जनवरी 2, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

लेखांक १: कृपा आणि वैभव – ख्रिस्ताचे परमोच्च गौरव

स्टीव्ह फर्नान्डिस

११ सप्टेंबरला अमेरिकेत ट्वीन टावरवर अतिरेक्यांनी केलेला हल्ल्यानंतर लॅरी किंग यांनी दूरदर्शनवर एक परिसंवाद आयोजित केला होता. त्यात भिन्न विश्वास असलेल्या व्यक्तींना पाचारण करण्यात आले होते. त्यांना प्रश्न करण्यात आला की , या गोष्टी घडत असता देव कोठे होता? या व्यक्तींमध्ये ‘देवाला कसे जाणावे’ या प्रचंड खप असलेल्या पुस्तकाचे लेखक सॅनडिएगोचे दीपक चोप्रा हे सुद्धा होते. ते चोप्रा सेंटर फॉर वेल  बीइंग  चे सीइओ आणि संस्थापक देखील आहेत. ते देवाविषयीचा नवयुगाचा हिंदू दृष्टीकोन शिकवतात . ते स्वत: मात्र तसा दावा करत नाहीत. हॅरल्ड कुश्नेर  नावाचे यहूदी रब्बी देखील त्यांच्यात होते. कुश्नेर यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत.त्यापैकी एक आहे: ‘देवाच्या लोकांच्या जीवनात जेव्हा अनिष्ट घटना घडते’ हे गाजलेले पुस्तक लिहून बरीच वर्षे लोटलेली आहेत.मेहेर हेदाउद नामक एक मुस्लीम पुढारी देखील त्यांच्यामध्ये होते. ते मुस्लीम पब्लिक अफेअर्स कौन्सिलचे वरिष्ठ सल्लागार आहेत. त्यांच्यामध्ये सुवार्तावादी पुढारी जॉन मॅकआर्थर हे देखील होते.ते कॅलिफोर्निया येथील ग्रेस कम्युनिटी चर्चचे पाळक आहेत आणि द मास्टर्स कॉलेजचे अध्यक्ष आहेत. भरपूर खप असणाऱ्या अनेक पुस्तकांचे ते लेखक आहेत. शिवाय त्यांची रेडिओ प्रसारणाद्वारे देखील सेवा आहे.

या लोकांची चर्चा बरीच रंगली होती. अनेक मुद्यांवर ते परस्परांशी सहमत नव्हते. शेवटी आयोजक म्हणाले, ‘तुम्ही विविध विश्वासाचे हे पाहुणे बोलावले आहेत. अशा जहाल मतवाद्यांमुळेच समस्या निर्माण होतात असे म्हणतात . आपण सर्व त्याविषयी बोलतो. पण ते कशाविषयीच सहमत होत नाहीत. अधिकारी कोण आहे याविषयीही यांचे एकमत नाही. त्या अधिकाऱ्याचे नाव आहे देव. आपण याकडे अधिक व्यापक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. देव कोण आहे. तो देव आहे हे तुम्ही जाणताच.’

आयोजकाला प्रतिसाद देताना लॅरी किंग यांनी परिसंवादात भाग घेणाऱ्यांना प्रश्न केला, ‘देव कोण आहे? ’तेव्हा जॉन मॅकआर्थर व ते मुस्लीम पुढारी यांच्यात या प्रश्नावर जी चर्चा झाली त्यावरून ख्रिस्ती जन ज्याला देहधारणाचा सिद्धांत म्हणतात तो किती महत्त्वाचा आहे हे सूचित होते. हा सिद्धांत देवाचा सार्वकालिक पुत्र मानव होण्यासंबंधी आहे. विशेष म्हणजे तो सिद्धांत असे शिकवतो की , देव मानव झाला आणि त्याचे नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. किंग यांनी जॉन मॅकआर्थर यांना प्रश्न विचारला की , ‘देव कोण आहे?’ तेव्हा मॅकआर्थर म्हणाले :-

देवाविषयीच्या प्रश्नावर या सर्वांचे प्रतिसाद मी ऐकत आहे. पण आपल्या व्यतिरिक्त बाहेरच्या अधिकाऱ्याकडे आपण गेले पाहिजे. विश्वाच्या देवाची व्याख्या माझ्यासकट कोणीही करू शकत नाही. बायबलमधील देव विश्वाचा निर्माता ,चालक व संगोपन करणारा आहे. तो सर्वांवर सार्वभौम आहे. तो येशू ख्रिस्ताठायी देहधारी होऊन आला. प्रायश्चित्ताच्या अर्पणासाठी तो स्वर्गातून खाली आला आणि वधस्तंभावर मरण पावला. त्यामुळे पश्चात्ताप करणाऱ्या सर्वांच्या पापाचा पूर्ण मोबदला भरून देण्यात आला. म्हणूनच त्यांच्यासाठी स्वर्ग खुला झाला. देवाच्या वचनातील देव असा प्रगट झाला.

