जनवरी 7, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

स्वर्गाचीउत्कट इच्छा

(५) (अ) पवित्र शास्त्रानुसार ‘सध्याच्या ‘स्वर्गाच्या ३ पातळ्या आहेत– पहिली वातावरणाची, दुसरी ग्रहमंडळाची व तिसरी ही अनंतकाळाची. मृत्यूनंतर- देवाने जिवंत असतांना त्याच्याकडे घेऊन जाण्यामुळे-‘विश्वासणारी व्यक्ती सरळ ‘तिसऱ्या पातळीच्या’ स्वर्गांत जाते व म्हणून आम्हीही सर्व विश्र्वासणारे सरळ ‘सुखलोकात’ जाऊ! स्वर्ग हीदेवाची ‘खरोखरची’राहायची जागा आहे किंबहुना तो ‘सार्वभौम, सर्वशक्तिमानआणि सर्वजाणणारा’  देव असल्यामुळे स्वर्ग देखील त्याला ‘सामावू’ शकत नाही!

ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे ज्याला …… तिसऱ्या स्वर्गापर्यंत घेऊन जाण्यात आले होते ……  त्या मनुष्याला सुखलोकात उचलून नेण्यात आले होते ……आणि त्याने व्यक्त न करता येणाऱ्या व ज्यांचा उच्चार करण्याचीही माणसांना परवानगी नाही, अशा गोष्टी ऐकल्या…… “(२ करिंथ १२: २ (अ), ३ (अ), ४ (अ) व ७ (ब) ).

“(परमेश्वरा) पवित्र निवासस्थानातून, स्वर्गातून अवलोकन कर ……” (अनुवाद २६:१५अ).

मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ? मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊमी जर स्वर्गात गेलो तर तेथे तू असतोस; अधोलोकी मी आपले अंथरुण घातले तरीही तेथे तू असतोस! मी पहाटेचे पंख धारण करून समुद्रच्या अगदी पलिकडल्या तीरावर जाऊन राहिलो तर तेथेही तुझा हात मला चालवील; तुझा उजवा हात मला धरून ठेवील”  (स्तोत्र १३:७ ते १०).

तेव्हा तो (येशू) त्याला म्हणाला, ‘मी तुम्हांला खचित सांगतो की, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील!” (लूक २३: ४३).

 

(ब) स्वर्गामध्ये आम्ही त्र्यैक देवाला (देव पिता, येशू आमचा प्रभू, देव पवित्र आत्मा), देवदूत, देवाचे संदेष्टे व संतगण, सर्व राष्ट्रांमधील आणि सर्व पिढ्यांतील सहविश्वासणाऱ्यांना (ज्याध्ये आमच्या ‘विश्र्वासणाऱ्या प्रियजनांचा समावेश असेल) भेटू!

“…… हे आमच्या स्वर्गातील पित्या ……” (मत्तय६:).

कारण ख्रिस्ताने ……आपल्या वतीने देवासमोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात प्रवेश केला ” (इब्री  ९: २४).

स्वर्गामध्ये साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत: आत्मा, पाणी आणि रक्त आणि या तिघांची साक्ष एकच आहे.” (१ योहान ५: ).

आणि ते यापुढे मरणारही नाहीत कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थानाचे पुत्रअसल्यामुळे ते देवाचेही पुत्र आहेत.” (लूक  २०: ३६).

(क) स्वर्गामध्ये:

(i) देवाचे सिंहासन आहे.

“…… मी प्रभूला एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसलेले पाहिले. त्याच्या झग्याच्या सोग्यांनी  मंदिर व्यापून गेले होते.” (यशया ६: १).

(ii) प्रत्येक विश्वासणाऱ्याचे नाव तेथे (जीवनाच्या पुस्तकात) नमूद केलेले आहे.

“…… तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना” (लूक १०: २०).

(iii)आमचे ‘घर’ आहे.

तुमचे अंत:करण अस्वस्थ होऊ देऊ नका; देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या पुष्कळ जागा आहेत …… मी  तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला माझ्याजवळ घेईन;ह्यासाठी की, जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे” (योहान १४: १ ते ३).

(iv) आमचे नागरिकत्व आहे.

परंतु आमचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे आणि तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा तारणारा येणार आहे ज्याची आम्ही वाट पाहत आहोत” (फिलिप्पै ३:२०).

(v) आमचा वारसा आहे

“……त्याच्या महान दयेमुळेत्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविल्याने जिवंत व नवी आशा दिली आणि ज्याचा कधीही नाश होत नाही व ज्याच्यावर काही दोष नाही व जे कधी झिजत नाही असे वतन स्वर्गात आपल्यासाठी राखून ठेवले आहे.  ” (पेत्र १: ३ (ब) आणि ४).

(vi) आमचा खजिना आहे.

तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा …… कारण जेथे तुमचे धन आहे तेथे तुमचे मनही लागेल” (मत्तय ६: २० (अ) व २१).

(vii) आमची शांती आहे.

परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुला शांतीदेवो” (गणना ६: २५)

(viii) आमचा आनंद आहे.

“……तर पित्याकडे आमच्या वतीने विवणी करणारा मध्यस्थ, येशू ख्रिस्त, नीतिमान,हा आमच्याकडे आहे आणि तोच आमच्या पापांबद्दल प्रायाश्र्चित आहे. …… “(१ योहान २: १ ब आणि २ अ).

