दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जेव्हा प्रीती हे युद्ध असते

ग्रेग मोर्स

जीवनातील सर्वात जिवलग मित्र आता तुमच्यासमोर शत्रू म्हणून उभा आहे (असं तुम्हाला वाटतंय). शस्त्रं उगारलेली आहेत. तप्त शब्दांची फेकाफेक होते. युद्धाची सुरवात होते.

तुम्ही ठोसा मारा किंवा झेला, तुम्हाला इजा होतेच. एका दुष्ट शब्दाची दुसऱ्याने परतफेड होते. कृपा बाजूला फेकली जाते – डोळ्याबद्दल डोळा असा सामना असतो. ती तिचा आवाज उंचावते, तुम्ही तुमचा उंचावता. ती खोचक वाक्य बोलते, तुम्ही त्याच प्रकारचे तिला ऐकवता. तुम्हा दोघांनाही भांडण थांबवायला हवंय – पण त्याच क्षणी हे शक्य नसते. तुम्ही शांत होण्याचा प्रयत्न करता पण आणखी एक सुनावले जाते. आता परिस्थिती विकोपास जाते.

अशा वाईट मोसमात काही जोडपी बिछान्यावर आपापल्या कोपऱ्यात झोपतात. सकाळचा गजर वाजतो आणि पुन्हा भांडण उकरले जाते. दु:खाची गोष्ट म्हणजे मुले रिंगणाबाहेर बसून हा लढा पाहत असतात.
वैवाहिक प्रीतीमध्ये आपण जखमा करतो आणि करून घेतो.

एक खुनी

जीभ ही एक मोठी खुनी आहे. या शस्त्राची भयानकता सांगताना याकोब म्हणतो:

जीभ ही आग आहे; नरकाने पेटवलेली अशी आहे. आपले जीवन पेटवून देते (३:५-६).
सर्व शरीर अमंगळ करणारा अवयव जीभ आहे (३:६).
अनीतीचे भुवन आहे (३:६).
ती शांतिरहित असून दुष्ट आहे व प्राणघातक विषाने भरलेली आहे (३:८).
मनुष्यांपैकी कोणीही जिभेला वश करण्यास समर्थ नाही (३:८).
ती कधी देवासाठी तर कधी सैतानासाठी वापरली जाते (३:९-१२).
जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते (नीती १५:४).

आपण अशुद्ध ओठांचे लोक होतो आणि अजूनही आहोत असे दु:खाने म्हणावे लागते. आपण बऱ्याच वेळा आपल्या प्रिय जनांचे अंत:करण विदारून टाकतो.
आपल्या प्रिय व्यक्तीशी संघर्ष करण्यासाठी बॉक्सिंग च्या अशा पवित्र्यात आपण उभे असताना एक शब्द सर्व फरक करू शकतो तो म्हणजे : कृपा.

कृपा करायची की नाही

ख्रिस्ती या नात्याने आपण कृपा हा शब्द उच्चारल्याशिवाय एकही दिवस जात नाही.

आपली प्रसिध्द गीते यासंबधीच आहेत. जुन्या करारात जरी तिच्याकडे निर्देश केला असला तरी नव्या करारात ती भरून वाहते. देवाची कृपा येशूमध्ये व्यापलेली आहे (योहान १:१४), त्याच्यामध्ये व त्याच्या कार्यामध्ये ती दिसते
( तीत२:११-१४). सुवार्तेचे ते नाव आहे (प्रेषित २०:२४). ती पापाला चिरडून टाकते (रोम ५:२०). देवाचे अभिवचन आपल्याला कृपेद्वारे मिळते (रोम ४:१६). दुर्बलतेचे सामर्थ्यात रूपांतर करते (२ करिंथ १२:९). देवाच्या आसनाची व्याख्या करते (इब्री ४:१६). कृपा हा देवाच्या आत्म्याचा गुण विशेष आहे (इब्री.१०:२९). देव हा सर्व कृपेचा देव आहे (१ पेत्र ५:१०).

