दिसम्बर 27, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

 संकलन – क्रॉसी उर्टेकर

लेखांक ६

जुन्या करारातील देवाचे राज्य

उत्पत्ती १ मध्ये देवाने विश्व निर्माण केले तेव्हापासूनच देवाचे राज्य जगामध्ये सुरू आहे. देव त्याच्या निर्मितीचा राजा आहे. ही धरती त्याचे राजक्षेत्र आहे. देवाच्या प्रतिमेप्रमाणे घडवलेल्या मानवाला त्याने ही पृथ्वी व्यापून टाकण्याची, फलद्रूप व बहुगुणित होण्याची, तिच्यावर सत्ता गाजवण्याची आज्ञा दिली होती. उत्पत्ती १:२६-२८.

सत्ता हा शब्द राजेशाहीशी संबंधित आहे. तो पुढे ख्रिस्ताच्या सत्तेशी जोडला आहे. स्तोत्र ११०:२. मानवाने देवाविरुद्ध पाप केले आणि तो आपल्या राज्यावर सत्ता गाजवण्याच्या कामी अपयशी ठरला. स्तोत्र ८:३-९ नुसार त्याला पक्षी, प्राणी, शेरडे मेंढरे, गुरेढोरे या सर्वांवर सत्ता दिली होती. ते मूळ राज्य आता अधूरे, अपुरे, अपूर्ण राहिले आहे. पण पुढे मानवाच्या वतीने मनुष्याचा पुत्र मशीहा पुढे हे अपुरे काम पूर्ण करण्याची भूमिका पार पाडील (इब्री २:५-१४). पहिला आदाम जेथे जेथे अपयशी ठरला ते ते दुसरा आदाम भरून काढणार आहे (१ करिंथ १५:२०-२१,४५). ख्रिस्ताचे एक हजार वर्षांचे पृथ्वीवरील हे भावी काळाचे राज्य बायबलमधील विनाअट कराराद्वारे येईल.

यापूर्वी देवाने करार केले आहेत.  नोहाशी केलेला करार, अब्राहामाशी केलेला करार, दाविदाशी केलेला करार आणि नवा करार.

(१) नोहाशी करार – त्यात निसर्गात स्थैर्य राहाण्याचे अभिवचन देवाने दिले. उत्पत्ती ८:२०-२२ व ९:१२-१७. आणि आजवर पृथ्वीचा पाण्याने नाश केला नाही. त्याने करार पाळला आहे.

(२) अब्राहामाशी करार – त्याच्या बीजाद्वारे इस्राएल राष्ट्र विकसित करण्याचे, त्यातून मशीहा येण्याचे व त्यांच्याद्वारे सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करण्याचे अभिवचन देवाने दिले होते. उत्पत्ती १२: २-७. त्यामुळे या जगातील देवाच्या राज्यासाठी तो जे काही करणार आहे, ती योजना व त्याचा हेतू साध्य होणार आहे (यशया २:२-४; २७:६).

() दाविदाशी करार – २ शमुवेल ७:१२-१९मधील या करारात दावीद व त्याच्या संतांची भूमिका चर्चिली आहे. त्यानुसार इस्राएल व विदेशीही आशीर्वाद पावणार आहेत.

(४) नवा करार – यिर्मया ३१:३१-३४; ३२:३८-४०. यात नवीन अंत:करणाने व पवित्र आत्म्याच्या वास्तव्याने, देवावर प्रीती करून त्याची सेवा करण्याची योजना देव प्रकट करतो. या सर्व करारांची परिपूर्ती नव्या कराराच्या पुस्तकात येशूने कशी केली ते आपण पाहतो. पण जुन्या करारात  देवाच्या योजनेबाबत काय इतिहास घडला ते थोडक्यात पाहू.      

पापामुळे आदामाने जरी या पृथ्वीवरील राज्य गमावले तरी पृथ्वीवर देवाची सार्वभौम सत्ता चालू होती. मग त्याने आपल्या योजनेप्रमाणे या पृथ्वीवर आपले राज्य स्थापण्यासाठी अब्राहामाच्या कराराप्रमाणे  इस्राएल राष्ट्र मिसरात वाढवले. मोशेद्वारे त्यांची मिसरातून सुटका केली. त्यांना कराराची वाचने दिली. चाळीस वर्षांत अरण्यात त्यांना राष्ट्र म्हणून घडवले. व कनान देशात स्थापले. देव म्हणाला, “तुम्ही मला याजक राज्य, पवित्र राष्ट्र व्हाल.” देव या राष्ट्राचा राजा होता.

