दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देवाच्या हाताखाली नम्र व्हा सॅमी विल्यम्स

“तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो” (१ पेत्र ५:५-७).

संकटे, परीक्षा येतात तेव्हा  ख्रिस्ती व्यक्तीला आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. पेत्राचे पहिले पत्र पुन्हा पुन्हा सांगत आहे की संकट, परीक्षा ही आपल्याला स्थिर उभे राहण्यासाठी मदत करतात.
वचन ५-७ मधून आपल्याला दिसते की दोन प्रकारच्या मनोवृत्ती संकटातून जाणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीला देवासाठी उपयोगी करतात. १. देवासमोर नम्र होण्यास शिकणे. २. देवावर अवलंबून राहणे.
कठीण समयी सोपी वाटणारी गोष्ट म्हणजे कोणाच्या अधीन न होता स्वत:चा मार्ग शोधणे. धार्मिक आणि आध्यात्मिकपणाचा आव आणणे. पण या वचनातून पवित्र आत्मा आपल्याला तीन आज्ञा देतो.
वचन ५: अधीन व्हा आणि नम्रतारुपी कमरबंद बांधा.
वचन ६: नम्र व्हा.
येथे  अधीन व्हा, नम्र होत जा आणि गर्व जमीनदोस्त करा. या सर्व आज्ञा शांतपणाने पाळण्याच्या आहेत.
तुम्हाला या परीक्षेतून पार पडण्याचे सामर्थ्य आहे असे समजू नका. देवाने दिलेल्या अधिकाराखाली स्वत:ला आणा.

१. देवासमोर नम्र होण्यास शिकणे.
येथे पेत्र सर्व मंडळीशी बोलत आहे की तुम्ही नम्र व्हा.

अ ) कारण त्यामुळे अचूक पारख करता येते.

येथे प्रथम तो तरुणांना हे सांगत आहे.  कारण ते नुकतेच ख्रिस्तावर विश्वास ठेऊ लागले आहेत. त्यांना अनुभव नाही. पेत्र प्रथम ज्या तरुणाच्या गटाला सांगत आहे त्यांच्यासाठी हे मोठे आव्हान आहे. ते अपरिपक्व आहेत. त्यांना अनुभव नाही. त्यांना प्रभूबरोबर चालण्याचा विशेष अनुभव नाही. त्यांना अधीन होणे, अधिकाराखाली येणे कठीण वाटते. का? कारण तरुण लोक ज्या मोहाला बळी पडतात तो आहे गर्व. जे. सी. राईल तरुणांना सांगतात, “तुमच्या कुवती, तुमचे स्वत;चे सामर्थ्य, ज्ञान, तुम्ही कसे दिसता, तुमची हुशारी या गोष्टींचा गर्व करू नका. हे सर्व स्वत:ची खरी ओळख नसण्यामुळे आणि जगामुळे येते. अज्ञान आणि अनुभवाचा अभाव ही गर्वाची बैठक आहे. ही बैठक काढली की गर्व धाडकन कोसळेल.

ब) कारण त्यामुळे अधीन होता येते.

तसेच म्हणजे जसे वडील त्या मुख्य मेंढपाळाच्या अधीन होतात तसे तरुणांनो तुम्ही यावर मनन करा की तुमच्या जीवनावर तुम्हाला नियंत्रण नाही. देवाला आहे. म्हणून तुम्ही देवाच्या लोकांच्या अधीन असा. त्यांच्या सुज्ञतेचा तुमच्या व इतरांच्या जीवनावर प्रभाव पडेल.

क) कारण त्यामुळे सेवा केली जाईल.

