दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

लोकांना खुश करणाऱ्याची कबुली

मार्शल सीगल

तुम्ही कोणीही असा, कोठेही असा, कोणत्याही वयाचे असा, तुम्ही एकतर लोकांना खुष करायला जगता अथवा देवाला. आणि तुम्हाला वाटत असेल की दोघांनाही खुष करता येणे शक्य आहे तर बहुधा तुम्ही लोकांनाच खुष करायला जगत आहात, देवाला नव्हे.

आपण त्याच्याशी प्रथम व  पूर्ण एकनिष्ठ असावे यासाठी देव प्रीतीने इर्षावान आहे हे योग्यच आहे. पण आपले प्रत्येक अर्थपूर्ण नाते त्याला उघडपणे किंवा चतुराईने खाली पाडण्यासाठी स्पर्धा करेल. म्हणूनच येशूने म्हटले, “जो माझ्यापेक्षा आपल्या बापावर किंवा आईवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही; जो माझ्यापेक्षा मुलावर किंवा मुलीवर अधिक प्रेम करतो तो मला योग्य नाही” (मत्तय १०:३७). देवाच्या प्रीतीपेक्षा व मान्यतेपेक्षा लोकांची मान्यता अधिक रोमांचक व पूर्ती देणारी आहे असे दाखवणारा मार्ग पापाचा असतो.

पौलाला मानवाची भीती बाळगण्याचा मोह ठाऊक होता आणि कोणीच दोन धन्यांची सेवा करू शकत नाही हे तो शिकला होता. “मी आता मनुष्याची किंवा देवाची मनधरणी करायला पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो” (गलती १:१०)

हे दुभाजन जितके धक्कादायक आहे तितकेच भीतीदायक आहे. लोकांना खुष करण्याचा प्रयत्न करत आपण ख्रिस्ताची सेवा करू शकत नाही. जर आपण लोकांची स्तुती, मान्यता आणि त्यांनी आपला स्वीकार करावा म्हणून जगत असू तर आपण ख्रिस्ताचे नाहीत.

आपल्या नातेसंबंधातील हा घातक मोह आपण ओळखू शकतो का? पौलाप्रमाणे आपण मानवाच्या मान्यतेसाठी मेलो आहोत का? गलतीकरांस पत्रामध्ये या युद्धाचा एक फेरफटका आणि त्यासाठी लागणारी शस्त्रे आपण पाहतो.

लोकांना खुष करण्याबाबत परिचित

पौल व्यक्तिश: आणि सलगीने मानवासंबंधीच्या भीतीबद्दल बोलतो कारण एकेकाळी त्याने इतरांची मान्यता मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्याची कबुली तो अशी देतो:

“मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो… यहूदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे व तिचा नाश करत असे; आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायांविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्या लोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहूदी धर्मात मी पुढे गेलो होतो” (गलती १:१०; १३-१४).

त्याचे पूर्वीचे जीवन हे मानवासाठी असलेली भीती ही किती नाशकारी असते याचे स्पष्ट उदाहरण आहे. मंडळीचा घातपात करून छळ – चेष्टा, हल्ले, तुरुंगात घालणे, आणि विश्वासीयांना ठारही करणे-  असे करताना त्याला त्याच्या

सहभावी लोकांकडून आणखी लक्ष, आणखी मान्यता, आणखी प्रशंसा मिळू लागली. अर्थात तो म्हणू शकत होता की तो केवळ देवाला खुष करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्याला तसे वाटतही असावे पण आता मागे पाहताना त्याला त्याची प्रेरणा अधिक स्पष्ट दिसते. जेव्हा पौल म्हणतो, “मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो” ( १:१०). अजूनपर्यंत हा शब्द महत्त्वाचा आहे. वर्षांमागून वर्षे त्याने मनुष्यांना खुश करणाऱ्या देवाची सेवा केली होती आणि त्याला आढळून आले की तो एक क्रूर धनी आहे. प्रीती, आनंद आणि जीवन हिरावून घेणारा असून त्यामध्ये पुढचा मार्ग बंद आहे. आणि त्याच देवाची देवा करण्याचा मोह झालेल्या मंडळीला तो गलतीकरांस पत्रात लिहीत आहे.