आणि देवाची कृपा नम्र जनांची भेट घेते (याकोब ४:१६), त्यांना तारते (प्रेषित १५:११, रोम ३:२४; इफिस २:५).  त्यांना उचलून धरते (रोम ५:२). त्यांना निवडते (रोम ११:५). त्यांना शुभेच्छा देते ( रोम १:७). त्यांची उभारणी करते (प्रेषित २०:३२). त्यांना बलवान करते (२ तीम २:१). त्यांना सुभक्तीमध्ये प्रशिक्षण देते (तीत २:११,१२). देणग्या देते (१ पेत्र ४:१०). आणि ही कृपा आपल्याकडे येशूद्वारे येत असल्याने अनंतकाळ स्तुती करण्यास उद्युक्त करते (इफिस २:७).
कृपा ही लायकी नसलेल्या पाप्यावर देवाने केलेला कृतिशील उपकार, मेहेरनजर आहे. ख्रिस्ती जीवन ह्या कृपेच्या अथांग सागरात पोहत असते.

पण जेव्हा आपण प्रियजनांबरोबर भांडतो तेव्हा आपण हे विसरतो. आणि देवाची कृपा क्षणोक्षणी, पात्रता नसताना आपल्याला दयेने भेटत असते हे जेव्हा आपण विसरतो तेव्हा ही कृपा दुसऱ्यापर्यंत आपण पोचवू शकत नाही.
तरीही प्रत्येक गोंधळात अपरिहार्यपणे आपल्याला ह्या प्रश्नाला तोंड द्यावे लागते: कृपा द्यायची की नाही? आपले बॉक्सिंगचे हातमोजे आपण काढून ठेवणार की उलट ठोसा देणार? जेव्हा जेव्हा मी कृपा पुरवण्यास नकार देतो तेव्हा माझ्या लक्षात आले की अशावेळी काही लबाड्यांचे आपल्यावर वर्चस्व होते.

१. कृपा पुरवणे हे योग्य आहे

कृपा देण्यास आपण हात आखडता करतो कारण आपल्याला वाटते की इतक्या सहज त्यांना सुटू देणे योग्य नाही. त्यांचा गुन्हा आपल्या मनात खूप मोठा दिसतो. जरी आपण त्यांच्याशी ‘धीराने’ वागत असलो तरी हळुवारपणे आपण आपल्या न्यायासनावर चढून बसतो. आपल्याला ते दोषी दिसतात. त्यांनी केलेल्या निर्दय आघातानंतर फक्त क्षमा मागण्याने भागणार नसते – न्याय आणखी मागणी करतो.

असा विचार आपण करतो तेव्हा ते बरोबर असते. नुसते सॉरी म्हणणे म्हणजे, तुम्हाला समजून घेतलेले नसते. किंवा धुळीत बसून काही पश्चात्ताप केलेला नसतो. क्षमा देणाऱ्यासाठी तिची किंमत मोठी असते. आणि विशेषत: ख्रिस्ती व्यक्तीसाठी.  कोणत्याही मानवी न्यायालयाने कधी दिली नाही इतकी अन्यायकारक शिक्षा त्यांच्यासाठी देवाच्या कोकऱ्याने शांतपणे सहन केली (यशया५३:७). अनंतकाळासाठी असलेला देवाच्या क्रोधाचा ज्वालामुखी त्यांच्या पापांची क्षमा करण्यासाठी देवाच्या पुत्रावर ओतला गेला.

