फरक पहिला – आज्ञापालन व आज्ञाभंग
- ख्रिस्ती जीवनात आज्ञापालन अतिशय महत्त्वाचे आहे. पुढील विधानावर चर्चा करा. “स्वर्गात जाण्यासाठी तुम्ही देवाचे आज्ञापालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे” सत्य की असत्य ते सकारण सांगा.
• पापाविषयीचे तीन दावे तपासून विश्वासी व्यक्तीचे देवाशी असलेले नातेसंबंध पहिल्या अध्यायात आपल्या नजरेस आणून
दिल्यावर आता योहान चार प्रकारचे फरक दाखवून ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन तपासत आहे.
• त्यातील पहिला फरक २:३-६ वचनांमध्ये आज्ञापालन करणे व आज्ञाभंग करणे याबाबत दिसतो. देवाने अगोदरच विश्वासी व्यक्तीच्या जीवनात काय केले आहे याचा पुरावा आज्ञापालन होय.
शास्त्राभ्यास
तुमची देवाबरोबर खरोखर सहभागिता आहे हे तुमच्या आज्ञापालनातून सिद्ध होते
आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळत नाही तो लबाड आहे, त्याच्या ठायी सत्य नाही (१ योहान २:३,४).
- सर्व काही अनिश्चित आहे असे बोलण्याची आपल्या पिढीमध्ये एक टूम आहे आणि जर कोणी “सत्य” किंवा “ज्ञान” विशेषत: देवासंबंधी बोलत असेल तर त्याला काही माहिती नाही असे समजले जाते. पण योहान म्हणतो की तुम्हाला देवाविषयी निश्चित माहिती नसण्याचे काही कारणच नाही.
▫ वचन ३ नुसार देव आपल्याला नातेसंबंधांनी माहीत असो वा नसो, आपण त्याला वास्तविक रीतीने बुद्धीने व सत्यामुळे “ओळखू”
शकतो.
▫ वचन ३ मधील “त्याला” हा शब्द देवपित्याला उद्देशून आहे. “ओळखणे” हा शब्द नातेसंबंध, कसलाही अडथळा दूर केला जाणे,
समेट व प्रीती याविषयी बोलतो.
▫ पण आपण देवाला का ओळखू शकतो याचे कारण वचन २ मध्ये आधीच स्पष्ट केले आहे. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याने
देवापासून आपल्याला विभक्त करणारे पापाचे अडखळण पूर्णपणे दूर केले आहे. जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो
तेव्हा आपली देवाबरोबर कसलेही अडखळण नसलेल्या थेट नातेसंबधाची सुरुवात होते.
• देवाशी असलेल्या ह्या नातेसंबंधांत असण्याचे लक्षण म्हणजे केवळ इच्छित विचार किंवा पुसटशी आशा बाळगणे नसते तर त्याचे
परिणाम दिसून येतात व ते सिद्ध होतात. वचन ३ पाहा:
▫ देवाच्या आज्ञा पाळणे – हे केवळ दहा आज्ञांचे पालन करण्याबद्दल सांगत नाही तर त्याहून काही अधिक निश्चित सांगते. ३:२३
पाहा. देवाच्या आज्ञा त्याच्या पुत्रावर विश्वास ठेवण्याकडे व त्याचे आज्ञापालन करण्याकडे इशारा करतात. त्यात प्रीतीभोवती
केंद्रित असलेल्या येशूच्या नियमाचे पालन करण्याचाही समावेश होतो.
▫ “पाळणे” ह्या शब्दासाठी वापरलेला मूळ भाषेतील शब्द बंदीशाळेच्या नायकाने तुरुंगाच्या कोठड्यांचा पहारा करण्यासाठीही
वापरला आहे. त्याचे बहुतेकदा “आज्ञा पाळणे” असे भाषांतर केले जाते. पण त्यात अधीन राहण्यापेक्षाही अधिक काही
अपेक्षित आहे. आपण अंत:करणपूर्वक देवाच्या आज्ञांच्या अधीन होणे. योहान ज्या आज्ञापालनाविषयी बोलत आहे ते
नियमावलीच्या यादीला बाह्यत: जडून राहण्यापेक्षाही अधिक काही आहे. ते हे की अंतर्यामात असलेल्या प्रीतीमधून बाह्यत:
आज्ञापालन होते. देवाच्या “आज्ञांचे पालन करणे” म्हणजे देवाच्या आज्ञा “साठवून जतन करणे” (स्तोत्र ११९:११).
