दिसम्बर 26, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

एक वेश्या – कुमारी आणि वधू स्कॉट हबर्ड

लैंगिक पापासारखे काही डाग आपल्या जीवाला अगदी चिकटून राहतात. आठवणी रेंगाळतात. वेड्यावाकड्या कामना आपोआप जाग्या होतात. जुने मोह नव्या नावाने दरवाजा ठोठावू लागतात.

ज्यांना असा काळा भूतकाळ नाही ते सुद्धा लैंगिक पापाने होणारी भग्नता काय आहे हे समजू शकतात. विवाहित व अविवाहित, अनुभवी संत अथवा नवा विश्वासी, पूर्वीचा व्यभिचारी किंवा आजन्म कुवारी – आपल्यातले कोणीच अजून आपण जसे व्हावे तसे झालेलो नाहीत. अजूनही आपण आपल्या आतील दलदलीतून सुटलेले नाही. जे ‘छोट्या’ मोठ्या लैंगिक पापाला चालना देते त्यापासून: दिवास्वप्ने, हळूवार टाकलेले कटाक्ष, एखाद्याचे शरीर निरखणे, व्यर्थता, भावनिक जवळीकतेची आस, नको ती उत्सुकता. पूर्ण लैंगिक शुद्धतेचा मार्ग स्वर्गातच लाभेल.

आपल्या ह्या लांबलचक जीवनात आपण सहज मार्ग हरवू शकतो. रस्ता लांब आहे आणि आपण थकून जातो. वाट खडतर आहे आणि आपण आरामासाठी आसुसतो. मार्गावर ठिकठिकाणी मोह आहेत आणि आपण फसू शकतो. दररोजच्या स्वनाकाराच्या भरडण्यात आपण कुठून आलोय आणि कुठे चाललोत हे आपण विसरून जाऊ शकतो.
वेळोवेळी आपण आपले डावपेच व धोरणे यांच्यावर आपले डोळे उचलून पुढे मागे पाहण्याची गरज आहे. आपण जे पूर्वी होतो तसे आता नाहीत आणि पण जसे असायला हवे तसेही अजून नाहीत. देवाने ख्रिस्ताच्या शुद्ध्तेची वस्त्रे आपल्याला घातली आहेत (यशया ६१:१०). आणि एक दिवस देव आपल्याला ‘त्याच्यासारखे’ करील कारण आपण त्याला तोंडोतोंड पाहू (१ योहान ३:२). जसजसे देवाने आपल्यामध्ये जे काही केले आहे आणि तो आपल्याला कुठे नेत आहे त्याबद्दल आपण आनंद करतो तसे लैंगिक शुद्धतेकडे पावले टाकण्यास आपल्याला सामर्थ्य मिळत राहते.

होशेय हा संदेष्टा आपल्या कल्पना काबीज करणारी एक गोष्ट आपल्याला देतो: देवाची न्यायी ठरवणारी कृपा एका वेश्येला कुमारी बनवते आणि त्याची शुध्द करणारी कृपा त्या कुमारीला एका विश्वासू वधू बनवते.

वेश्या

ती एक अत्यंत सुंदर वधू होती. मिसरी दास्यातून तिला सोडवले होते. इस्राएलची गुलामीची लक्तरे काढून तिला विवाहाची वस्त्रे लेववण्यात आली, तिच्या लोखंडी बेड्या काढून तिला सोने रूपे दिले होते (होशेय २:८). ती राष्ट्रांमध्ये राणीसारखी राहिली,  पण हळूहळू ज्या पतीने तिला सोडवले त्याला ती विसरली आणि तिच्या इतर प्रेमिकांच्या शय्येवर ती चढली (होशेय २:१३).

इस्राएलने केलेला व्यभिचार हे पापाच्या वेडाचे – लैंगिक पापाचेही – सततचे  चित्र आहे. इस्राएलने आपला देव सोडला आणि त्याचे बाहू तिच्यासाठी सतत खुले आहेत हे विसरून ती इतरांकडे जवळीक शोधू लागली  (होशेय २:५). आणि सुख शोधण्यासाठी तिने त्याला झिडकारून टाकले. तिला याची जाणीव नव्हती की सर्व सौख्ये त्याच्या उजव्या हाताशी आहेत आहेत (होशेय २:८). तिने स्वत:ला दुसऱ्या प्रेमिकांना देऊन टाकले आणि अखेरीस त्यांनी तिला उघडे केले व दास्यात टाकले (होशेय २:१०; ३:१,२). देवाने याचे भयानक परिणाम दोनदा सांगून तिला प्रतिसाद दिला. म्हणून/ह्यास्तव हे शब्द दोनदा वापरून इस्राएलच्या व्यभिचाराचे न्याय्य फळ तिला दाखवले गेले आहे.
“ह्यास्तव पाहा, मी तुझ्या मार्गावर काटेरी कुंपण घालीन; तिला वाट सापडणार नाही अशी आडभिंत तिच्यापुढे घालीन” (२:६).
“म्हणून पिकाच्या वेळी माझे धान्य व हंगामाच्या वेळी माझा द्राक्षारस मी अटकावून ठेवीन व तिची नग्नता झाकण्यासाठी तिला दिलेली माझी लोकर व माझा ताग हिरावून घेईन” (२:९).

त्या क्षणी सुखकर वाटलेले लैंगिक पापाचे क्षण अखेरीस आपल्याला या स्थितीला आणून सोडतात: नग्नता, धिक्क्कार आणि आपल्या अधर्माच्या काट्यामध्ये अडकून पडणे. देवाने हस्तक्षेप केला नाही तर आणखी एक म्हणून होशेय आपल्याला देतो स्वर्गीय युक्तिवादाच्या ज्वालेतून फेकलेला निखारा: दया आणि कृपेने जळत राहणे.

कुमारी

न्याय होत असताना दया बोलू लागते:  “ह्यास्तव मी तिला मोह घालून वनात आणीन, तिच्या मनाला धीर येईल असे बोलेन” (होशेय २:१४). हा पहिल्यापेक्षा खोलवरचा युक्तिवाद आहे आणि म्हणूनच प्रभातेचा समय आहे. देव आपल्या अविश्वासू बायकोला तिच्या अशुद्ध अंथरुणात पाहतो – आणि तिला दोष देण्याऐवजी तो तिला वाचवतो. प्रतिकार न करता येणारी कृपा करून तो तिला दासी बनवणाऱ्याच्या हातातून ओढून घेतो आणि तिला स्वत:साठी तो घेतो.

तारण इतके परिपूर्ण आहे की दुसऱ्या एका संदेष्ट्याच्या द्वारे देव त्याच्या लोकांना पुकारतो; “हे इस्राएलाच्या कुमारी”   (यिर्मया ३१:४). ‘हे व्यभिचारिणी’ किंवा ‘लाजीरवाण्या स्त्रिये’ असे न म्हणता ‘हे  इस्राएलच्या कुमारी’ – हे डागविरहित, अकलंकित, कुमारी इस्राएल! फक्त तिच्या पापांची क्षमा करून त्याचे समाधान होत नाही तर देव तिला (आणि आपल्याला) नवे करतो. व्यभिचारिणी कुमारी बनलेली आहे.

फक्त नव्या करारात अशा प्रकारच्या उद्धारक प्रीतीचा प्रवाह आपल्याला दिसतो. व्यभिचारिणी कुवारी बनू शकते फक्त याच कारणाने की – त्या नग्न, धिक्कार आणि अधर्मांचे काटे ल्यालेल्या त्या व्यभिचारिणीसाठी त्या पतीने स्वत:ला वधस्तंभावर पसरले. फक्त वधस्तंभावरच आपण आपण नव्या सुरुवातीची बातमी ऐकू शकतो.  “तुमच्यापैकी कित्येक तसे होते; तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरवलेले असे झालात” (१ करिंथ ६:११). प्रत्येक, गडद, वेडावाकडा आणि दोष देणारा कलंक त्या नीतिमान बनवणाऱ्या दयेच्या प्रवाहात दिसेनासा होतो.

लैंगिक शुद्धतेसाठी लागणाऱ्या सामर्थ्याची सुरुवात वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताबरोबर सुरू होते. आणि वधस्तंभावरचा ख्रिस्तच ते सामर्थ्य नवे करत जातो. येथे धडपडणारे  पश्चात्तापी आठवतात की येशू हाच त्यांचे नीतिमत्त्व आहे (२ करिंथ ५:२१). देवाची प्रीती त्यांच्या ह्रदयात ओतली गेली आहे हे त्यांना जाणवते (रोम ५:५-६). ते पुन्हा त्या वैभवी स्वर्गीय क्षमेविषयी ऐकतात आणि देवाच्या कृपेचा श्वास घेतात.

