दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मानव होणारा राजा     जॉन मॅकआर्थर

 

येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या देशात पळून गेले. त्यांच्या कमकुवत खांद्यावर असलेले जबाबदारीचे ओझे त्यांना किती जड वाटत असेल – जो सर्व विश्वाचा देव, मानवी शरीरामध्ये आला होता त्याची काळजी वाहण्याची  जबाबदारी घेण्यास त्यांची निवड केली गेली होती.

त्यांचे मिसर देशाकडे पलायन मला नेहमी उपरोधिक वाटते.  – अनेक पिढ्यांपूर्वी ज्याने आपल्या सामर्थ्याने  इस्राएलाच्या मुलांना सोडवले तोच नम्र बालक राजा आता त्याच राष्ट्रात आश्रय घेत होता. मिसरच्या लोकांना त्याच्या दैवी व राजकीय व्यक्तित्वाची कल्पनाही नसेल – त्यांच्या राजाच्या कल्पनेत तो कुठेच बसत नव्हता.

मिसर देशाला त्यांच्या गौरवी इतिहासाचा अभिमान होता. ३००० वर्षांच्या इतिहासात तीस वंशपरंपरागत राजकर्ते होऊन गेले होते. मिसरचे राजे म्हणजे फारो हे सामर्थ्यवान व्यक्ती असत व कल्पनेपलीकडे श्रीमंत असत. त्यांनी संपत्ती शस्त्राप्रमाणे सांभाळली होती, भव्य शहरे बांधली, प्रचंड सैन्यांवर प्रभुत्व गाजवले. आलिशान महालात राहिले, ते उत्तम पक्वाने खात असत, उत्तम द्राक्षारसाचे सेवन करीत, किमती दागदागिने घालत, त्यांना कशाचीच कमतरता नसे.

फारोच्या मरण्याचा दर्जाही काही कमी नसे. “तुम्ही आपल्याबरोबर काही घेऊन जाऊ शकत नाही” असे त्यांनी कधी ऐकले नसावे. मेल्यानंतरच्या जीवनाची तरतूद हा मिसरच्या धर्माचा अविभाज्य भाग होता. म्हणून त्यांच्या रीतीनुसार ते पुढच्या जीवनात प्रवास करण्यास लागणारी तरतूद पुरण्याच्या खोल्यांमध्ये भरभरून करीत. टूट राजाची कबर याचा पुरावा देते.

कायम जगण्याची अपेक्षा एवढीच फारोंची जबरदस्त आकांक्षा नव्हती. ऐतिहासिक नोंदीनुसार फारोंची कल्पना होती की त्यांना अलौकिक दर्जा देण्यात आला आहे. मिसर देशातील पिकाला पाणी देणारा पूर आणण्यासाठी फारो जबाबदार आहे असे समजले जाई आणि म्हणून देशाला अन्न पुरवण्याचे श्रेय त्याला दिले जाई. त्याची मूर्ती केली तर  नागरिक त्या मूर्तीपुढे नमन करीत. आणि गर्वाची परिणती म्हणजे प्रत्येक राज्य करणारा फारो स्वत:ला एका तरी देवाचे प्रतिरूप समजत असे.

प्राचीन फारो इतरांच्या भक्तीची मागणी करत असतील किंवा सध्याचे संशयवादी फारो देवाला निर्माता न मानता सिंहासनावरून खाली ओढतात आणि स्वत:ची भक्ती करतात. कसेही असो, मानवाचा मूळजात नमुना म्हणजे स्वत:ला उंचावणे. देवाविरुध्द बंडखोरी ही स्वप्रेमापलीकडे जात नाही. जी व्यक्ती दुसऱ्यांच्या बदल्यात स्वत:चे हित पाहते ती स्वत:ला विश्वाच्या केंद्रस्थानी ठेवते. तुमचे आणि माझे तारण होण्यापूर्वी आपली हीच स्थिती होती. आणि ज्यांची प्रभूशी ओळख झाली नाही ते याच स्थितीमध्ये राहतात.

