दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

येशू सांताक्लॉजसारखा असता तर  जिमी नीडहॅम

 

काल माझ्या मुलीने एक मोठा प्रश्न विचारला. कारच्या पाठीमागच्या सीटमधून तिने मला विचारले “डॅडी ह्यावेळी सांता आपल्या घरी येणार आहे का?”
ज्यांना छोटी मुले आहेत असे ख्रिस्ती आईवडील अशा प्रश्नाला घाबरतात. कारण विश्वासी म्हणून खोलवरच्या  समर्पण व खात्रीने आपल्याला ख्रिस्तजन्माच्या सोहळ्यामध्ये ख्रिस्तालाच केंद्रस्थान द्यायचे असते. पण मिडिया, मित्र आणि नातलग यांचा अवाढव्य ताणही आपण डावलू शकत नाही. जो म्हणतो की, अशा वेळी आपला जुन्या सांताक्लॉजबद्दलचा मुलांचा आनंद हिरावून घेऊ नका. तर या सांताला शुभवर्तमानाच्या प्रकाशात कसे हाताळावे?
मी तसा सांताचा कट्टर विरोधक नाही. अशीही काही ख्रिस्ती कुटुंबे मला माहीत आहेत की त्यांनी कौशल्यपूर्ण रीतीने सांताला परंपरातून बाहेर काढून त्याचा ख्रिस्ताकडे निर्देश केला आहे. तर मी अशा गोष्टींच्या विरोधात आहे की ज्या कृपेच्या शुभवर्तमानाच गोडवा आणि खोली कमी करून दुसराच संदेश देतात.
एक गोष्ट आपण स्पष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती म्हणजे सांता हा सुद्धा एक संदेश देत आहे. दर वर्षी टी व्ही आणि मुलांच्या पुस्तकातून त्याची घोषणा केली जाते. वरवर पाहिले तर तो निरुपद्रवी आहे असे वाटते. पण त्याच्या लाल आणि पांढऱ्या अस्तन्यांवर एक जगिक दृष्टिकोन लिहिलेला आहे जो येशूच्या शुभवर्तमानाशी संघर्ष करतो. ख्रिस्ती पालक या नात्याने आपल्या कुटुंबात शिरकाव करणाऱ्या  प्रत्येक दृष्टिकोनाची सुवार्तेच्या संदेशातून छाननी करायला हवी. या मुद्यातून मी चार मुद्दे तुमच्यापुढे ठेवू इच्छितो आणि त्यांच्यामुळे येशूची बातमी ही सांताच्या नाताळामध्येही उजळून दिसते.

बक्षिसांनंतर गर्व येतो
सांता म्हणतो “तुम्ही जर चांगले केले तरच तुम्हांला पारितोषिक मिळेल”
येशू म्हणतो, “तुम्ही चांगले करू शकत नाही; पण जे मी केले त्यामुळे तुम्हाला पारितोषिक मिळेल.”
तुमच्या मुलांच्या ह्रदयात गर्व कसा फोफावू लागतो हे तुम्हाला पहायचं का? त्यांना फक्त असे शिकवा की त्यांच्या  जीवनात त्यांच्या चांगल्या कृतीचे प्रतिफल म्हणून त्यांना चांगल्या गोष्टी मिळतील. जर येशूने सांताप्रमाणे आपल्याला वागवले असते तर आपण फक्त नैतिक असण्याचा प्रयत्न केला असता म्हणजे त्यातून आपल्याला काहीतरी मिळाले असते. आज्ञापालनाचे क्षण हे फक्त स्वत:ची प्रशंसा व लोभ असे बनले असते.
देवाची स्तुती असो की ख्रिस्त यापेक्षा चांगले बहाल करतो. तुम्ही आणि मी जे जीवन जगू शकत नाही ते जीवन तो परिपूर्ण रीतीने जगला आणि त्याचे नितीमत्त्व तो आपल्याला आपल्यासाठी देऊ करतो. या नाताळाला यापेक्षा अधिक कोणती चांगली देणगी तुम्ही आपल्या मुलांना देऊ शकता? सांता देत असल्यापेक्षा ही शुभवार्ता अनंत पटीने चांगली आहे इतकेच नव्हे तर ती आपल्या अंत:करणात एक सौम्य, नम्र वृत्ती निर्माण करते.

