दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का? लेखक : मार्शल सैगल

कोणत्याही पुस्तकाच्या स्टोअरमधून चक्कर टाका आणि तुम्हाला वाटेल की येथे आपल्यासाठी सुखाचा एक कोपरा  आहे. प्रत्येक पुस्तकाचे मुखपृष्ठ काहीतरी नव्या आणि खोल समाधानाचे अभिवचन देत असते. प्रत्येक पुस्तकाचा खप हजारो प्रतींचा असतो. सवयी, नातेसंबंध, खाण्याचे प्रकार, काम, व्यायाम, क्षमा करणे – सुखाच्या हजारो पाकक्रिया येथे असतात व त्यातून तुम्ही निवड करू शकता. हल्ली लोक पुस्तके वाचोत अथवा न वाचोत ही सर्व पाने हेच दाखवतात की सुखाच्या बाबतीत आपण अत्यंत समृध्द आहोत.

पण खरे गुपित हे आहे की सुखासंबंधीची हजारो पुस्तके तसेच पैसा, ऐष, मनोरंजन यांच्या सागरामध्ये आपण पोहत असलो तरीही  – आपली सुखासाठी उपासमार होत आहे. अशी सर्व शिर्षके दर वर्षी प्रसिध्द होत असली तरी त्यामुळे सिद्ध होत नाही की सुखी कसे होणार हे आपण शोधून काढले आहे. केक चे चित्र असलेलीं हजारो चित्रे भूकमारीने बेहोष होणाऱ्या जमावाभोवती ढिगाऱ्याने पडलेली आहेत.

नंदनवनात उपासमार
सुमारे ३००० वर्षांपूर्वी यशयाने एकविसाव्या शतकाचे चित्र चितारून ठेवले आहे. ते म्हणजे आध्यात्मिक आणि भावनिक भुकेचे. जो प्रभुविरुध्द जाईल त्यांना तो धोक्याची सूचना देतो:
“कोणी भुकेला स्वप्नात जेवतो आणि जागा होऊन पाहतो तो पोट रितेच; कोणी तहानलेला स्वप्नात पितो आणि जागा होऊन पाहतो तो मूर्च्छित व तहानेने व्याकूळ झालेला; तशीच सीयोन पर्वताविरुद्ध उठलेल्या सर्व राष्ट्रसमूहाची स्थिती होईल” (यशया २९:८).
भुकेल्या माणसाला झोपावे लागतेच – किवा काही तास टी.व्ही पाहावा लागतो – काही आराम मिळावा म्हणून. तहानेली स्त्री  तिच्या बेहोशीत कल्पना करते की शुध्द पाण्याच्या डोहात  ती बुडून जात आहे. आणि जेव्हा तिचे अवयव हळूहळू कोरडे पडत जातात व चालत नाहीत तेव्हा वेदना तिला भेदून जाते. भविष्यासाठी असलेली लोकांची स्वप्ने खरी काय आहेत याचा अनुभव तुम्ही घेतला आहे का? आपल्याला वाटते आपण जीवन जगत आहोत पण खरे तर आपण धोक्याची घंटा वाजण्याचीच वाट पाहत नाही का? भविष्याची स्वप्ने ठीक आहेत पण जर आपल्याला सुखी होण्याची खरी इच्छा असेल तर आपण जागे होण्याची गरज आहे.

