दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

कोमट कसे राहू नये

लेखक: ग्रेग मोर्स

अनेक वर्षे मी समजत होतो की मी ख्रिस्ती आहे -पण मी नव्हतो.

माझे आणि देवाचे नाते आहे हे मी शपथेवर सांगे- पण तसे नव्हते.

मी कोणत्याही क्षणी मेलो तरी स्वर्गात माझे स्वागत होईल असा माझा पूर्ण विश्वास होता -पण मी गेलो नसतो.

ख्रिस्ताचा शिष्य असण्याच्या वर्गात मी बसत नव्हतो आणि मी खरेच नव्हतो. मला वाटत असे की जर ख्रिस्ती  असण्याची मला थोडी जरी इच्छा असली तर देव अगदी आनंदाने माझे स्वागत करील. न्यायाच्या दिवशी काही लोक असतील की ते ठामपणे ख्रिस्ताला प्रभू प्रभू म्हणत त्याचे अभिवादन करतील आणि तरीही त्यांना नाकारले जाईल (मत्तय ७:२१-२३) हे मी कधीच वाचले नव्हते. लोक देवासाठी अनेक मोठी कृत्ये करतील पण तरीही त्यांचा नाश होईल असे मला कधी कुणी सांगितलेही नव्हते. मी मला खात्री देत होतो की देवाच्या क्रोधापासून मी सुरक्षित आहे. कोमट ख्रिस्ती लोकांना देव त्याच्या तोंडातून थुंकून टाकील (प्रगटी. ३:१६) असे मला कोणी सांगितले नव्हते. जर देवाला माझ्या जीवनात प्रथमस्थान  नसेल तर मला पश्चात्तापाची तातडीची गरज आहे नाहीतर माझा नाश होईल अशी माहिती मला कोणीही दिली नव्हती. फ्रान्सिस चान यांच्या शब्दात सांगायचे तर मी एक कोमट ख्रिस्ती होतो आणि मला ते आवडत होते.

कोमट असणे आणि ते आवडणे
मी काही त्रासदायक व्यक्ती नाही. मी अनीतीने वागत नव्हतो. मी बहुतेक रविवारी चर्चला जात होतो .मी ख्रिस्ती असायलाच हवे होते.
येशू माझ्या पापांसाठी मरण पावला असे मी म्हणत असे. मी चर्चमध्ये पुस्तकातून गाणी गात असे. जेवणापूर्वी मी प्रार्थना करत असे. मला खेळात विजय मिळाला तर त्याचे श्रेय मी देवाला देत असे. मी ख्रिस्ती असायलाच हवे होते.

देव माझे अगदी सर्वस्व नव्हता. मी त्यचे वचन वाचत नव्हतो. मी विशेष प्रार्थना करत नव्हतो. खरंतर मला गुप्तपणे पाप आवडत होते. पवित्र जीवन खूपच कन्टाळवाणे दिसत होते हे नक्कीच. उघडपणे मी कधी देवाबद्दल बोललो नाही किंवा एकांतात त्याच्यासमवेत वेळ घालवला नाही . पण देवाला तर सर्व समजते, मी तर मानव आहे आणि तसे  परिपूर्ण तर कोणीच नसते.

जर देवाने हस्तक्षेप केला नसता तर त्या अग्नीच्या सरोवरातच माझ्या भ्रमातून मी जागा झाला असतो. मी कृपेच्या मेजावरून खात आहे , अनंतकलिक प्यालायातून पीत आहे अशी माझी कल्पना होती . पण मी कचरा खात होतो आणि गटाराचे पाणी पीत होतो. यशयाने वर्णन केल्याप्रमाणे मी स्वप्न पाहत होतो; “त्यांना पाहिजे असलेले मिळणार नाही. उपाशी माणसाला अन्नाबद्दलचे स्वप्न पाहावे तसेच ते असेल. तो जागा झाला तरी त्याची तहान भागलेली नसते” यशया २९:८.
सर्व विनाशाचा मी एक मोठा दीन प्राणी ठरलो गेलो असतो. आणि मी माझ्या भ्रमामध्ये स्वत:ला ठेवून माझ्या विवेकबुद्धीला मुके ठेवून स्वत:ची खात्री करून देत होतो की मी देवाच्या दृष्टीने योग्य आहे कारण माझे धोरण होते: देवाचे पुस्तक न वाचणे आणि सभोवती असणाऱ्या लोकांशी माझी तुलना करून मला अजमावणे.