पण पुढे त्यांनी इतर राष्ट्रांसारखा मानवी राजा मागितला. तेव्हा एकसंघ राष्ट्रावर शौल, दावीद व शलमोन हे तीन राजे होऊन गेले. त्यातील दाविदाशी देवाने करार केला. शलमोनाच्या राजवटीत राष्ट्र भरभराटीला आले व कळसाला पोहचले. पण त्याने देवाच्या आज्ञा मोडल्या. अनुवाद १७:१४-२०. आणि इस्राएलांवर मोशेच्या करारातील शाप आले (अनुवाद २८).

 राष्ट्राची दोन शकले पडली. दहा वंशांचे उत्तर राज्य इ. पू ७२२ मध्ये अश्शूरकडून लयास गेले. दक्षिण राज्य यहूदा इ.पू ५८६ मध्ये बाबेलकडून बंदिवासात गेले. यरूशलेम व देवाचे मंदिर धुळीस मिळाले. या सर्व काळात देवाने १२ वंशातून अवशिष्ट लोक राखले. इस्राएलांच्या बहकण्याच्या काळात व्यासपीठावर देवाचे संदेष्टे दिसतात. त्यांनी इस्राएलांच्या पुढार्‍यांना धमकावले व लोकांना देवाकडे वळण्यास विनवले. तसेच त्यांना आशीर्वादित करणार्‍या मशीहाची भाकिते व भावी राज्याची अभिवचने देऊन त्यांना आशा व सांत्वन दिले. यशया २:२-४; आमोस ९:११-१२. पण हा संदेश त्यांना कळला नाही. अवशिष्ट लोक अभिवचनाप्रमाणे बंदिवासातून परतले. यरूशलेम नगर व मंदिर पुन्हा बांधण्यात आले. पण इस्राएल लोक विदेश्यांच्या सत्तेखालीच राहिले. १९४८ पर्यन्त त्यांचे स्वतंत्र राष्ट्र झालेच नाही. आता मशीहा त्यांचे तारण करून त्यांना आत्मिक व राष्ट्रीय मुक्ती देणार आहे. हा इतिहास पुढे नव्या कराराच्या काळात कसे वळण घेतो ते पाहू.

नव्या कराराचे राज्य

मलाखी ते नव्या कराराच्या काळापर्यंत अवशिष्ट लोक मशीहाच्या राज्याची फार आतुरतेने वाट पहाट होते. मलाखीत शेवटी प्रत्यक्षात मशीहा आल्यावर त्याची ओळख करून देण्यासाठी बाप्तिस्मा करणार्‍या योहानाचे आगमन होण्याविषयी वृत्तान्त आहे. आणि कालक्रमाने नव्या करारात प्रथम त्याच घटनेची लूक नोंद देतो. व लगेच येशूच्या पहिल्या आगमनाचा वृत्तान्त देऊन इतिहास पुढे सरकतो.

दाविदाच्या कराराप्रमाणे हा मशीहा त्याच्या वंशातला युगानुयुगांचा राजा आहे. येशू व योहान दोघेही “पश्चात्ताप करा देवाचे राज्य जवळ आले आहे” हाच संदेश देतात. कारण पुढे या जगात येणार्‍या त्याच्या प्रत्यक्षातील राज्यात प्रवेश करण्यासाठी या पहिल्या आगमनात मशीहा जो तारणाचा मार्ग तयार करणार होता तो प्राप्त करण्यासाठी पश्चात्ताप ही पहिली महत्त्वाची अट होती. मग प्रथम या जगातील जीवनात माणसाच्या अंत:करणात त्याचे आत्मिक राज्य सुरू होणार होते.

पण इथेच इस्राएल चुकले. त्यांनी पश्चात्ताप केलाच नाही. हा संदेश व मशीहालाही धिक्कारले. याच आगमनात त्याने या जगातले प्रत्यक्ष राज्य स्थापन करावे ही अपेक्षा ठेवली. म्हणजे येशूच्या योजनेप्रमाणे बदलीच्या मरणाचा यज्ञच त्यांनी धिक्कारला. येशूने आपल्या सेवेच्या अंतिम टप्प्यात व पुनरुत्थानानंतर शिष्यांना मरण, पुनरुत्थान, पवित्र आत्म्याचे आगमन, भावी काळ, ही सर्व रहस्ये शिकवली (मत्तय १६:२१, १९:२८). आपल्या गौरवी राजासनाविषयी मत्तय २५: ३१-४५ मध्ये स्पष्ट कल्पना दिली.