एक दोन लोकांनी यावर मत प्रदर्शन केल्यावर लॅरी किंग मुस्लीम पुढारी हेदाऊद यांच्याकडे वळले व त्यांना प्रश्न केला, ‘तुमचा या गोष्टीला काय प्रतिसाद आहे?’ तेव्हा त्यांनी खालील उत्तर दिले, ‘मी देहधारी सिद्धांत सोडल्यास जॉन मॅकआर्थरशी पूर्णपणे सहमत आहे. कारण आम्ही देहधारी होण्यावर विश्वास ठेवत नाही. आमचा विश्वास आहे की देव काळ, स्थळ अवकाशात हजर राहण्यापलीकडचा आहे. तो एखाद्या स्थळी बंदिस्त होऊ शकत नाही. तो अगम्य व अनाकलनीय आहे. तो शरीराने वास्तव्य करू शकत नाही.’ तेव्हा किंग यांनी हेदाऊद यांना विचारले , ‘जॉन मॅकआर्थर यांना जसा ख्रिस्त वाटतो , तसा तुम्हाला महंमद वाटतो का? हेदाऊद उत्तरले “नाही. जॉन मॅकआर्थरांसाठी ख्रिस्त देव आहे. माझ्यासाठी ख्रिस्त देवाचा जासूद किंवा निरोप्या आहे. मग लॅरी किंग म्हणाले, “म्हणजे महंमदासारखा येशूही जासूद आहे असे तुम्हाला म्हणायचे काय?” त्यांनी उत्तर दिले, ‘होय , महंमदासारखा.’

देहधारी होण्याचे महत्त्व फुगवून सांगता येत नाही. पण देह्धारी होऊन आलेल्या ख्रिस्ताचे व ख्रिस्ती विश्वासाचे एकमेव वेगळेपण सिध्द होते. तो मुस्लीम पुढारी मान्य करत होता की ख्रिस्ती धर्मविश्वास आणि इस्लाम व जगातील इतर धर्म यांच्यामध्ये एक महान दरी आहे. ते सर्व सारखे नाहीत. केवळ ख्रिस्ती धर्म विश्वासच शिकवतो की देव मानव होऊन या जगात आला आणि त्याचे नाव येशू आहे. मुस्लीम महंमदाविषयी असा दावा करत नाहीत किंवा शिकवत देखील नाहीत. जेव्हा ख्रिस्ती म्हणवणारे लोक सर्व धर्म सारखे आहेत असे विधान करतात तेव्हा मला खरोखर आश्चर्य वाटते. कारण सर्व धर्म सारखे नाहीत! मुस्लीम लोक देखील म्हणतील की सर्व धर्म सारखे नाहीत.

ख्रिस्ताने दावा केल्याप्रमाणे ख्रिस्ती धर्मविश्वास सांगतो की , ख्रिस्त देव आहे. देवाचे वचन आणि ख्रिस्ती धर्मविश्वास सांगतात की ख्रिस्त संदेष्टयांपेक्षा अधिक काही आहे. संदेष्ट्यांना ज्या देवाने पाठवले तोच देव तो आहे! हे जर खरे असेल तर महंमदीय विश्वास चुकीचा आहे कारण कुराणात म्हटले आहे की जो येशू देवाचा पुत्र आहे असा दावा करतो तो नास्तिक आहे; आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे.

१. ख्रिस्ताचे देहधारण हा मंडळीचा पाया आहे आणि त्यातून ख्रिस्ताचे अत्युच्च गौरव प्रदर्शित होते.

प्रस्तावनेत आपण दोन गोष्टी पाहणार आहोत. त्या ख्रिस्ती विश्वासात देहधारणा ही केंद्रस्थानी असून तिचे महत्त्व दर्शवितात. पहिली गोष्ट  म्हणजे ख्रिस्त हा सनातन देव असून तो मानव झाला हे सत्य मंडळीचा पाया आहे. हा पाया खडकासमान अढळ असून त्यावर सर्व काही उभारलेले आहे. जर खिस्त देहधारी होऊन आलेला देह नाही तर तो मानवास मुक्ती देण्यास पात्र नाही, त्याच्यात ती गुणवत्ता नाही. तो केवळ एक मानव आहे या मुद्यापाशीच सर्व उभारले जाऊन रचले ते अगर कोसळले जाते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर, तुमच्या जीवात्म्याच्या अवस्थेसाठी आणि सदासर्वकाळ तुम्ही देवासमोर सादर होण्यासाठी ख्रिस्त या व्यक्तीचे आकलन होणे अत्यंत महत्त्वाचेआहे.