न्यायी ठरवले जाणे हे फक्त कृपेद्वारे, केवळ विश्वासाद्वारे आणि केवळ ख्रिस्ताद्वारेच केले जाते. पण संघर्षामध्ये आपण ते फक्त आपल्या स्वत:लाच लागू करतो. आपण त्यांना क्षमा करण्यासाठी त्यांनी काही तपस्या करण्याची, शिक्षा भोगण्याची  गरज नाही.  ख्रिस्ताने फार मोठी किंमत भरून पित्याकडून त्यांना क्षमा देऊ केली आहे. ते कोण आहेत की आम्ही त्यांना क्षमा करावी असा प्रश्न कधीच नसावा तर त्यांना क्षमा आवरून धरणारे आपण कोण असा असावा. येशूने आमच्या अनंत ऋणांची क्षमा केली आहे – तर आपल्या प्रियजनाला एका दिवसाच्या मजुरीसाठी बंदिवासात घालणारे आपण कोण (मत्तय १८:२१-३५)?

२.  कृपा देण्याने त्यांना एक धडा शिकवला जातो

आपल्याला वाटते की जर त्या व्यक्तीसाठी आपण विपुल कृपा दिली तर ते आपला फायदा उठवतील. जर आपण एक गाल पुढे केला तर ते जीवनभर आपल्या गालावर चपडाका देत राहतील. मग आपण सर्व सूत्रे आपल्या हातात  घेतो. आणि त्या व्यक्तीने भविष्यात वेगळे वागावे म्हणून प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. जर त्यांनी बर्नरवर हात धरण्याचा प्रयत्न केला तर ते भाजतीलच.

पण देव आपल्याशी देव किती निराळेपणाने वागतो हे लक्षात घ्या. जरी तो निखालसपणे आपल्याला शिस्त लावतो (इब्री १२:५-११) तरी तीत २:११ कडे लक्ष द्या की, देवाची कृपा आपल्याला पाप सोडून सुभक्तीमध्ये चालण्यास शिकवते. तुमच्या प्रिय व्यक्तीला पवित्र करण्यास  देवाची कृपा समर्थ आहे, आपला क्रोध नाही. देवाची परिपूर्ण कृपा जी येशूमध्ये प्रकट झाली तिची याद्वारे आपण आठवण करून देतो व त्यामुळे बदल घडतो.

३. कृपा पुरवल्यानंतर क्षमायाचना व्हायलाच पाहिजे

मोठ्या भांडणामध्ये मी कृपा ही पश्चात्तापाची बाब करतो – भग्न व अनुतप्त ह्रदय मी तुच्छ मानणार नाही. त्यांना जेव्हा आणि जेव्हा खूप वाईट वाटेल तेव्हाच मी त्यांच्याकडे प्रीतीने जाईन. माझ्या योजनेत कृपा ही लायक नसताना दिलेली दया नाही. ती लायक व्यक्तीला दिलेली सहभागिता आहे.

परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला (रोम ५:८). जेव्हा आपण जेव्हा देवाच्या तोंडावर शेण फेकत होतो तेव्हा येशू मध्ये आला आणि आपल्याला पाडण्यासाठी जो एकच गुद्दा पुरा होता तो त्याने स्वत: झेलला. देवाची विलक्षण प्रीती मला माझ्या पत्नीसाठी (आणि मित्रांसाठी, कुटुंबातील लोकांसाठी) उगारलेला गुद्दा खाली घेऊन तिच्याकडे कनवाळूपणे जायला मदत करते – तिने सॉरी म्हणण्यापूर्वी आणि अनेकदा. “देवाची ममता तुला पश्‍चात्तापाकडे नेणारी आहे” (रोम २:४). मी देवाच्या दयेचे व धीराचे व सहनशीलतेचे कमकुवतपणे अनुकरण केले तरी ती हेच काम करते असे मला दिसून आले.

तीन वैयक्तिक निर्णय
नातेसबंधाच्या संघर्षासंबंधी मला बराच अनुभव आहे. जर पळून जा किंवा लढ असे दोनच पर्याय असतील तर प्रत्येक वेळी मी रिंगणात उतरलो आहे. मी शब्दफेक केली आहे आणि घेतली आहे. पण विवाहासाठीच्या मार्गदर्शनाच्या वेळी ख्रिस्ताच्या कृपेने मला जसे देवाने माझ्यावर केले त्या प्रकारे मित्रांवर, कुटुंबावर, पत्नीवर  प्रेम करायला दया दाखवणे व  संयम राखण्यास शिकवले आहे. माझ्या या कृपा देणाऱ्या वैवाहिक संघर्षात ह्या काही तत्त्वांची मला मदत झाली.