दयनीय कोट्याधीश

जर तुम्हाला खऱ्या – भरभरून व ह्रदय तृप्त करणाऱ्या – सुखाचे गुपित हवे असेल तर  प्रश्न विचारा की प्रथमत: मला ह्रदय का दिले आहे? देवाने तुम्हाला का निर्माण केले आहे?  या सत्तर किंवा थोड्या अधिक वर्षात फक्त मजा आणि आराम करण्यासाठी का तुम्ही जिवंत आहात? कोट्याधीश यामुळेच आत्महत्या करतात.
नाही. तुम्ही सत्तर वर्षे जगा अथवा सतरा वर्षे, जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला असेल तर देवाने तुमचे जीवन सर्वाधिक पैसे मिळवणारा कलाकार, अतिश्रीमंत व्यावसायिक आणि यशस्वी खेळाडू यांच्यापेक्षा अधिक कुवतीने भरून टाकले आहे. त्यांचे सर्व चित्रपट, त्यांचे शोध, त्यांची प्रसिद्धी, त्यांचे प्राविण्य लयाला जाईल आणि विसरले जाईल, बहुतेक तुम्हाला मरण येण्यापूर्वीच.
पण या जगात तुम्ही राहत असताना तुम्ही जे करावे असे देवाला वाटते ते जर तुम्ही कवटाळले तर या गोष्टी अनंतकाळ सांगितल्या जातील – जरी येथे तुमच्याकडे काही दशके दुर्लक्ष झाले किंवा दखल घेतली नाही तरीही. आणि तुम्हाला अशा प्रकारचे सुख लाभेल की हॉलीवूडचे सर्वात सुखी भासणारे लोक असले सुख मिळवण्यास त्यांचे सर्व काही विकायला तयार होतील.
तुम्हाला सुखी कसे करावे हे देवाला माहीत आहे. तुमचे सुख हे तुमच्यासंबंधी नाही (जर ते काही मिनिटेच टिकावे असे तुम्हाला वाटत असेल तरच). जर आपण आपले जग या क्षणाला काय मिळेल यापुरतेच संकुचित करणार असू तर सुख आपल्यापासून स्वत:ला लपवेल. त्याऐवजी देव या जगभर  काय करत आहे आणि सर्व इतिहासात त्याने काय केले आहे त्याचा आपण भाग आहोत हे आपण पाहायला हवे.
देव म्हणतो, “ज्यांना माझे नाम ठेवले, ज्यांना माझ्या गौरवासाठी उत्पन्न केले, निर्माण केले आणि घडले त्या सर्वांना घेऊन या” (यशया ४३:७). जर तुम्हाला सुखी व्हायचे असेल तर ज्या कारणासाठी देवाने तुम्हाला जीवन दिले आहे त्यासाठी हे जीवन वाहून द्या. ते म्हणजे त्याचा गौरव. त्याने तुमच्या आईच्या उदरामध्ये तुम्हाला घडवले – तुमच्या स्नायूचा प्रत्येक तंतू, तुमचे ह्रदय सुद्धा (स्तोत्र. १३९:१३). तुमचा एकही दिवस उगवण्यापूर्वी त्याला त्यातला प्रत्येक दिवस ठाऊक होता (१३९:१६). हजारो वर्षांपूर्वी त्याला तुमच्या आजच्या दिवसाचा सर्व तपशील ठाऊक होता. तुम्ही जो प्रत्येक विचार करता तो तो ऐकतो – प्रत्येक प्रश्न, प्रत्येक मोह, प्रत्येक इच्छा. मग तुम्हाला सुखी काय करील याचे ज्ञान त्याला आहे असे तुम्हाला वाटत नाही? जर आहे तर त्याला त्याचे स्वत:चे सुखाबद्दलचे पुस्तक आहे. कदाचित तुम्हाला ते मॉलमध्ये आढळणार नाही पण जगाच्या इतिहासामध्ये कुठल्याही इतर पुस्तकांपेक्षा त्याचा खप सर्वात अधिक झाला आहे.

आनंदाचा अंश
त्या  स्टोअरमधली पुस्तके जे प्रश्न विचारतात तेच दावीद राजाने विचारले “आम्हांला चांगले दिवस कोण दाखवील?” (स्तोत्र ४:६). आम्हाला सुखी करणारे काहीतरी कोण दाखवील? दावीद स्वत:च त्याच्या प्रश्नाचे उत्तर देतो; “हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड. धान्याची व द्राक्षारसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस” (स्तोत्र ४:६-७).

अधिक आनंद. जेव्हा तुम्हाला समजते की कोणाला तरी खाणे, पिणे (आणि शारीरिक सुख, क्रीडा, शॉपिंग, टीव्ही इ.)  यापेक्षा कोणीही देऊ शकत नाही असे सुख गवसले आहे तर फक्त खाणे आणि पिणे यातच तृप्त होऊ नका. पुन्हा दावीद लिहितो; “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील; तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे; तुझ्या उजव्या हातात सौख्ये सदोदित आहेत” (स्तोत्र १६:११). आनंदाच्या अंशासाठी आणि क्षणभंगुर सुखाच्या क्षणासाठी पूर्ण आनंदाची व सदोदित सौख्याची देवाणघेवाण करू नका.