सांताच्या कृपेची रिकामी पोतडी
सांता म्हणतो, “तुम्ही जर वाईट वागलात तर शिक्षा म्हणून तुम्हाला कोळसे मिळतील.”
येशू म्हणतो, “तुम्ही वाईट केलेले आहेच पण देवाच्या क्रोधाचे निखारे मी तुमच्यासाठी वधस्तंभावर घेतले आहेत.”
मला येथे एका आक्षेपाला उत्तर देवू द्या.  तुम्ही विचार करत असाल, “मुले कितीही वाईट वागली तरी कोणताच सभ्य पालक त्याला कोळसे देणार नाही. हे कृपेचेच चित्र नव्हे काय?” त्यावर मी म्हणेन होय हे कृपेचेच चित्र आहे, पण सुवार्तेच्या कृपेचे नाही. आपल्याला क्षमा मिळावी यासाठी सुवार्तेच्या कृपेसाठी येशूला आपल्या प्राणांची किंमत द्यावी लागली. सांताची कृपा किंमत न देता क्षमा करते. हे मुलांना असे म्हणण्यासारखे आहे “ शेवटी तू काय करतोस हे महत्त्वाचे नाही; तुला नेहमीच सुटका मिळेल.”  सत्य हे आहे की, आपल्या कृतींचे परिणाम असतात – अनंतकालिक परिणाम. आणि देवाने त्याच्या कृपेने येशूला पाठवले व  त्याने ते परिणाम स्वत:वर घेतले यासाठी की आपल्याला त्याच्याबरोबर जीवनाची  देणगी मिळावी. ह्याव्यतिरिक्त असलेला कोणताही जगिक दृष्टिकोन हा शुभवर्तमानाशी स्पर्धा करतो व तो त्याला पूरक नाही.

न्यायाची भीती नाही

सांता म्हणतो, “तुमच्या वागण्याचे परीक्षण करण्यासाठी माझी सतत तुमच्यावर नजर आहे.”
येशू म्हणतो माझ्या परिपूर्ण आचरणामुळे तुम्ही जरी चुका केलेल्या यादीवर आहात तरी तुम्हाला कधीच काळजी करण्याचे कारण नाही. “म्हणून आता जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाही” (रोम ८:१). आपला तारणारा तपासण्याची यादी घेऊन बसलेला नाही. कलसैकरांस पत्र आपल्याला सांगते की ती यादी त्याने कालवरीला खिळून टाकली. “त्याने आमच्याविरुद्ध असलेल्या आरोपपत्राचा निवाडा असलेला दस्तऐवज आणि ज्यात आम्हांला विरोध होता, तो त्याने आमच्यातून काढून घेतला, आणि वधस्तंभावर खिळ्यांनी ठोकून रद्द केला” ( कलसै.२:१४). आपला स्वर्गीय बाप कडक शाळामास्तर नाही. देवाच्या दृष्टीने आपण चुका केलेल्यांच्या यादीमध्ये कधीच सापडणार नाही.

तुमचे मूल आज्ञा का पाळणार?

