Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on फरवरी 18, 2020 in जीवन प्रकाश

बायबलला काहीही विचारा                                                               स्कॉट हबर्ड

बायबलला काहीही विचारा स्कॉट हबर्ड

जर बायबलबद्दल तुमचा विश्वास काय आहे याची माहिती हवी असेल तर तुम्ही त्यासाठी काय प्रश्न विचारता याकडे लक्ष द्या.

आपल्यातील काही असे प्रश्न विचारत नाहीत कारण प्रश्न विचारण्याची वृत्ती अनादर करणारी आहे असे ते समजतात. आपण बायबलच्या पानातून पाय जपून उचलत चालतो जसे काही ते कलादालन आहे आणि प्रत्येक पानापुढे हात लावू नका अशी सूचना पुढे आहे.

आपल्यातले काही इतर प्रश्न विचारतात पण साशंक होऊन काळजी करतात. खूपच छाननी  केली तर कदाचित बायबल टिकाव धरणार नाही. आपण प्राचीन वस्तूंप्रमाणे शास्त्रलेख इतके जपून हाताळतो जणू घट्ट पकडले तर ते तुटून जातील.

पण बायबल हे काही कलादालन नाही किंवा पुरातनकाळच्या वस्तूंचा संग्रह नाही. तर शोध घेणाऱ्यांसाठी ते एक राकट आणि टिकावू जग आहे. जसे तुम्ही हे पुस्तक उघडता तसे देव आपल्याला त्याच्या वैभवाच्या पवर्तावर चढू देतो. त्याच्या गूढ गोष्टींच्या सागरामध्ये डुबू देतो आणि त्याच्या अनंत खाणीमध्ये खोल शिरू देतो. त्या पर्वतावर आपण काही जोराने पळू शकत नाही, किंवा त्या ताऱ्यांमध्ये  खूप खोलवर निरखून पाहू शकत नाही. हे सागर आपण कधीच संपवू शकणार नाही, ही तुफाने शमवू शकणार नाहीत किंवा संगमरवरी खडक फोडू शकणार नाहीत. आपण फक्त थकून जाऊ, गप्प केले जाऊ, भग्न होऊ आणि या सर्वांनी आपल्याला काबीज केले जाईल.

जे प्रश्न आपण बायबलला विचारू त्याने जगाला काही धोका दिला जाणार नाही. आपण फक्त त्याच्या अद्भुत गोष्टींमध्ये खोल ओढले जाऊ.

पश्न विचारून त्याचा सन्मान करा

अर्थातच बायबलला आपण कसे प्रश्न विचारतो त्यावर बरेच काही अवलंबून आहे – आपण तेथे जात आहोतच. पण त्यापूर्वी जर देवाचा सन्मान करण्याचे आपले ध्येय आहे तर प्रश्न का विचारावेत यावर जरा विचार करू या.

पहिले बायबल कशा प्रकारचे पुस्तक आहे हे ध्यानात घ्या. इथे आपल्याजवळ दैवी प्रकटीकरणाचे वाचनालय आहे: ६६ पुस्तकांनी हजारो वर्षांच्या कथेची भव्य मालिका साहित्याच्या अनेक शैलींमध्ये सादर केली आहे. बायबलमध्ये कोठेही उडी घ्या तुम्ही स्वत:ला काव्य, भाकिते, दाखले, पत्रे, नीतिसूत्रे किंवा नाश अशा कशामध्ये तरी आलेले पाहाल.

बायबलमधली साहित्यिक धाटणीसुद्धा विविध प्रकारची आहे. “जरी कारण संदेश मनुष्यांच्या इच्छेने कधी आलेला नाही; तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या पवित्र मनुष्यांनी देवापासून आलेला संदेश सांगितला आहे” (२ पेत्र १:२१). तरी यशया हा काही यिर्मया नाही आणि लूक योहान नाही. देवाच्या सत्याचा  प्रकाश आपल्याकडे एकाच उगमातून येतो पण तो मानवी व्यक्तिमत्वे व दृष्टिकोनाचे अनेक पैलू असलेल्या लोलकातून बाहेर पडतो.