१. शांती असताना योजना करा

मला समजले आहे की लढा चालू असताना चतुर योजना करणे चुकीचे आहे. जेव्हा गोळ्या झाडल्या जातात तेव्हा लढ्याला तोंड कसे द्यावे ह्याची योजना करणे व्यर्थ ठरते. शांतीच्या वेळेचा भविष्यातील संघर्ष कसे हाताळाल याची योजना करा. तुमच्या प्रिय जनाला विचारा की परिस्थिती विकोपाला गेली तर ती कशी थंड करायची? मी असे काय बोललो की त्यामुळे तुझा मूड बिघडला? तुला काय पसंत आहे – संघर्ष लगेच हाताळणे की नंतर ?
नात्यामधली युद्धे बहुधा शांततेच्या काळात सोडवली जातात.

२. प्रीतीची याचना करा

माझ्या लक्षात आलेय की संघर्षाच्या वेळी प्रेमळ शब्द घशातच अडकतात. जेव्हा मी ते मोकळे करतो – काहीतरी -काहीही दयाळू बोलतो तेव्हा तणाव लगेचच कमी होतो. म्हणून आम्ही दोघांनी ठरवले आहे की अशा वेळी कोणीही प्रेमाच्या शब्दांची विचारणा करावी.

संघर्ष नेहमी विचारतो, तुझं अजूनही माझ्यावर प्रेम आहे का? तू मला (पुन्हा) नाराज केलं आहे. “मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो”  (नीती १५:१).

३. वधस्तंभाची आठवण करा

ज्या नवऱ्याला जास्त क्षमा मिळाली आहे तो अधिक प्रीती करील. त्याला ख्रिस्ताच्या कृपेने जे मिळाले त्याने तो विस्मित होईल व आनंदाने आपल्या पत्नीला तेच देऊ करील. ख्रिस्ती कृपा ही कृसाशी जखडलेली आहे. कृपेतून रक्ताचे ओघळ वाहिले यासाठी आपण ते घ्यावे व इतरांपर्यंत पोचवावे.

आपण जी कृपा पुढे करतो ती आपल्या नैतिक उंचीतून वाहत नाही तर  ती जो रक्तबंबाळ तारणारा त्याच्यातून वाहते. तो त्याच्या लोकांवर कृपेचा वर्षाव करतो.

Previous Article

आशीर्वादित म्हणजे काय?

Next Article

काही ख्रिस्ती सत्यांचा अभ्यास

You might be interested in …

प्रभू काहीही कर पण मला शिस्त लाव

जॉन ब्लूम .  जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखी माझी बुद्धी असे, आता प्रौढ झाल्यावर मी पोरपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत ( १ करिंथ १३:११). याचा अर्थ; […]

तुमच्या आनंदाचा विध्वंस करणारा गर्व 

जोनाथन वूडयार्ड                              मी एक गर्विष्ठ माणूस आहे. खरंच. या विभागातला मी एक प्रमुख तज्ज्ञ आहे. मी ढोंग करत नाहीये. मला प्रामाणिक आणि नितळ व्हायचे आहे. गर्वामुळे येणाऱ्या समस्या मी प्रत्यक्ष  अनुभवल्या आहेत. मी […]

धडा २२.   १ योहान ४: ४-६ स्टीफन विल्यम्स

  तुमचे आध्यात्मिक अन्न – कोण खात आहे? प्रत्येक पावसाळ्यात आपल्याला कॉलरा, कावीळ अशा त्या मोसमातील रोगांचा इशारा दिला जातो आणि सतर्क लोक लगेच त्याबाबत प्रतिबंधक उपायांची तजवीज करायला सुरुवात करतात. त्यात पुढील दोनपैकी एक […]