दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

लक्ष विचलित  झाल्यास तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल लेखक: जॉन ब्लूम

येशूने शुभवर्तमानात पुन्हा पुन्हा सांगितलेले वाक्य असे आहे, “कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको” (मार्क ४:२३). जर आपण शहाणे असू तर येशू जे काही सांगतो ते आपण ऐकू, विशेष करून त्याने वारंवार सांगितले ते. आणि या बाबतीत त्याने जे सांगितले त्याचे तंतोतंत पालन करण्यानेच ऐकणे होणार आहे.
येशूच्या या बोधामागे एक फार फार महत्त्वाचे कारण आहे. “तुम्ही जे काही ऐकता त्याविषयी सावध राहा; ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला मापून देण्यात येईल, किंबहुना तुम्हांला जास्तही देण्यात येईल. कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल-नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल.” (मार्क ४:२४-२५).

येशू काय बोलत आहे ते तुम्हाला समजते का?  हा इशारा समजायला कठीण आहे, यामुळे हा मुद्दा दिसतो: ऐका आणि काळजीपूर्वक मनन करा. कारण जर तुम्ही केले नाही तर तुम्हाला समजणार नाही, आणि जर तुम्हाला समजले नाही तर तर तुम्हाला समजण्यास  असलेली आकलनशक्ती तुम्ही गमावून बसाल.

देव जे बोलतो – ज्याला आपण देवाचे वचन म्हणतो ते तुम्ही किती चांगल्या प्रकारे ऐकता त्यावर अवलंबून आहे. आणि देवाचे बोलणे चांगल्या रीतीने ऐकण्यासाठी तुम्ही जवळून लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही लक्ष देत आहात ना?

दाखल्यांचा विचित्र हेतू

दाखल्यांची मालिका देताना येशू हा इशारा देत आहे. दाखले म्हणजे कोड्यांच्या गोष्टी असून देवाच्या राज्याबद्दलची महान गुपिते त्यांमध्ये येशूने थोडक्यात लपवलेली होती. बहुधा ही रूपके असत. मार्क ४ मध्ये शेतकऱ्याची जमीन (मार्क ४:१-८), दिवा (४:२१-२५) आणि बी (४: २६-३२) हे दाखले वाचा. ते तुम्हाला समजतात का? अर्थातच येशूने जमिनीच्या दाखल्याचा अर्थ सांगितला (४:१३-२०). पण दिव्याचे व बी चे काय? या गोष्टी आहेत त्यापेक्षा सोप्या वाटतात. आपण त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर आपल्याला त्या खऱ्या रीतीने समजणार नाहीत. आणि आपल्याकडे बायबल आहे! येशूच्या श्रोत्यांपैकी कोणीच हे दाखले पूर्वी कधी ऐकले नव्हते. ते लिहिले गेले नव्हते की ते पुन्हा पुन्हा वाचू शकले असते, त्यांची व्याकरणात्मक रचना तपासली असती आणि इतर शास्त्रलेखांशी सहज संबंध जोडला असता. पहिल्या श्रोत्यांनी या गोष्टी एकदाच ऐकल्या. जर त्यांनी लक्ष दिले नसते तर ते राज्य गमावणार होते. असे लक्ष विचलित होणे फार महागात पडणार होते.

