Pages Menu
Facebook
Categories Menu

ख्रिश्चन जीवन प्रकाशचे लेख अथवा त्यातील भाग तुम्ही फोरवर्ड करू शकता. परंतु तसे करताना "lovemaharashtra.org - ख्रिश्चन जीवन प्रकाशच्या सौजन्याने" हे वाक्य टाकावे.

Posted on जून 14, 2022 in जीवन प्रकाश

सध्या ख्रिस्त राष्ट्रांवर राज्य करतो का?

सध्या ख्रिस्त राष्ट्रांवर राज्य करतो का?

जॉन पायपर

फर्नांडिसचा प्रश्न:

एक दिवस ख्रिस्त या पृथ्वीवर येईल आणि राष्ट्रांवर राज्य करील हे आपल्याला ठाऊक आहे. जेव्हा तो त्याच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार होऊन येईल, त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे असतील, रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले असेल आणि अखेरीस सर्व राष्ट्रांवर लोहदंडाने राज्य करण्यासाठी तो येणार (प्रकटी १९:११-१५), त्या क्षणाची वाट पाहण्यास आपल्याला सांगितले आहे. पण आता सध्या तो राष्ट्रांवर राज्य करत आहे का? पौल रोम १५: ८-१२ मध्ये तसा निर्देश करताना दिसतो. मत्तय २८:१८ नुसार  “स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार” येशूला  दिलेला आहे. की हा अधिकार १करिंथ १५:२७-२८ नुसार भविष्यात येणार आहे? त्याच्या दुसर्‍या येण्यानंतर तो सर्व राष्ट्रांवर राज्य करणार आहे का? आता तो आध्यात्मिक रीतीने दुसर्‍या प्रकारे राज्य करत आहे आणि नंतर शरीराने खुद्द स्वत: राज्य करणार आहे का?

उत्तर:

फर्नांडिस, बायबल मधून मला दिसते की देव राष्ट्रांवर तीन प्रकारे राज्य करतो. किंवा आपण असे म्हणू शकतो की इतिहासात राष्ट्रांना आपल्या पूर्ण अधीन करण्याच्या देवाच्या तीन पायऱ्या आहेत.

देवाचे अनंतकालिक अधिराज्य

पहिले – देवाचे सर्व राष्ट्रांवर, सर्व वेळ, सर्व ठिकाणी असणारे,  एकमेव, सर्व-समावेशक, सर्वव्यापी असे राज्य निश्चित आहे.

“परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापले आहे; त्याचे राज्य सर्वांवर आहे” (स्तोत्र १०३:१९). हे सत्य आता आहे व सर्वकाळ सत्य असणार.

“परमेश्वर … अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे” (स्तोत्र ४७:२).

“माझ्या साहाय्याने राजे राज्य करतात” (नीति. ८:१५). कोणत्याही राजाला कोठेही, कधीही देवाच्या हुकुमाशिवाय राज्य मिळत नाही.

“मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे, व तो ते पाहिजे त्याला देतो” (दानिएल ४: १७).

राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे. त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो” (नीति. २१:१).

देव पापी राज्यकर्त्यांची इच्छा व कृती यावर नियंत्रण करण्याचे नाट्यमय उदाहरण म्हणजे त्या राज्यकर्त्यांनी देवाच्या पुत्राला मारून टाकण्याचा केलेले  कपटकारस्थान.

“कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केलास तो तुझा पवित्र ‘सेवक’ येशू ह्याच्या विरुद्ध ह्या शहरात परराष्ट्रीय व इस्राएल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले; ह्यासाठी की, जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते व स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे” (प्रेषित ४:२७-२८).

दुसर्‍या शब्दात पापी राज्यकर्त्यांच्या कृतींवर देव नियंत्रण ठेवतो. उदा. हेरोद, पिलात. यासाठी की देवाचे हेतू पूर्ण केले जावेत. म्हणून देवाचे राष्ट्रांवरचे  सार्वभौमत्व हे संपूर्ण, सतत, अमर्याद, न्यायी व सुज्ञ – आता व सर्वकाळ आहे. “पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही” (दानिएल ४:३५).

देवाच्या उजव्या हाताकडे ख्रिस्त

दुसरे – देव आपला देहधारी पुत्र ख्रिस्त याला आपल्या उजव्या हाताला विश्वाच्या राजासनावर बसवतो व स्वर्ग आणि पृथ्वीवर सर्व अधिकार देतो.

आणि देवाच्या राष्ट्रांवरील अधिराज्याच्या या पायरीवरील नवीन गोष्ट म्हणजे देहधारणेपूर्वी देवाच्या उजवीकडे बसून राष्ट्रांवर सत्ता करणारे कोणीही नव्हते. तर आता देवाचा अनंतकलिक पुत्र मानवी देह धारण करून सर्व राष्ट्रांवर राज्य करत आहे “इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्‍चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे” (प्रेषित २:३६).

तसेच येशूने आपल्या शिष्यांना पाठवताना म्हटले, “ स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे” (मत्तय २८:१८). देवाच्या उजव्या बाजूस देव-मानव म्हणून असताना त्याला आता आणि सर्वकाळ अधिकार आहे. अशी वस्तुस्थिती नेहमीच नव्हती, हे नवे आहे. पहिल्या पायरीवरचा सर्व अधिकारसुद्धा आता देहधारी पुत्राला सुपूर्त केला आहेच. लूक १०:२२ मध्ये येशूने म्हटले, “माझ्या पित्याने सर्वकाही माझ्या स्वाधीन केले आहे” तसेच योहान ५:२२  “न्याय करण्याचे सर्व काम त्याने (पित्याने) पुत्राकडे सोपवून दिले आहे.”

आता वधस्तंभी गेलेल्या, पुनरुत्थित झालेल्या देहधारी देवपुत्राबाबतची दुसरी नवी गोष्ट अशी की या अधिकाराचा देवाचा हेतू असा आहे की जगाच्या  सर्व राष्ट्रांतील लाखो लोकांच्या ह्रदयात देवाचे तारण करणारे राज्य स्थापित करणे. या बिंदुला राजकीय, राष्ट्रीय किंवा जगिक, नागरी अधिराज्य तो स्थापणार नाही. ते नंतर येईल. सध्याचा त्याचा हेतू हा आहे की सर्व वंश, भाषा, जमाती आणि राष्ट्रांतील त्याच्या सर्व निवडलेल्या लोकांच्या ह्रदयात त्याचे तारणारे राज्य स्थापित करणे.

तो सर्व प्रकारे सार्वभौम आहे. पण आता तो लोकांच्या ह्रदयातील व जीवनातील सैतानाचा अधिकार नष्ट करून त्याच्या पकडीतून बंदिवानांना सोडवत व सर्व राष्ट्रांतून आपले निवडलेले लोक गोळा करत  त्याचा सार्वभौम अधिकार वापरत आहे. या युगात त्याच्या राज्याचा शिरकाव करणारा जोर हा तारण आणि पवित्रीकरण हाच आहे – म्हणजेच शेवटच्या दिवशी त्याला सादर होणार्‍या ख्रिस्ताच्या  वधूला सुंदर करत राहणे. हेच ख्रिस्ताद्वारे देवाचे सध्या राष्ट्रांवरचे राज्य आहे.

जेव्हा देव सर्वात सर्व होईल

तिसरे आणि शेवटचे. राष्ट्रांवरच्या देवाच्या अधिकाराची अजून न आलेली पायरी. ही ख्रिस्ताच्या दुसर्‍या येण्याच्या वेळी सुरू होईल.

म्हणून दुसर्‍या पायरीच्या वेळी ख्रिस्त हा अदृश्य असून तो त्याचा अधिकार तारण करून व लोकांना त्यामध्ये राखण्याने गाजवतो. पण हे त्याच्या दुसर्‍या येण्याच्या वेळी बदलणार आहे. तो येथे अदृश्य राहणार नाही. – आता तो स्वर्गातून अदृश्यपणे राज्य करणार नाही- पण तो स्वत: पुढे येईल आणि दृष्यपणे,  शरीराने, राजांचा राजा म्हणून स्वत:ला पृथ्वीवर सादर करील.

त्याचे सध्याचे सर्व गोष्टींवरचे राज्य व भविष्यातील सर्व गोष्टींवरचे राज्य यातील फरक ऐका. सध्याच्या राज्याचे वर्णन आपण इफिस १:२०  मध्ये ऐकतो व त्याचे भविष्यातील राज्यातील फरक १ करिंथ १५:२२ मध्ये ऐकतो.

“त्याने तीच कृती ख्रिस्ताच्या ठायी दाखवून त्याला मेलेल्यांतून उठवले; आणि सर्व सत्ता, अधिकार, सामर्थ्य, धनीपणा, सांप्रत आणि भावी युगातील कोणतेही नाव घ्या, त्या सर्वांहून त्याला उंच करून स्वर्गात आपल्या उजवीकडे बसवले; त्याने सर्वकाही त्याच्या पायांखाली ठेवले, आणि त्याने सर्वांवर मस्तक असे व्हावे म्हणून त्यास मंडळीला दिले” (इफिस १:२०-२२)

सध्या सर्व राज्ये, अधिकार, सामर्थ्य यावर तो  असला तरी ती अजूनही जगात कार्यरत आहेत. पण तरीही तो देवाच्या उजव्या हाताशी बसून त्यांच्यावर अधिकार चालवतो. जरी त्यांना पृथ्वीवर काही प्रमाणात दिशा देता येत असली तरी अदृश्यपणे त्यांच्यावर प्रभाव पाडतो. मग त्यातील फरक आपण  आता १ करिंथ १५:२२ -२४ मध्ये पाहतो.

“कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील; पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी. नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल.”

म्हणजे आता फरक आहे. या युगात म्हणजे ख्रिस्ताचे दुसरे आगमन होण्यापूर्वी तो सर्व राज्य, अधिकार सामर्थ्य यांच्याहून अत्युच्च असा  देवाच्या उजव्या बाजूला बसलेला आहे आणि त्याचे तारण्याचे कार्य करत आहे. पण त्या दिवशी प्रत्येक राज्य, अधिकार व सामर्थ्य नष्ट केले जाईल. विरोध संपुष्टात येईल. ते काम पूर्ण होईपर्यंत ख्रिस्त राज्य करत आहे. आणि नंतर पौल म्हणतो, “जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय” (१ करिंथ १५:२६). प्रकटी. २०:१४ त्याबद्दल वर्णन करते: “तेव्हा मरण व अधोलोक हे अग्नीच्या सरोवरात टाकले गेले.”

मग ख्रिस्त, देव जो बाप त्याच्या हाती राज्य सुपूर्त करील आणि देव सर्वात सर्व होईल. आणि ख्रिस्ताद्वारे, त्याच्या शरीराद्वारे- त्याचे लोक-  नव्या  स्वर्गात व नव्या पृथ्वीवर युगानुयुग राज्य करील. त्याचे लोक हे “सर्व वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक व राष्ट्रे ह्यांमधून आमच्या ‘देवासाठी’ विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांना ‘राज्य’ व ‘याजक’ असे केले आहेस आणि ते पृथ्वीवर राज्य करतील”  (प्रकटी ५:९-१०).