आता पेत्र सर्व मंडळीला सांगत आहे. सर्व वयाच्या स्त्री पुरुषांना सांगत आहे.  सर्व मंडळीने दासाच्या सेवेची वस्त्रे गुंडाळायला हवी. एकमेकाबरोबर नम्रतेने वागा. जसा दास हा नेहमीच सेवा करण्यासाठी सिद्ध असतो तसे आमची मने सेवेसाठी नेहमी तयार असावीत.
येशूने त्याच्या शिष्यांचे पाय अगदी वधस्तंभावर जाण्याच्या आदल्या संध्याकाळी  धुतले. कठीण समय येतो तेव्हा आपण इतरांनी आपली सेवा करावी याची वाट पाहतो की सेवा कशी करता येईल हे शोधतो?
मत्तय २०:२८ म्हणते, “मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यास नाही, तर सेवा करण्यास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करण्यास आला आहे.”
सेवेसाठी प्रवृत्त करणारा ख्रिस्ती सिद्धांत म्हणजे, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”
नम्र होणे म्हणजे असे ठिकाण शोधणे की जेथे देव तुमचा अधिक उपयोग करून घेईल.
संकटामध्ये आपल्याला दोन पर्याय असतात. ख्रिस्ती सहभागितेपासून दूर होणे, त्यांचा उपहास व तिरस्कार करणे, आणि आपल्या पापमय प्रतिसादाद्वारे आपली सुटका शोधणे. जर तुम्ही असे करत असाल तर देव तुमच्या विरुद्ध असणार. तो अक्षरश: तुमच्याविरुद्ध लढेल.
पण जर तुम्ही लीनतेची वृत्ती स्वीकारली, आपल्यामध्ये शक्ती नाही हे मान्य केले तर देव तुम्हाला सतत कृपा पुरवील. ही कृपा तुम्हाला शुध्द करीत राहील आणि तुम्ही अधिक उपयोगी व्हाल.

२. देवावर अवलंबून राहणे – देवाची तुमच्यासाठी असलेली काळजी पहा (व. ६,७).

मग जर नम्र होणे इतके चांगले आहे तर ते इतके कठीण का आणि ते आपण जीवनात कसे आणावे? सहाव्या आणि सातव्या वचनात पवित्र आत्मा आपल्याला खरी नम्रता व्यवहारात कशी आणावी याचे दोन मार्ग सांगतो.

नम्र व्हा. याचा अर्थ देवासमोर आपण खरे कोण व कसे आहोत हे समजून घेणे. हा शब्द पर्वत सपाट करण्यासाठी वापरला जात असे. आध्यात्मिक रीतीने गर्व कापून तो वास्तवामध्ये  सपाट करणे. हे आपण कसे करतो?

अ) तुमच्या जीवनाचे नियंत्रण देवावर सोपवून द्या – “देवाच्या पवित्र हाताखाली.” आपण आपल्या जीवनात काहीही बदलू शकत नाही हे समजून आपला गर्व धुळीला आणण्याची गरज आहे. सर्व काही देवाच्या हातात आहे व त्याच्या पुरवठ्याखाली आहे. त्याचे निर्णय स्थिर आहेत आपले निश्चय हे वाफेसारखे आहेत. त्याच्या योजना समर्थ आणि उत्तुंग आहेत. परीक्षा व न्याय हे सुद्धा त्याच्याकडूनच येतात. आपल्या जीवनातील सर्वाच उगम तोच आहे. जेव्हा आपण अशा विचारांनी जगू लागतो तेव्हा तुम्ही त्याचे हेतू कवटाळून घ्याल.
तो तुम्हाला योग्य वेळी उंच करील. तुमची सुटका करावी, तुम्हाला उंच करावे ही त्याची इच्छा आहे.  देवाचा हात आपल्या परिस्थितीला नेहमी हाताळत असतो. आपण काय सहन करू शकतो हे त्याला माहीत आहे. आपण त्याच्यावर अधीन होऊन विश्वास  ठेवायला तयार आहोत का?
परीक्षांचा उपयोग देवबाप आपण अधिक ख्रिस्तासारखे व्हावे म्हणून करतो. प्रत्येक परीक्षा ही विश्वासीयांसाठी देवाने नेमलेला विजय आहे. अगदी मृत्यूची परिणती सुद्धा गौरवात होते.