आणि इतिहासामध्ये देव बनू पाहणाऱ्या अशा मानवांची गर्दी झाली आहे तरी एकच देव मानव होणार होता.

आपले तारण सुरक्षित करण्यासाठी आपल्या प्रभू येशूला काय करावे लागले याचा क्षणभर विचार करा. स्वर्गाच्या राजाने आपले राजासन सोडले आणि एक गोठा आपली जोपासना व्हावी म्हणून निवडला. देवाच्या या एकाच पुत्राचा दुष्ट राजाने शोध घेण्यामुळे त्याला मिसर देशात हद्दपार बालक असे व्हावे लागले. सर्व जगाच्या ज्ञानाचा व सुज्ञतेचा जो उगम त्याला गरिबीत जन्म घ्यावा लागला आणि जगिक ऐश्वर्य आणि संपत्ती याशिवाय तो जीवन जगला. पवित्र व कलंक विरहित अशा तरुण मशीहावर सैतानाचे सर्व प्रकारे हल्ले झाले तरीही आपल्या पूर्ण शक्तीने त्याने त्याचा विरोध केला. निर्मितीच्या या राजाने मानव होण्यास स्वत:ला इच्छेने वाहून दिले. त्यामध्ये वेदना, भूक, तहान, दु:ख, शारीरिक थकवा, मानवी भावनांच्या सर्व छटा यांचा समावेश होता. तरीही त्याने पाप न करता हे सर्व स्वत:वर घेतले.

अथांग अशा निस्वार्थी, व त्यागपूर्ण प्रीतीच्या कृतीने त्याने स्वर्गाचे वैभव सोडले आणि आमच्याऐवजी तो मरण पावला. जे लोक फक्त देवाच्या क्रोधालाच पात्र होते त्यांना त्याने दया देऊ केली. जे आपण करू शकत नव्हतो एवढेच नव्हे तर करणारही नव्हतो ते करण्यासाठी तो खाली आला. प्रीतीने विश्वाचा हा देव अनंतकाळातून मानवी इतिहासात हस्तक्षेप करण्यास उतरला आणि जे स्वत:ला वाचवू शकत नव्हते त्यांचे तारण करण्यास तो आला.

एकाच शब्दात सांगायचे झाले तर ख्रिस्तजन्मामुळे आपण प्रीती शिकतो. ही प्रीती त्याच्या येण्याने, त्याच्या जीवनाने, त्याच्या मरणाने प्रकट झाली. ही स्वार्थत्याग करणारी प्रीती आहे. ह्या प्रीतीने स्वत:ची गरज न शोधता इतरांची गरज शोधली. ह्या प्रीतीने आपण काय गमावणार हे पाहिले नाही तर दुसऱ्यांना काय मिळणार हे पाहिले. ह्या प्रीतीने स्वत:ला रिकामे केले ज्यामुळे इतर भरले जातील, स्वत:ला नम्र केले यासाठी की दुसरे उंचावले जातील. या प्रीतीने स्वत:च्या किंवा आपल्या फायद्याचा विचारही न करता स्वत:ला देऊन टाकले.

“अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या ठायीही असो;तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या
बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही,तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले. आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण, आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले, आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे” (फिलीपै २: ५-११).

 

 

 

 

 

 

Previous Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर

Next Article

येशू सांताक्लॉजसारखा असता तर  जिमी नीडहॅम

You might be interested in …

इतरांचे भले चिंता

ग्रेग मोर्स माझ्या पत्नीवर त्या पापाचा परिणाम पाहीपर्यंत मला ते दिसतही नव्हते. इतकी उत्साही, बालसदृश, तडफदार, असणारी ती आता सहजतेने विनोद करेना, तिचे हास्य मावळले. ती शांत झाली, तिच्यातला जोम कमी झाला, ती पूर्वीची राहिली […]