दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा १२. १ योहान २:२८,२९ स्टीफन विल्यम्स

 

                                                                           त्याच्यामध्ये राहण्यात लज्जा नाही

  • हा शास्त्रभाग वाचल्यावर ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनात “लाज” “पाप” या शब्दांना काय स्थान असल्याचे दिसते?
    ▫         ख्रिस्ताने पूर्ण केलेल्या कार्यामुळे आपल्या पापावर पांघरूण घातले गेले आहे (१ योहान १:९;  रोम ८:१)
    ▫         पण लज्जा मात्र विश्वासी व्यक्तीच्या सध्याच्या कृत्यांनी दूर केली जाते.
    ▫         दोषीपणाचा संबंध अनिती, आध्यात्मिकता व कायदेशीर परिणाम यांच्याशी आहे. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याखेरीज दोष दूर                      करण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही.
    ▫         आपल्याला आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध असूनही देवाला मान्य असे आचरण न ठेवण्याशी लज्जेचा संबंध आहे.
    •           दुसऱ्या अध्यायात ख्रिस्ती जीवनाविषयीचे चार फरक अभ्यासल्यावर आता आपल्याला आठवण करून देण्यात आली आहे की                 आपल्या इच्छा विरुद्ध दिशांना खेचल्या जात असतात.
    ▫         आपण देवाच्या वचनाचे पालन करण्याऐवजी आज्ञाभंग करतो, प्रीती करण्याऐवजी द्वेष करतो, देवाशी समरूप होण्याऐवजी                   जगाशी समरूप होतो, आत्म्यात राहण्याऐवजी चुका करत राहतो.
    ▫         यावर उपाय काय? मधली स्थिती नाही; तर परत देवाकडे फिरायचे.
    ▫         या वचनात योहान प्रतिध्वनित करतो की त्याच्यामध्ये राहा म्हणजे तो येईल तेव्हा खात्रीने तुम्ही  त्याची मुले असल्याचे आढळाल.

शास्त्राभ्यास

जे ख्रिस्तामध्ये राहतात त्यांना लाज वाटण्याचे काही कारण नाही

तर आता मुलांनो, त्याच्यामध्ये राहा, यासाठी की तो प्रगट होईल तेव्हा आपल्याला धैर्य असावे आणि त्याच्या येण्याच्या वेळेस लाजेने माघार घ्यावी लागू नये (१ योहान :२८).