ब) देवाची काळजी जाणून घेऊन विसावा घ्या

जसजसे आपले भरवसा ठेवणे वाढू लागते तसे आपण पुढच्या पायरीवर पाउल ठेवतो. आपण आपली काळजी त्याच्यावर सोपवून नम्र होतो. काळजी ही अक्षरश: आपल्याला विदारून टाकते. ती आपले ह्रदय विचलित करते. आपल्या मनाला त्रास देते. परीक्षा आपल्यामध्ये आध्यात्मिक रीतीने अनेक व्यत्यय आणते. आपल्याला सांगितले आहे की एकदाच आणि कायमचे तुमची काळजी सोपवून टाका.
“तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीही ढळू देणार नाही” (स्तोत्र ५५:१२).

काळजी ही गर्वाचे लक्षण आहे. तेथे मी देवाला माझ्या समस्येत मदत करू देत नाही. मला काळजी करत राहायला हवे आहे. ती देवावर अविश्वास असल्याचे चिन्ह आहे. त्याने हे संकट पाठवले आहे त्याला कदाचित माझे हित नको आहे. (कारण मला हवे ते तो देत नाही.) येथे आपण त्याच्यावर का काळजी टाकावी याची आठवण दिली आहे “ तो तुमची काळजी घेतो.”

तो आपली जीवने प्रीतीने सांभाळतो. संपूर्ण विश्वाचा देव आपल्यासारख्या पाप्यांमध्ये त्याची प्रीती देत राहतो. “परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो; परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो; परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो” (स्तोत्र १४६:८).

जॉन केल्विन यांनी मोठा छळ सहन करत असलेल्या त्यांच्या मित्राला पाळक म्हणून पत्र लिहिले; “जर तुझ्याकडून सर्व काही काढून घेतले गेले तरी एक सांत्वन तू स्वीकारायला पाहिजे, ते म्हणजे देवाला संपूर्ण वाहून टाकणे. देवाचा पुत्र आपल्याला आहे, त्यामुळे सगळे काढून घेतले तरी आपल्याला काही इजा पोचत नाही. ख्रिस्त हेच आपले  पारितोषिक आहे…मी प्रार्थना करतो की तो तुझ्यामध्ये इतक्या सामर्थ्याने कार्य करील की तू जगातले सर्व तुच्छ मानशील आणि तुझे ह्रदय फक्त त्याच्याकडूनच श्वास घेईल आणि तुला स्वर्गात जी अशा त्याने राखून ठेवली आहे तिची तू चव घेशील.”

 

 

 

 

Previous Article

संकटामध्ये आनंदाचे पाच अनुभव  (उत्तरार्ध) क्रिस विल्यम्स

Next Article

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

You might be interested in …

लक्ष विचलित  झाल्यास तुम्हाला मोठी किंमत द्यावी लागेल लेखक: जॉन ब्लूम

येशूने शुभवर्तमानात पुन्हा पुन्हा सांगितलेले वाक्य असे आहे, “कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको” (मार्क ४:२३). जर आपण शहाणे असू तर येशू जे काही सांगतो ते आपण ऐकू, विशेष करून त्याने वारंवार सांगितले ते. […]

जर तुम्हाला जगण्यास एकच आठवडा असता

जॉन ब्लूम                    कुपीत भरून ठेवण्यास वेळ मिळाला असता जरपहिली गोष्ट केली असती तरराखून ठेवला असता अनंतकाळ सरेपर्यन्तचा प्रत्येक दिवसघालवण्यासाठी तुझ्याबरोबर १९७२ मध्ये जिम क्रोस या एका गीतनिर्मात्या आणि गायकाची आंतरदेशीय कीर्ती उजळू लागली होती. […]

स्तोत्र १४: देवाच्या दीनांचा दिलासा

दाविदाचा हा अनुभव आहे की, “मूर्ख आपल्या मनात म्हणतो, देव नाही.” तो मूर्ख कोण आहे? देवाच्या मंडळीतला एक इसम. एकच आहेत की अनेक? अनेक. पण हा त्यांचा पुढारी, प्रतिनिधी आहे. ते सर्व याच्याशी सममनस्क आहेत. […]