सत्याचा शोध करा

शास्त्रलेखाच्या लेखकांनी आपले संदेश नेहमीच समोरच्या फडताळात ठेवले नाहीत. तरीही बायबलचे मुख्य शिक्षण इतके स्पष्ट आहे की ते मुलांनाही समजू शकते. पण सर्वच बायबल इतके साधे नाही. अनेक वेळा आपण फक्त सत्यच हाताळावे यात देवाला रस नाही तर आपण ते शोधावे अशी त्याची इच्छा आहे. “एखादी गोष्ट गुप्त ठेवणे ह्यात देवाचे गौरव आहे” (नीती २५:२). यामुळेच बायबलचा बराच भाग जाणीवपूर्वक कठीण बाबींनी भरलेला आहे. उदा. “मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नकोस, देशील तर तू त्याच्यासारखा ठरशील. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर दे, नाहीतर तो आपल्या मते स्वत:ला शहाणा समजेल” (नीती २६:४-५).

बायबलचे बारकाईने निरीक्षण करणाऱ्याला असे ताणतणाव, सर्व बायबलमध्ये दिसतील – फक्त जवळ असलेल्या वचनां- वचनाततच नाही तर पुस्तकाच्या निराळ्या अध्यायांत, एकाच लेखकाच्या निराळ्या पुस्तकांत व निरनिराळ्या लेखकांच्या लिखाणातून दिसतील.

उदा. देव “मी शौलाला राजा केले ह्याचा मला पस्तावा होत आहे” असे म्हणतो, तर अठरा वचनानंतर शमुवेल म्हणतो, “तो पस्तावा करणार नाही” (१ शमुवेल १५:११, २९). किंवा पौलाचा अथनीकरांना दिलेला संस्कृतीची जाण धरून दिलेला संदेश (प्रेषित १७:२२-३१) व  १ करिंथ २::२ प्रमाणे “येशू ख्रिस्त, म्हणजे वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त, ह्याच्याशिवाय मी दुसरे काही जमेस धरू नये”  हे त्याचे समर्पण; यांचा आपण कसा मेळ साधावा?

हे सर्व ताण हेतूपूर्वक आहेत, हा काही अपघात नाही. बहुधा मानवी लेखकांनी हा ताण हेतुपूर्वक निर्माण केला; देवही असेच करतो. का? कारण जसे आपण आपले बायबल वाचतो तेव्हा तुम्ही “रुप्याप्रमाणे त्याचा शोध कराल व गुप्त निधींप्रमाणे त्याला उमगून काढाल” (नीती २:३-४).

दुसऱ्या शब्दात आपण काटेकोरपणे आणि प्रार्थनापूर्वक विचार करावा. जर आपण प्रश्न विचारले नाहीत तर आपण विचार करू शकत नाही.

आपल्या प्रश्नामागचे ह्रदय

तर आपण प्रश्न विचारावेत की नाही याबद्दल आपल्याला निवड नाही – फक्त ते कसे विचारावेत हे महत्त्वाचे आहे. आणि शास्त्रातल्या गोष्टी आपल्याला आठवण करून देतात की  ‘कसे’ हा आपल्या कल्पनेपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. मरीयेला तिच्या प्रश्नाला अद्भुत उत्तर मिळाले (लूक १:३४-३८); जखऱ्याला आपला आवाजच गमवावा लागला (लूक १: १८-२३). शिष्यांना युगाच्या समाप्तीबद्दल शिकायला मिळाले. शास्त्री ओशाळवाणे होऊन निघून गेले (मार्क ११:२७-३३). प्रश्न हे देवाचा आनंदाला आमंत्रण देतात किंवा त्याचा क्रोध ओढवून घेतात. हे त्याच्या मागे ह्रदय कसे आहे त्यावर अवलंबून असते.

देवाच्या वचनाला आपण कसे प्रश्न विचारावेत? नम्रतेने, अपेक्षेने, आणि धीराने.

नम्रतेने विचारा

जर आपले प्रश्न केवळ  कागदावरच दिसणार नसतील आणि देवाच्या वचनातील त्याचे गौरव उघड करणार असतील  तर आपण प्रत्येकाने एक ठराविक प्रकारची व्यक्ती असायला हवे – नम्र व्यक्ती.

या जगात आध्यात्मिक दृष्टी असलेले लोक हे उत्तम बौद्धिक सामग्री असलेले नसतात तर ते कृपेने नम्र केले गेले असतात. देव त्याचे मार्गदर्शन ‘ज्ञानी व विचारवंत” यांना देत नाही तर लहान मुलांना देतो (लूक १०:२१). आणि जेव्हा बुद्धिमान आणि गर्विष्ठ मध्यरात्रीच्या दारुड्याप्रमाणे ते हाताळतात तेव्हा “देव नम्र जनांना न्यायपथाला लावतो. तो दीनांना आपला मार्ग शिकवतो” (स्तोत्र २५:९).

