जनवरी 24, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

विश्वासी ख्रिस्ती उत्क्रांतीवादावर विश्वास ठेवू शकतात का?

ग्रेग अॅलीसन

उत्क्रांतिवाद हा शब्द आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. मी कॉलेजमध्ये असताना सायन्स शाखा निवडली होती व मी अभ्यास करत असलेला प्रत्येक विषय – बायॉलजी, बॉटनी, इकॉलजी, मायक्रोबायॉलजी – हे सर्व विषय उत्क्रांतीवादाच्या दृष्टिकोनातून शिकवले जात असत. यामध्ये उत्क्रांती म्हणजे “सर्व जीवन हे निर्जीव पदार्थापासून निर्माण झाले आहे आणि ते नैसर्गिक निवडीने व प्रजातीने प्रगत झाले आहे. कोट्यावधी वर्षांच्या काळात सहज घडलेल्या हेतूरहित उत्परिवर्तनाद्वारे (mutations) हे बदल घडले गेले.

विचार करा की ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि कार्बन ही मूलतत्वे एकत्र येतात आणि हवा, पाणी आणि धातू असे निर्जीव पदार्थ तयार करतात. तसेच झाड, गवत, कीटक, पक्षी, हत्ती आणि मानव असे सजीव सुद्धा तयार करतात… न समजणाऱ्या अशा पातळीवर हे बदल अपघाताने घडले गेले – हेतूरहित उत्परिवर्तनाद्वारे डीएनए मध्ये घडले. ह्यांचे अस्तित्व टिकून राहिले. त्यांच्यामध्ये मर्जीने थोडे बदल झाले. जसजसे निराळ्या प्रकारच्या वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचे वर्ग प्रगत होत गेले तसे त्यांना अस्तित्वासाठी फायदा लाभत गेला. अखेरीस त्यांनी सजीव व निर्जीवांची सध्या असलेली विविधता निर्माण केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही सर्व प्रक्रिया निर्हेतुक होती. तिचे  कोणीही मार्गदर्शन केले नाही. ती देवाशिवाय घडली.

ईश्वरवादी उत्क्रांती म्हणजे काय?

ईश्वरवादी उत्क्रांती हा याचा उपसंच आहे व त्याचे मुख्यत: दोन विभाग आहेत. एका आवृत्तीनुसार ईश्वरवादी उत्क्रांती ची व्याख्या अशी: “हा सिद्धांत सांगतो की सर्व जीव हे उत्क्रांतीवादाच्या प्रक्रियेत सांगितले तसेच प्रगत झाले, त्यामध्ये देवाने वेळोवेळी हस्तक्षेप करून स्वत:चे हेतू पूर्ण केले.” या सिद्धांतानुसार महत्त्वाचा फरक म्हणजे उत्क्रांतीवादाची वर दिलेली व्याख्या आज अस्तित्वात असलेले सजीव व निर्जीव यांच्या प्रगतीच्या प्रक्रियेत देवाची कोणतीही भूमिका नाकारते तर ईश्वरवादी उत्क्रांती देवाची या प्रगतीमधील काही भूमिका मान्य करते.

याचे एक उदाहरण म्हणजे ईश्वरवादी उत्क्रांती म्हणजे देवाने भौतिक पदार्थ निर्माण केले आणि त्यानंतर पदार्थांच्या नैसर्गिक वर्तनात कोणताही दिसेल असा बदल घडताना मार्गदर्शन केले नाही अथवा हस्तक्षेप केला नाही. व अखेरीस सर्व सजीवांची पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रियेने उत्कांती झाली. अशा रीतीने देवाने आपल्या बाहेर असलेले जग अस्तित्वात आणताना केलेल्या आरंभीच्या कृतीनंतर उत्क्रांतीच्या प्रक्रियेत परिणाम होईल अशी कोणतीही भूमिका चालू ठेवली नाही.