लोकांना आपण चांगले दिसावे असे वाटणाऱ्यांचा देव

गलतीच्या मंडळीमध्ये लोकांना खुष करण्याची भावना किती खोल रुजत चालली होती? खोटे शिक्षक आत शिरले होते, आणि ते विदेशी विश्वासीयांना शिकवत होते की तारण होण्यासाठी त्यांनी यहूदी नियम पाळण्याची गरज आहे. पण आपल्याला समजते की त्यांना मंडळीची काळजी  नसून स्वत:चीच होती.

 जर गलतीकरांनी ख्रिस्ताला कबूल केले पण सुंता, खाण्यापिण्याचे नियम आणि इतर यहूदी नियम पाळण्याचे नाकारले तर यहूदी लोकांकडून होणारा छळ टाळावा अशी या खोट्या शिक्षकांची इच्छा होती. तसेच विदेशी लोकांना यहूदी मतानुसारी केल्याबद्दल  यहूदी अधिकाऱ्यांनी त्यांना मान्यता देऊन त्यांची प्रशंसा करावी अशी त्यांची इच्छा होती.

दुसऱ्या शब्दांत काही लोकांनी केलेला धिक्कार व छळाची त्यांना भीती वाटत होती आणि त्यांच्या मान्यता व स्तुतीची लालसा त्यांना होती. पौल स्पष्ट करतो, “जितके दैहिक गोष्टींचा डौल मिरवू पाहतात, तितके ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे स्वत:चा छळ होऊ नये म्हणूनच तुम्हांला सुंता करून घेण्यास भाग पाडतात. कारण सुंता करून घेणारे स्वतःही नियमशास्त्र पाळत नाहीत, तर तुमच्या देहावरून नावाजून घेण्यासाठी तुमची सुंता व्हावी अशी इच्छा बाळगतात” (गलती ६: १२-१३)

त्यांचा दुटप्पीपणा स्पष्ट होता. ते स्वत: नियमशास्त्र पाळत नव्हते पण इतरांकडून तशी अपेक्षा करत होते कारण त्यामुळे ते चांगले दिसणार होते. आणि ‘चांगले दिसणे’ हा त्यांचा खरा देव होता.

पहिला सापळा :खुशामत

गलतीच्या मंडळीला भ्रष्ट करणारे प्रभाव पौलाने ओळखले होते. लोकांना भिण्याच्या गुलामीत अडकलेले खोटे संदेष्टे आता गलतीच्या लोकांच्या इच्छेवर हे मान्य करण्यासाठी आघात करत होते. पौल त्यांच्या धोरणाचे वर्णन करतो ते नीट ऐका; कारण आजच्या जगात हीच धोरणे चालवल्याचे आपण ऐकतो. “ते लोक तुम्हांला मिळवून घेण्याची खटपट करतात, पण ती शुद्ध हेतूने नव्हे; तर तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात” (४:१७)

लोकांना खूष करणाऱ्या लोकांना गळ घालण्यासाठी ते खुशामत करण्याची एक प्रभावी युक्ती वापरू लागले. खुशामत जरी ऐकायला प्रथम चांगली वाटत असली तरी ती नेहमीच स्वार्थी व नाशकारक असते. ती वास्तव विपरीत करते, भरवसा कमी करते आणि दुसऱ्याला त्याची किंमत भरावी लागते. “खुशामत करणारे तोंड नाशाला कारण होते” (नीति. २६:२८). तुमच्याविषयी अथवा तुमच्या भल्याची फिकीर नसताना ते गोड शब्दांनी तुम्हाला जिंकायला पाहतात.

सुवार्ता म्हणते, “तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुम्ही वाईट आहात, पण देवाची कृपा तुमच्या पापापेक्षा मोठी आहे.” खुशामत म्हणते, “तुम्हाला वाटते त्यापेक्षा तुम्ही चांगले आहात, आणि त्या इतर लोकांपेक्षा तर तुम्ही नक्कीच चांगले आहात.” जर देवाच्या मान्यतेपेक्षा मनुष्याच्या मान्यतेसाठी तुम्ही जगत असाल तर तुम्ही इतरांनी आपली खुशामत करण्यास त्यांना वाव द्याल. आपली मान्यतेसाठी असलेली तहान भागवण्यासाठी लोक आपले समाधान करण्यासाठी  प्रभाव टाकून आपल्याला हाताळतील.

