दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा १४.           १ योहान ३:२-३ स्टीफन विल्यम्स

 

  त्याच्याबरोबर, त्याच्यासारखे

  • तुमच्या हे लक्षात आले आहे का, की एकमेकांसोबत वेळ घालवणाऱ्या व्यक्ती परस्परांसारख्याच दिसू लागतात? पति- पत्नी परस्परांसारखे दिसू लागतात, जवळचे मित्र एकमेकांसारखे वागू लागतात, पाळीव प्राण्यांचे मालक  व त्यांचे पाळीव प्राणी परस्परांसमान दिसू लागतात. एखाद्यासोबत राहणे आणि त्याच्यासारखे बनणे यात  काहीतरी संबंध दिसतो.
    •           देवाने आपले तारण करण्यामागे महत्त्वाचे कारण कोणते? (चर्चा करा)
    ▫         अखेरीस, त्याचे स्वत:चे गौरव व्हावे (इफिस १:१२).
    ▫         वैयक्तिक रीतीने, आपण येशू ख्रिस्तासारखे निष्कलंक व पवित्र व्हावे (इफिस १:४).
    •           येशूच्या द्वितीयागमनाविषयी व आपण “त्याच्यामध्ये राहण्यात” आपला वेळ खर्च करायलाच हवा याविषयी योहान बोलत आहे.                (२:२८). पण हा विषय पुढे चालू ठेवत असता तो ख्रिस्तासोबत असणे व ख्रिस्तासमान  होणे या मुद्यांवर जोर देत आहे.

शास्त्राभ्यास

येशूच्या दुसऱ्या येण्याविषयीच्या अनेक गोष्टी स्पष्ट नाहीत

प्रियजनहो , आपण आता देवाची मुले आहो; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही ( ३:२अ).

  • येशुचे द्वितीयागमन आपल्या भवितव्यासाठी कसे असेल याबाबत अनिश्चितता असली तरी येशूचे द्वितीयागमन होणार हे अगदी निश्चित.
    ▫         योहान १४:१-३
    ▫         योहान १७:२४
    •           पुष्कळ अभिवचने प्रत्यक्षात दिसणारी आहेत. १ल्या वचनातील अभिवचन खरे व वर्तमानकाळात आहे – आपण देवाची मुले                    आहोत, दत्तक आहोत, नवीन जन्म पावलेले आहोत .
    ▫         पण तरीही देवाने आपल्यासाठी काही योजना आखल्या आहेत ज्या आपल्या सध्याच्या ज्ञानाच्या  व आकलनाच्या पलीकडच्या                आहेत. (१ करिंथ २:९).
    ▫         या न उकललेल्या गोष्टी त्याची प्रीती व कृपा अधिक उंचावून दाखवतील (इफिस २:७)
    •           त्यामुळे आपल्याला अधिक उल्हसित वाटायला हवे. आपण निराश होता कामा नये. कारण जरी पुढे आपल्यासाठी काय वाढून                ठेवले आहे हे आपल्याला माहीत नसले तरी आपल्याला सुखद धक्के बसणाऱ्या गौरवी गोष्टी घडतील.

एक गोष्ट नक्की की आपण त्याच्यासारखे होऊ

तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे; कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल (३:२ब).            

  • जरी अजून आपल्याला बरेच प्रकटीकरण नसले तरी योहान आपल्याला समजायला मदत करतो की एक गोष्ट  स्पष्ट  आहे.
    •           येशू येईल तेव्हा आपण कसे होऊ हे आपल्याला माहीत नाही; तरी सर्व सोडून आपण एका गोष्टीची खात्री बाळगून अनुमान                   काढू  शकतो.
    ▫      ज्या अभिवचनांविषयी आपल्याला माहीत नाही अशी अभिवचने आपल्या समोर येतील तेव्हा एक  गोष्ट स्पष्ट आहे की आपण                   त्याच्यासारखे होऊ.
    ▫         तो येईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला कसे समजते? योहान कसे समजते ते                                                              सांगतो: कारण तो जसा आहे तसा आपल्याला दिसेल.
    ۰         कलसै ३:४ – तो येईल तेव्हा आपली आशा “त्याच्यामध्ये” प्रगट होईल – आपणही प्रगट होऊ.
    ۰         १ करिंथ १३:१२ ती भेट प्रत्यक्ष समोरासमोर होईल – पापाचे अच्छादन नसेल .
    •           याचा अर्थ काय? योहान आपल्या गौरवीकरणाचा तपशील देताना एकच अनुमान काढतो. आपण तेच करून या वचनाचा                      अभ्यास करू.
    ▫         आपली तारणासाठी निवड करण्याचा देवाचा हेतू आपण येशूसारखे व्हावे हा आहे. (रोम ८:२९).
    ▫         का? एक उत्तर आहे की त्याला पाहण्यासाठी आपण त्याच्यासारखे व्हायला हवे . सध्याच्या पापी, मानवी अवस्थेत आपण                        देवाला  पाहून जिवंत राहू शकत नाही (निर्गम ३३:२०).
    ▫         देवाला अनंतकालिक संबंधात ओळखणे सार्वकालिक जीवन होय (योहान १७:३).
    ▫         जेव्हा येशू येईल तेव्हा त्याच्या स्वत:च्या लोकांबरोबर सर्वकाळ राहायला येईल (१ थेस्स. ४:१७).
    ▫         म्हणून त्याच्यासोबत कायमचे राहाण्यासाठी सक्षम असावे म्हणून तो आपल्याला बदलून टाकील. तसे न झाले तर आपण त्याला              प्रत्यक्ष तोंडोतोंड कसे पाहू शकू?
    ▫         हे अगदी असेच आहे (फिलिपै ३:२०-२१).
  • आपण त्याच्यामध्ये असावे, म्हणून तो आपल्याला त्याच्यासारखे करील. देव कसलेही अडखळण नसणारी, सार्वकालिक सहभागिता अपेक्षितो. त्याकरता तो ख्रिस्तामधील त्याच्या प्रीतीचे गौरव आपल्याला प्रदर्शित   करील. म्हणून तो आपल्याला सर्व पापांपासून दूर करील व सर्व पाप आपल्यामधून काढून दूर करील. हीच  आपली महान आशा आहे.