दुसरी गोष्ट हे दर्शविते की देहधारणेचे महत्त्व हे ख्रिस्त या व्यक्तीचे गौरव करते. खिस्ताठायी  म्हणजे एकाच व्यक्तीत दोन भिन्न स्वभाव वसतात. एक स्वभाव सार्वकालिक , अमर्याद व सर्वसमर्थ आहे; म्हणजे देवाचाच स्वभाव प्रत्यक्ष त्याच्या ठायी आहे. आणि दुसऱ्या स्वभावाची काळाने सुरुवात झाली. तो मर्यादित व सीमित असून स्थळाशी निगडीत आहे; म्हणजे तो मानवाचा स्वभाव आहे. हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की ख्रिस्ताच्या मानवी स्वभावाला आरंभी मानवी व्यक्तिमत्त्व नव्हते. सार्वकालिक देवाचा पुत्र , ज्याला आरंभ नाही त्याचे व्यक्तिमत्व मानवी स्वभावाला दिले. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर ती केवळ एकच अशी व्यक्ती आहे . ही एक व्यक्ती देवाचा सार्वकालिक पुत्र देहधारी झाल्यामुळे आहे.ती व्यक्ती एकाच वेळी या दोन स्वभावांनी अस्तित्वात आहे. त्याच्यासारखी दुसरी एकही व्यक्ती नाही.

कलसै १ मध्ये ख्रिस्त ह्या व्यक्तीच्या गौरवावर उहापोह केला आहे, त्याकडे आपण पाहू या; मग मी त्याचे स्पष्टीकरण करीन. कलसै १:१६ म्हणते, ‘आकाशात व पृथ्वीवर असलेले ,दृश्य व अदृश्य असलेले राजे , अधिपती सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले ते सर्व त्याच्यामध्ये उत्पन्न झाले; सर्व त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी उत्पन्न झाले.’ हे गौरव ख्रिस्ताच्या दैवी व्यक्तिमत्वाचे वर्णन करते. तो निर्माणकर्ता देव आहे. त्याने किती व काय काय निर्माण केले? सर्व! म्हणजे सर्व काही! शिवाय तो सनातन देव आहे. कलसै १:१७ मध्ये म्हटले आहे; ‘ तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात. निर्माता असल्याने प्रत्यक्षात निर्मिती होण्यापूर्वीच्या काळापासून तो आहे. तो सनातन आहे. तो विश्वाच्या पूर्वीचा आहे. ‘त्याच्यामध्ये सर्व समाविष्ट होतात’ म्हणजे ख्रिस्ताने सर्व काही निर्माण तर केलेच पण त्या सर्वांची तो देखभाल व जोपासना करतो. आणि आता या क्षणीही तो सर्वांना चालवतो. या सर्व गोष्टींतून त्र्येकत्वातील दुसरी व्यक्ती असणाऱ्या ख्रिस्ताचे देवत्व , दैवी स्वभाव व दैवी अस्तित्व व्यक्त होते.

त्यानंतर पौल ख्रिस्ताच्या मानवत्वाबद्दल बोलतो. कलसै १:१८ मध्ये म्हटले आहे ‘ तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आदि, मृतांतून प्रथम जन्मलेला आहे.’ हे येशूच्या मानवी शरीराच्या पुनरुत्थानाच्या संदर्भात म्हटले आहे. ख्रिस्त मानव झाला  मानवाप्रमाणे मरण पावला.आणि मानव म्हणूनच मानवी शरीराने मेलेल्यांतून परत उठला! या सत्यावरून सिद्ध होते की तो देवही आहे व मानवही आहे. सर्व गोष्टीत प्रथम स्थान प्राप्त व्हावे म्हणून तो आला. तो सर्वश्रेष्ठ आहे. त्याच वचनात पौल पुढे म्हणतो , ‘अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे.’ (कलसै १:१८ ब ). ख्रिस्त सर्वांहून परमोच्च आहे. जरी तो मानव आहे तरी तो देवमानव आहे ! आणि देवमानव म्हणून ख्रिस्त अत्युच्च गौरवी आहे!

क्रमशः

Previous Article

संपादकीय

Next Article

लेखांक ३: जेव्हा देव अन्यायी वाटतो

You might be interested in …

संपादकीय

  देवाने आपल्याला नेमूनदिलेल्या ठिकाणी आपण त्याची सेवा करत असताना आपण खूप प्रार्थनेत राहण्याची जरुरी आहे. देव कार्य करत आहे आणि त्याचे सहकारी या नात्याने आपण काळजी घ्यायला हवी की आपले देवाबरोबरचे सामूहिक आणि वैयक्तिक […]

गेथशेमाने बाग

लेखांक ६ “पाहा, घटका येऊन पोहंचली देखील ” ( मत्तय २६:४५; मार्क १४:४१). ही मात्र मघाची सैतानाची घटका नव्हे अं?  ही त्याची देवनियुक्त, आत्मयज्ञाची, खरीखुरी घटका. ती आली. यहूदा आला आहे. शत्रुंच्या पुढं आहे. येऊन […]

ईयोबाच्या संदेशाचा आढावा

जॉन पायपर एका पित्याने हा प्रश्न मला पाठवला आहे. “माझ्या चवदा वर्षांच्या मुलीने नुकतेच ईयोबाचे पुस्तक पहिल्यांदाच वाचलं आणि इथं देवाचे जे चित्रण आहे ते पाहून ती गोंधळून गेली आहे. कारण आतापर्यंत तिने देव प्रेमळ […]