हा धोका समजून घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक नातेसंबंधाविषयी प्रश्न करा की, मला जे  पुष्टी देतात ते मला नेहमी आव्हानही देतात का?

दुसरा सापळा : धिक्कार

गलतीच्या लोकांच्या माणसांसाठी असलेल्या भीतीवर हल्ला करण्यासाठी खोटे शिक्षक दोन निराळी धोरणे वापरतात. दोन्ही धोरणे असुरक्षितपणाला लक्ष्य करतात पण विरोधी प्रकारे.

होय. यहूदी मतानुसारी या ख्रिस्ती लोकांची खुशामत करत होतेच पण जे त्यांना मान्य झाले नाहीत त्यांना ते कशी दहशत घालत होते तेही पाहा. या नवविश्वासीयांना ते पटवत होते की देवाच्या आतल्या वर्तुळात येण्यासाठी त्यांनी काही यहूदी नियम पाळायची जरुरी होती. “तुम्ही त्यांना मिळवून घेण्याची खटपट करावी म्हणून ते तुम्हांला वेगळे ठेवू पाहतात” (गलती ४:१७) ते “खऱ्या विश्वासीयांचा” एक खास वर्ग स्थापन करू पाहत होते. तुम्ही बाहेर आहात असे भासवून ते तुम्हाला गळ घालू पाहतात. सैतानाला माहीत आहे की लोकांना खुष करणाऱ्या लोकांना इतरांच्या मान्यतेची जितकी हाव असते तितकीच त्यांच्या नापसंतीची जास्त भीती असते.

तर ही बाहेर टाकले जाण्याची भीती आपल्यावर कसा हल्ला करू शकेल? ह्याची परीक्षा करण्यासाठी आपण स्वत:ला विचारावे, समाजाच्या मान्यतेसाठी कोणती ख्रिस्ती तत्त्वे दडवण्याचा मोह आपल्याला होतो? – गर्भपात, लैंगिक सत्ये, जात, इ. मान्यतेसाठी असलेली आपली इच्छा देवाच्या वचनात तो जे बोलतो त्याची लाज बाळगायला भाग पाडते का?

खुशामत आपल्या मान्यतेच्या अपेक्षेवर घाला घालते. एकटे पडण्याच्या आपल्या भीतीवर आघात करणारी दुसरी गोष्ट म्हणजे – एकटे टाकले जाणे.

जग मला मेले आहे

तर माणसांनी लावलेले हे दुहेरी  सापळे आपण कसे चुकवू शकू? पौल स्वत: यातून सुटला असल्याने असे मोह असणार्‍यांसाठी तो एक मार्ग आखतो. त्यासाठी दोन महान मृत्यूंची गरज आहे.

खोटे शिक्षकांची तुम्ही सुंता करावी अशी इच्छा आहे म्हणजे तुम्ही आपल्या देहात फुशारकी मारू शकाल. पण “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो; त्याच्या द्वारे जग मला वधस्तंभावर खिळलेले आहे व जगाला मी वधस्तंभावर खिळलेला आहे” (गलती ६:,१४).

प्रथम जग माझ्यासाठी मरायला हवे. याचा अर्थ काय? पौलाचे परिवर्तन झाले. त्याने त्याचे लोकांना खुष करण्याचे मार्ग मागे सोडून दिले. जगामध्ये काहीच बदलले नाही. तेच तणाव त्याच्यावर ओझे लादू लागले. तेच धोके त्याला छळ करून एकटे पाडण्यासाठी भेडसावू लागले. आणि तरी तो म्हणू शकतो की, एक दिवस येशू त्याला भेटला आणि जग त्याच्या डोळ्यासमोर मरून गेले. जग- जगाची हाव, मते, इच्छा, वाहवा, आणि केवळ मनुष्यांची टीका – यांचे पौलावरील सामर्थ्य नष्ट झाले. जसे काही एके काळी ज्याचे त्याच्यावर नियंत्रण होते ते वधस्तंभावर खिळले गेले आणि मरण्यासाठी तेथे ठेवले गेले.