(ix) आणि आमचे अनंतकाळचे पुरस्कार आहेत.

परमेश्वर माझे  सामर्थ्य व माझी ढाल आहे; त्याच्यावर मी अंत:करणपूर्क भाव ठेवला आणि मी सहाय्य पावलो. म्हणून  माझे हृदय उल्लासते. मी गीत गाऊन त्याचे स्तवन करी“(स्तोत्र २८: ७).

आनंद करा आणि उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे ……” (मत्तय ५:१२ अ).

(६) स्वर्गामध्ये विश्वासणारी व्यक्ती ‘परिपूर्ण’ तेच्या स्थितीत सदोदित असेल. स्वर्ग ही एक ‘परिपूर्ण’ केलेल्या व्यक्तींची ‘परिपूर्ण’ जागा आहे. स्वर्ग हे अमर्यादित गौरवाचे, कधीहि कमी न होण्याऱ्या सुखाचे, कधीहि अंधुक न पडणाऱ्या आनंदाचे,  कधीहि कमी न होण्याऱ्या उल्हासाचे व कधीहि कमी न  पडणाऱ्या समाधानाचे वलय/स्थान आहे

(i) तेथे आम्ही ख्रिस्ताच्या प्रतिमेसारखे होऊ!

कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना अगोदरच नेमून ठेवले; ह्यात हेतू हा कीतो पुष्कळ बंधुणांमधला ज्येष्ठ असा व्हावा” (रोम ८: २९).

(ii) तेथे आमच्या पृथ्वीवरील अस्तित्वातील सर्व ‘अपरिपूर्ण’ ते चा शेवट होईल कारण आमच्यामधील सर्व प्रकारच्या पापांच्या क्रूर प्रभावांचा शेवट त्या ठिकाणी होईल.

परमेश्वरने उध्दरलेले जन परततील व जयजयकार करीत सियोनास येतील; त्यांच्या मस्तकी सार्वकालिक हर्ष राहील; त्यांस आनंद व उल्लास प्राप्त होईल; दु:ख व उसासे पळ काढतील” (यशया ५१: ११).

(iii) शेवटी आमचा आत्मा सर्व आणि प्रत्येक पापी वासनांपासून मुक्त होईल. आम्ही  देवाला दुखवणारी कोणतीही गोष्ट करणार नाही. आम्हांला ‘परिपूर्ण सुख’ हे समजेल.

जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत” (स्तोत्र १६: ११)

(iv) आम्हाला ‘परिपूर्ण प्रेम’ हे काय ते समजेल कारण प्रेमाचा जनक जो देव तो स्वत:तेथे राहतो.

प्रीती कधी अंतर देत नाही …… कारण आता आम्हाला आरशात अस्पषट असे दिसते; परंतु नंतर आम्ही समोरासमोर पाहू; आता मला जे कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला पूर्णपणे  समजेल” (१ करिंथ १३: ८ अ व १२)

(v) आम्हाला ‘परिपूर्ण समाधान’ लाभेल.

परंतु अब्राहाम म्हणाला …… पण आता येथे (स्वर्गात)  त्याला (लाजरसाला) समाधान मिळत आहे  ……” (लूक १६:२५ ब)

(vi) आमच्यामध्ये ‘परिपूर्ण आनंद’ वास करेल.

त्याला त्याचा धन्याने म्हटले, ‘शाब्बास, भल्या व विश्वासू दासा; तू थोडक्या गोष्टीत  विश्वासू राहिलास म्हणून मी तुझी पुष्कळांवर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो” (मत्तय २५: २३).

(vii) आमच्यामध्ये’परिपूर्ण ज्ञान’ वसेल.

पण जेव्हा जे पूर्ण ते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल…….आता मला जे कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला पूर्णपणे समजेल” (१ करिंथ १३: १० व १२ )

                                                             क्रमश:

Previous Article

लेखांक १: जेव्हा देव अन्यायी वाटतो

Next Article

कावकाव … की..?    

You might be interested in …

भावंडातील वैमनस्य

जॉन पायपर स्टेफनीचा प्रश्न पास्टर जॉन , माझा प्रश्न भावंडातील वैमनस्यासबंधी आहे. उत्पत्तीमध्ये दिसते की प्रत्येक कुटुंबावर  भावंडातील हेव्याचा परिणाम झाला. त्यापैकी काही – काईन आणि हाबेल, याकोब आणि एसाव, राहेल आणि लेआ, योसेफ आणि […]

येशू मेलेल्यातून उठला याची आठ कारणे जॉन पायपर

१.  येशूने स्वत: आपल्या येणाऱ्या पुनरुत्थानाची साक्ष दिली. आपल्यासंबंधी पुढे काय होणार हे येशूने उघडपणे सांगितले. प्रथम वधस्तंभावर खिळले जाणे आणि नंतर मेलेल्यांतून पुन्हा उठणे. “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री […]

 प्रेषितांची उमटलेली पावले

प्रकरण ४ काळ इ.स.३०० ते १५०० या सुमारे १००० वर्षांच्या कालखंडातील ख्रिस्ती मंडळीच्या उत्कर्षाची माहिती फारच तुटपुंजी असल्याने आपण ती एकदमच सलग पहाणार आहोत. पंतैनस अलेक्झान्द्रियास परतल्यानंतर भारतावर पुन्हा पडदा पडला. नंतरच्या शतकात तो पुन्हा […]