ईश्वरवादी उत्क्रांतीच्या दुसऱ्या आवृत्तीचे बायोलोगॉस ईश्वरवादी उत्क्रांती ही संस्था प्रतिनिधित्व करते. त्यांचा दृष्टिकोन आहे की “देवाने येशूद्वारे सर्व सजीव निर्माण केले, यामध्ये त्याच्या प्रतिमेमध्ये निर्माण केलेला मानव आहे व त्यासाठी त्याने आज शास्त्रज्ञ ज्याला उत्क्रांती म्हणतात ती नैसर्गिक प्रक्रिया कृतिशीलतेने टिकवून तिची हेतुपूर्वक रचना केली. अशा रीतीने देवाने आरंभी जगाची निर्मिती करताना फक्त कृतीच केली नाही तर जे काही अस्तित्वात आहे त्याच्या प्रगतीमध्ये कृतीशील सहभाग घेतला.  उत्क्रांतीची प्रक्रिया होत असताना म्हणजे नैसर्गिक निवड,  प्रजाती, व हेतूरहित उत्परिवर्तन, ह्यांवर पर्यवेक्षण केले यासाठी की दैवी रचनेनुसार सजीव व निर्जीव दोन्ही तयार व्हावे.

ईश्वरवादी उत्क्रांतीच्या ह्या दोन आवृत्तीपैकी एकतरी शास्त्रलेखामध्ये बसते का? ह्याचे उत्तर देण्यासाठी आपल्याला मंडळीचा इतिहास व ऐतिहासिक ख्रिस्ती सिद्धांत पाहण्याची गरज आहे.

मंडळीकडे उत्क्रांतीवाद येतो

इतिहासाच्या बहुतेक भागात मंडळीने विश्वास ठेवला आहे की देवाने सर्व काही ‘एक्स निहीलो’ (नसत्यातून) निर्माण केले आहे. मंडळीने बायबलच्या पहिल्याच वचनावर आधारित राहून या सिद्धांताला पुष्टी दिली. “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली” (उत्पत्ती १:१). देव जो अनंतकालापासून पिता, पुत्र व पवित्र आत्मा म्हणून अस्तित्वात आहे त्याने आपल्या योजनेनुसार आपल्यापासून निराळे असे विश्व निर्माण केले. इतर काही संदर्भ या मूलभूत विश्वासाला पुष्टी देतात. उदा. स्तोत्रकर्ता जगाच्या निर्मितीचे देवाच्या श्वासाला श्रेय देतो. “परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले; त्याच्या मुखश्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण झाले. कारण तो बोलला आणि अवघे झाले; त्याने आज्ञा केली आणि सर्वकाही स्थिर झाले” (स्तोत्र ३३:६,९). ह्या परिच्छेदाचा पारंपारिक अर्थ असा आहे की , देवपित्याने शब्दाद्वारे (देव पुत्र) आणि आपल्या श्वासाद्वारे (पवित्र आत्मा) विश्व अस्तित्वात आणले. निर्मिती ही त्र्येक देवाची सामर्थ्यशाली कृती आहे.

शिवाय खुद्द शास्त्रलेखच जेव्हा देवाने निर्मिती केली तेव्हा पूर्वी अस्तित्वात असलेले भौतिक पदार्थ वापरले हे नाकारतात. “विश्वासाने आपल्याला कळते की, देवाच्या शब्दाने विश्वाची रचना झाली, अशी की, जे दिसते ते दृश्य वस्तूंपासून झाले नाही” (इब्री ११:३). उदा. देवाने पूर्वी अस्तित्वात असलेले दोन हायड्रोजनचे परमाणू आणि एक ऑक्सिजनचा परमाणू घेऊन ते एकत्र आणून त्यांचे पाणी बनवले नाही. तर त्याने हायड्रोजन व ऑक्सिजनचे परमाणू आणि पाणी निर्माण केले. देवी निर्मिती ही शून्यातून, नसत्यातून झाली गेली.

उत्पत्तीच्या उरलेल्या वृत्तांतानुसार मंडळीचा असाही विश्वास आहे की देवाने जे काही अस्तित्वात आहे ते सर्व निर्माण केले: प्रकाश, पाणी, हवा, जमीन, वनस्पती, सूर्य, चंद्र आणि तारे, समुद्रातील प्राणी, उडणारे पक्षी, जमिनीवरील प्राणी, आणि अखेरीस दैवी प्रतिरूपाचा मानव निर्माण केला.

