अशी एक म्हण आहे. आपल्यापैकी अनेक जण अशा वृत्तीचे भक्ष ठरतात. आमच्याकडे जे नसते तेच आम्हाला हवे असतेआणि तेच आम्ही आमचे ध्येय बनवतो.पण जेव्हा तुम्हाला ख्रिस्त लाभतो“ तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये पूर्ण केलेले आहात”(कल.२:१०)आणि“तुमचे जीवनख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले आहे”(कल. ३:३). तसेच“त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वर देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे”(इफिस १:३). या जगातील चंचल/सरणाऱ्या गोष्टी अंधुक होत जातात.आणि ख्रिस्तामध्ये आपली पूर्णता आहे हे पाहून त्याच्यामध्ये जे आहे त्याचा आपण खऱ्या अर्थाने आनंद घेऊ शकतो. प्रेषित पौलाप्रमाणेच हे जग आपल्याला जे काही देऊ करते तेसर्वआपण सोडून देऊ शकतो कारण आपल्याला जे पारितोषिक मिळणार आहे ते सर्वात मोठे आहे (फिली. ३:८).
या पृथ्वीवरील सौख्यांतून आपले लक्ष काढून देवापासून जे आपल्याला प्राप्त झाले आहे त्यामध्ये आपण कसा आनंद करू शकतो? हे समजण्यास मदत होईल असे खाली काही व्यावहारिक मार्ग दिले आहेत:

* एक,देवाने तुम्हांला तुमच्या जीवनात जे जे आशीर्वाद दिले आहेत ते लिहून काढा. रोज नव्या सुर्योदयाचे सौंदर्य तुम्ही पाहू शकता येथून सुरुवात करू शकता.जसजसे तुम्ही तुमचे आशीर्वाद मोजू लागाल तसतसे तुम्हाला दिसू लागेल की ख्रिस्तामध्ये तुम्हाला किती तरी गोष्टी मिळाल्या आहेत.

*दुसरा एक मार्ग म्हणजे असमाधानी वृत्तीशी असलेला तुमचा हा झगडा तुमच्याडायरीत लिहीत जा.जसजसे तुम्ही देवावर अवलंबून राहता तसतसे प्रभूचा विश्वासूपणा तुम्हाला काही आठवड्यात, महिन्यात किंवावर्षानंतर दिसून येईल.

* तिसरी गोष्ट म्हणजे आपली इतरांशी तुलना करण्याचे थांबवा.तासनतास टीव्ही , फेस बुक पुढे बसून घालवल्यास अशा असमाधानी वृत्तीला खत मिळते. तेथे लोकांची जीवनशैली पाहून, त्यांची लग्ने, देश- विदेशातील त्यांचे प्रवास व धमाल पाहून त्यांची जीवने आपल्या तुलनेत फारच आकर्षक वाटू लागतात. अशाजगिक इच्छांबद्दल बायबलचे स्पष्ट मत आहे, “जग आणि जगाची वासना ही नाहीतशीहोत आहेत पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो”(१ योहान २:१७).

३. तुमच्या जीवनाची गुंतवणूक अनंतकाळच्या प्रकाशात करा
पुथ्वीवरचे आपले जीवन लहान आहे. आपण आपल्या सोबत कोणतीच मालमत्ता घेऊन जाऊ शकणार नाही.
१ तीमथ्य ६:६-८ ही वचने  आपण आपले आयुष्याची गुंतवणूक कोठे करावी यावर भर देतात, “संतोषसहित असलेली सुभक्ती तर मोठाच लाभ आहे. आपण जगात काही आणले नाही, आपल्याच्याने त्यातून काही नेववत नाही.आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्याने तृप्त असावे.”

जगातील संपत्तीच्या मागे धावून असमाधान वाढते करण्याऐवजी “स्वर्गात आपणाकरिता संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घर फोडून चोरी करीत नाहीत”( मत्तय ६:२०). ही संपत्ती तुम्ही कशी साठवू शकता? तुमच्यावेळातला वेळ काढून आपल्या गरजू  विश्वासणाऱ्याभावाला/बहिणीला  उत्तेजन द्या. प्रभूला आणि जे गरजेत आहेत त्यांना आनदाने द्या. तुमचे घर लोकांसाठी खुले ठेवा. चर्च सुटल्यावर किंवा शास्त्राभ्यास संपल्यावर लोकांबरोबर वेळ घालवण्यातआनंद घ्या. प्रभूने तुमच्यावर जशी प्रीती ओतली तशी तुम्ही इतरांवर प्रीती करा.

अनंतकाळसाठी गुंतवणूक केलेला वेळ कसा असतो याचे पौल वर्णन करतो. प्रीतीने भरलेला, इतरांना चांगुलपणा दाखवणारा, सेवा करणारे ह्रदय, संकटामध्ये आनंदी, इतर विश्वासीयांच्या गरजा भागवणारा व पाहुणचार करणारा (रोम १२:९-१३).

पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला असमाधानी वाटेल तेव्हा प्रभू पुरवत असलेल्या सामर्थ्याने त्याच्याशी लढा करा.प्रत्येक पावलागणिक त्याच्याकडे पाहत राहा. तो विश्वासू आहे आणि तुम्हाला पेलवता येणार नाही इतके ओझे तो तुमच्यावर कधीच लादणार नाही तर त्यातून टिकून राहण्याचा मार्ग पुरवील (१ करिंथ १०:१३).

अबिगेल ससाणे

मी अबिगेल. पत्नी, गृहिणी, स्वतंत्र शैलीचीलेखिका अशा निरनिराळ्या भूमिका पार पाडण्यात मी आनंद घेते. मला वाचायला, प्रवास करायला, कलाकुसरीच्या बस्तू बनवायला, पाकक्रिया करायला पण खूप आवडते. माझा जन्म व वाढ ख्रिस्ती घराण्यात झाली. अठराव्या वर्षी एका यूथ कॅम्पमध्ये ख्रिस्ताने माझे डोळे उघडून शुभवर्तमानातील सत्य मला दाखवले व मला मुक्ती मिळाली. तेव्हापासून माझे जीवन पूर्णपणे बदलून गेले.

 

Previous Article

लेखांक ५ माझ्या प्रिय पत्नीच्या देवाघरीजाण्यामुळे माझ्या जीवनामध्ये आलेला अर्थ

Next Article

स्वर्गाची उत्कट इच्छा

You might be interested in …

सर्वात वाईट शुक्रवारला आपण उत्तम शुक्रवार का म्हणतो?

  लेखक- डेविड मॅथीस जगाच्या सर्व इतिहासातला तो एकमेव भयानक, निष्ठूर असा दिवस होता. अशी दु:खद घटना कधी घडलेली नाही आणि भविष्यात अशी घटना घडणे शक्य नाही. कोणतेही दु:खसहन इतके अयोग्य ठरलेले नाही. कोणत्याही मानवाला […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ७ उत्पत्ती ३ व […]

काबीज केलेले, समर्पित, संसर्गजन्य लेखक : मार्शल सीगल

नवीन वर्ष हा एकमेव समय असतो जेव्हा आपण थांबून आपला समाज – चर्च, आपले अभ्यासगट, आपले मित्रमंडळ यांचा आढावा घेतो. मला असे विश्वासी जन भेटले आहेत का ज्यांनी मला माझ्या विश्वासात चालण्यात मदत केली? (इब्री. […]