दिसम्बर 30, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा १९.  १ योहान ३: १९-२० स्टीफन विल्यम्स

 

देवासमोर खात्री

तुमच्या जीवनात अशी कधी वेळ येते का की तुमच्या मनात देवाविषयी शंका येऊ लागते? त्या कोणत्या प्रकारच्या वेळा असतात? असे विचार तुमच्या मनात केव्हा येतात? तेव्हा कोणत्या प्रकारे काही मदत मिळते? चर्चा करा.

आपण पाहिले की योहानाच्या पहिल्या पत्राचा विषय विश्वासीयांची खात्री हा आहे (१ योहान ५:१३). ख्रिस्तामधील आज्ञापालनाच्या जीवनाची लक्षणे याविषयी तिसऱ्या अध्यायात सांगितल्यानंतर योहान आता देवासमोर धैर्याने आपल्याला उभे राहता यावे म्हणून आज्ञापालन, प्रीती आणि विश्वास या गोष्टी कशा पायाभूत आहेत ते स्पष्ट करत आहे.

शास्त्राभ्यास

प्रीती आणि आज्ञापालन ही खात्रीचा पाया आहेत (व. १९)

                        यावरून आपणास कळून येईल की आपण सत्याचे आहो, त्याविषयी आपण स्वत:च्या                                                                                          अंत:करणाला त्याच्यासमोर उमेद देऊ (३:१९).

  • आपण आपले तारण गमावू शकत नाही. पण ख्रिस्ती व्यक्ती तारणाची खात्री गमावू शकते असे शिकवणे योग्य आहे का? या लक्षणीय वचनांमध्ये योहान नेमके हेच सांगत आहे.
    १९ व्या वचनातील आपण सत्याचे आहेत हे “कळून येईल” आणि आपल्या अंत:करणाला “उमेद देऊ या” शिकवणीचा संदर्भ लक्षात घ्या.
    पण आपण सत्याचे आहोत, व आपल्या अंत:करणाला आपण उमेद द्यायला हवी आपल्याला केव्हा कळून यायला हवे? २० वे वचन याविषयी स्पष्टीकरण देते की जेव्हा आपल्याला आपले मन दोषी ठरवेल तेव्हा.
    आपली खात्री डळमळवणारा हा अनुभव असामान्य किंवा कधीतरी येणारा अनुभव नाही.
    • हे महत्त्वाचे आहे. योहान पाप व आज्ञापालनाविषयी स्पष्ट व भक्कम अशी भरपूर विधाने करत आहे. काही             लोक (मंडळीतील देखील) म्हणतात की पापाविषयी बोलत राहणे रोगटपणाचे लक्षण आहे. कारण लोकांचा             कल आत्मपरीक्षणाकडे जातो.
    •  देवाचे वचन तर आत्मपरीक्षणाला प्रोत्साहन देते. विश्वासी व्यक्ती आपल्या बंधुजनांवरील प्रीती व पापाशी संबंधाबाबत आत्मपरीक्षण करू लागते तेव्हा तिला आपल्या उणीवा दिसू लागतात.
    देवाची इच्छा आहे की आपण पापाकडे दुर्लक्ष न करता खरी खात्री बाळगावी.
    तथापि २० वे वचन आपल्याला सांगते की विश्वासी व्यक्तीला ही खात्री अंध आत्मविश्वासातून प्राप्त होत नसते. (याचा अर्थ कोणतीच चूक मान्य न करणारी, आणि देवासमोर धैर्याने उभे राहू शकू अशी गर्विष्ठ वृत्ती.)
    उलट विश्वासी व्यक्ती जेव्हा देवासमोर नम्र होऊन त्याच्यावर अवलंबून राहते आणि त्याचे सत्य व  सामर्थ्य समजून घेते, तेव्हा तिला उमेद प्राप्त होते.
    •  अधिक विस्ताराने या वचनांचे परीक्षण करू या:
    •   या वचनानुसार आपल्या खात्रीचे मूळ काय आहे? “यावरून” वचन १९.
    या वचनात यापूर्वी योहान जे बोलला त्याच्याशी आपली सांगड घालत आहे.
    अगदी नुकतेच, वचन १८ – कृतीने व सत्याने प्रीती करणे.
    त्यामागचे वचन १० – नीतिचे आचरण करणे
    दुसऱ्या शब्दात सांगायचे तर देवासमोर पात्र ठरण्यास आपली प्रीती व आज्ञापालन ही साधने उपयुक्त नसली तरी खात्रीसाठी ते अंतिम कारण आहेत.
    हे समजणे काही अवघड नाही. जर तुम्हाला प्रकृतीची काळजी वाटत असेल तर त्याविषयी तुम्ही कशी खातरजमा करून घेता? तुम्ही किंवा तुम्ही विश्वास टाकू शकाल अशी व्यक्ती तुमच्या शारिरीक यंत्रणेची चिकित्सा करतात. योहान म्हणत आहे की तसेच तारणाच्या खात्रीविषयी व पुराव्याविषयी आहे.

