अगस्त 30, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आत्म्याचे फळ – चांगुलपणा

स्टीफन विल्यम्स

 चांगुलपणा म्हणजे काय?
आजच्या दिवसात चांगुलपणा हा शब्द बऱ्याच प्रकारे वापरला जातो. उत्कृष्टपणाचा दर्जा, सामर्थ्य, दयाळू, अवलंबून राहता येणे, आनंदाचा उपभोग, ताजेपणा इ. बाबींसाठी आपण हा शब्द वापरतो.
परंतु ग्रीकमध्ये याचा अर्थ अगदी वेगळा आहे. तो आहे  –  न्याय आणि औदार्य दाखवणारी केलेली प्रत्यक्ष कृती. देवाने स्वत:चे वर्णन निर्गम ३४ मध्ये दयेचा सागर असे केले आहे. देहधारी येशू हा न्यायी होता आणि अनेक स्त्री पुरुषांचे त्याने चांगले केले. उदा. जक्कय, लहान मुले.

आध्यात्मिक चांगुलपणासाठी देवाचे मार्गदर्शन – निर्गम २३:१-३

हा परिच्छेद इस्राएल राष्ट्राला त्यांनी त्यांच्या शेजार्‍याशी न्यायाने  व चांगुलपणाने कसे वागावे हे सांगत आहे. येशूचा स्वीकार करण्यासाठी नियमशास्त्राची जरुरी नाही व ते आपला न्याय करत नाही. तरी ही वचने आपल्याला योग्य संदर्भात लाभाचे मार्गदर्शन करतात. जुन्या करारातही आपल्याला सुवार्तेची अनेक सत्ये दिसतात.

निर्गम हे कराराचे पुस्तक आहे. या कराराची सुरुवात निर्गम २० च्या दहा आज्ञांपासून होते. २१ व्या अध्यायापासूनचा भाग त्याचे लागूकारण कसे करायचे यासंबंधी आहे. २१व्या अध्यायापासून उपासना कशी करायची याचे नियम दिले आहेत आणि नंतरच्या विभागात  आपल्या शेजाऱ्यावर कशी प्रीती करायची याचे नियम दिले आहेत. उदा. अनाथ, विधवा, लैंगिक शुद्धता इ.

जे न्यायी आहेत आणि ‘चांगला’ हा गुण असणाऱ्या यहोवाची भक्ती करतात ते या गोष्टी इतरांशी वागताना  दाखवतील. देव न्यायाची आज्ञा करतो. न्यायाचा पाया हा या शास्त्रभागावर आधारित आहे. आपल्या देशाच्या कायद्यांना सुद्धा ख्रिस्ती नैतिकता आहे. आता या वचनांतून देवाने दिलेला चांगुलपणा पाहू या.

 जगिक नमुना सोडून द्या

“खोटी अफवा उठवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस. दुष्कर्म करण्यास प्रवृत्त होणार्‍या बहुजन-समाजास अनुसरू नकोस आणि बहुजनसमाजास अनुसरून एखाद्या मुकदम्यात विपरीत न्याय होण्यासाठी साक्ष देऊ नकोस, दावा गरिबाचा आहे एवढ्यावरूनच त्याचा पक्ष घेऊ नकोस” (निर्गम २३:१-३).

  • जमावाचे अनुकरण करू नका. न्यायीपणासाठी तो  चुकीचा उगम आहे.
  • अफवा पसरवण्यामध्ये (व.१).  खोटी अफवा पसरवू नको. ती पसरवणे हे पाप आहे. तसेच जे लोक असे करतात त्यांना सामील होऊ नकोस किंवा पुष्टी देऊ नकोस.

ब) बहुसंख्यांच्या बाबतीत (व२). जमावाला अनुसरण्यासंबंधी इशारा. लोकांचा आवाज हा देवाचा आवाज नाही. फक्त देवाचे वचन हेच परिपूर्ण प्रमाण आहे.

बरब्बाला सोडा व येशूला खिळा असे बहुसंख्य जमावच ओरडत होता. धार्मिकता ही नेहमी
अप्ल्पसंख्येत असते.

  • दर्जा पाहून – गरीब माणसाशी पक्षपाताने वागू नकोस. जे प्रसिद्ध त्यांना मान देण्याची आपली प्रवृत्ती असते.

२ तुमच्या शत्रूवर प्रीती करा.

“आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला, तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर. तुझा द्वेष करणार्‍याचा गाढव बोजाच्या भाराखाली दबलेला तुला दिसला तर त्याला उठवण्याचे त्या एकट्यावर टाकून जावेसे वाटले तरी जाऊ नकोस, तर त्याला साहाय्य करून त्याची अवश्य सुटका कर” (व. ४-५).

  • त्याच्या मालमत्तेची काळजी घ्या

   शत्रूचे गाढव अथवा बैल भटकला असेल तर तो त्याच्याकडे पोचव. एक मैल अधिक जा! तुलाच  
   त्याच्याशी व्यक्तिगत संपर्क साधायचा आहे. तो तुझ्याशी वाईट वागला तरी तू त्याच्याशी चांगले वाग.
   जेव्हा प्रीती ही शत्रूवर आणि कृतीसह केली हाते तेव्हा ती सुवार्ता आणि ख्रिस्तीत्व प्रगट करते !

   ब)  त्याच्या शांतीसाठी काळजी घ्या
  
जेव्हा तू त्याचा गाढव पाहतो तेव्हा तो तुझा द्वेष करतो हे तुला आठवतंय. जेव्हा त्याची होणारी हानी तुला   
   दिसते तेव्हा सूड घेऊ नकोस. आनंद करू नकोस- त्याला सोडव, मोकळे कर. रोम १२:२०-२१ हे जुन्या
   कराराचे तत्त्व आहे. “तुझा शत्रू भुकेला असल्यास त्याला खायला दे; तान्हेला असल्यास त्याला प्यायला
   दे; कारण असे केल्याने तू त्याच्या मस्तकावर निखार्‍यांची रास करशील. वाइटाने जिंकला जाऊ नकोस,
    तर बर्‍याने वाइटाला जिंक.”

३ प्रीतीने इतरांना चालवा            
“तुझ्या लोकांपैकी जो कंगाल असेल त्याच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस. खोट्या मुकदम्यापासून दूर राहा; निरपराधी व नीतिमान ह्यांचा वध करू नकोस, कारण दुष्टाला मी नीतिमान ठरवणार नाही. लाच घेऊ नकोस, कारण लाच डोळसांना आंधळे करते, आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करते. उपर्‍यावर जुलूम करू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हांला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता”  (व. ६-९)

हे वचन जे न्यायाधीश व नेते होते त्यांच्यासाठी आहे. नेतृत्वामध्ये ही तत्त्वे वापरा.

  • तुमच्या लोकांची काळजी घ्या (व. ६)

  तुझ्या गरीब भावाचा तो वादामध्ये असताना विपरीत न्याय करू नकोस. न्यायाधीश म्हणून त्याला    
  भावाप्रमाणे वागव (व. ७) खोट्या आरोपांपासून दूर राहा. निर्दोषी व्यक्तीचा वध करू नकोस. मी न्याय
  करीन ! स्वार्थीपणा दूर कर (व ८-९).

  न्यायाधीशांनी लाच घेऊ नये. कारण ती न्यायाधीशाचे विचार अंध बनवते आणि लोकांना न्यायापासून दूर   
  ठेवते (अनुवाद १०:१७).

देव लाच घेत नाही.! त्याच्या नावाने अधिकार करताना त्याला प्रकट करावे नाहीतर तो न्याय करील. ही प्रथा किंवा संस्कृतीची बाब आहे असे तो म्हणत नाही. हा न्यायाचा मामला आहे. आपल्याला देवाची संस्कृती असायलाच हवी.

व.९- जे इस्राएली नाहीत व आता तुमच्या देशात आहेत त्यांना हाकलून देऊ नकोस. तुम्ही मिसरामध्ये उपरी होता हे लक्षात ठेव. आपणही जे परके त्यांचा पाहुणचार करावा.

४. इतरांसाठी जीवन जगा – विशेषत: दुर्लक्षित जनांसाठी

सातवे वर्ष आणि शब्बाथ- “सहा वर्षे आपल्या जमिनीची पेरणी कर, आणि तिचे उत्पन्न साठव. पण सातव्या वर्षी ती पडीत राहू दे, म्हणजे तुझ्या लोकांपैकी कंगाल असतील ते तीत उगवलेले खातील; त्यांनी खाऊन जे उरेल ते वनपशू खातील. तुझे द्राक्षमळे व जैतुनवने ह्यांविषयीही तसेच कर. सहा दिवस तू आपला उद्योग कर व सातव्या दिवशी विश्रांती घे, म्हणजे तुझे बैल आणि तुझे गाढव ह्यांना विसावा मिळेल आणि तुझ्या दासीची संतती आणि उपरा ह्यांचा जीव ताजातवाना होईल. मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये” (व. १०-१३).


व.१०
– जमिनीची पेरणी सहा वर्षे करायची. हे शेतकीविषयक चांगले तत्त्व आहे. जर तुम्ही जमिनीला विसावा न देता तिचा नाश कराल तर तिची वरची माती गमावली जाईल व तिची झीज होईल.

व ११-  सातवे वर्ष सांगते जमिनीलाही शब्बाथाचा विसावा असावा (लेवीय २५). कारण मग तुम्ही तुमच्या देशातील गरीब व गरजू लोकांना आणि वनपशूंना पण खाऊ द्याल. तुमचे महाग द्राक्षमळे आणि जैतुनाच्या बागा फक्त तुमच्यासाठी नाहीत. ज्यांना नाही त्यांना तुमचे सर्वोत्तम द्या.

लागूकरण- आपण गरजू देशात राहत आहोत. त्यांना फक्त पैसेच देऊ नका तर देवाबरोबर चांगले जीवन जगण्याची संधी द्या.

कामकरी

सहा दिवस काम. सातवा दिवस विसावा. म्हणजे तुमचे बैल गाढवे, दास, परके त्यांच्या गरजांची काळजी घेऊ शकतील (व.१२). वर्षामध्ये ५२ दिवस विसावा!

लागूकरण – आपल्या नोकरांना आपण कसे वागवतो?

उपासना

 मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये (व.१३).

देवाकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या सर्व न्यायामध्ये त्याला प्राधान्य द्या. तोच आपल्या चांगुलपणाचे सामर्थ्य आहे.

इस्राएल राष्ट्राला देवावर भरवसा टाकण्यास सांगितले होते. जेव्हा ते चांगुलपणावर लक्ष केंद्रित करतील तेव्हा तो त्यांची काळजी घेणार होता (लेवी. २५:२०-२१).

१३वे वचन हा सर्वाचा सारांश आहे. पापापासून सावध राहा.
येथे इतरांच्या गरजा भागवण्यामुळे मान, सन्मान मिळेल असा कोणताही निर्देश नाही.

मूर्तिपूजा करू नका किंवा त्यांच्यासबंधी बोलू पण नका. हेच जगिक प्रणालीसाठीही लागू आहे.

Previous Article

पूर्ण झाले आहे

Next Article

नीतिसूत्रे ३१ मधला पुरुष

You might be interested in …

मी कोमट आहे का?

जॉन पायपर कोमटपणा म्हणजे काय? कोमटपणाचे सार म्हणजे असे म्हणणे, “ मला कशाची गरज नाही, मला काहीच नको. मला येशू मिळाला ते पुरे आहे. एक दिवस मी त्याला माझ्या ह्रदयात यायला आमंत्रण दिले होते आणि […]

हजार छोट्या परीक्षा

स्कॉट हबर्ड जेव्हा मी कामावरून परतलो आणि किचनमध्ये गेलो तेव्हा मला जाणवले की मी एकटा नव्हतो. क्षणभर मी घुटमळलो, मग मला सावरून मी लाईट उघडले. आणि ते तिथे होते, सर्व दिशांनी माझ्याकडे पाहात. भांडी. सिंकमध्ये […]

देव आपल्या अंत:करणाचे डोळे कसे उघडतो?

लेखक : जॉन पायपर एखादी अंध असलेली व्यक्ती देव खरा कोण आहे हे त्याच्या गौरवासाठी कसे पाहू लागते? नैसर्गिक डोळे, कान आणि मेंदू हे या प्रक्रियेचे भाग आहेत हे नक्की. त्यांच्याशिवाय आपण देवाने त्याचे गौरव प्रकट केलेल्या […]