Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on अप्रैल 13, 2016 in जीवन प्रकाश

उत्तेजनाचे कृपादान

उत्तेजनाचे कृपादान

लेखक: जेम्स फॅरीस

मंडळीमध्ये असे काही लोक असतात की त्यांना वाटते त्यांना लोकांनानिराश करण्याचे  आध्यात्मिकदान मिळाले आहे . एवढेच काम ते करत असतात-इतरांना निराश करणे. आणि सत्य परिस्थिती पहिली तर आपण सर्वच एखाद्या वेळी नव्हे तर अनेकदा  “असे लोक”असतो. कोणत्याही परिस्थितीत तक्रार करणे किंवा नकारात्मक रीतीने पाहणे आपल्याला फार सोपे वाटते. यामुळेच एखादी व्यक्ती जेव्हाप्रत्यक्ष उत्तेजन असते तेव्हा ते आपल्या लगेच लक्षात येते.  प्रेषितांनीअशा एका व्यक्तीची दखल घेतली त्याचे नाव होते योसेफ. तो सामान्य नव्हता हे त्यांना समजले. त्यांनी त्याला बर्णबा म्हणायला सुरुवात केली. मूळ भाषांतरानुसार या नावाचा अर्थ आहे “उत्तेजनाचा पुत्र” किंवा पंडिता रमाबाईंच्या भाषांतरात“सांत्वनाचा पुत्र” असे म्हटले आहे (प्रेषित ४:३६).

बर्णबा जसजसा उत्तेजन देऊ लागला तसतशी मंडळीची झपाट्याने वाढ होऊ लागली. १ करिंथ ३:६-७ मधून हेआपल्याला समजते. जेव्हा आपण  वाढीसंबंधी बोलतो तेव्हा कोणी पेरतो, कोणी पाणी घालतो पण फक्त प्रभूच वाढ घडवून आणतो. उत्तेजन हे पाणी घालण्याचा एक प्रकार आहे.

रोम १२:७ मधून आपण शिकतो की उत्तेजनहे एक आध्यात्मिक कृपादान आहे. सर्वांनाच ते सम प्रमाणात मिळत नसते. बर्णबाला त्याचा खूप मोठा वाटा मिळाला होता. जरी काहींना हे खास दान मिळालेले असले तरी पौलाने सर्व विश्वासीयांना एकमेकांना उत्तेजन देण्याचे काम करा असा बोध केला आहे (१ थेस्स. ५:११). ज्यांना उत्तेजन देण्याचे दान मिळाले आहे त्यांचे निरीक्षण करूनइतर विश्वासी या विभागामध्ये वाढू शकतील. आपणचांगले उत्तेजन देणारे बनावे म्हणून बर्णबा पासून आपण काय शिकू शकतो? उत्तेजनदेणाऱ्याच्या जीवनाची गुणवैशिष्ट्ये काय असतात?बर्णबाच्या जीवनातून शिकता येतील असे पाच गुणविशेष आपण पाहू जे उत्तेजन देणाऱ्या व्यक्तीमध्ये असतात. (जर तुम्ही बर्णबाच्या चरित्राचा अभ्यास केला तर तुम्हाला नक्कीच याहून अधिक गुणविशेष आढळतील.)

१. उतेजक त्यागपूर्वक देतो. प्रेषित४:३७ मध्ये बर्णबाने स्वत:ची जमीन विकून तिचे पैसे दिल्याचाउल्लेख आहे. बर्णबाच्या पार्श्वभूमीविषयी आपल्याला विशेष ठाऊक नाही, पण हे स्पष्ट दिसते की येशूने त्याचे तारण करण्यासाठी आपल्या स्वत:च्या जीवनाचा त्याग करून ते दिले हे त्याला ठाऊक होते.कृतज्ञपूर्वक अंत:करणाने त्याला येशूच्या येशूच्या पावलावर पाऊल टाकायचे होते आणि स्वत:ला देवाच्या गौरवासाठी देऊन टाकायचे होते कारण त्याचे  लोकांवर प्रेम होते. उत्तेजक व्हायचे असेल तर स्वत:चीच किंमत भरावी लागते. खर सांगायचं तर त्यामध्येपैशांचीमदत करणेयेणार नाही,पण तुमच्या वाहनाने तेथे जाणे, तुमचा वेळ देणे , तुमची शक्ती खर्च करणे असा त्याचाअर्थ होईल. काहीही असो, इतरांना उत्तेजन देण्यास तुम्हाला स्वत:ला द्यावेच लागते.

२. उत्तेजक दुसऱ्यांना सेवेमध्ये ओढून घेतात. बर्णबाने पाहिले की पौलाच्या परिवर्तनानंतर यरुशलेमातील इतर विश्वासी त्याच्यावर विश्वास टाकत नव्हते (प्रेषित ९:२६-२८). मग त्याने पौलाला आपल्या कवेत घेतले. कारण येशूने प्रथममाझ्यासाठी हेच केले हे त्याला माहीत होते. पौलाच्याअरबस्तानातील वास्तव्यानंतर  बर्णबाने पुन्हा पौलाला सेवेत  ओढून घेतले. (प्रेषित ११ :२५-२६). त्याने आपला नातलग योहान मार्क यालाही सेवेमध्ये आणले (प्रेषित १२:२५). आपण निष्कर्ष काढू शकतो की असाच त्याने इतरांवर पण प्रभाव टाकला. तुमच्या सेवेमध्ये असे तुम्ही इतरांना ओढून घेता का ? उत्तेजक असे करतात.