सांता म्हणतो, “आज्ञा पाळा मग नाताळाच्या वेळी माझी मर्जी तुमच्यावर असेल हे निश्चित.”
येशू म्हणतो, “आता तुमचा स्वीकार झाला आहे यामुळे आता तुम्ही विश्वासाने व कृतद्न्यतेने आज्ञापालन करा न्यायाच्या भीतीमुळे नव्हे.”
माझ्या अनुभवाप्रमाणे पौल म्हणतो त्यानुसार अंत:करणपूर्वक आज्ञापालन –  रोम ६:१७. याला कोणीच अटकाव करू शकत नाही. कारण ते आज्ञापालनासाठी न्यायाच्या भीतीकडे झुकत नाही. जॉन पायपर म्हणतात, “पापाच्या अभिवचनाचे सामर्थ्य देवाच्या सामर्थ्याने मोडले गेले आहे. येशूशिवाय पाप जे काही देऊ करते त्याच्याविरुद्ध देवाने जे आपल्याला येशूमध्ये जे देऊ केले आहे ते विजयाने उभे राहते.
भीती ही आपले कार्य करतेच (लूक १२:५). पण फक्त विश्वास व देवामध्ये असलेले समाधान अखेरीस पापाचे सामर्थ्य पराजित करते. देवाच्या व्यवस्थेमध्ये स्वीकार केल्यानंतरच नेहमी आज्ञापालनाला चालना मिळते. जेव्हा आपण आपल्या लहान मुलांना सांगतो की तुम्ही आज्ञा पाळा म्हणजे तुमचा न्याय होणार नाही तेव्हा आपण त्यांना अस्थिर, कमकुवत, आनंदविरहीत अशा जमिनीवर उभे राहण्यास सांगतो. यामुळे तुमची मुले छान वागतील पण ती नवी केली जाणार नाहीत.

सर्वात आनंदाची बातमी
प्रत्येक पालकांना वाटतेच की हा ख्रिस्तज्न्माचा उत्सव आपल्या मुलांसाठी सुखाचा आनंदाचा ठरावा. या नाताळाम्ध्ये आपण आपल्या घरांमध्ये अत्युच्च आणि कायम आनंद देणारी दृष्टी यावी म्हणून झगडू या. ज्याला दावीद राजा -पूर्णानंद- म्हणतो (स्तोत्र १६:११). सांता देत असलेला संदेश हा क्षणिक, बालवर्गाचा व कमकुवत जनांसाठी आहे. तो आनंद अनिश्चित असून आपल्या चांगल्या कृतीवर आधारित आहे, आपल्या कर्मांमुळे आपले आशीर्वाद तो निश्चित करतो. आणि जर आपण व्यवस्थित वागलो नाही तर तो आपल्याला दोष देतो. म्हणून आता माझ्या मुलांना समज येत असताना आम्ही त्यांच्या बालपणासाठी नव्या प्रथा निर्माण करत आहोत. आम्ही आमच्या बैठकीच्या खोलीत दिवे उजळतो पण सांतासारखे प्रतिस्पर्धी काढून टाकले आहेत. आम्ही सांताला नाकेतोंडे मुरडत नाही पण  आमच्या मुलांनी आनंदाची बातमी ऐकावी म्हणून आम्ही ही निवड केली आहे. तुमची फक्त कोळशे मिळण्याचीच लायकी आहे पण देवाने तुमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने स्वत: किंमत देवून आपल्याला सर्वात मोठी देणगी दिली ती म्हणजे खुद्द तो स्वत: !

Previous Article

मानव होणारा राजा     जॉन मॅकआर्थर

Next Article

येशूचे वंशज – येशूच्या कुटुंबातील कुप्रसिध्द स्त्रिया जॉन ब्लूम

You might be interested in …

जेव्हा देव अन्यायी वाटतो

जॉनी एरिक्सन टाडा लेखांक २                             (लेखिकेसंबधी – वयाच्या १७व्या  वर्षी  पोहोण्यासाठी उडी मारताना जॉनीचा अपघात झाला व त्यामुळे तिला हातापायाचा पक्षघात झाला आणि कायम व्हीलचेअरवरचे आयुष्य मिळाले. दोन वर्षाच्या पुनर्वसनानंतर नवी  कौशल्ये व अशा स्थितीमध्ये […]

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर    अनुवाद : क्रॉसी उर्टेकर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष […]