जनवरी 8, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

देव तुम्हाला तुमच्या सवयीमध्ये  राखील

डेव्हिड मथीस


पुढच्या दहा वर्षात तुम्ही प्रभूला धरून असणार याबद्दल तुमची किती खात्री आहे?

अखेरीस निश्चितपणे विश्वासात  टिकून राहण्यासाठी देवच आपली आशा आहे. तोच आपल्याला राखतो
(१ थेस्स.५:२३-२४; यहूदा २४).

तरीही ख्रिस्ती चिकाटी ही निष्क्रीय नसते. ती काही आपल्या सभोवती घडत नाही तर आपल्यामध्ये व आपल्यामधून घडत असते.

या विश्वासात टिकून राहायला आपण त्याच्यावर अवलंबून राहावे अशी देव आज्ञा करतो. देव आपल्याला राखील हे आपल्याला केवळ अभिवचन दिले नाही तर आपल्या आदेश दिला आहे की, “आपणांस देवाच्या प्रीतीमध्ये राखा” (यहुदा २१). ह्या टिकून राहण्यामध्ये आपण जे काही करतो ते मूलभूत  नाही पण ते आवश्यक आहे.

सवयीचे सामर्थ्य

“आणि प्रीती व सत्कर्मे करण्यास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकांना बोध करावा, आणि तो दिवस जसजसा जवळ येत असल्याचे तुम्हांला दिसते तसतसा तो अधिक करावा” (इब्री १०:२४-२५).
इथे चालीप्रमाणे हा शब्द सवय या अर्थाने वापरला आहे आणि तो त्यामध्ये टिकून राहण्याविषयी बोलत आहे. एकत्र मिळणे सोडू नये म्हणजे होकारात्मक रीतीने खरी ख्रिस्ती सहभागिता वाढती ठेवावी.

एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा करणे ही एकाच वेळची घटना नसते. तर तो  दररोजचा, दर आठवड्याचा, नियमित जीवनाचा घटक आहे. याला आपण आध्यात्मिक शिस्त किंवा कृपेच्या सवयी असे म्हणतो.

चांगल्या सवयीसाठी चार किल्ल्या

दैवी  बाबींसाठी चिकाटी धरणे हे तुमच्या सवयीमध्ये  असते. स्वर्ग आणि नरक हे आपल्या सवयींवर अवलंबून आहे. मला एखाद्याची सवय दाखवा आणि मला त्याच्या आत्म्याची झलक दिसते. आज ज्या सवयी तुम्ही जोपासाल त्यांचा परिणाम तुम्ही शेवटी विश्वासात टिकणार की पडणार ह्यावर होईल.

सोप्या शब्दात तुमच्या सवयी या तुमच्यासबंधी सर्वात महत्त्वाच्या बाबी आहेत. म्हणून येथे तुम्ही ख्रिस्ती जीवनात जीवनदायी सवयीत वाढावे म्हणून अधिक प्रभावी, निश्चयी व्हावे यासाठी चार धडे दिले आहेत.

१. सवय ही आपल्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी मोकळीक देते

सवय आपले लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टीपासून आपल्याला मोकळे करते मग ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्याकडे आपण लक्ष देऊ शकतो. चांगल्या सवयी लावल्याने – उदा. सकाळी बायबल वाचणे, जेवणाच्या वेळी तसेच दिवसातून अनेक वेळा प्रार्थना करणे, इतर विश्वासीयांना भेटणे- या गोष्टींनी आपण देवाच्या कृपेच्या मार्गात राहतो.

शास्त्रलेखांवर वैयक्तिक  मनन आणि प्रार्थना केल्याच्या सवयीमुळे आपल्याला देवाची ओढ लागते. येशूचे त्याच्या पुस्तकातून ऐकणे, त्याला समजून घेऊन त्याच्यामध्ये आनंद घेणे, पित्याशी प्रार्थनेद्वारे बोलणे या मुख्य गोष्टींसाठी आपण वेळ देऊ लागतो.

बायबल वाचण्याच्या कृतीने आपली ह्रदये त्याच्यासाठी उत्सुक होऊन बदलत नाहीत तर आपल्या ह्रदयाच्या डोळ्यांनी त्याला पाहण्याने. सवय ही विश्वासाला जागा करून देते. “आपल्या मुखांवर आच्छादन नसलेले आपण सर्व जण आरशाप्रमाणे ‘प्रभूच्या वैभवाचे’ प्रतिबिंब पाडत आहोत; आणि प्रभू जो आत्मा त्याच्या द्वारे, तेजस्वितेच्या परंपरेने, आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत” ( १ करिंथ ३:१८). मग आपण त्याचा पाठपुरावा करू लागतो. चांगल्या सवयीने आपण नीट पाहू शकतो व पाहत राहू शकतो.

२. सवयीमुळे अधिक महत्त्वाच्या गोष्टींचे रक्षण होते

सवयीमुळे आपल्याला योग्य निर्णय पुन्हा पुन्हा करण्याची गरज नसते. ह्यामुळे निर्णय घेण्यामध्ये व्यर्थ शक्ती घालवली जात नाही.

देवाच्या वचनाकडे रोज सकाळी जायचे की नाही हा निर्णय रोज घेण्याची गरज नसते. उपासनेसाठी व विश्वासी लोकांबरोबर वेळ घालवायचा की नाही हा निर्णय दर शनिवारी रात्री घेण्याची गरज नसते. त्यासाठी स्वत:ला वाहून घ्या. सवय लावा म्हणजे हे प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवण्याची गरज नाही.

चांगल्या सवयी जे अधिक महत्त्वाचे त्याचे रक्षण करतात. आपल्याला चिकाटी पुरवतात. चांगल्या सवयी आपल्याला देवाच्या वचनात, प्रार्थनेत, देवाच्या लोकांमध्ये राखून ठेवतात.

३. सवयीचा एकच साचा नसतो.

ख्रिस्ती जीवनात टिकून राहणे हे चैतन्यमय असते. ते तुमचे स्वत:चे अनुभव, घडण, प्रवृत्ती, तुमचे वयोमान, तुमचा जीवनाचा इतिहास, आणि तुमचा सध्याचा समाज यावर अवलंबून असते.

तुम्हाला इतर कोणासारखे आध्यात्मिक कार्यक्रम जगायला पाचारण केले नाही हा विचार तुम्हाला मुक्त करतो. तुमच्या हिरोची नक्कल तुम्हाला करायची नाही. सवयी ह्या व्यक्तीनुसार असतात आणि देव आपल्याला त्यासाठी काळानुसार, व्यक्तिमत्त्वानुसार लवचिकता देतो.

आपल्याला शौलाचे चिलखत घालण्याची गरज नाही. जेव्हा दावीद गल्ल्याथाशी लढायला पुढे आला तेव्हा शौलाने त्याला स्वत:चे चिलखत व तलवार दिली. त्यावेळी दावीद शौलाला म्हणाला; “हे घालून माझ्याने चालवत नाही, कारण मला ह्यांचा सराव नाही;” म्हणून दाविदाने ते उतरवून ठेवले. मग त्याने आपली काठी हाती घेतली; ओहोळातून पाच गुळगुळीत गोटे वेचून आपल्या थैलीत म्हणजे धनगरी बटव्यात ठेवले, आणि आपली गोफण हाती घेऊन तो त्या पलिष्ट्याकडे गेला” ( १ शमुवेल १७:३९-४०).

जो राक्षस तुम्ही विश्वासात टिकून राहू नये म्हणून पाहतो त्याला तुम्ही कसा लढा द्याल? तुम्हाला दुसऱ्याचे चिलखत घालायची गरज नाही. पण आत्मिक शस्त्रे कशी वापरायची हे तुम्हाला ठाऊक असायला हवे. “कारण जर तुम्ही देहस्वभावाप्रमाणे जगलात तर तुम्ही मरणार आहात; परंतु जर तुम्ही आत्म्याने शरीराची कर्मे ठार मारलीत तर जगाल” (रोम ८:२३).

प्रभूमध्ये  टिकून राहणे हे “आत्म्याद्वारे” घडते. आणि तो देवाच्या वचनाच्या तलवारीद्वारे कार्य करतो (इफिस ६:१७). तुम्ही ही तलवार उचलून घ्याला हवी व टिकून राहण्यासाठी युद्धातले डावपेच शिकायला हवे. आणि ज्याच्यासाठी तुम्ही लढता – यापेक्षा जो तुमच्यासाठी लढत आहे त्याच्यापासून शिका.

४. सवयी ह्या इच्छेमुळे पुढे नेल्या जातात

सवय ही ख्रिस्ती जीवनात टिकून राहण्याचे मुख्य साधन आहे आहे. इच्छा आणि प्रतिफळ हे सवयींना  पुढे चालवतात. देवाने या विश्वाची रचना अशी केली आहे यात आपल्याला आश्चर्य वाटू  नये. सवयी ह्या जगिक देणग्या आहेत ज्यामुळे आपण स्वर्गीय चव घेऊ शकतो. आध्यात्मिक सवयी आणि खरी ख्रिस्ती चिकाटी ह्या फक्त कर्तव्य म्हणून केल्या जात नाहीत तर त्यात मिळणाऱ्या आनंदामुळे केल्या जातात. इब्री १०:३५ सांगते  की जे टिकून राहतात त्यांच्यासाठी मोठे प्रतिफल आहे.  हे प्रतिफल काय आहे? ३४ वे वचन हे त्याची किल्ली आहे; “कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झालात आणि [स्वर्गात] आपली स्वतःची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे व ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली.”

त्या पहिल्या ख्रिस्ती लोकांनी त्यांच्या अनेक मालमत्तांची हानी सोसली कारण आपल्याला स्वर्गात चांगली टिकाऊ मालमत्ता आहे हे त्यांना ठाऊक होते.

पवित्र सवयी जोपासण्याचे ध्येय म्हणजे येशूला विश्वासाने  मिळवणे. त्याला जाणून घेणे आणि त्याच्यामध्ये आनंद घेणे. आपल्या चिकाटीची  तोच अखेर आहे. आपल्या महान प्रतिफळाचे केंद्र , शिखर आणि सार तोच आहे. सवयी आपल्या विश्वासात टिकून राहायला जे करतात ते पाहण्यापेक्षा आपण आपल्या विश्वासाचा जो विषय म्हणजे येशू त्याकडे पाहायला हवे.

येशूला ओळखत राहा व त्याचा आनंद घ्या

कृपेच्या सवयी म्हणजे शास्त्रवाचन व प्रार्थना, त्याच्या शरीराशी जोडलेले असणे यामुळे येशू आपला प्रभू याच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेची (फिली. ३:८) आपण नियमित चव घेतो. या सवयी आपल्याला विश्वासात टिकून राहायला मदत करतात कारण ते येशूला जाणून घेण्यासंबंधी आहे.

येशूने योहान १७:३ मध्ये प्रार्थना केल्याप्रमाणे “सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे.”   या सवयीचे सर्वात मोठे प्रतिफल म्हणजे त्याला ओळखत राहणे. आपल्या सर्व सवयी व चिकाटीचा शेवट हा एक व्यक्ती आहे म्हणून आपण रोज न रोज म्हणतो, “चला, आपण परमेश्वरास ओळखू; परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यास झटू”  (होशेय ६:३).

Previous Article

तुमच्या कुटुंबाला पैशापेक्षा अधिक गरज आहे

Next Article

मार्टिन लूथर (१४८३ -१५४६)

You might be interested in …

खिस्तजयंतीच्या वेळी तुम्हाला ख्रिस्ताचाच कंटाळा येत नाही ना? लेखक : स्टीफन विटमर

ख्रिस्तजयंतीच्या वेळी मार्काच्या शुभवर्तमानाकडे दुर्लक्ष केले जाते. इतर शुभवर्तमाने येशूच्या जन्माची तपशीलवार हकीगत सांगतात (मत्तय आणि लूक) किंवा त्याचा उल्लेख तरी करतात (योहान). मार्क आपल्याला यातले काहीच देत नाही – गव्हाणी नाही, मेंढ्या नाही, मेंढपाळ […]