१. येशूने स्वत: आपल्या येणाऱ्या पुनरुत्थानाची साक्ष दिली.
आपल्यासंबंधी पुढे काय होणार हे येशूने उघडपणे सांगितले. प्रथम वधस्तंभावर खिळले जाणे आणि नंतर मेलेल्यांतून पुन्हा उठणे. “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडीलमंडळ, मुख्य याजक व शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि त्याने तीन दिवसांनंतर पुन्हा उठावे, ह्याचे अगत्य आहे” (मार्क ८:३१). मत्तय १७:२२ व लूक ९:२२ सुद्धा वाचा. ही शुभवर्तमाने जे वाचतात त्यांची खात्री होते की त्या लेखकांची ही भ्रामक कल्पना नव्हती तर येशूने स्वत: जी साक्ष दिली तीच ते खात्रीने पुढे करत आहेत. हे येशूचे स्पष्ट शब्द आहेत. येशूने केलेल्या या विधानावरच दोन साक्षी पुढे आले व “तुम्ही हे मंदिर (शरीर) मोडून टाका आणि मी तीन दिवसांत ते उभारीन.” असे तो म्हणाला अशी साक्ष दिली (योहान २:१९, मार्क १४:५८).
तसेच योनाचे चिन्ह देऊन येशूने सांगितले की “मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील” (मत्तय १२:३९, १६:४).
त्याच्या स्वत:च्या या साक्षीशिवाय त्याच्यावर आरोप करणाऱ्यांनी सुद्धा त्याने केलेला दावा सांगितला (मत्तय २७:६३)
यामुळे पुनरुत्थानाचा पहिला पुरावा आहे की येशू स्वत: यासंबंधी बोलला.
२. पुनरुत्थानदिनी कबर रिकामी होती.
सर्वात प्रथम केलेला दावा असा: “त्या आत गेल्यावर त्यांना [प्रभू येशूचे] शरीर सापडले नाही” (लूक २४:३). आणि त्याच्या शत्रूंनी त्याच्या शिष्यांनी त्याचे शरीर चोरून नेले (मत्तय २८:१३) असे म्हणून याला पुष्टीच दिली. त्याचे मृत शरीर कधीच सापडले नाही. यासबंधी चार दावे करता येतील.
- त्याच्या शत्रूंनी त्याचे शरीर चोरून नेले. जर त्यांनी असे केले असते तर जेव्हा ख्रिस्ती विश्वास यरूशलेमातच यशस्वी रीतीने फैलावू लागला तेव्हा त्यांनी ते शरीर आणून त्याला खीळ घातली असती. पण तसे त्यांना करताच आले नाही.
ब. त्याच्या मित्रांनी त्याचे शरीर चोरून नेले. प्रथम अशीच अफवा पसरण्यात आली (मत्तय २८:११-१५). हे
शक्य होते का? कबरेजवळच्या पहारेकर्यांना त्यांना तोंड देता आले असते का? यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तो
उठला नसताना येशू उठला आहे हे इतक्या अधिकाराने ते कसे सांगू शकले असते? ही फसवणूक आहे असे
माहीत असताना त्यांनी आपला जीव धोक्यात घालून इतकी मारहाण कशी सहन केली?
- येशूला जेव्हा कबरीत ठेवले तेव्हा तो बेशुद्धावस्थेत होता, मेला नव्हता. तो उठला, त्याने धोंड लोटली, सैनिकांवर मात केली. मग त्याने शिष्यांची काही वेळा भेट घेऊन आपण मेलेल्यातून उठलो अहो अशी
त्यांची खात्री करून दिली आणि मग इतिहासात गडप झाला. पण त्याच्या शत्रूंनी देखील अशा प्रकारचा
दावा केला नाही. तो खात्रीने मेलेला होताच. रोमी लोकांनी ते स्वत: पाहिले.
ड. देवाने येशूला मेलेल्यांतून उठवले. असेच होणार हे येशूने पूर्वीच सांगितले होते. आणि हेच झाले असे
शिष्यांनी सांगितले. ही दैवी कृती आहे आहे हे कसे झाले याचे स्पष्टीकरण आपण करू शकत नाही.
३. जे शिष्य आशाहीन व भयभीत होते त्यांचे पुनरुत्थानानंतर लगेचच रूपांतर झाले (लूक २४:२१, योहान २०:१९) आणि त्यांनी पुनरुत्थानाची धैर्याने व आत्मविश्वासाने साक्ष दिली (प्रेषित २:२४, ३:१५, ४:२).
यासाठी माझे स्पष्टीकरण आहे की त्यांनी पुनरुत्थित येशूला पाहिले व त्याने त्याचे साक्षी व्हावे असा त्यांना अधिकार दिला (प्रेषित २:३२). शिष्य हे काही डळमळीत लोक नव्हते तर शुभवर्तमानापूर्वी तसेच नंतरही संशयी होते (मार्क ९:३२, लूक २४:११, योहान २०:८-९,२५).
पौलाने सुद्धा साक्ष दिली की त्याने पुनरुत्थित येशूला पाहिले.
४. पौलाने दावा केला की फक्त त्यानेच येशूला पाहिले नाही तर एकाच वेळी तो ५०० जणांना दिसला आणि त्यातील कित्येक जण तो हे लिहीत असताना जिवंत होते.
“त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत” (१ करिंथ १५:६). त्यावेळी ते फार महत्त्वाचे होते कारण ग्रीक लोक अशा दाव्याबद्दल फार संशयखोर होते आणि तेव्हाचे बरेच साक्षी अजून जिवंत होते. जर ग्रीक लोकांनी त्याचा तपास केला असता व त्यांना ते खोटे आहेत असे सिध्द करता आले असते तर ते फार धोक्याचे ठरले असते.