३. उत्तेजक देवाची कृपा पाहतात. अन्त्युखियायेथील नव्या मंडळीकडे बर्णबा गेला. तेथले अनेक विश्वासी अजून पूर्णपणे शुद्ध जीवन जगत नव्हते यात शंका नाही. कदाचितमंडळीला जमण्यासाठी त्यांना जागा मिळत नसावी किंवा बायबल अभ्यासाच्या वेळेस मुलांना सांभाळण्यास मदत नव्हती , आर्थिक समस्या होत्या, विश्वासीयांच्या जीवनात पाप होते, ईश्वरज्ञान अपूर्ण होते आणि लोकांमध्ये संघर्ष होते. तरीही जेव्हा बर्णबा तेथे आला तेव्हा प्रे. कृ. ११:२३ म्हणते की, “तेथे पोचल्यावर देवाची कृपा पाहून तो हर्षित झाला.” देवाची कृपापाहून  त्याला आनंद झाला. तुमच्या जोडीदारामध्ये, तुमच्या मुलांमध्ये किंवा मंडळीच्या लोकांच्या जीवनामध्ये तुम्ही प्रथम आणि दररोज देवाची कृपा पाहता का?त्यामध्ये  तुम्ही आनंद करता का? तुम्हाला त्यामुळे आनंद वाटतो हे इतरांना समजते का?की तुम्ही जी परिस्थिती अथवा व्यक्ती पाहता त्यांच्यातल्या चुका तुम्हाला प्रथम दिसतात आणि त्यावर तुम्ही शेरे मारता?बर्णबासारखे विश्वासाने आणि पवित्र आत्म्याने भरलेल्या(प्रेषित ११:२४) लोकांनाचदेव जेकरत आहे ते प्रथम आणि प्रामुख्याने दिसते. मग ते इतरांना त्यांनी विश्वासात चालावे म्हणून उत्तेजन देऊ शकतात (प्रेषित १४:२२).

४.उत्तेजक कथा सांगतात. कृपेच्या कथा सांगतात. प्रेषित १४:२७, १५:५ आणि १५:१२ मध्ये बर्णबाने अशाच कथा सांगितल्या. एखाद्या मुलाच्या यशाची गोष्ट जेव्हा तुम्ही इतरांना सांगता तेव्हा त्याचे डोळे कसे चमकू लागतात हे तुम्ही पाहिलंय? त्यांनी चेंडू कसा मारला किंवा पियानो कसा वाजवला ह्याबद्दल तुम्ही एवढा विचार केला यामुळेच त्यांना उत्तेजन मिळते. जेव्हा आपण देवाच्या कृपेच्या गोष्टी सांगत असतो तेव्हा ज्याला ह्या कृपेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला त्या व्यक्तीला व ज्यांनी ते ऐकले त्या सर्वांना त्यामुळे उत्तेजन मिळते. वॉल्टडिस्ने यांनी१९५०च्या दशकात  फ्रान्सिस मेरियनया टी.व्ही मालिकेचीओळख करून देताना म्हटलेकी “मेरियनची  गोष्ट हजारो कॅम्प फायर भोवती सांगण्यात आली आहे .आम्हा अमेरिकनलोकांना अजूनही गोष्टी आवडतात. पण मी धिटाई करून  म्हणतो की आपण गोष्टी सांगण्याचे काम आता हॉलीवूडकडे सोपवले आहे आणि वैयक्तिक गोष्ट सांगण्याची कला गमावली आहे.” देवाच्या कृपेची गोष्ट आज तुम्ही कुणाला सांगितली आहे? लोकांना गोष्टी आवडतात. आपण असे लोक असावेत की ज्यांना हजार गोष्टी सांगायला हव्यात – कृपेच्या गोष्टी – ज्या आमच्या आणि इतर विश्वासीयांच्या जीवनात प्रदर्शित होतात. त्याहून विशेष म्हणजे देवाच्या वचनात दिसणारी तारणाची कथा सांगायला आपण नेहमीच तयार पाहिजे.

५. उत्तेजक देवाने लोकांना बदलावे अशी अपेक्षा करतो.पौलाला बर्णबाकडून पूर्वी खूपच उत्तेजन मिळाले होते . पण योहान मार्क याला दुसऱ्या मिशनरी फेरीवर सोबत घ्यायला तो तयार नव्हता कारण पहिल्या फेरीत तो त्यांना मध्येच सोडून गेला होता (प्रेषित १५:३६-४०). मार्क अपयशी ठरला होता. बर्णबाला हे अगदी बरोबर  ठाऊक होते. पण त्याचा देवावर विश्वास होता आणि देव मार्कला बदलेल असा विश्वास त्याने धरला. पौल व बर्णबा हे विभक्त झाले.बर्णबाने मार्कला सोबत घेतले तर पौलाने सीलाला. या गोष्टीचा शेवट आपल्याला कलसै ४:११ मध्ये दिसतो. पौल आपल्या जीवनाच्या अखेरीस आला असताना लिहितो “बर्णबाचा बंधू मार्क हा ही तुम्हाला सलाम सांगतो.. तो आला तर त्याचा स्वीकार करा.” या गोष्टीचा हा  लगेच दिसणारा शेवट आहे. पण ही गोष्ट पुढे चालूच राहते कारण बर्णबाद्वारे मार्कला बदलण्याचे जे काम देवाने केले ते पाहून आपण देवाची स्तुती करणे चालूच ठेवतो.दुसऱ्याचे पतन झालेले पाहून उत्तेजक त्यांना वजाबाकीत काढत नाही. ते त्यांना उभे करतात व देवाच्या कृपेवर विश्वास ठेवतात. परिणाम? जीवने कायमची बदलतात, मंडळी कायमची बदलते आणि येशू ख्रिस्ताला सर्वदा गौरव दिला जातो.