जेव्हा नम्र जन शास्त्रलेखांना प्रश्न विचारतात तेव्हा ते राजापुढे असलेल्या प्रजेसारखे, निर्मात्यापुढे असलेल्या निर्मितीसारखे, जो पवित्र त्यापुढे असलेल्या उद्धारलेल्या पाप्यांसारखे प्रश्न विचारतात. असे प्रश्न देवाला सिध्द करतील. नम्र व भग्न अंत:करणातून विचारलेले प्रश्न प्रामाणिकपणाने अर्थ शोधतात – असे प्रश्न देवाला आवडतात (यशया ५७:१५).

अपेक्षेने विचारा

खरे नम्र केवळ प्रश्न विचारूनच थांबत नाही तर ते अपेक्षा धरतात की देव प्रश्नांना उत्तरे देतो आणि “त्याचा शोध झटून शोध करणार्‍यांना तो प्रतिफळ देणारा आहे”  (इब्री.११:६). खरी नम्रता दडलेली संपत्ती शोधण्यासाठी खोलवर जाते. बऱ्याच वेळा आपल्यातले बरेच जण आपला शोध टीकाग्रंथ, विद्वान शिक्षक, आणि स्टडी बायबल यांनी सादर केलेले ज्ञान विचारात घेतात. पण आपण आपले ज्ञान फक्त त्यांच्या ज्ञानावरच मर्यादित न ठेवता  आपण स्वत: काय शोधू शकू हे पाहावे.

जेव्हा आपण सहजपणे आपल्याला उत्तरे पुरवणाऱ्यांवर अवलंबून राहतो तेव्हा आपण चुकीचे प्रश्न विचारतो. अशा वेळी आपण विसरतो की, “ज्ञान परमेश्वर देतो” (नीती २:६). आणि ही खात्री आपल्याला सांगते की आपण अंतर्दृष्टी मिळावी म्हणून देवाला विचारावे, प्रार्थना करावी आणि आपली मने व ह्रदये पणाला लावून अधिक नेटाने अर्थ शोधावा. आणि देव स्वत: आपल्या कुवतीपेक्षा अधिक अर्थ प्रकट करील.

धीराने मागा

नम्रता व अपेक्षेमध्ये आपण धीराची भर घालतो. कारण जर आपण देवाच्या वचनाला प्रश्न विचारण्याच्या बाबतीत गंभीर असू तर अशी वेळ येईल की तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला तुम्हाला उत्तर मिळणार नाही. आपण नम्रतेने व अपेक्षेने विचारले होते पण त्या क्षणी तुमचे प्रयत्न मातीत गेले.

देवाला त्याच्या सुज्ञतेने आपल्याला गोंधळवून टाकणाऱ्या ‘गूढ गोष्टींचे’ उत्तर देणे योग्य वाटले नाही ( अनुवाद २९:२९). शास्त्रलेखात देवाच्या सुज्ञतेच्या अनेक उंची व खोली आहेत त्यांच्यापर्यंत आपण सध्या पोंचू शकत नाही तर फक्त शांतपणे नवल करीत त्या स्वीकारू.

सर्व गूढ गोष्टी या जीवनात स्पष्ट होणार नाहीत, सर्व गाठी सोडवता येणार नाहीत, सर्व कोडी सुटणार नाहीत. पण ख्रिस्ती विश्वास हा जे काही आपल्याला समजायला आवडेल त्याच्यावर विसंबून राहत नाही तर ख्रिस्ताला समजून घेण्यावर आहे. “ज्या ख्रिस्तामध्ये ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्त निधी आहेत” (कलसै २:३).

उत्तरे कितीही वैभवी असली तरी तरी ते आपली अंतिम आशा नाहीत; खिस्त आपली आशा आहे. आणि जेव्हा आपले ज्ञान अडखळू लागते तरी ख्रिस्ताशी असलेली आपली सहभागिता नाही. कारण येथेच आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेवणे, आपल्याच बुद्धीवर अवलंबून न राहणे; (नीती ३:५) काय आहे हे आपल्याला समजते. अनंतकाळ सिध्द करील की असा भरवसा आधारहीन नव्हता .

दरम्यानच्या काळात देवाच्या वचनामध्ये अनेक न शोधलेली ठिकाणे आपली वाट पाहत आहेत. या प्रकटीकरणाच्या मैदानात आपण पळू या. या नद्या पार करा, शिखरे चढून जा आणि ढगापर्यंत पोचा. आणि असे करताना खजिना शोधून काढा. त्याद्वारे तुम्ही देवाला अधिक शोधाल अशी आशा बाळगा.