५. पहिल्या ख्रिस्ती मंडळीचे अस्तित्व व राज्य जिंकणारी वाढ हे पुनरुत्थानाच्या दाव्याचे समर्थन करते.
येशू मेलेल्यामधून उठला आहे व अशा रीतीने देवाने त्याला ख्रिस्त व प्रभू केले आहे ह्या साक्षीच्या सामर्थ्याने मंडळी फैलावू लागली. ‘सर्व राष्टांवरचे ख्रिस्ताचे प्रभुत्व’ याचा पाया आहे: ख्रिस्ताचा मरणावरील विजय. हा संदेश सर्व जगात पसरू लागला. सर्व संस्कृतीपार जाऊन देवाचे नवे लोक करण्याचे त्याचे सामर्थ्य ही त्याची खंबीर साक्ष होती.
६. प्रेषित पौलाचे परिवर्तन पुनरुत्थानाच्या सत्याला आधार देते.
गलती १:११-१७ मध्ये विरोधक श्रोत्यांशी तो बोलत आहे की त्याची सुवार्ता ही लोकांपासून नाही तर पुनरुत्थित ख्रिस्तापासून आली आहे. त्याचा वाद असा आहे की दमास्कसच्या रस्त्यावर पुनरुत्थित येशूला पाहण्याचा अनुभव येण्यापूर्वी तो ख्रिस्ती विश्वासाचा हिंसकपणे विरोध करीत असे (प्रेषित ९:१). पण आता सर्वजण चकित झाले होते की सुवार्तेसाठी तो आपला जीव धोक्यात घालत आहे. त्याचे समर्थन: त्याला पुनरुत्थित येशू दिसला आणि विदेशी लोकांमध्ये सुवार्ता सांगण्यात प्रमुख म्हणून त्याने त्याला अधिकार दिला (प्रेषित २६:१५-१८). अशा साक्षीला आपण मोल देऊ शकतो का? यामुळे आपण पुढच्या मुद्द्याकडे येतो.
७. नव्या कराराचे साक्षीदार हे फसवे किंवा भोळे नव्हते.
एखादा साक्षीदार विश्वासार्ह केव्हा असतो? एखाद्या व्यक्तीच्या साक्षीवर विश्वास ठेवायचा की नाही हे तुम्ही कसे ठरवता? असा निर्णय हा गणित सोडवण्यासारखा नाही. त्यासाठी त्या व्यक्तीच्या जीवनातली दुसऱ्या प्रकारची निश्चितता तितकीच दृढ असायला हवी असते. ( उदा. मी माझ्या पत्नीवर भरवसा ठेवतो कारण ती विश्वासू आहे.) एखादा साक्षी मृत असेल तर त्याने जे लिहिले अथवा लोक त्याच्याबद्दल जी साक्ष देतात त्यावरून आपण आपले मत बनवू शकतो. आता आपण याच मापदंडाने पेत्र, योहान, मत्तय पौल यांचा विचार करू या.
ह्यांचे लिखाण हे काही भोळेपणाने, फसवेगिरीसाठी लिहिले नव्हते. त्यांचे वैयक्तिक समर्पण सुद्धा गंभीर व विचारपूर्वक केलेले होते. त्यांचे लिखाण सुसंगत असून अस्थिर माणसांच्या कल्पना दिसत नाहीत. आणि या माणसांचे जीवन सत्याला आणि देवाच्या सन्मानाला पूर्ण वाहिलेले होते.
८. ख्रिस्ताचे मरण आणि पुनरुत्थानाच्या वृत्तांताच्या शुभवर्तमानात देवाचा गौरव प्रकट होतो.
नवा करार शिकवतो की देवाने पवित्र आत्म्याला यासाठी पाठवले की त्याने ख्रिस्ताला देवाचा पुत्र म्हणून त्याचा गौरव करावा. येशूने म्हटले, “तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल… तो माझा गौरव करील” (योहान १६:१३). येशू मेलेल्यांमधून परत उठला असे केवळ सांगत पवित्र आत्मा हे करत नाही तर तो आपले डोळे उघडून ख्रिस्ताचे जीवन, मरण व त्याचे पुनरुत्थान याच्यातून जो गौरव वृत्तान्तातून दाखवला जातो त्याद्वारे हे करतो. येशू खरा जसा होता ते पाहण्यास तो आपल्याला मदत करतो; मग तो किती खरा, सत्य आणि सुंदर आहे हे आपल्याला कळते. प्रेषित पौल आपल्या आंधळेपणाची ही समस्या आणि त्यावर उपाय असा मांडतो: “विश्वास न ठेवणार्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. कारण “अंधारातून उजेड प्रकाशित होईल” असे जो देव बोलला तो येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी आमच्या अंतःकरणात प्रकाशला आहे” (२ करिंथ ४:४,६).
वधस्तंभावर खिळलेल्या आणि पुन्हा उठलेल्या ख्रिस्ताच्या तारणाचे ज्ञान हे केवळ ऐतिहासिक सत्याचे योग्य परीक्षण करून मिळणारा निर्णय नाही. तर ते सत्य जसे आहे तसे दिसण्यासाठी टाकलेल्या आध्यात्मिक प्रकाशाचे फळ आहे: ख्रिस्ताच्या मुखावर असलेले देवाच्या गौरवाचे सत्य आणि त्याचे प्रकटीकरण – जो काल, आज आणि सर्वदा सारखाच आहे.
प्रभू उठला आहे.
खरोखर उठला आहे.
Social