Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on मई 13, 2016 in जीवन प्रकाश

स्वर्गाची उत्कट इच्छा

स्वर्गाची उत्कट इच्छा

माझ्या प्रिय पत्नी रीटाच्या देवाघरी गेल्यानंतर व माझ्या अत्यंत मोठ्या आणि कधीही न भरून येणाऱ्या हानीच्या तीव्र दु:खांतून जात असताना जी गोष्ट फार प्रकर्षाने माझ्या मनात आली व जिने मला खोलवर विचार करावयास भाग पाडले ती ही की–  रीटाचा आत्मा कोठे गेलाआहे? ती (तिचा आत्मा) काय करत असेल? तिला (तिच्या आत्म्याला या जगातील घडामोडींबद्दल काहीही माहीत होत असेल काय? रीटा  बरोबरचे ‘पुनर्मिलन’ हे कोणत्या प्रकारचे असेल? स्वर्ग कसा असेल आणि रीटाचाआत्मा स्वर्गात कसा असेल ? पहिल्या पुनरुत्थानाच्या पूर्वी ‘नवीन शरीरे’ मिळण्याआगोदर तारण झालेले देवाकडे गेलेले आत्मेम्हणूनआपणआम्ही एकमेकांना जाणू, भेटू व तसेच एकमेकांशी संभाषणकरू शकू काय? की गौरवी शरीर मिळेपर्यंत आपण तेथे असूनही एकमेकांशी संपर्क साधू शकणार नाही?या प्रकारचे विविध प्रश्न मला पवित्र शात्राच्या अधिकाअधिक व सखोल अभ्यासाकडे आणि या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकडे घेउन गेले. याच बरोबर ही जिज्ञासा मला पवित्र शात्राशी निगडीत साहित्यांमधून आणखीन शोध घेण्यास व तसेच काही देवाचे अभिषिक्त, पवित्र शात्राचे शिक्षक व विव्दानांच्या लिखाणांकडे आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांकडे घेऊन गेली. या संदर्भात मी पाळक जॉन मकऑर्थर  यांचे ‘स्वर्गाचे गौरव’ हे पुस्तकही वाचले. तसेच सन २०१३ मध्ये आयोजित पवित्र शात्राच्या राष्ट्रीय उलगडात्मक परिषदेत बंधू अँजेलो टॉलेंटीनो यांनीही या विषयावर शिक्षण दिले होते. या सर्व ‘मदतींव्दारे’ माझी या विषयासंबंधीची अस्पष्टता दूर होण्यात व त्याच बरोबर या विषयाच्या बाबतीत माझा समज वाढण्यात मदत केली. उदा: स्वर्गाची वास्तविकता, स्वर्ग कसा असेल आणि स्वर्गात आम्ही कसे असू. या सर्वांमुळे पवित्र शात्रात दिलेल्या अभिवचनांवरचा माझा विश्र्वास अधिक खंबीर होण्यात मदत झाली की (अ) स्वर्ग वास्तविक आहे  (ब) रिटा (तिचा आत्मा)’ सर्वोत्तम’ ठिकाणी गेला आहे (क) रीटा(तिचा आत्मा) हा आमच्या त्र्येक  देवाबरोबर  (देव पिता, प्रभु येशू व पवित्र आत्मा) व तसेच देवदूतांबरोबर आणि तिच्या आगोदर देवाकडे गेलेल्या सर्व विश्र्वासणाऱ्यांबरोबरआहे (ड)तिला (तिच्या आत्म्याला) या जगातील गोष्टी फारश्या आठवत नाहीत कारण देवाने तिला जास्त उत्तम प्रकारच्या  आनंदाने व्यापलेले आहे (इ) आमचा आमच्या प्रिय व्यक्तीशी  कसे ‘पुनर्मिलन’ होईल याचा ‘अनुभव’ आम्हाला स्वत: घ्यावा लागणार आहे.