• जीवनशैली म्हणून येशूच्या आज्ञांचे पालन करणारे आपले अंत:करण व आपली कृती आहे का याचे आत्मपरीक्षण करून आपण
त्याविषयी नक्की खात्री करून घेतली पाहिजे. तरीही त्यातील फरक स्पष्ट आहे.
वचन ४:
▫ हे निदान दोन्ही मार्गांना छेद देते.
▫ ज्याचे अंत:करण देवाशी जडलेले नाही, त्यांचे आत्मपरीक्षण लबाडी उघड करते – तुझी देवाशी ओळखही नाही आणि त्याचे
सत्य तू साठवून जतन करत नाहीस.
आज्ञापालन पुरावा देते की देवाची प्रीती ही जिवंत प्रीती आहे
जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे (व. ५).
- देवाशी नातेसंबंघ अस्तित्वात असल्याचा पुरावा आज्ञापालन आहे हा विचार येथे विस्ताराने मांडला आहे. येथे योहान “आज्ञा पाळण्याऐवजी” “वचनाप्रमाणे चालण्यावर” जोर देताना दिसतो.
▫ ” मी काय करायचे ते मला सांग” एवढ्यापुरतेच आपले प्रेम मर्यादित नाही. तर असे प्रेम की जे “देवाच्या मुखातून बाहेर
पडणारा प्रत्येक शब्द” झेलते.
▫ मत्तय ४:४ (संदर्भ अनुवाद ८:३)
• पण ५वे वचन आणखी काही सांगते –
▫ आज्ञापालन देवाशी नातेसंबंध जडल्याचा पुरावा देते. कारण त्या व्यक्तीत देवाची प्रीती खरोखर पूर्ण झालेली असते.
▫ आज्ञापालन करणे हे देवाचे वचन साठवून जतन करण्याने झालेल्या देवाच्या अफाट झालेल्या कामाचा पुरावा होय.
▫ देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे – हा पूर्ण काळ आहे. प्रक्रिया पूर्ण झाली आहे. “पूर्ण झाली आहे” याचा अर्थ “पार
पाडली आहे” “प्रक्रिया पूर्ण करून संपवली आहे.”
۰ १ योहान ४:९ मध्ये आपण पाहतो की वधस्तंभावर देवाची प्रीती प्रकट करण्यात आली. पापी लोकांच्या बदली जेव्हा देवाने
आपल्या पुत्राचे यज्ञार्पण केले तेव्हा जगावरील आपली प्रीती त्याने व्यक्त केली .
۰ पण देवाची प्रीती फक्त आदर्शच नाही तर ती रूपांतर करणारी प्रीतीही आहे. योहान आपल्याला दाखवून देत आहे की जे विश्वास
ठेवतात त्यांच्यासाठी ती प्रीती कार्य करू लागते. देवाच्या प्रीतीने तुमच्यामध्ये बदल न होता तुम्ही देवाची वधस्तंभावरील प्रीती अनुभवू शकत नाही.
۰ देवाच्या आपल्यामधील प्रीतीचे उद्दिष्ट पूर्णत्वाला (परिपूर्ण) कसे येते? जेव्हा आपण “त्याचे वचन पाळतो.”
▫ जी ख्रिस्ती व्यक्ती अंत:करणापासून देवावरील प्रीती व ख्रिस्ताच्या आज्ञांचे पालन करणे प्रदर्शित करते, जी देवाच्या वचनांचा
आपल्या मनात साठा करून ठेवते. ती काही आपण किती चांगली व्यक्ती आहोत हे दाखवत नसते.
▫ उलट ती दाखवत असते की देवाची प्रीती जिवंत व क्रियाशील आहे.
आज्ञापालन सिद्ध करते की तुमचे येशूशी जिवंत संबंध आहेत
यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्याठायी आहो. मी त्याच्याठायी राहतो, असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वत:ही चालले पाहिजे (१ योहान २:५,६).