इस्राएलांना तात्पुरते बाजूला ठेऊन या शिष्यांद्वारे विदेश्यांच्या तारणासाठी मंडळी सुरू केली. सध्या मंडळीद्वारे सुवार्ताप्रसाराचे काम करून त्याचे आत्मिक राज्य वाढवत आहे. हे काम काही काळ चालणार आहे. तोवर येशू पित्याच्या उजवीकडे बसला आहे. त्याचे शत्रू पायाखाली तुडवेपर्यंत तो तेथेच बसणार आहे (इब्री १०:१२-१३). सध्या त्याचे राज्य विश्वासीयांच्या अंत;करणात आहे. नव्या करारातील पत्रांमध्ये दिलेले या राज्याचे आत्मिक आशीर्वादाचे सर्व फायदे व नवे ह्रदय, पवित्र आत्म्याचे वास्तव्य हे आशीर्वाद नव्या कराराच्या प्रत्येक विश्वासीयाला या जीवनात अनुभवता येतात (२ करिन्थ ३:६). ज्यांच्या अंत:करणात ते राज्य आहे तेच फक्त देवाच्या पुत्राच्या नीतिमत्तेच्या राज्यात जातील. रोम १४:१७, कलसै १:१३; २ तीम. २:१२. या जीवनात त्यांना संकट क्लेश सोसावे लागले तरी त्या राज्यात त्यांना प्रतिफल मिळेल. म्हणून येथे त्यांना त्या भावी राज्याला साजेसे ख्रिस्ताला प्रभुत्व देणारे जीवन जगायचे आहे (१ थेस्स २:१२). त्यासाठी त्यांना देवाचे वचन व पवित्र आत्मा मदत करतात (२ पेत्र ४:१८; १:१०-११). हा राजा परत कसा येणार याचे चित्र प्रकटी. १९ :११ – २०:१९ मध्ये दिले आहे.  

                                                              प्रश्नावली

सूचना – धड्यातून उत्तरे शोधा. कंसातील संदर्भाचा वापर करा

प्रश्न १ ला – पुढील प्रश्नांची उत्तरे द्या.                                                              

१.नोहाच्या कराराचे स्वरूप काय? तो अजूनही चालू आहे का? कसा?                                                       
२- दाविदाचा करार काय सांगतो? त्याचा कोणता भाग अजून पूर्ण झालेला नाही?                                        
३- इस्राएल राष्ट्र बहकण्याच्या काळी देवाने पाठवलेल्या संदेष्ट्यांनी काय काम केले? (पान ३ )                                           ४- नवा करारातील पहिली घटना कोणती? (पान ३)                                                  
५- इस्राएल राष्ट्राकडून कोणती चूक झाली? (पान ३)                                                              
६- देवाने इस्राएला तात्पुरते राष्ट्राला बाजूला सारून कोणते काम केले? (पान ३)                                    
७- सध्या ख्रिस्ताचे राज्य कोठे व कसे अनुभवले जाते? (पान ३ व ४)              

प्रश्न २रा – आजवरच्या अभ्यासावरून खालील करारांचा कालक्रम लावून १-७ आकडे द्या.

अ- याजकीय करार —– ब- मोशेचा करार —- क नोहाचा करार —– ड – दाविदाचा करार ——-                      इ – येशूचा करार —- ई – यिर्मयाला दिलेले नव्या कराराचे भाकीत—– फ – अब्राहामाशी करार—–


प्रश्न ३ रा – कंसातील योग्य शब्द वापरून रिकाम्या जागा भरा.
( ७२२, मुक्ती; पवित्र आत्मा; विश्व; मंडळी; अंत:करणात; भावी; अश्शुर ; सतत; ५८६; आत्मिक; लिखित वचन; सार्वकालिक; भूतलावर; पश्चाताप; बाबेल; सैतान; इस्राएलांसाठी; विनाअट; १९४८; खाण्यापिण्यात )                                  

१- देवाच्या राज्याचे अस्तित्व —— असत आले आहे.                                                  
२- देवाचे राज्य संपूर्ण—— व्यापून आहे.                                                                      
३- थेट किंवा मध्यस्थाद्वारे —— देवाची सत्ता आहे.                                                          
४- —- काळी संपूर्णपणे देवाचेच राज्य असेल.                                                
५- मानवाशी केलेल्या ——   करारानुसार देवाची राजवट आहे.                                                    
६- देवाचे राज्य ——— आहे.                                                                                                    
७- देवाचे राज्य ———- नाही.                                                                                    
८- ख्रिस्ती लोक ——– च्या युगात आहेत.                                                              
९- जगाच्या अधर्मावर तात्पुरती सत्ता ——– चालवतो.                                                               
१०- राज्य ——— असले तरी ते सध्या मंडळीला दिले आहे.                                                    
११- उत्तर राज्य इस्राएल ख्रि.पू. —– मध्ये———–कडून व दक्षिण राज्य यहूदा ——- मध्ये ——-   कडून
      धुळीस मिळाले.                                                                            
१२-इस्राएलांचे आताचे स्वतंत्र राष्ट्र ——- साली स्थापन झाले.                                               
१३- भावी काळी देव इस्राएल राष्ट्राला ——- व राष्ट्रीय ——–देणार आहे.                                      
१४- तारणाचा मार्ग प्राप्त करण्याची ——— ही पहिली अट होती. मग प्रथम देवाचे राज्य व्यक्तीच्या ————
      सुरू होते.                                                                                                      
१५- ख्रिस्ताला शोभेसे जीवन जगायला —– व——— ही विश्वासीयांना मदत करण्यास देवाने दिली आहेत.