खरी खात्री देवकेंद्रित खात्री असते ( १९-२०)

देव उथळ नव्हे तर खरीखुरी खात्री देऊ करतो (१९)

यावरून आपणास कळून येईल की आपण सत्याचे आहो. त्याविषयी आपण स्वत:च्या मनाला त्याच्यासमोर उमेद देऊ (३:१९).

  • कोणत्या प्रकारची खात्री आपल्याला येथे देऊ केली आहे?
    • वचन १९ मध्ये पहिली गोष्ट आपल्याला समजते की आपण सत्याचे आहोत. दुसरी गोष्ट, हे समजणे प्रामाणिक आहे. कारण ही खात्री देवासमोर मिळत आहे. म्हणजे देवासमक्ष तुम्ही ही खात्री बाळगू शकता.
    काही लोक शंकित ख्रिस्ती व्यक्तीला म्हणतील की कोणतीही शंका खोटी असते. आणि तुम्ही सत्याचाच वापर करायला हवा.
    सैतानाला बंधुजनांवर दोषारोप ठेवणारा असे संबोधले आहे (प्रकटी १२:१०). आपण का शंका घेतो याची कारणे कदाचित खोटी असू शकतील. बायबल शिकवते की जो ख्रिस्तामध्ये आहे त्याला दंडाज्ञा नाही.
    काही लोक म्हणतील “लबाडीवर विश्वास ठेऊ नका. केवळ सत्यावर विश्वास ठेवणे निवडा” हाच शंकांना लढा देण्याचा मार्ग आहे. पण हा अपुरा उपाय आहे. तुम्ही केवळ योग्य आहार घेऊन आपल्या आरोग्याची हमी देऊ शकत नाही. केवळ तुम्ही सत्याचा आहार घेता म्हणून तुम्ही आध्यात्मिक दृष्ट्या निरोगी आहात असा अर्थ होत नाही. तुमचे निरोगीपण दिसून येते का?

▫     खेदाची गोष्ट ही आहे की काही लोक देवाच्या वचनाचा आधार घेऊन खोटी खात्री करून घेतात. केवळ पोपटपंचीने वचने पाठ                         म्हणण्यापेक्षा आपल्या शंकांना अनेकदा आणि वारंवार भक्कम  खात्रीची गरज असते. पण असली “देवासमक्ष मिळालेली खात्री” नसून               अंधश्रद्धा असते.
▫     योहान एक सच्चा पाळक असल्याने तो शंकेशी पुरता संघर्ष करायला आपल्याला सहाय्य करतो.
۰        तो हे म्हणत आहे – शंकेचे काळेकुट्ट ढग जमले असता, तुम्ही देवाविषयी शंका घेणार  नाही, पण तुम्हाला देव कळला आहे की नाही                  यविषयी शंका घ्याल. “सुवार्ता ही खरी  आहे पण रोम ८:१ (सुवार्तेचे सत्य) माझ्याविषयी खरे आहे का हे मला कसे समजते?
۰        त्याला योहानाचे उत्तर आहे की: तुमच्या जीवनात जेव्हा तुम्हाला आज्ञापालन व प्रीती ही  आढळतात तेव्हा तुम्हाला नक्की समजते की               तुम्ही सत्याचे आहात. माझी जीवनशैली कशी आहे? पापाविषयी मी संवेदनशील असल्याचे माझी जीवनशैली मला दाखवते का?                          मंडळीतील बहीण भावंडांवर मी खरी प्रीती करत असल्याचे आढळून येते का? सुवार्तेचे जीवन सुवार्तेची सत्ये प्रस्थापित करते.
▫     येशू ख्रिस्तामुळे आपण जगत असलेल्या जीवनातून येशूविषयीच्या ज्या सत्यांवर आपला विश्वास आहे, ती सत्ये दिसून येत असतील तर               आपल्याला खरी खात्री बाळगता येते.
▫      आता हा उपरोध पाहा:
۰         एखादी व्यक्ती पापावर विचार करायला वेळही घेत नाही आणि आपण ख्रिस्ती                                                                                                  असल्याचा दावा करते तर तिने खात्री बाळगण्याचे कारणच नाही पण तिला नेहमीच मोठी खात्री असते. याला आत्मविश्वास म्हणतात.
۰         जी ख्रिस्ती व्यक्ती देवाच्या वचनाच्या सत्यातून आत्मपरीक्षण करते तिला आपल्या कमतरता दिसतात. पण देवाची कृपा व सामर्थ्याची                 लक्षणेही आढळतात;  मग त्यांना वाटणारी खात्री हा आत्मविश्वास नसतो तर ती खात्री देवामध्ये व देवासमोर अशी असते.