  • २८ व्या वचनाचा प्रमुख विषय आहे लज्जा. लाज ही भयजनक बाब आहे.
    ▫         अशा व्यक्तीची कल्पना करा की जिने आज्ञा पाळणे, प्रीती करणे, देवकेंद्रित असणे व सत्य या  गोष्टींशी तडजोड केली आहे.                   अशी व्यक्ती देवासमोर कोणत्या तोंडाने उभी राहू शकेल? लाज वाटते: मी विश्वासू राहिलो नाही.
    ▫         योहान “ख्रिस्ताचे प्रकट होणे” म्हणजे त्याच्या “द्वितीयागमनाविषयी” म्हणजे धोक्याविषयी बोलत  आहे. नव्या करारात वारंवार                  हा शब्दप्रयोग केला आहे (मत्तय २४:३; २ थेस्सलनी २:१).
    ▫         आपल्याला आठवण करून दिली आहे की तो केवळ प्रभू म्हणून नव्हे तर न्यायाधीश म्हणून येणार आहे. आणि आपल्या                          जीवनाचा तो तेव्हा हिशोब घेईल (१ योहान ४:१७).
    ▫         योहानाला काय हवे आहे तर आपल्याला आत्मविश्वास असावा की आपण देवासमोर उभे राहू शकू. आपल्याला लाजेने खाली                  मान घालावी लागू नये, त्याच्यापुढे आपण संकोच पावू नये.
    ▫         येथे पापाविषयी अपराधी भावनेने लाज वाटण्याचा मुद्दा नाही. तर आपण स्वत: काही न केल्याने  लाज वाटण्याचा मुद्दा आहे. हे               ज्या शिक्षकाला तुम्ही काय करू शकता या तुमच्या क्षमतेविषयी  माहीत आहे, आणि तरी तुम्ही ते न केल्यामुळे त्या                                 शिक्षकापासून लपण्यासारखे आहे. “तू कितीतरी चांगले करू शकला असतास.”
    •           यावर काय उपाय सुचवला आहे? योहान एका जबरदस्त विधानाने थोडक्यात ख्रिस्ती व्यक्तीची गरज मांडतो: “त्याच्यामध्ये                       राहा.”
    ▫         तो म्हणत नाही की आज्ञांकित होण्यासाठी परिश्रम करा, किंवा अधिक प्रीती करण्याचा प्रयत्न करा, किंवा जगाशी लढा द्या                       अथवा सत्याचा शोध करा – तो असे म्हणू शकला असता. पण तो आपल्यासाठी उपलब्ध असलेल्या मदतीच्या गाभ्यात शिरतो.
    ▫        आज्ञापालन- अवज्ञा, प्रीती – द्वेष, देव- जग, ख्रिस्ती – चुका करणे अशा रश्शीखेचीत देवासाठी  जगणे म्हणजे दोन घोड्यांमधील               ओढाओढीसारखे आहे. आणि आपण विश्वासू राहण्यासाठी शक्ती प्राप्त करण्याचा मार्ग सापडत नाही.
    ▫         योहान १५:३-४ वाचा. तुमचे अपराध कायमचे दूर केले आहेत. माझ्यामध्ये राहा म्हणजे मला जे हवे आहे ते सर्व लज्जा न वाटता               तुम्ही करू शकाल.
    •           मला खात्री आहे की त्याच्या आगमनसमयी आपल्याला सर्वात जास्त कसली लाज वाटेल तर – प्रभू ख्रिस्ता, या सर्व गोष्टी मी तुला               बाजूला सारून करायचा प्रयत्न केला आणि बघ मी कसा अपयशी झालो आहे!
    •           लज्जेला प्रतिबंध घालण्याचा उपाय स्पष्ट आहे  – आपण ख्रिस्तामध्ये राहायचे; त्याला पाहायचे.

विश्वासू मुलांना लज्जेचे काही कारण नाही

तो न्यायसंपन्न आहे, हे जर तुम्हाला माहीत आहे तर जो कोणी नितीने चालतो तो त्याच्यापासून जन्मलेला आहे हे ही तुम्हाला माहीत आहे  (१ योहान :२९).

  • आपण पुढील अद्भुत सत्याला घट्ट धरून राहू शकतो. जेव्हा आपण ख्रिस्तामध्ये राहण्याविषयी बोलतो, तेव्हा आपण हे जाणत असतो की आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या सामर्थ्याचा उगम तोच आहे. म्हणून ते सामर्थ्य  आपण त्याच्यामधून घेतले पाहिजे.
    •           पण ख्रिस्तामध्ये राहण्याचे आणखी एक गहन कारण आहे. ते केवळ औपचारिक तात्विक परस्परसंबंध नाहीत –  तुम्हाला हवे                  तेव्हा यंत्र प्लगला जोडण्यासारखे ते नाही.  विजेची उर्जा हवी तेव्हाच फक्त ते यंत्र व     प्लगचा संबंध      येतो याखेरीज त्या                        दोहोंमध्ये काहीच संबंध नाही
    •           योहान आणखी अधिक काही सांगतो:

▫         पहिले, तो (ख्रिस्तामधील देव) नीतिमान आहे. हा त्याचा स्वभाव आहे. जे देवाशी जडले आहेत ते त्याचा स्वभाव प्रतिबिंबित करतील.
▫         जडले जाण्याचे कारण महत्त्वाचे आहे: आपण ख्रिस्ताशी का जडून राहतो? कारण आपण “त्याच्यापासून जन्मले” आहोत. प्रथमच                     योहान हा विचार मांडत आहे. तोच विचार पुढे २:९; ४:७; ५:१; ५:४; ५:१८ मध्ये चालू ठेवत आहे.
▫         त्याला काय म्हणायचे आहे ते चौथ्या शुभवर्तमानात आढळते – योहान १:१२-१३; ३:३,५.
▫         या सर्वांचे सार काढले तर ते असे होईल:
۰           जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तेव्हा त्याला प्रभू म्हणून स्वीकारता, तो तेव्हा देव असल्याने त्याला फक्त आपली क्षमा                        करण्याचा अधिकार आहे एवढेच नाही तर  आपल्याला देवाची मुले करण्याचाही अधिकार आहे.
۰         आपण दत्तकपणाने आणि नवीन जन्म पावल्यानेही देवाची मुले आहोत. (३:९ वाचा. देवाचे बीज आपल्यामध्ये आहे.)
ᵒ           देवाने आपल्याला दत्तक घेतले असल्याने आपण त्याची मुले आहोत. आणि विश्वासू मुलांना लज्जेने आपल्या स्वत:च्या पित्यापासून                      संकोच बाळगण्याचे  काही कारण नाही. उधळ्या पुत्रानेही लज्जा दूर व्हावी म्हणून आपल्या पित्याकडेच परतले पाहिजे.
ᵒ           देवाने केलेल्या नवीन जन्माच्या चमत्कारामुळे आपल्याला देवाचा आत्मिक                                                                                                         स्वभाव प्राप्त झाला आहे – जसे बापाचे गुण त्याच्या मुलात दिसतात तसा देवाचा स्वभाव त्याच्या मुलांमध्ये दिसतो.
•           त्याच्यामध्ये राहा – आणि त्याच्यामध्ये राहत असता तुम्ही त्याची नीतिमत्ता प्रतिबिंबित कराल. कारण मुले तेच करतात. आणि रोज होत              असलेल्या रूपांतरामुळे तुमचा जन्म देवापासून झालेला असल्याचे पुरावे तुम्हाला   दिसतील –  तुम्ही देवाचे खरे मूल असल्याचे पुरावे!

चर्चेसाठी प्रश्न

  • “ख्रिस्तामध्ये असणे ” हा प्रचलित शब्दप्रयोग आहे. दररोजच्या जीवनात ख्रिस्तामध्ये राहण्याचा अर्थ काय यावर चर्चा करा.
    •           जेव्हा देव आपला पिता आहे याची याची आपल्याला जाणीव होते तेव्हा देवाविषयीच्या आपल्या विचारसरणीत कोणते बदल                     होतात?

 

 

Previous Article

मी असले कृत्य करणार नाही लेखक: मार्शल सेगल

Next Article

चिडचिड? विसरून जा लेखक : स्कॉटी स्मिथ

You might be interested in …

तुमची लाडकी पापे ठार करा – त्यांनी तुम्हाला ठार करण्यापूर्वी ग्रेग मोर्स

“एक्स्क्यूज मी, आता जे तुम्ही म्हणालात ते परत सांगता का?” माझी खात्री होती की मी ऐकले ते चुकीचे होते. “…” “ म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की जर लैंगिक पापाशी तुम्ही सतत मुकाबला करत असाल तर ती […]

आमच्या अशक्तपणात आमच्यामध्ये कार्य करण्यास देवाला आवडते

ट्रेवीस मायर्स गेल्या मार्चमध्ये माझ्यावरचा कॅन्सरचा उपचार संपला तरीही मला खूपच अशक्त वाटत होते. पूर्ण वेळ प्रोफेसर म्हणून माझे काम तसेच माझे घरातील व मित्रांशी असलेले  नातेसंबंध  या सर्व जबाबदाऱ्या पार पडण्यास मी मर्यादित आहे […]

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर लेखांक २ येशू हा देवाच्या योजनेचे केंद्रस्थान आहे. येशू हाच अंतिम राजा व त्याचे राज्य हा जुन्या करारातील भाकि‍तांचा विषय आहे. त्याच्याद्वारे देवाची योजना, अभिवचने, भाकिते व करार प्रत्यक्ष पूर्ण होतात. […]