दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

करोनाच्या संदर्भात महत्त्वाचा संदेश अर्पण बागची, पुणे

देवाने ज्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेतला त्या महान सेवकांच्या जीवनातून रोग व महामारीसाठी महत्त्वाचा संदेश.

 

*विल्यम केरी :* आधुनिक मिशनरी कार्याचा जनक. ह्यांनी भारतात येऊन ४० भाषांत पवित्र शास्त्राचे भाषांतर केले.

  • त्यांचा मुलगा भारतात येताच जुलाबाने मरण पावला.
  • त्यांची पत्नी तापाने मरण पावली.

 

*एमी कारमायकल :*  भारतातील अनाथांची आई व डोनावर मिशनची संस्थापक.

  • ह्या २० वर्षे आजारामुळे बिछान्याला खिळून होत्या.

 

*अदोनीराम जडसन* : ब्रह्मदेशात यांनी सुवार्ता आणली व तेथील भाषेत पवित्र शास्त्र भाषांतरित केले. तसेच ५००० पेक्षाही जास्त ख्रिस्ती मंडळ्या त्यांच्या कार्यामुळे स्थापन झाल्या.

  • त्यांची पत्नी व मुले दोघेही रोगामुळे मरण पावले.
  • ते स्वतः फुफ्फुसाच्या आजाराने मेले.

 

*मेरी स्लेसर* : नायजेरिया देशात सुवार्ता नेणारी व्यक्ती

  • आयुष्याची ४० वर्षे मलेरियामुळे येणाऱ्या तापाने ग्रस्त होती.
  • ह्याच तापामुळे ती मरण पावली.

 

*डेव्हिड लिव्हिंगस्टन* : आफ्रिका देशातील सर्वांत जास्त सेवा करणारा व अनेकांना सेवेसाठी उत्तेजन देणारा मिशनरी.

  • जुलाब व मलेरियाने होणाऱ्या रक्तस्रावामुळे मरण पावला.

 

*चार्ल्स स्टड* : महान व श्रीमंत क्रिकेटर ज्याने महाल सोडून चीन देशात सेवा करणे पसंत केले.

  • पोटाच्या आजाराने मरण पावला.

 

*पंडिता रमाबाईची मुलगी मनोरमाबाई :*

  • आईच्या अगोदरच आजाराने मरण पावली.

 

*पंडिता रमाबाई :* आम्हांला मूळ हिब्रू आणि ग्रीकमधून मराठीत पवित्र शास्त्र देणारी व्यक्ती व अनाथांची आई.

  • न्यूमोनियामुळे होणाऱ्या श्वासाच्या आजाराने मरण पावली.

 

*आपण ख्रिस्ती लोक स्वलाभासाठी वचन पिळून काढून त्याचा सोईस्कर अर्थ लावणारे आहोत.* आजार, रोग आले की सुरू होतो आपला उद्योग.

 

पण वरील विश्वासाच्या पुढाऱ्यांनी असे काही केले नाही. ते देवाची सेवा करत होते व अत्यंत महान असे कार्य त्यांनी केले. अनेक लोक व देश त्यांच्यामुळे आशीर्वादित झाले. पण त्यांनी देवाचा आणि त्याच्या वचनाचा गैरअर्थ लावला नाही. ते रोगाने व आजाराने ग्रस्त होते, तरी त्यातच ते सेवा करत गेले.

 

अदोनीराम जडसन ह्यांनी आपल्या भावी सासऱ्याला पत्र लिहिले होते :

*मला तुम्हांला विचारू द्या की, तुम्ही आपल्या मुलीला मरणाच्या स्वाधीन करण्यास तयार आहात काय? तिला एका मूर्तिपूजक देशात जाण्यासाठी – अशा ठिकाणी की जेथे आजार, महामारी, संकट व मरण होणे नक्की आहे – तेथे तुम्ही आपल्या मुलीला पाठवणार काय… सुवार्तेसाठी आणि देवासाठी?*

 

आणि आपण बघा. येशूचे रक्त, त्याचे नाव, त्याचे वचन… सर्वकाही चुकीच्या अर्थाने आणि उद्देशाने वापरत आहोत. स्वार्थी नालायक ख्रिस्ती आहोत सारे. वर उल्लेखिलेल्या देवाच्या सेवकांमुळे आज आपण ख्रिस्ती आहोत, पण त्यांच्या जीवनांतून आपण काही धडे शिकलो नाही. उलट हे पाहा आजकालचे भोंदू शिक्षक.  ते म्हणतात, “देवाकडे या म्हणजे तुम्हांला आजार व रोग होणार नाहीत.” पवित्र शास्त्र असे काही आश्वासन देत नाही.

