दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देव नेहमीच मेज तयार करतो मार्शल सीगल

कदाचित देवाच्या पुरवठ्याची इतकी संथपणे स्वीकारलेली, इतकी गृहीत धरलेली, इतकी नकळत स्वीकारलेला दुसरी कोणती कृती नसेल ती म्हणजे आपले पुढचे जेवण.

आज जगातील करोडो लोकांसाठी हे न पेलवणारे आश्चर्य होऊ शकते आणि त्याचा सन्मान केला जातो. आपल्यातल्या अनेकांसारखे जेव्हा “आमची रोजची भाकर आज आम्हांस दे” (मत्तय ६:११) अशी ते प्रार्थना करतात, तेव्हा ही भाकर कशी व कोठून येईल हे त्यांना खरेच माहीत नसते. आपल्यातल्या कित्येकांना कधीच वाट पहावी लागली नाही पण त्यांना तशी वाट पहावी लागते. जेव्हा पुरेसे खाऊन त्यांच्या पोटाच्या वेदनेची आग शमवून रात्री ते बिछान्यावर पडतात तेव्हा ते नवल करतात की आज आपल्याला उपास नाही घडला – आणि देवाने त्यांना पुढचे २४ तास तग धरण्यासाठी पुरेसे अन्न दिले. उरलेले आपण आपले जेवण घेताना असे नवल करण्यात किती मंद आहोत. कधी आपण जेवायचे विसरून जातो. कधी आपल्याला आपल्या व्यस्त कामाच्या दिवसात जेवण हे अडथळा आणणारे वाटते. स्वर्गीय देवाने आपल्याला दिवसातून तीनदा पुरवलेला हा सूर्योदय पाहण्याचे नवल आपण गमावून बसलो आहोत.

तो अन्न उत्पन्न करतो

स्तोत्र १०४ आपल्याला अवाक् करणारे दररोजच्या भाकरीचे सौंदर्य वर्णन करण्याचे विसरत नाही.

“तो जनावरांसाठी गवत आणि मनुष्याच्या उपयोगासाठी वनस्पती उगववतो; ह्यासाठी की, मनुष्याने भूमीतून अन्न उत्पन्न करावे; म्हणजे मनुष्याचे अंतःकरण आनंदित करणारा द्राक्षारस; त्याचे मुख टवटवीत करणारे तेल, मनुष्याच्या जिवाला आधार देणारी भाकर, ही त्याने उत्पन्न करावी (स्तोत्र १०४:१४-१५).

“तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस; कनातीप्रमाणे आकाश विस्तारतोस” (स्तोत्र १०४:२).
तू पृथ्वीच्या स्तरांना तिच्या पायावर असे स्थापन केले आहेस, काळजीपूर्वक तिच्या गाभ्यावर आच्छादन घालत २५,००० मैलांचे आवरण तिच्यावर चढवले आहे (स्तोत्र १०४:५). तू पर्वत तुझ्या हातांनी उचलले, त्यातले काही २०,००० फूट उंच आहेत आणि तू त्यांच्यामध्ये दऱ्या खोरी कोरली (स्तोत्र १०४:८). आणि तू आम्हांला अन्न चारतोस. आमचे पुढचे भोजन हिमालय, ग्रॅन्ड कॅनीयन अशा  श्वास रोखून पाहण्यासारख्या ठिकाणांच्या शेजारी निर्माण केले असेल. तुमच्यासमोर वाढलेल्या  ताटामागे अशी गहन भव्यता सकारलेली आहे हे रहस्य माझ्याप्रमाणेच तुम्हीही गमावले आहे का?

अन्न हे काही तळाशी घातलेली टीप नाही

जे स्तोत्रकर्त्याने पाहिले तेच येशूने पाहिले, जीवनाला आधार देणारी देवाच्या आकाराची भाजलेली अद्भुत भाकर. जेव्हा तो शिष्यांना प्रार्थना करायला शिकवतो तेव्हा तो म्हणतो, ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा :

“हे आमच्या स्वर्गातील पित्या,तुझे नाव पवित्र मानले जावो.तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे…” (मत्तय ६:९-११).