ख्रिस्तामधील विश्र्वासणाऱ्यांचा या पृथ्वीवर शेवटचा श्र्वास हा त्यांचा स्वर्गामधील पहिला[1] श्र्वास असतो

कारण विश्र्वासणाऱ्यांची तंबूपासून महालातउन्नती होते!  – बिली ग्रहॅम

माझ्या प्रिय पत्नी रीटा हिच्या वियोगाच्या दु:खातून अतिशयमंदगतीने परत वर उभारताना, ‘स्वर्गासंबंधी’ विचार करत रहाण्यामुळे मला माझे दु: ख कमी होण्यात,  मी शांत होण्यात, माझ्या जीवाला शांतता प्राप्त होण्यात आणि देवावरचा माझा विश्वास अधिक बळकट होण्यात फार मदत झाली.ही गोष्ट मला माझा देवावरचा विश्वास अधिक बळकट व दृढ होण्यात मदत करत आहे. या विषयावर जे काही थोडे  मी शिकलो ते याप्रकारे आहे:

  • आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की लवकर किंवा उशीरा आम्ही सर्वजण हे जग ‘सोडून जाणार’ आहोत! पवित्र शास्त्रानुसार आम्हाला जाण्यासाठी दोनच ठिकाणे आहेत–स्वर्ग व नरक! पुष्कळश्या मानवजातीला हे माहीत आहे की या जगाचा निर्माणकर्ता – सर्वोच्च जो देव हा स्वर्गात वास करितो आणि सैतान हा या जगाचा अधिपती आहे, परंतु शेवटी त्याला नरकांत ‘पाठविले’ जाईल.सर्वांना हेही माहित आहे ‘स्वर्ग’ हे जाण्यासाठी ‘सर्वोत्तम’ स्थान आहे व नरक एक ‘वाईट स्थान आहे व ते टाळावे. एकदा का देवाने ‘मानवी जीवन’ घडविले तर ते अनंतकाळासाठी ,  कायमस्वरूपी असते आणि म्हणून आमचे या पृथ्वीवरील ‘काही’ वर्षांचे’ जीवन संपल्यानंतर, आम्हाला स्वर्गात किंवा नरकात जावे लागणार आहे. सर्वजण हेही स्वीकार करतात की ‘वाईट व्यक्ती’ स्वर्गात जाणार नाही परंतु पुष्कळांना हे माहीत नाही किंवा तेस्वीकारीत नाही की अनेक ‘चांगले लोक’ देखील स्वर्गात जाणार नाहीत!पवित्र शात्रानुसार ज्या व्यक्तींनी आपला अढळ विश्वास येशू ख्रिस्तावर आपला प्रभू व तारणारा म्हणून ठेवला आहे व म्हणूनच त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे, असेच फक्त स्वर्गात प्रवेश करू शकतील! म्हणून , ख्रिस्तामध्धे विश्वास ठेवणाऱ्यांची अंतिम आणि उत्सुक अपेक्षा व आशा ही स्वर्गात जाण्याची असते.

 

कारण आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगीत आहे. इतकेच केवळ नव्हे तर ज्या आपल्याला आत्म्या हे प्रथम फळ मिळाले आहे ते आपणही स्वत: दत्तकपणाची म्हणजे आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असतां आपल्या ठायी कण्हत आहोत.कारण आपण अशी आशा धरून तरलो; जी आशा दृष्य झाली आहे ती आशाच नव्हे. जे दृष्य झाले आहे त्याची आशा कोण धरील? पण जे अदृष्य त्याची जर आपण आशा धरली तर धीराने आपण त्याची प्रतीक्षा करत असतो ” (रोम. ८: २२-२५).

 

(२) (अ) एका विश्वासणाऱ्या व्यक्तीचे मरण हे एक ‘सुखद मरण’ असते कारण खरे तर ती व्यक्ती त्याच वेळी या जगातून स्वर्गात जाते! हाच आमच्या विश्रासाचा पाया आहे की ख्रिस्त  मरण पावला व मरणातून पुन्हा उठला आणित्याने आम्हांला हेच पुनरूत्थानाचे अभिवचन दिले की जी व्यक्ती त्याच्यावर विश्वास ठेवते ती ‘मृत्यू’  समयीच ‘अनंतकाळच्या जीवनामध्ये’ प्रवेश करील. देवासाठी या पृथ्वीवरील प्रत्येक ‘जीवनामागे’  त्याचा उद्देश असतो आणि ज्यावेळी त्याचा त्या व्यक्तींबंधीचाउद्देश पूर्ण होतो त्यावेळी त्या व्यक्तीचे पृथ्वीवरील ‘जीवन’ ही समाप्त होते!

कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याचप्रमाणे देवही येशूबरोबर त्याच्यावरच्या (येशू्वरच्या) विश्वासात जे मरण पावलेले आहेत त्यांनाही तश्याच प्रकारे परत जिवंत करील …… “(१ थेस्सलीकरांस ४:१४).

“No guilt in life, no fear in death[2]

This is the power of Christ in me!