वधू

देवाने जे केले त्याचे वैभव सांगणे हे होशेयच्या उद्धाराच्या गीताचे फक्त पहिले कडवे आहे. मग तो झांज, बासरी, वीणा, सतार ही घेण्यास जातो : प्रभू काय करील ते गाण्यासाठी.
“मी तुला सर्वकाळासाठी आपली वाग्दत्त असे करीन. नीतीने व न्यायाने,  ममतेने व दयेने मी तुला आपली वाग्दत्त असे करीन. मी तुला निष्ठापूर्वक वाग्दत्त करीन व तू परमेश्वराला ओळखशील” (होशेय २:१९-२०).

धार्मिकता, न्याय, सततची प्रीती, दया, विश्वासूपणा, हे गुण देव फक्त या विवाहात आणतो एवढेच नाही पण हे गुण तो आपल्यामध्ये निर्माण करतो. आता हळूहळू नंतर पूर्णपणे (होशेय २:१६). आता आपण पूर्ण शुद्धतेसाठी कण्हतो व झगडा करतो आणि आपल्या लैंगिक मूर्खपणाबरोबर देवाची शुध्द करणारी कृपा लढा देते हे पाहून पुलकित होतो. नंतर आपण असे कण्हणार नाही, झगडणार नाही कारण जसा तो शुद्ध आहे तसे आपण ही होऊ (१ योहान ३:२).

याचा परिणाम होईल शांती. आपल्यामध्ये शांती, आपल्यासभोवतालच्या जगाशी शांती आणि आपल्या देवासमवेत शांती (होशेय २:१८, २१-२३).  आपली लैंगिकता ही आता एक अशुद्धतेचा गाळ आणि वेडीवाकडी नसणार पण देवाच्या बागेसारखी बनेल. प्रत्येक इच्छा, विचार आणि उर्मी म्हणेल, “तू माझा देव आहेस” (होशेय २:२३).

कुवारी आता सदासाठी एक विश्वासू वधू बनेल.

लैंगिक शुद्धतेसाठी सामर्थ्य फक्त वधस्तंभावरच्या ख्रिस्ताकडे मागे वळून पाहण्याने मिळत नाही  पण नवे आकाश व नव्या पृथ्वीत गौरवलेल्या ख्रिस्ताकडे पुढे पाहून मिळते. त्या देशाचे सौंदर्य जेव्हा आपल्या ह्रदयात उचंबळून वर येईल तेव्हा आजच्या काळ्या सुखापासून मागे फिरण्यासाठी आपल्याला नव्या  सामर्थ्याची जाणीव होईल (१ योहान ३:३). हा प्रवास सोडून देऊन  काट्यात घर करून राहण्याच्या विचाराने आपण थरथर कापू (इब्री ४:१). आपण नक्की तेथे पोचणार हे देवाचे अभिवचन आपण जतन करू ( १ थेस्स. ५:२३-२४). आणि एक दिवस आपल्याला आढळेल की आपण एका नव्या देशात प्रवेश केला आहे जेथे आपला वर वैभवाने राज्य करीत आहे.

Previous Article

जेव्हा मला भीती वाटेल मार्शल सीगल

Next Article

तुमचा पिता असण्यात देवाला खूप आनंद आहे मार्शल सीगल

You might be interested in …

कोमट जन माझ्याकडे येवोत

मार्शल सीगल येशूसाठी तुमचे ह्रदय थंड होण्यास केव्हा सुरुवात झाली? बहुतेक तुम्हाला तो दिवस अथवा आठवडा किंवा कदाचित वर्षही आठवत नसेल. तुम्ही जेव्हा आवेशी (उष्ण) होता तो वेळ बहुतेक तुम्हाला आठवत असेल. तुम्हाला बायबल वाचायची […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण ११ (मार्क ३) मला […]

संपादकीय

ख्रिश्चन जीवन प्रकाश वाचण्यामध्ये तुम्हाला आनंद लाभत आहे अशी माझी खात्री आहे. हा अंकही नेहमीप्रमाणेच विविध प्रकारचे लेख, वृत्त, मुलांचे पान अशा सदरांनी युक्त असून या नव्या वर्षात पाऊल टाकताना तुम्हांला प्रेरणादायी ठरेल अशी आशा […]