आपला प्रभू स्वर्गाच्या पुरवठ्यातून व जगाच्या कानाकोपऱ्यातून आपल्या ताटातल्या चपातीपर्यंत हा अखंड पुरवठा आणतो. ह्या छोट्याशा प्रार्थनेमध्ये विश्वातून आपल्या किचनमध्ये झालेले हे संक्रमण तो वगळत नाही कारण ह्या सर्वामध्ये तो देवाचे सामर्थ्य जाणतो.

जेव्हा आपल्यासमोर असलेल्या अन्नासाठी आभार मानण्यास आपण थांबून प्रार्थना करतो तेव्हा हे क्षण क्षुल्लक, तात्पुरते, विसरण्याजोगे आहेत असा विचार करणे आपण टाळावे. प्रत्येक भोजन हे प्रभू आपल्या मेजावर मांडतो. त्याच्या लोकांना अन्न पुरवून तो त्याचे नाम पवित्र राखतो, त्याचे राज्य विस्तृत करतो आणि (इतर गोष्टींप्रमाणेच) त्याची इच्छा पूर्ण करतो. आपण जे खातो ते येशूसाठी तळाशी लिहिलेली टीप नाही किंवा नंतर सुचलेला विचार नाही. कारण त्याच्या पित्याचा गौरव व्हावा अशीच त्याची इच्छा असल्याने रोजची भाकर तो गृहीत धरून चालत नाही.

दोन महान घटक

जेवणासाठी आभार मानण्याच्या प्रार्थनेत देव दोन महान घटक मिश्रित करतो : एक, आपण जे काही खातो त्यामध्ये तो स्वत:चे काहीतरी तयार करतो – त्याचे मोल, तोंडाला पाणी सुटवणारे त्याचे वैभव. जे आपण खातो ते देवाविषयी गप्प राहत नाही. आपला प्रत्येक घास आपल्याला काहीतरी अधिक गोड, अधिक तृप्ती देणारे, जिवाला अधिक राखणारे असे करण्यास प्रवृत्त करते : तो स्वत: ! “अन्नाची निर्मिती, जीभ आणि मानवी पचनसंस्था ही देवाच्या अनंत सुज्ञतेचे फळ आहे आणि ते सर्व जग एका सुसंवादाच्या एकतेमध्ये गुंफून टाकते. निरनिराळ्या चवी निरनिराळे प्रकार निर्माण करतात आणि स्वर्गीय गोष्टींच्या खाता येईल अशा प्रतिमा सादर करतात.” जो रिग्नी.

दुसरे, जेव्हा देव आपले अन्न आपल्यासाठी तयार करतो, तेव्हा त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपले पोषण करतो आणि आपल्याला शक्ती पुरवतो.  “म्हणून तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा” (१ करिंथ १०:३१). मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही तरीही भाकरीशिवाय तो दीर्घकाळ जगू शकणार नाही. आपण देवाच्या प्रीतीला लायक नसतानाही देव आपल्याला पृथ्वीवरील लोकांतून निवडतो आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत आपण त्याचे साक्षी व्हावे असे करतो. आणि आश्चर्य म्हणजे रोज आणि रोज, तासन तास  तो पृथ्वीमधून अन्न आणून आपल्याला टिकवून ठेवतो. रिग्नी यांनी पुढे म्हटले आहे, “ होय अन्न हे आपल्या आनंदासाठी दिलेले आहे; देवाला जाणून घेण्याची आपली क्षमता विकसित व्हावी म्हणून दिले आहे. तसेच अन्न हे आपल्याला कामासाठी ऊर्जा व ताकद पुरवण्याचा देवाचा मार्ग आहे.”

जर तुमच्या समोरच्या जेवणाच्या रहस्याची जाण तुम्ही गमावली असेल तर लक्षात घ्या हे अन्न फ्रीजमधून किंवा तुमच्या घरातल्या कोठीतून किंवा वाण्याच्या दुकानातून अथवा खाटीकाकडून किंवा शेतकऱ्याकडून आलेले नाही तर देवाच्या मनातून व ह्रदयातून आलेले आहे. आणि त्याने आपल्याला तोंड आणि जेवण हे फक्त तग धरून राहण्यासाठी दिलेले नाही. आपण ते मुख्यत्वाने त्याच्याकरता खावे अशी त्याची इच्छा आहे – आपण त्याचा अनुभव घेऊन त्याचा आनंद घ्यावा आणि या जगात त्याच्याबद्दल अधिक सांगत राहावे म्हणून दिले आहे.