महत्त्वाची बाब म्हणजे सर्व सजीव व निर्जीव हे नैसर्गिक निवड, प्रजाती, आणि हेतुरहित उत्परिवर्तन अशा प्रक्रियेने प्रगत केले गेले अशा कल्पनेला मंडळीने कधीही पुष्टी दिली नाही. अणुविषयक सिद्धांत – जो म्हणतो की अस्तित्वात असणारी प्रत्येक पदार्थाची सुरुवात अपघाताने झालेल्या अणूंच्या धडकण्याद्वारे झाली व आकस्मिक रीतीने प्रारब्धाद्वारे (संधी मिळाली तसे) प्रगत झाले – असा सिद्धांत अर्थातच पहिल्या मंडळीने पूर्णपणे नाकारला. अशी हेतुरहित प्रक्रिया स्वीकारण्याऐवजी मंडळीने निर्माणकर्त्याची स्तुती केली. ओरीजेन याने म्हटले आहे, “आम्ही खिस्ती लोक जो एकमात्र आणि एकच  देव त्याच्या भक्तीला वाहून घेतलेलो आहोत. त्याने या सर्व गोष्टी निर्माण केल्या आहेत आणि आम्ही त्या त्याने केल्या म्हणून त्याचे ऋणी आहोत.”

एकोणिसाव्या शतकात मंडळीला शास्त्रलेखांचा अधिकार व सत्यता याविरुद्ध केलेल्या अनेक हल्ल्यांना तोंड द्यावे  लागले. इ.स. ३८१ मध्ये कॉन्स्टॅटिनोपलच्या नायसिन मतांगिकाराने दृढ केले की, “सर्वसमर्थ एकच देव जो पिता आकाश व पृथ्वी आणि त्यातील सर्व दृश्य व अदृश्य वस्तूंचा निर्माणकर्ता यावर आम्ही विश्वास ठेवतो.” यानंतर ईश्वरी सिद्धांत प्रगत होत असताना थॉमस अॅक्वीनस याने खुद्द निर्मितीला निर्माण करण्याची क्षमता आहे किंवा इतर सजीव प्रगत करता येतात ही कल्पना नाकारली. त्याने कारण दिले की, “फक्त देव जो सर्वोच्च त्यालाच फक्त निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे. हे निर्माण केलेल्या प्राण्यांना अशक्य आहे.” त्याची मनोभूमिका ही ईश्वरवादी उत्क्रांतीच्या विरोधात उभी राहते कारण ईश्वरवादी उत्क्रांती ही निर्मितीचे सामर्थ्य हे पदार्थाला देते व त्याची प्रगती केवळ नैसर्गिक प्रक्रियेद्वारे मानते. याच प्रकारे प्रोटेस्टंट पंथाने निर्मितीच्या पारंपारिक सिद्धांतालाच पुष्टी दिली.

जे ख्रिस्ती लोक ईश्वरवादी उत्क्रांतीला धरून आहेत ते बायबलनुसार असलेल्या निर्मितीच्या वृत्तांताशी सहमत नाहीतच पण ते स्वत:ला मंडळीच्या ऐतिहासिक विश्वासाच्या बाहेर ठेवतात. देवाने भौतिक पदार्थ निर्माण केले असा विश्वास ठेवत असतानाच, देवाने फक्त निर्जीव भौतिक पदार्थच नाही तर सर्व दृश्य गोष्टी (उदा. वडाची झाडे, घोडे) आणि अदृश्य गोष्टी (उदा. देवदूत) निर्माण केले असे खात्रीने बोलण्यास ते कचरतात.

“देवाची निर्मिती ही केवळ व्यापक भौतिक पदार्थांची नव्हती तर विशिष्ट वर्गांची आणि भिन्नभिन्न प्राणिमात्रांची होती.”