۰ याप्रकारे योहान आपली चर्चा देवाला ओळखण्यापासून पुढे (देवाच्या नाते संबंधात येणे) त्याच्यामध्ये राहण्याकडे नेत आहे (वचन ५,६).
▫ दोन विधाने – आपल्याला कळून येते की आपण “त्याच्या ठायी आहो” आपण म्हणतो मी “त्याच्या ठायी राहतो. ”
▫ हे जसे आपण सहभागी करून घेतो तशा केवळ मानवी नातेसंबंधांहून काही अधिक आहे. आपण बहुधा “आम्ही एकमेकांमध्ये
राहतो” असे म्हणत नाही. ही ख्रिस्ती व्यक्तीची देवाशी असलेल्या नातेसंबंधांविषयी अपवादात्मक किंवा एकमेव भाषा आहे.
▫ कदाचित योहान ख्रिस्ताबरोबरच्या जिवंत नातेसंबंधांवर जोर देत असावा. त्याला “अत्यंत महत्त्वाचे अत्यावश्यक ऐक्य” म्हणता येईल –
येशूशी अशा प्रकारे संयुक्त होण्यातून आम्हाला आध्यात्मिक जीवन प्राप्त होते. योहान १५:५ पाहा.
۰ “तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तर पुष्कळ फळ द्याल” – तुमच्या जीवनात ते दिसेल.
۰ माझ्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण तुम्हामध्ये उगमाचा झराच नाही.
۰ हे एखादे साधन वापरण्यासाठी वायरने ते प्लगला जोडण्यासारखे आहे – ते यंत्र ज्या कामासाठी बनवण्यात आले आहे ते काम
करण्याची क्षमता त्याला मशीनमधून येत नसते तर त्याला उर्जा देणाऱ्या शक्तीच्या उगमापासून प्राप्त होत असते. त्या प्लगपासून ते यंत्र
वेगळे केले की ते यंत्र काहीच करू शकत नाही.
▫ योहान आज्ञापालनाविषयीची येशूची भाषा वापरतो.
- ख्रिस्तामध्ये असणे, ख्रिस्तामध्ये राहणे, त्याच्याशी जोडले जाणे व या प्रकारे देवाच्या नातेसंबंधात असणे याचा अर्थ तुमचे आत्मिक यंत्र जिवंत राहणे, व अद्भुत प्रकारे सजीव असणे. आणि आपण कसे काम करणार? देवाच्या कृपेने!
▫ वचन ६ – आपण जसा तो चालला तसे चालू – येशू आपल्यासाठी साच्याप्रमाणे घालून दिलेला आदर्श आहे. त्या नमुन्याप्रमाणे त्याचे
सर्व शिष्य त्याचा आदर्श अनुसरणार.
▫ येशू आपल्याला त्याचे सामर्थ्य पुरवत असल्याने आपण त्याचा “आदर्श अनुसरणार.” - आपले आज्ञापालन सिद्ध करते की आम्हा विश्वासी जनांवरील सर्वसमर्थ देवाची जीवन देणारी प्रीती आपल्यामध्ये कार्यरत आहे.
• शेवटी हे लक्षात घ्या की आपल्या आज्ञापालनाचा नमुना येशूचे मानवधारी होणे व त्याचे जीवन या ऐतिहासिक आदर्शानुसार आहे.
आपण कसे चालले पाहिजे हे शुभवर्तमानात नोंद केलेल्या येशूच्या जीवनावरून आपल्याला प्रकट केले आहे – त्याच्या सामर्थ्याने आपण पावलांवर पाऊल ठेऊन त्याला “अनुसरू” शकतो.
चर्चेसाठी प्रश्न
- हे स्पष्टच आहे की विश्वासी व्यक्तीने आज्ञापालन करणे अत्यावश्यक आहे. पण आज्ञापालनावर कोणकोणत्या चुकीच्या प्रकारांनी भर दिला जातो किंवा जबरदस्ती केली जाते?
• प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती जगामुळे, दैहिकतेमुळे व सैतानामुळे प्रेरणा गमावते. जर आज्ञापालन हे देवाचे काम आहे तर आपली
गाडी योग्य मार्गावर आणण्याचे काही योग्य मार्ग कोणते?
Social