जेव्हा येशूने हे दाखले का शिकवले याचे कारण सांगितले तेव्हा त्याने ते यशया ६:९-१० चा  संदर्भ देऊन सांगितले – त्याच्या श्रोत्यांनी “पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये.” असे होऊ शकणार होते (मार्क ४:१२). इथे पुन्हा येशूचे समजण्यास कठीण असे उदाहरण त्याचा मुद्दा स्पष्ट करते : जर आपण लक्षपूर्वक ऐकले नसले तर तो जे काही सांगत आहे ते आपण गमावून टाकू. देव अशी कोडी सांगत आहेत आहे का की जी लोक समजू शकणार नाही? होय आणि नाही. देवाच्या राज्याची आध्यात्मिक रहस्ये प्रकट करण्यासाठी येशूने दाखले सांगितले आणि ती लोकांना समजावे अशी त्याची इच्छा होती. म्हणूनच त्याने म्हटले “ज्याला ऐकायला कान आहे तो ऐको” आणि “लक्ष द्या” पण त्याच्या प्रकट करण्याच्या पद्धतीने श्रोत्यांची जागरूकता व प्रामाणिकपणा याची परीक्षा झाली. जे खरेच ऐकण्यासाठी ऐकत होते ते ऐकू शकले. पण आध्यात्मिक रीतीने मंद आणि लक्ष विचलित झालेले ऐकू शकले नाहीत. पहिल्या वर्गाच्या लोकांना येशूला राज्य द्यावयाचे होते. दुसऱ्या नाही. जे लक्ष देऊ शकत नव्हते ते आपला आध्यात्मिक मंदपणा उघड करीत होते – मंदपणाचे गंभीर परिणाम आहेत: देवाचे राज्य गमावणे.

विवेकानुसार  देवाचे मार्ग

जर येशूचे मार्ग विवेकानुसार ऐकू येतात तर ते तसे आहेतच. देवाच्या वचनाला धरूनच येशू बोलला आणि चालला हे पुढील वचनात पकडले गेले आहे. “कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५:८-९).

देवाचे मार्ग आपले मार्ग नाहीत. आपण कोणीच उद्धाराची गोष्ट देवाने जशी लिहिली तशी लिहू शकलो नसतो. ही गोष्टच आपल्याला एका व्यक्तिमत्वाकडे  आणि त्याच्यामागे असलेला उद्देश दाखवते. आणि जर आपण लक्ष देत असलो तर हेच व्यक्तिमत्व व उद्देश आपण येशूने देवाच्या राज्याविषयी सांगितलेल्या समजण्यास कठीण अशा दाखल्यात शोधू शकू. पण आपण तसे करत नाही.

परिचित, संपन्न आणि विचलित

पात्र होण्यासाठी किल्ली म्हणजे आपण लक्ष द्यायला हवे. कारण येशूने म्हटल्याप्रमाणे आपण जर लक्ष देत नसलो तर देव जे करीत आहे ते आपण गमावून बसू व हा विचलितपणा आपल्याला फार महागात पडेल.

देवाच्या कृपेने येशूचे जे मूळ श्रोते होते त्यांच्यापेक्षा आपल्याला अधिक फायदेशीर सोयी आहेत: आपल्याला देवाचे अधिकारयुक्त वचन लिखित स्वरूपात आहे. खरं तर देवाच्या वचनाकडे जाण्याचा मार्ग इतर ख्रिस्ती लोकांना कधी नव्हता तेवढा आपल्याला सुकर झाला आहे.

पण येशूच्या शिक्षणाशी एवढा परिचय झाल्याने आपल्याला आता पहिल्या शतकाच्या श्रोत्यांसारखा धोका नाही असे समजून आपण स्वस्थ बसू नये. येशूचे दाखले ज्या लोकांनी प्रत्यक्ष ऐकले त्यांच्यापेक्षा आपल्याला स्पष्ट चित्र दिसत असेलही.  पण आपण कधी नव्हे इतके मंदपणे ऐकण्याविषयी धोक्यात आहोत (इब्री ५:११).

आज ख्रिस्ती जन कधी नव्हते एवढे श्रीमंत आहेत, यामुळे अनेक मोह आपल्यापुढे येतात व ते आपल्याला भेडसावतात आणि नाश करतात (१ तीमथ्य ६:९-१०). आणि कधी नव्हे इतके ख्रिस्ती लोकांवर विविध प्रकारच्या व अनेक विचलित करणाऱ्या गोष्टींचा भडीमार होत आहे.  अति परिचित, अति संपन्न आणि अति विचलित असणे ही ऐकण्यास मंद असण्याची पाककृती आहे. आणि ते येशू जे बोलतो त्याचे स्पष्टीकरण करता येऊन पण त्याप्रमाणे प्रत्यक्ष न केल्याने दिसून येते.