हे विचार ईश्वरवादी उत्क्रांतीच्या दुसऱ्या प्रकाराला लागू करून बायोलोगोसचे ईश्वरवादी उत्क्रांतीचे लोक आपले पूर्वज समाईक असल्याचे प्रस्थापित असल्याचे मानतात. समाईक पूर्वज म्हणजे जर आपण ३०,००० पिढ्यांच्या मागे गेलो “तर ही प्राचीन जमात (जी मानव नव्हती किंवा चिंपांझी नव्हती) ही दोन भागात विभागली गेली. आणि हे गट प्रजननाने अलग झाले…अखेरीस प्रत्येक गटाचे गुणधर्म इतके बदलले गेले की शास्त्रज्ञ त्यांना निराळ्या प्रजाती म्हणून ओळखू लागले.” ईश्वरवादी उत्क्रांतीच्या पुरस्कर्त्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशाच प्रकारची पूर्वजांच्या वंशावळीची गोष्ट कोणत्याही इतर दोन सजीव प्रजातींबद्दल सांगता येईल. (नाहीतरी उत्क्रांती म्हणजे काय?) त्यांचा आरंभ  म्हणजे काय आणि सामान्यपणे प्रजातींचा आणि विशेषतः मानवांचा विकास ह्याचा बायबलमधील वृत्तांताशी संघर्ष होतो. जरी त्यामध्ये देवी मार्गदर्शन व हेतू घातला तरीही.  ईश्वरवादी उत्क्रांतीचे पुरस्कर्ते उत्पत्ती १ चा वृत्तांत नाकारतात. तो म्हणजे देवाने विशिष्ट आणि  तत्काळ केलेली जलचर, पक्षी, प्राणी आणि अखेरीस मानव यांची  निर्मिती. त्याऐवजी ते असे म्हणणे पसंत करतात की देवाने हे सर्व सजीव, नैसर्गिक यंत्रणेद्वारे दीर्घ कालखंडामध्ये निर्माण केले. त्यांच्या या भुमिकेद्वारे सूचित होते की त्यामुळे बायबलमधील पतनाची कहाणी सुद्धा नाकारली जाते कारण अशा उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक आदाम व हवेला कुठेच जागा नाही.

या सर्व कारणांमुळे (आणि इतर अनेक) मंडळीने स्थिर उभे राहून शास्त्रलेखातील दैवी निर्मितीचा वृत्तांत वाचत राहून तिच्या ऐतिहासिक भूमिकेशी विश्वासू राहावे. आणि देवाने नसत्यातून (एक्स निहीलो)  हेतुपूर्वक केलेल्या आणि प्रत्येक प्रकारच्या सजीव व निर्जीवांची निर्मिती केल्याबद्दल त्याची स्तुती करावी.

Previous Article

रोगी असणे निरोगी असण्यापेक्षा चांगले असू शकेल का?

Next Article

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

You might be interested in …

जर सर्वात वाईट घडलं तर ?

वनीथा रिस्नर माझी भीती वाढत आहे असं मला जाणवलं. ती अगदी ह्रदयाची धडधड बंद करणारी, सर्वत्र व्यापून राहणारी भीती नव्हती पण  सतत कुरतडत राहणारी भीती- जेव्हा तुम्ही सध्याच्या निराशाजनक घटना पाहता आणि हे कधी बदलणार […]

येशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर विचार

येशूवर आणि त्याने वधस्तंभावर यावर तुम्ही विचार करत असताना खाली दिलेले काही विचार तुम्हाला आणखी मदत करतील. पाप म्हणजे फक्त वाईट गोष्टी करणे एवढेच नाही. तर “चांगल्या” गोष्टींनाच आपले अंतिम ध्येय करणे हे ही पाप […]

ख्रिस्तजयंती तुमच्या दु:खाकडे दुर्लक्ष करत नाही

डेव्हिड मॅथीस प्रमाणिकपणे विचार केला तर सर्व सोहळा काही लख्ख आणि आनंदी नाही कारण हे जग तसे नाहीये. काहींना तर या ख्रिस्तजयंतीला मनावर ओझे असेल, दु:खी भावना असतील. सोहळ्यात आनंद करायची कल्पनाच कठीण वाटत असेल. […]