जे त्याच्या बरोबर राहाण्याची आशा बाळगतात, ते त्याच्यासारखे होण्याची धडपड करतात

जो कोणी त्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करतो (३:३).

  • लोकांचा एक असा कल असतो की भावी काळाविषयीची अभिवचने या प्रकारे कितीही गौरवी असली तरी, ती स्वप्नवत असतात ती आपल्या सध्याच्या परिस्थितीला स्पर्श करू शकत नाहीत; त्यामुळे आपण भावी काळी  देव आपल्यासाठी व आपल्यामध्ये जे काही करणार आहे, त्याबाबत तात्त्विक दृष्ट्या नवल करत बसणे बंद  करू शकतो.
    •           योहान पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने, या विचारसरणीला मुभा देत नाही. तो आपल्याला आपल्या आशेसंबंधीच्या अगदी व्यावहारिक              गोष्टीकडे घेऊन जातो.
    •           ख्रिस्ती “आशा” म्हणजे एखादी इच्छित गोष्ट नव्हे. ते “खात्रीचे” ज्ञान होय. (वचन २ पाहा “आपल्याला माहित आहे”). ते                             ख्रिस्ताच्या “खात्रीलायक” अभिवचनावर आधारित आहे. त्याने म्हटले आहे की तो येणार आहे.
    ▫         तुम्ही येशूच्या येण्याची आशा धरता का? तुमच्या तारणाऱ्याशी अतूट नातेसंबंध असावेत याची तुम्हाला उत्कंठा लागली आहे                   का? “हे प्रभू येशू, ये ” असे मुखाने म्हणण्याने पुरावा दिला असे होत नाही. पुरावा हा व्यावहारिक असावा लागतो.
    ▫         योहान त्याची अशी मांडणी करतो – जर तुम्ही त्यासंबंधाने ही “आशा” बाळगता की तो जसा  आहे तसा तुम्हाला तो दिसेल- तर              तुम्ही त्याच्या सान्निध्यापासून कदापि विभक्त होणार नाही, तर या आशावादाचा पुरावा पवित्रता हा असेल.
    ▫         आजही, जे त्याच्याबरोबर राहण्याची उत्कंठा बाळगतात ते त्याच्यासारखे होत राहण्याची तयारी करत राहतात. या प्रकारे ते                  आज त्याच्यामध्ये राहतात. त्यामुळे ते सदासर्वकाळ त्याच्याबरोबर राहू  शकणार आहेत.

चर्चेसाठी प्रश्न

  • येशूच्या पुनरागमनाची तुम्ही उत्कंठा बाळगता का? आपले अंत:करण व जीवनशैलीचे परीक्षण करा – अशा कोणत्या गोष्टींबाबत तुम्ही जगाने बांधले गेला आहात, की ज्यामुळे तुम्ही सार्वकालिक जीवनाविषयी नाखूष आहात?
    • ख्रिस्तात राहण्याने त्याच्या पुनरागमनाविषयी उत्कंठा धरण्यास मदत कशी होऊ शकेल यावर चर्चा करा.

 

 

 

 

 

 

 

 

Sent from my iPad

 

Previous Article

तुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत काय?                                             लेखक : जॉन ब्लूम

Next Article

जर मरणे हे मला लाभ आहे तर बरे होण्यासाठी प्रार्थना करावी का? लेखक : ट्रेवीस मायर्स

You might be interested in …

देव नेहमीच मेज तयार करतो मार्शल सीगल

कदाचित देवाच्या पुरवठ्याची इतकी संथपणे स्वीकारलेली, इतकी गृहीत धरलेली, इतकी नकळत स्वीकारलेला दुसरी कोणती कृती नसेल ती म्हणजे आपले पुढचे जेवण. आज जगातील करोडो लोकांसाठी हे न पेलवणारे आश्चर्य होऊ शकते आणि त्याचा सन्मान केला […]

देवाच्या दीनांना दिलासा (III)

जुळं स्तोत्र ५३ अक्षरश: १४ व्या स्तोत्रासारखंच. दोनच गोष्टींमध्ये भिन्न आहे. (१) पाचवं वचन निराळं आहे. (२) देवाचं एलोहीम नाव यात आठ वेळा आलं आहे. १४ व्या स्तोत्रात ४ वेळा एलोहीम व ४ वेळा यहोवा […]