 

*हे समजून घ्या :*

  • आपण जोवर ह्या देहात आहोत तोवर आम्ही रोग व आजार ह्यांनी ग्रस्त होऊ शकतो. कारण हा देह नाश पावत आहे.
  • त्यामुळेच देव आम्हांला आता नाही तर नंतर गौरवी शरीर देणार आहे. आम्ही जर रोगमुक्त होऊ शकतो, तर मग आम्हांला गौरवी शरीराची गरज नाही.
  • येशूचे रक्त रोगमुक्त होण्यसाठी नव्हे, तर खंडणी म्हणून आमच्या पापासाठी ओतण्यात आले.
  • येशूचे नाव हे तंत्र किंवा मंत्र नाही. “तारण दुसर्‍या कोणाकडून नाही; कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यांमध्ये दिलेले नाही” (प्रेषित.४:१२)
    केवळ ते नाव घेतल्यास कोणी रोगमुक्त होत नाही.
  • आम्ही ख्रिस्ती आहोत आणि आम्ही पुरेसा विश्वास ठेवला तर आम्ही रोगमुक्त होणार हे पवित्र शास्त्राचे शिक्षण नाही (पवित्र शास्त्रात व ख्रिस्ती इतिहासात असे अनेक लोक होते जे आजारी होते व आजाराने मरण पावले. त्यात संत पौलाचाही समावेश होतो.)
  • अभिषिक्त तेल आणि अभिषिक्त माणूस रोग व आजार दूर करू शकत नाही.
  • पवित्र शास्त्रातील वचन वापरल्यास आम्ही रोगमुक्त होत नाही.
  • देवाचे नाव यहोवा-राफा आहे, त्यामुळे आम्ही रोगमुक्त होतो असे नाही.
  • जे म्हणतात त्यांना “आरोग्याचे दान” आहे ते तर घाबरून घरात बसले आहेत. त्यांना आपल्या घरी बोलवा येतात का पाहू…

 

मग अशा वेळेस आमची आशा काय? आमची आशा सुवार्ता आहे जी आम्हांला सार्वकालिक जीवनाची खात्री देते. स्थिती काहीही असो, आम्हांला ती अढळ ठेवते. आम्हांला तारणाची खात्री आहे व ख्रिस्ताच्या कार्यात आम्हांला ती तृप्त ठेवते. त्यामुळे समोर रोग किंवा आजार जरी असले तरी आमच्या अंतःकरणात  देवाची शांती आहे.

 

*नवल ह्याचे वाटते की, जे शिक्षक रोगमुक्त, आजारमुक्त जीवनाची खात्री देतात त्यांना तारणाची खात्री नाही.* आम्ही करोनाला येशूच्या नावात हरवतो किंवा मारतो किंवा बांधून ठेवतो असे विधान करणाऱ्याचा नाद सोडा.

 

वरील देवाच्या लोकांचे चरित्र वाचा. सेवा काय आहे?  देव कोण आहे? हे समजून घ्या. आजचे भोंदू शिक्षक आणि त्यांचातील फरक समजून घ्या. स्वयंघोषित सेवकांचा नाद सोडून द्या.

 

Previous Article

तुमचा पिता असण्यात देवाला खूप आनंद आहे मार्शल सीगल

Next Article

संघर्षला तोंड देताना जॉश स्क्वायर्स

You might be interested in …

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

स्कॉट हबर्ड ख्रिस्ती या नात्याने आपल्याला फक्त बायबल वाचण्यातच रस नसतो. जे वाचतो ते आपल्याला भावले जावे, त्याने आपल्याला प्रेरणा द्यावी व आपल्याला बदलून टाकावे अशी आपली इच्छा असते. आपण लवकर उठून शास्त्रलेखांच्या पानावरून केवळ […]

माझे कोणतेच दु:खसहन देवाला चकित करत नाही वनिथा रिस्नर

मला आता काय होणार? किती कठीण होणार आहे अजून? ही परीक्षा अजून किती काळ चालणार आहे? माझ्या काळजीच्या मध्यभागी हे प्रश्न बहुधा येत राहतात. मला खात्री हवी असते की ही समस्या तात्पुरती आहे. माझी गहन […]

मानव होणारा राजा     जॉन मॅकआर्थर

  येशूचा दुसरा जन्मदिन येण्यापूर्वीच तो हेरोद राजाच्या वधाच्या कटाचे लक्ष्य बनला होता. हा राजा रोमच्या अधिपत्याखाली असलेल्या यहूदीयाचा दुष्ट व कावेबाज अधिपती होता. देवाने स्वप्नात सांगितल्यानुसार मरीया व योसेफ हे बाळ घेऊन दुसऱ्या देशात […]