अशा प्रकारचे आपल्यावरचे सामर्थ्य जग कसे गमावते? एका अधिक वेदनामय दुसऱ्या मरणाने: मी जगाला मरायला पाहिजे. जगाचे आपल्यावरील सामर्थ्य जाण्यासाठी जगाला खुष करण्याची आस आपण समर्पण करायला पाहिजे. क्रूसावरच्या पुत्राच्या मागे जाण्यासाठी आपण आपला जुना धनी मारायला पाहिजे. (आपल्यावर ताबा ठेवणारे कोणतेही पाप.) ख्रिस्तामधील जीवनाच्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी पौलाला त्याच्या सहकाऱ्यांची प्रशंसा, आणि स्तुती यांना मरावे लागले. दोन्ही गोष्टींचा आनंद तो घेऊ शकत नव्हता. “ जर मी अजूनही मनुष्याला खुष करू पाहतो तर मी ख्रिस्ताचा दास नाही.” म्हणून जो धनी भीती घालत त्याचे जीवन हिरावून घेत होता, शांती हरण करून जो दोषी भावना वाढवत होता, प्रीतीचा आवाज बंद करून जो असुरक्षित करत होता, त्याला त्याने नाकारले.

मानवाची मान्यता नाकारून देवाच्या मान्यतेसाठी जगण्याचे निवडणे या जगात फार महाग पडणार आहे. या निवडीमुळे पौलाला हुडकून काढून मारले, त्याचे सगळे हिरावून घेतले, त्याला तुरुंगात टाकले, जवळजवळ मरेपर्यंत धोंडमार केला आणि तरीही तो म्हणू शकला, “कारण आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो” (रोम. ८:१८). तुलना करण्याच्या लायकीची नाहीत. मनुष्याच्या भीतीवर मात करण्याची ही गुरुकिल्ली आहे. जेव्हा आपण पौलासमवेत हे समजून घेऊ की देवाला खुष करण्यासाठी दु:खसहन करणे किती समाधानाचे आहे तेव्हाच आपण मनुष्यांना खुष करण्याच्या सुखसोयीला मरून जाऊ.

Previous Article

काहीही न करण्याचे पाप

Next Article

तुमच्या मुलांना देवावर प्रेम करणे सोपे करा

You might be interested in …

माझ्या पापाचा अनंतकालिक पारितोषिकावर परिणाम होतो का?

जॉन पायपर ब्रॅंडनचा प्रश्न-  बायबलमध्ये स्वर्गात मुगुटांची पारितोषिके मिळतील असे लिहिले आहे. येणाऱ्या जीवनात मला  खूप आनंद हवा आहे. पण या जीवनात मला वाटते की मी सतत पाप करतो. आणि प्रत्येक वेळेला मी पाप केले […]

कोमट जन माझ्याकडे येवोत

मार्शल सीगल येशूसाठी तुमचे ह्रदय थंड होण्यास केव्हा सुरुवात झाली? बहुतेक तुम्हाला तो दिवस अथवा आठवडा किंवा कदाचित वर्षही आठवत नसेल. तुम्ही जेव्हा आवेशी (उष्ण) होता तो वेळ बहुतेक तुम्हाला आठवत असेल. तुम्हाला बायबल वाचायची […]

एक वेदनामय आणि सुंदर दफन – अंधारात देवाचे आज्ञापालन

लेखक: गेविन ऑर्टलंड येशूने क्रूसावर त्याचा शेवटचा श्वास सोडल्यानंतरच्या तासांचा आपण फारसा विचार करत नाही. पवित्र आठवड्यामध्ये आपण गुरुवार, शुक्रवार आणि रविवार यावर जास्त लक्ष केंद्रित करतो आणि ते योग्यच आहे. पण येशू मरण पावला […]