जनवरी 2, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धर्मजागृती आणि तिचा आघात व आशियात सुवार्तेचे सामर्थ्य

क्रिस विल्यम्स

लेखांक ४

ठासून केलेल्या विरोधातून प्रॉटेस्टंट व सुवार्तावादी चळवळींचा जन्म

रोमन कॅथॉलिकवादाच्या कित्येक शतकांपासूनच्या जुनाट शृंखला तोडून त्यांचा विध्वंस करून अगदी पूर्ण नवीन मतप्रणालीची सुरुवात झाल्याचे पाहून तुमच्या मनात खोल प्रतिक्रिया उमटलीच पाहिजे. ३१ ऑक्टोबर १५१७ रोजी  लूथरने आपल्या ९५ प्रबंधांची प्रत व्हिटेनबर्ग कासल चर्चच्या दारावर लावली. या त्याच्या कृतीने त्याने स्वत:ला पवित्र रोमन साम्राज्य असे गर्वाने संबोधून घेणाऱे साम्राज्य ढासळून पाडणाऱ्या चळवळीची प्रभावीपणे सुरुवात केली. जेवढे म्हणून पाखंडी शिक्षण आहे, त्याविरूद्ध हरकत घेऊन निषेध करण्याची ही सुरुवात होती.

१५२१ साली चार्ल्स पॉलने बोलावलेल्या वोर्म्स येथील राजकीय सभेत या जर्मन भिक्षुकाला पाचारण करण्यात आले होते. त्यात  तो एकटा  आपल्या विवेकभावाच्या स्वातंत्र्याने  बायबलसाठी ठाम उभे राहून जाहीर कबुली देणार होता की: “माझी खात्री झाली आहे की पवित्र वचनाच्या साक्षीशिवाय व सकारण पुराव्यांशिवाय मी केवळ  पोप किंवा धर्मसभेवर विश्वास ठेऊ शकत नाही; कारण हे स्पष्ट आहे की त्यांनी वारंवार चुका केल्या आहेत,  आणि स्वत:स विरोधी शाबीत केले आहे. देवाचे जे पवित्र वचन माझा मूळ आधार आहे, त्याद्वारे माझी खात्री  झाल्याचे मी समजतो की माझा विवेकभाव देवाच्या वचनाचा गुलाम झाला आहे. त्यामुळे मी पुन्हा पूर्वीप्रमाणे चालणे ठेवू शकत नाही व चालू ठेवणार नाही. कारण एखाद्याने आपल्या विवेकभावाविरुद्ध वागणे सत्याचे व सुरक्षितपणाचेही होणार नाही. देवा, मला सहाय्य कर, आमेन.”

देवाच्या वचनावर धैर्याने व ठामपणे उभे राहण्याच्या त्याच्या या आवाजाने सारे जग दुमदुमून गेले. कारण जे त्याचा प्राणही घेऊ शकत होते अशा बलवान साम्राज्याच्या राजकारण्यांसमोर तो उभा होता, म्हणूनच ही धाडसाची बाब होती. ते नम्रपणाचे होते कारण केवळ एकच दिवस आधी त्याने त्याला वाटणाऱ्या भयानक भीतीची कबुली दिली होती. शिवाय ही याकरता नम्रतेची गोष्ट होती की मार्टिन लूथर सेनाधीश देवाच्या सत्य वचनाच्या पूर्णपणे अधीन व समर्पित होता. 

लूथरने घेतलेल्या या पवित्र्यामुळे त्याच्या काळातील अनेकांचे धैर्य पेटवले गेले आणि त्याच्या या धाडसाचा भडका पुढे कित्येक वर्षे अनेकांमध्ये भडकत राहिला.