कोमट कसे राहावे
माझ्या विश्वासाची इतरांशी तुलना करणे (अख्रिस्ती लोकांशीही) हे सर्वात सोपे होते . सी एस लुईस च्या शब्दात -नरकामध्ये नेणारी एक  ह्ळूवार घसरण.

खालचा दृष्टिक्षेप
मी “कमी” ख्रिस्ती असणाऱ्या त्याा लोकांकडे खाली पाहत माझ्या आत्मसंतुष्टतेची खात्री करून घेतली. ज्या शेळ्या स्वत:ला मेंढ्या म्हणवून  घेत होत्या त्यांच्यापेक्षा मी बाह्यत: चांगला आहे या सत्यावर माझी तारणाची खात्री आधारलेली होती.
मी परूश्यांप्रमाणे प्रार्थना करत होतो: देवा मी तुझे आभार मानतो की मी त्या इतर माणसाप्रमाणे नाही, व्यभिचारी , खोटारडे, मूर्तिपूजक- त्यांच्याशिवाय मी ख्रिस्ती आहे हे जाणू शकत नव्हतो.
जेव्हा बदक स्वत:ची इतर बदकांशी तुलना करू लागते तव्हा ते स्वत:ला हंस समजते.

वरचा दृष्टिक्षेप
जेव्हा मी खऱ्या विश्वासणाऱ्यांच्या संपर्कात येत असे तेव्हा मला एक खोलवर टोचणी लागे. पण कोमट राहण्यासाठी मी निष्कर्ष काढला की ते फार वरच्या दर्जाचे ख्रिस्ती आहेत.आणि मी मृतांच्या वर्गात असताना ते जीवन्ताच्या वर्गात आहेत हे न मानता मी ठरवले कि ते शूरवीर आहेत. ते अ श्रेणी साठी पात्र आहेत तर मी क श्रेणीसाठी. पण दोघेही पास होणार आहेत. जरी मी सर्वथ: ख्रिस्ती नसलो तरी मी त्या संघाचाच आहेना?

मी कोठे दृष्टिक्षेप टाकला नव्हता: बायबल वर
जेव्हा मो कोमट होतो तेव्हा देवाचे पुस्तक – न उघडता- ते  माझ्या खोलीत धूळ खात पडले होते.
मग देवाने मला त्याच्या वचनाकडे नेले आणि माझे तारण केले. माझ्या असहाय थंड अंधाऱ्या कोठडीतून मला काढून त्याच्या आत्म्याने आणि वचनाने त्याने मला जिवंत केले. जिवंत विश्वासाद्वारे व बायबलच्या भस्म करणाऱ्या देवाने माझा कोमट ख्रिस्तीपणा भस्मसात केला.
तेथे मी वाचले की देवाच्या राज्यात प्रवेश होण्यासाठी तुम्हाला नव्याने जन्मले पाहिजे (योहान ३:३). तेथे मी वाचले की -आई , वडील, पुत्र, कन्या , पत्नी या सर्वांपेक्षा येशूवर अधिक प्रेम करणे हे फक्त काही विशेष  ख्रिस्ती लोकांसाठी नसून जे कोणी येशूमागे जातात त्या सर्वांसाठी आहे (मत्तय १०:३७-३९). तेथे मी वाचले की मी माझ्या तोंडाने जेवणापूर्वी केलेल्या प्रार्थनांचा व रविवारी चर्चला जाण्याचा देवाला वीट आला होता कारण माझे अंत:करण त्याच्यापासून फार दूर होते (यशया २९:१३-१४). तेथे मी वाचले की हजार बायबल अभ्यास करून मी शोध केला तरी खऱ्या रीतीने मी येशूकडे जाणे नाकारू शकत होतो (योहान ५:३-४०).
तेथे मी वाचले की देवाला ऋणात ठेवण्याइतका चांगला मी कधीही होऊ शकत नाही (लूक १७:१०). मी देहानुसार जगत असताना देवाला कधीही आनंद देऊ शकणार नव्हतो (रोम ८:८). तेथे मी वाचले की येशूवर प्रेम न केल्याने मी खर्या अर्थाने शापित होतो ( १ करिंथ १६:२२) आणि याची शिक्षा म्हणजे अनंत काळ वेदना भोगत राहणे (प्रकटी १४:११).
तेथे मी वाचले की देव काही एक सामाजिक रीतीने दुर्लक्षित झालेले बेढब मूल नाही की कोणीतरी आपल्या शेजारी येऊन बसावे याची तो वाट पाहत आहे. तेथे मी वाचले की तो राजांचा राजा व प्रभूंचा प्रभू आहे (प्रकटी १९:१६) ज्याच्या पुढे निर्मितीतील  प्रत्येक गुडघा टेकेल (फिली. २:१०). तेथे मी वाचले की त्याला माझी गरज नाही (प्रेषित १७:२५); जर मी त्याची स्तुती केली नाही तर धोंडे ओरडून त्याची भक्ती करतील (लूक १९:४०). तेथे मी वाचले की मी त्याच्या गौरवासाठी निर्माण केलेला आहे तो माझ्या गौरवासाठी नाही (यशया ४३:७). तेथे मी वाचले की ख्रिस्ताला सर्वस्व मानण्यात, पापांचा पश्चात्ताप करण्यात , व आनंदाने त्याला समर्पित न होण्यात मी जर उदासीन राहिलो तर तो मला त्याच्या तोंडातून थुंकून टाकील ( प्रकटी ३:१५-१६).