एखादा परिच्छेद शिकवता येणे पण त्याचे आज्ञापालन न करणे हा खोटा दिलासा आहे. अशा वेळी आपल्या दैहिक अधीरता व इच्छा आपल्यावर प्रभुत्व गाजवून कार्य करून घेतात, येशूच्या आज्ञा किंवा अभिवचने नाही.  फक्त न ऐकणे किंवा विसरणे यापेक्षा मंदपणे ऐकणे हे अधिक फसवे आहे.

अगदी जवळून लक्ष द्या

“ह्या कारणास्तव ऐकलेल्या गोष्टींकडे आपण विशेष लक्ष लावले पाहिजे, नाहीतर आपण त्यांपासून वाहवत जाऊ” (इब्री २:१). जर आपण लक्ष पुरवले नाही तर आपण ढळले जात आहोत हे आपल्या ध्यानातही येणार नाही. आपण भोवताली पाहू आणि अनेक इतर जणांचे लक्ष विचलित झाले आहे असे आपल्या लक्षात येईल. उदासीन ख्रिस्ती जन ख्रिस्ताचे बोल बोलतात पण तसे वागत नाही. हे असेच असते असे त्यांना वाटते आणि आपण अगदी ठीक आहोत अशी ते समजूत करून घेतात. येशू म्हणाला अगदी तसेच करून म्हणजे त्याने जे सांगितले अगदी तसेच केल्यास आपण जवळून लक्ष देत आहोत हे आपल्याला समजते (योहान १४:१५).

ख्रिस्ती जीवन हे दक्षतेचे जीवन असते (मार्क १३:३७; लूक २१:३६; इफिस ६:१८; १ थेस्स. ५:६; १ पेत्र ५:८). ख्रिस्ती जीवन हे ऐकणारे जीवन असते (मार्क ४:२४; लूक ८:२१; योहान १०:२७; रोम १०:१७; इब्री ३:७-८). पण येशूचे लक्षपूर्वक ऐकणे सहजपणे येत नाही. त्याची काळजीपूर्वक जोपासना व जतन करावे लागते. आणि जवळून लक्ष कसे द्यावे याचे काही सूत्र नाही. लक्ष देण्याची सवय लावून ते जोपासले जाते – कृपेच्या सवयींचा सराव करून. आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन लक्ष पुरवायला शिकतो. जर आपण पित्याला हे शिकव असे मागितले तर पवित्र आत्मा आपल्याला मदत करील (लूक११:९-१०, स्तोत्र २५:४).

म्हणून काहीही करून आपण जे ऐकतो त्याकडे आपण लक्ष पुरवलेच  पाहिजे. आपले लक्ष देणे उद्ध्वस्त होईल अशा जगात आपण राहत आहोत आणि येशूचे शब्द हे विवेकानुसार सत्य आहेत. आणि आपण येशूचे कसे ऐकतो यावरच सर्व काही अवलंबून आहे.

 

 

Previous Article

 देवाच्या प्रीतीचा अनुभव जेरी ब्रिजेस (१९२९-२०१६)

Next Article

मौल्यवान क्षण तुम्हाला ओलांडून जाऊ देत लेखक : जॉर्ज मोर्स

You might be interested in …

ईयोबाच्या संदेशाचा आढावा

जॉन पायपर एका पित्याने हा प्रश्न मला पाठवला आहे. “माझ्या चवदा वर्षांच्या मुलीने नुकतेच ईयोबाचे पुस्तक पहिल्यांदाच वाचलं आणि इथं देवाचे जे चित्रण आहे ते पाहून ती गोंधळून गेली आहे. कारण आतापर्यंत तिने देव प्रेमळ […]

रात्री उच्च स्वराने गा लेखक: स्कॉट हबर्ड

ख्रिस्ती लोक हे अशा प्रकारचे लोक असतात की ते मध्यरात्री गाणी गातात. जेव्हा पौल व सीला यांना मारहाण करून, रक्तबंबाळ करून, बेड्या घालून तुरुंगात डांबले होते तेव्हा तुरुंगातील इतर कैद्यांनी त्या कोठडीत त्यांना गाणी गाताना […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

  एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.  अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण १२ कोणाला भ्यावे […]