जर असल्या सुखाविषयी तुम्ही ऐकले तर तुम्हाला खरंच ते हवे का? की तुम्ही दुसरेच काही उलगडून पाहत आहात?

 तुम्ही सुखी आहात का?

जे तुम्ही प्रसिध्द पुस्तकात कधीच वाचू शकणार नाही ते हे आहे की, जेव्हा तुम्ही दुसऱ्या कोणासाठी तरी जगाल तेव्हा तुम्हाला सुख लाभेल – तुमच्या देवाच्या गौरवासाठी. आणि ज्या हेतूसाठी तुम्हाला घडवले आहे तो तुम्ही पूर्ण करू लागाल – तो म्हणजे ज्या देवाने तुम्हाला निर्माण केले त्याचा गौरव करणे. अशा वेळी तुम्ही त्याच्यामध्ये सर्वात सुखी असता. जॉन पायपर यांनी म्हटले आहे “जेव्हा आपण देवामध्ये सर्वात समाधानी असतो तेव्हा देवाचा सर्वात अधिक गौरव होतो.” ज्या हेतूने त्याने तुम्हाला निर्माण केले आहे तो तुम्ही पूर्ण करता. जो आनंद, सुख तुम्हाला इतरत्र कोठेही मिळणार नाही ते तुम्हाला गवसते आणि या सर्व प्रक्रियेत तुम्ही स्वत:ला विसरून जाता.
तुम्हाला ज्यासाठी निर्माण केले आहे ते सुख तुम्हाला मिळाले आहे हे तुम्हाला कसे समजते?

स्तोत्र ४ मधले पुढचे वचन पाहा: “धान्याची व द्राक्षारसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस. मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकान्तात निर्भय ठेवतोस” (स्तोत्र ४: ७,८).
तुम्ही निराळ्या प्रकारे झोपता. सुखसमृद्धीच्या स्वप्नात हरवून जाण्याऐवजी तुम्हाला समजते की खऱ्या वास्तवामध्ये तुम्हाला सर्वात अधिक आनंद मिळतो. जेव्हा तुमचे जीवन हे देवाच्या गौरवासंबंधी असते व तुमची संपत्ती स्वर्गात असते – जेव्हा इतर जगाच्या क्षणिक आनंदापेक्षा तुम्हाला अधिक आनंद असतो – तेव्हा तुमच्या जिवाला सुद्धा गोड आणि खोल विसावा मिळतो.

 

हे लेख तुम्ही इतरांना पाठवू शकता . पाठवताना lovemaharashtra.org द्वारे प्रसारित असा उल्लेख करावा.

 

Previous Article

धडा ९.    १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स

Next Article

धडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स

You might be interested in …

जेव्हा येशू पुन्हा येईल

जॉन ब्लूम हर्ष जग प्रभू आला, नमा हो त्याजलाह्रदी जागा करा त्याला, मोदे गा गीताला हर्ष जगा प्रभू राजा, नमा हो त्याजलानभी, नगी, जळा, स्थळा, पुन्हा गा गीताला जा, जा अघा तसे दु:खा, निघोनी कंटकाआशीर्वादा […]

माझे कोणतेच दु:खसहन देवाला चकित करत नाही वनिथा रिस्नर

मला आता काय होणार? किती कठीण होणार आहे अजून? ही परीक्षा अजून किती काळ चालणार आहे? माझ्या काळजीच्या मध्यभागी हे प्रश्न बहुधा येत राहतात. मला खात्री हवी असते की ही समस्या तात्पुरती आहे. माझी गहन […]

धडा ९.    १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स

  फरक तिसरा – देव आणि जग •           या जगात आपण उपयोगी पडावे अशी ज्या व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती आपण प्रौढता धारण करावी अशी इच्छा करते. मग प्रौढता म्हणजे तरी काय ?  ▫       सामान्यत: […]