कोमट असलेल्यांना चांगली बातमी
पण तेथे मी असेही वाचले की, जरी आम्ही कोमट असण्यापेक्षा अधिक बिघडलेले होतो तरी राजांचा राजा आमच्यासाठी मरण पावला (रोम ५:८). जरी माझ्या पापाने व उदासीनपणाने माझ्यासाठी मरण कमावले होते तरी देवाने ख्रिस्तामध्ये मला सार्वकालिक जीवनाचे मोफत दान दिले आहे (रोम ३:२३). तेथे मी असेही वाचले की येशू निरोग्यांसाठी आला नाही तर करुणेने व कृपेने जे पापाने रोगग्रस्त आहेत त्यांच्यासाठी आला (लूक ५;३१).

तेथे मी असेही वाचले की जर मी मी तहानेला असेन आणि माझ्याकडे पैसे नसतील तरी देव मला आमंत्रण देतो की त्याच्यामध्ये तृप्त व्हावे (यशया ५५;१). तेथे मी असेही वाचले की जरी मी थकलेला असेन व जे मला काही देवू करत नाही त्याच्यासाठी मी श्रम करतो तरी जर मी त्याच्याकडे वळलो तर तो मला उत्तम अन्नाने तृप्त करील, मला जीवन देईल व त्याच्या पुत्राद्वारे माझ्याशी अनंतकालिक करार करील (यशया ५५:२-३).

तेथे मी असेही वाचले की देव जे त्याच्याकडे पापक्षमेसाठी परततात त्यांच्या जवळ असतो. व सर्वात दुष्ट -आणि कोमट- पाप्याला तो पूर्ण पापक्षमा देतो व तो कल्पना करू शकणार नाही एवढी आशा त्याला देतो (यशया ५५:६-९). तेथे मी वाचले की हे आमंत्रण त्याच्या पुत्राच्या जीवनाचा मोबदला देऊन विकत घेतले आहे. (यशया ५३:१-१२).

जर तुम्ही कोमट असाल आणि हे वाचत आहात तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अजूनही वेळ आहे. पश्चात्ताप  करा. विश्वास ठेवा. आनंद करा व जीवन जगा.

Previous Article

ख्रिस्ती लोक कोणत्या गोष्टी करू शकत नाहीत?

Next Article

एक वेदनामय आणि सुंदर दफन – अंधारात देवाचे आज्ञापालन

You might be interested in …

आपल्या पित्यापासून शक्ती मिळवणे  (उत्तरार्ध) क्रिस विल्यम्स

ब. काळजी घेणाऱ्या पित्याची सुरक्षा मत्तय ६:२५-३४ या वचनांचा भर आहे की आपला स्वर्गीय पिता आपली काळजी घेतो. ३२ वे वचन हे दाखवते – “तुम्हांला ह्या सर्वांची गरज आहे हे तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे.” […]

प. शास्त्राचा उपयोग: चांगल्या कामासाठी तयारी

लेखांक ७                       आपण पाहिलं की पवित्र शास्त्र वाचणाऱ्याला चांगल्या कामाकरता तयार करण्याचं काम करतं. आता ते काम पवित्र शास्त्र कसं करतं ते पाहू. विश्वासी व्यक्तिमध्ये चांगलं काम कोणतं ते पाहू. मार्क ७:३७ मध्ये एका चिमुकल्या […]

ख्रिस्तजयंती तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही

डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]