खरी खात्री आत्मविश्वास नसून ती देवकेंद्रित असते (वचन २०)

कारण जर आपले अंत:करण आपल्याला दोषी ठरवते तर आपल्या अंत:करणापेक्षा देव थोर आहे आणि तो सर्व काही जाणतो (३:२०).

  • याच संदर्भात वचन २० अधिक अर्थ स्पष्ट करते. (हे ग्रहण करायला थोडे अवघड आहे.)
    आपल्या जीवनाचे परीक्षण करीत असता जेव्हा आपण देवाची कार्यरत असलेली कृपा पाहतो तेव्हा देवामध्ये आपल्याला खात्री प्राप्त होते. अशा प्रकारे आपण सत्याचे आहोत हे आपल्याला समजते (वचन १९).
    आपल्याला अजूनही आपल्या कमतरता दिसतात का? होय. पण त्यातही आपल्याला देवाची कृपाही दिसते. ही अर्थहीन खात्री नसते तर देवकेंद्रित खात्री असते.

۰         मी आज्ञाधारक असावे ही माझी इच्छा कमकुवत असली तरी प्रामाणिक आहे हे मला कळते. जरी माझ्या बंधुजनांवरील प्रीती परिपूर्ण                नसली तरी ती प्रामाणिक आहे हे मी जाणतो. देव माझ्यामध्ये कार्य करत असल्याचे मला दिसते.
۰        या खात्रीमध्ये मी स्वत:ला देवावर सोपवून देतो. माझे ऱ्हदय वेगाने वेडीवाकडी वळणे घेते पण शेवटी देवच माझे ऱ्हदय जाणतो. खऱ्या                ख्रिस्ती व्यक्तीसाठी हा मोठा दिलासा आहे ;  दहशत नव्हे.

  • पेत्राकडे पाहा. येशू जेव्हा त्याचा पुनरुद्धार करतो तेव्हा त्याच्या महान पतनानंतर त्याने त्याचे ऱ्हदय तपासले. त्याची अखेर काय खात्री होती? काही धाडसी दावा नव्हता. तर योहान जे सांगतो, तेच त्याने केले. पेत्र काय म्हणाला? “प्रभू, आपणाला सर्व ठाऊक आहे. मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे.” (योहान २१:१७).

चर्चेसाठी / मननासाठी प्रश्न

  • तुम्ही आत्मविश्वासणारे आहात की तुमचा विश्वास देवकेंद्रित आहे? तुम्ही आपल्या शंकाकुशंका दाबून टाकता की देवावर सोपवता? देवावरील विश्वास वाढवण्यासाठी आत्मपरीक्षण करणे ही एक आरोग्यदायी सवय आहे.
    (२ करिंथ १३:५ वाचा.)

 

 

 

 

 

 

 

Sent from my iPad

 

Previous Article

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल? जॉन ब्लूम

Next Article

देवाची सुज्ञता जेरी ब्रिजेस  (१९२९-२०१६)

You might be interested in …

देवावर विश्वास (मार्गदर्शनासाठी) लेखक : जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

रोजचा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचा आहे कारण तो देवाने नेमला आहे. जर आपण जीवनाला कंटाळलेले असू तर काहीतरी चुकले आहे. देवाच्या संकल्पनेविषयी आपण गल्लत केली आहे. देवाची आपल्या जीवनातील गुंतवणूक आपल्याला समजलेली नाही. अगदी उदासवाणे, दमणूकीचे […]

आणिवल्हांडणाची सांगता झाली

…  आणिवल्हांडणाची सांगता झाली संकलन- लीना विल्यम्स “बेखमीर भाकरीचा सण, ज्या दिवशी वल्हांडणाचे कोकरू मारावयाचे तो दिवस आला” लूक २२:७. यरुशलेमाचे रस्ते गजबजून गेले होते. वल्हांडणाचे पवित्र भोजन करण्याचा तो वार्षिक दिवस पुन्हा आला होता. […]

सुलभतेवरच्या प्रीतीचा धोका

ग्रेग मोर्स पाश्चिमात्य जगात राहत असलेल्या आपल्या ख्रिस्ती लोकांना एका मोहाला (नकळत) तोंड द्यावे लागते. तो मोह म्हणजे आरामशीर, सुखी, समाधानी असणे. आपण जो विसावा निर्माण केला आहे त्याला बाधा येईल अशा कोणत्याही गोष्टीकडे दुर्लक्ष […]