माझा सर्वकाळचा वाटा

जर आपण देवाची अन्नापेक्षा जास्त किंमत करत नसू तर आपला रोजच्या अन्नाचा पुरवठ्याचा आपल्याला खऱ्या रीतीने विस्मय वाटणार नाही. “माझा देह व माझे हृदय ही खचली – माझे पाणी कोरडे पडेल आणि माझी भाकरी कदाचित येणारही नाही – तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे” (स्तोत्र ७३:२६). तो माझा वाटा आहे. तीन वेळा पूर्ण भोजन आणि बरेच अधिक.. शेकडो व हजारो वर्षे…

आपल्याला लागणारी भूक व तहान यांच्या जाणीवेची देवाने अशी योजना केली आहे की त्याद्वारे आपल्या जिवाची भूक व आध्यात्मिक अन्नावर आपण भर द्यावा… आपले रिकामे पोट व कोरडा घसा, तसेच भरलेले पोट व शमलेली तहान, निरनिराळ्या चवींचा आस्वाद असे निरनिराळे अनुभव नसतील तर आपली आध्यात्मिक जीवने भिकेला लागतील. आणि आध्यात्मिक इच्छांसाठी आपल्याला खरे शब्दच नसतील, देवाशी नाते जोडण्यास काही मानसिक आणि भावनिक चौकटच राहणार नाही.

जे आपण खातो त्यामुळे आपल्याला देवाची भूक लागावी अशी त्याची इच्छा आहे. आपण बहुधा आपली भूक भागावी म्हणून खातो. पण जर त्याऐवजी आपण जो देव आपल्याला भरवतो त्याला पाहण्याचा, त्याची चव घेण्याचा आनंद घेण्यासाठी का खाऊ नये?

आपल्या प्रभूने देह धरण केला आणि आपल्यासोबत खाताना म्हटले, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही”  (योहान ६:३५). मग ही जीवनाची भाकर वधस्तंभावर मोडली गेली, त्याच्या मौल्यवान रक्ताचा द्राक्षारस आपल्यासाठी सांडला गेला – यासाठी की जे भुकेले, कृतघ्न, भटकणारे- यांना त्याच्या नव्या करारात आणावे ( १ करिंथ ११:२४-२६) आणि “कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीसाठी” (प्रगटी. १९:९) आपली जागा आरक्षित व्हावी.

थांबा आणि तुमच्या पुढच्या भोजनाचा खरा आस्वाद घ्या. तुम्हाला कदाचित हे ओढून ताणून आणल्यासारखे वाटले तरी अन्न हे त्याचा पुरवठा करणाऱ्याकडे निर्देश करते हे समजून घ्या. ते त्याची कहाणी सांगते आणि त्याच्यासमवेत जी मेजवानी आपण अनंतकाळ चाखणार त्याची आठवण करून देते.

Previous Article

गर्वाची सात मार्मिक लक्षणे फेबियन हार्फोर्ड

Next Article

चर्चला जाण्याची पाच अयोग्य कारणे ग्रेग मोर्स

You might be interested in …

येशू सांताक्लॉजसारखा असता तर

लेखक: जिमी नीडहॅम काल माझ्या मुलीने एक मोठा प्रश्न विचारला. कारच्या पाठीमागच्या सीटमध्ये तिने मला विचारले “ डॅडी ह्यावेळी सांता आपल्या घरी येणार आहे का? ज्यांना छोटी मुले आहेत असे ख्रिस्ती आईवडील अशा प्रश्नाला घाबरतात. […]

जेव्हा येशू पुन्हा येईल

जॉन ब्लूम हर्ष जग प्रभू आला, नमा हो त्याजलाह्रदी जागा करा त्याला, मोदे गा गीताला हर्ष जगा प्रभू राजा, नमा हो त्याजलानभी, नगी, जळा, स्थळा, पुन्हा गा गीताला जा, जा अघा तसे दु:खा, निघोनी कंटकाआशीर्वादा […]