From life’s first cry, till final breath

Jesus commands my destiny

No power of hell, no scheme of man

Can ever pluck me from His hand 

Till He returns or calls me Home

Here in the power of Christ I stand”

 

(ब) कारण की आत्मा हा नेहमीच ‘सजीव’ असतो, त्याचे अस्तित्व कधीही संपत नाही. म्हणून ‘मृत्यू’ हा आमच्या अस्तित्वाचा कायमचा शेवट नाही. आमचा आत्मा हा नेहमीच ‘जाणीव” अवस्थेत असतो आणि ‘अनंतकालिक’ आहे!

मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्र्वास फुंकला आणि तेव्हा मनुष्य जीवधारी (जिवंत) प्राणी झाला”(उत्पत्ति २:७).

तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, ‘हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो……” (लूक २३:४६).

मृत्यूच्या वेळी विश्वासणाऱ्या आत्मा त्वरित मानवाच्या शरीरापासून विभक्त होतो व त्याक्षणीच स्वर्गाकडे कूच करतो.

तेव्हा येशू त्याला म्हणाला,” मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुखलोकात असशील”! (लूक २३: ४३ ).

चार्ल्स स्पर्जन यांनी योग्यपणे सांगितले आहे की क्षमा पावलेला तो चोर हा या पृथ्वीवरील येशूचा शेवटच्या सोबती होता आणि स्वर्गातील पहिला सोबती झाला!’

(क)  कारण आत्मा हा ‘अनंतकालिक’ आहे, म्हणून त्याचा कधीही ‘नाश’होत नाही.

आणि ते दगडमार करीत असता स्टीफन प्रभूचा धावा करत म्हणाला हे प्रभू येशू, माइया आत्म्याचा स्वीकार कर’ ” (प्रेषितांची कृत्ये ७: ५९).

(ड) (i) म्हणून स्वर्गात जाण्यासाठी, (आणि केवळ ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारेच तेथे जातात) एकतर त्या व्यक्तीला मेले पाहिजे किंवा ज्यावेळी प्रभू येशू जिवंतअसलेल्या व त्याच्यावर विश्र्वास ठेवणाऱ्यांना घेण्यास येईल त्यावेळी त्याच्याबरोबर गेले पाहिजे! म्हणून विश्वासणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या मृत्यूची अपेक्षा नेहमीच बाळगली पाहिजे व त्याचे भय बाळगू नये. (नैसर्गिक ‘अज्ञाताची भीती’  जी देवाने प्रत्येक मानवाला दिली आहे ती वगळता). आम्ही सर्वांनी ‘आदामाच्या पापामध्ये’ जन्म घेतलेला आहे आणि जर येशूने लगेच परत यायच्रे ठरविले नाही तर  आम्ही सर्वजण मरण पावू कारण आम्ही सर्वांनी पापे केली आहेत आणि आमच्या पापांचे वेतन हे मरण आहे!

 

आणि ज्याअर्थी माणसांना एकदाच मरणे……नेमून ठेवले आहे ……” (इब्री ९: २७ अ)

कारण पापाची मजुरी मरण आहे. पण देवाची आम्हाला दिलेली मोफत देणगी (कृपादान) हे आमच्या प्रभू ख्रिस्त येशूमध्ये सार्वकालीन जीवन आहे” (रोम. ६: २३).

(ii) म्हणून ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी, मृत्यू हा शेवट नाही. ही तर  एक ‘नवीन सुरुवात’ आहे!  म्हणून प्रत्यक्षात मृत्यू ही एक दु: खी घटना नव्हे तर एक सुखद घटना आहे,  कारण याव्दारे  देव आम्हांला त्याच्या उपस्थितीत नेहमीसाठी आमंत्रित करतो! प्रभू ख्रिस्ताचे ‘त्याच्या लोकांना’ घेऊन जाण्यासाठी होणाऱ्या गुप्त आगमनाच्या वेळी जे ‘येशूमधील विश्वासी आहेत त्यांना सोडून,  देवाच्या महिम्यामध्ये वसानिध्यात जायचा केवळ हाच एकमेव मार्ग आहे. येशूच्या पुनरुत्थानाच्या वेळी मृत्यूचा ‘नाश’ झाला व  प्रभू येशच्या रक्ताव्दारे आम्हाला   अनंतकाळच्या जीवनाची हमी मिळाली आहे.

“Then bursting forth in glorious Day[3]

Up from the grave He rose again!

And as He stands in victory

Sin’s curse has lost its grip on me

For I am His and He is mine

Bought with the precious Blood of Christ”

 

                                                                                                               क्रमशः