प्रश्न ४ था – कंसातील संदर्भवचने वाचून रिकाम्या जागा भरा.

( यिर्मया ३१:३१-३४; ३२:३८-४०; अनुवाद १७:१६-२०; इब्री १०:१२-१३;  २करिंथ ३:६; यशया २२:२-४; २७:६)                         

१- —-ने भरलेले नगर, —-ले शहर, ——- करणारे नगर; त्यातील—- पावलेले; —- ने वधले नाहीत;  ———
   एकत्र पळाले, ———– लावल्यावाचून बद्ध केले. सर्वांना एकत्र——-                          
२- मी——- रडणार आहे. माझे —— करण्याचे—– करू नका.
३- ——– काळी याकोब —- धरील. —— फुलेल व त्याला —-येतील. ते फळांनी —— भरतील.
४- ——– चे घराणे व ——-चे घराणे यांच्याबरोबर मी——- करीन. तो हा: मी आपले—— त्यांच्या ——
   ठेवीन. मी ते त्यांच्या —– लिहीन. मी त्यांचा—- होईन, ते माझे —- होतील.——- पासून —- पर्यन्त ते सर्व मला
    —–. मी त्यांच्या ——- क्षमा करीन. त्यांचे —- मी ——– नाही.
५- राजाने फार —- बाळगू नयेत. पुष्कळ —– करू नयेत. ——— फार मोठा साठा करू नये. ——– ची प्रत
    त्याच्यापाशी असावी, त्याने तिचे ——— करावे. त्यातील —— पाळावेत, त्याप्रमाणे ——— करावे. देवाचे –       
   —— बाळगावे. म्हणजे तो त्यापासून बहकून ——- वळणार नाही.
६ – मी त्यांस एकच— व एकच —– देईन मी त्यांच्याशी ——- करार करीन, तो असा की मी त्यांचे —–
    करण्यापासून —- घेणार नाही. मी आपले ——- त्यांच्या —- उत्पन्न करीन. मी त्यांच्याविषयी —– पावून त्यांचे
    —- करीन.
७- पापांबद्दल —- असा  एकच —— अर्पून येशू देवाच्या —– बसला आहे. तेव्हापासून आपले —– आपले —– 
     होईपर्यंत वाट पहात आहे.
८- त्याने आम्हाला नव्या —–चे ——होण्यासाठी——-केले. हा करार —– नव्हे तर —–आहे. लेख —–
    मारतो,——जिवंत करतो.

 

Previous Article

समाधानकारक सांत्वनदाते कसे व्हाल?

Next Article

विश्वाचे सर्वात मोठे दोन प्रश्न

You might be interested in …

प्रार्थनांची उत्तरे माझ्या चांगुलपणावर अवलंबून असतात का?

जॉन पायपर आजच्या या विषयावर बायबल अगदी स्पष्ट सांगते. ते म्हणते: आपल्या प्रार्थनांचे उत्तर मिळावे म्हणून आपण देवाचे आज्ञापालन केले पाहिजे. हा मुद्दा परखड आणि आपले जीवन व्यापून टाकणारा आहे. बायबलमधले अनेक संदर्भ हे दाखवतात. […]

जर आपण प्रीती केली नाही तर आपण टिकणार नाही

जॉन ब्लूम “वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक” (रोम. १२:२१). जेव्हा पौलाने हे शब्द रोम मधील एका छोट्या मंडळीला लिहिले तेव्हा तो एका साधुसंताचा सल्ला देत नव्हता. किंवा त्यांना प्रेरणा देऊन त्यांनी गाठावे […]

चांगले करताना थकू नका डेविड मॅथिस

जे खरेपणाने चांगले करतात त्यांना आपण थकून जात आहोत असा लवकरच मोह येईल. इतरांसाठी जेव्हा तुम्ही – देवाच्या पाचारणानुसार, त्याच्या अटींवर – चांगले करण्यास वाहून घेता तेव्हा थोडक्याच अवधीत तुम्हाला थकण्याचा मोह होईल. प्रेषित पौलाला […]