वोर्म्स येथील राजकीय सभेनंतर आठच वर्षांनी विस्तृत प्रमाणात धर्मजागृती झाली. प्रत्येक प्रॉटेस्टंट लूथरन होता असे नसले तरी जॉन केल्विन, हल्ड्रेक झ्विंगली, जॉन नॉक्स यांच्यासारखे कित्येक लोक धर्मजागृतीत सामील झाले. राजे आणि राजपुत्रांसह त्यांचा विवेकभावही  देवाच्या वचनाचा गुलाम झाला. पोपच्या धर्माच्या जुलूमशाहीचा त्यांनी ठासून निषेध केला. जर्मनी, हंगेरी, नेदर्लंड, स्कॉटलंड, स्वित्झर्लंड, डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फिनलँड, बाल्टिक राज्ये, आइसलंड व फ्रान्स येथे धर्मसुधारित मंडळ्यांची स्थापना  झाली. इंग्लंडने या धर्मसुधारणेत व प्रॉटेस्टंट चळवळीमध्ये आपली स्वतंत्र व विशेष  अशी ओळख ठेवली. देवाच्या सामर्थ्यशाली वचनाचा प्रहार  इंग्लिश चर्च व त्यांच्याद्वारे सुवार्तावादी बिशपांवरही झाला. १५२९ मध्ये प्रॉटेस्टंट हे बिरूद अधिकृतपणे स्वीकारण्यात आले. प्रॉटेस्टंट या शब्दाचा स्वाभाविक मूळ अर्थ आता मनुष्ये निर्भयपणे कोणताही निषेध मुक्तपणे व्यक्त करू शकत होती. याचा परिणाम योग्य व अयोग्य दोन्ही  गोष्टींसाठी चळवळी होण्यात झाला. त्यानंतर झालेल्या चळवळींची धामधूम आपण पाहिली आहे. धर्मजागृती व प्रॉटेस्टंटांच्या चळवळींमुळे सुवार्तावादी चळवळीचा जन्म झाला. 

प्रमुख पंथांमधून झिरपलेला कृपेचा सिद्धांत

आपला विश्वास व त्याचे पालन यासाठी प्रारंभीचे प्रॉटेस्टंट देवाच्या वचनाला आपल्यावर  एकमेव अधिकार असल्याचे मानत होते. केवळ विश्वासाने नीतिमान ठरणे आणि सर्व विश्वासी जनांचे याजकत्व हा  त्यांचा मूलभूत विश्वास होता.  धर्मजागृतीकडे साशंकतेने पाहिले जाऊ लागल्याने इंग्लंडला व  त्यावर निष्ठा असणाऱ्यांना खूप छळाशी सामना करावा लागला. पुष्कळ लोक जिनिव्हात पळून गेले पण जे तेथेच राहिले त्यांना छळाला तोंड द्यावे लागले. तरीही कृपेच्या सिद्धांतांचा  प्रॉटेस्टंट पंथांमध्ये पाय रोवला गेला आणि इंग्लंडमध्ये पुष्कळ सुवार्तावादी मंडळ्या उदय पावल्या. धर्मजागृतीने ईश्वरविज्ञानाच्या मैदानात बराच मोठा वाटा  उचलल्याने या सुवार्तावाद्यांनी  जागतिक मिशनकार्याच्या साहसात फार मोठा वाटा उचलला. हल्लीच्या दिवसात व आधुनिक मिशनकार्य व मिशनकार्यावरील अभ्यासाच्या युगात हे सांगणे महत्त्वाचे आहे की, बायबलचे ईश्वरविज्ञान हेच कोणत्याही मिशन कार्याच्या अभ्यासाचे मूळ असायला हवे. ईश्वरविज्ञान ही राणी आहे आणि ती  सर्व विज्ञानांची राणीच राहायला हवी. 

आरंभीच्या मिशनरींनी धर्मजागृती ही परिभाषा वापरली नसेल; पण त्यांनी बायबलची सुवार्ता कोणत्याही धर्मसुधारकाइतकीच घोषित केली. उदारमतवादी ईश्वरविज्ञानाच्या प्रभावाने सुवार्तेची प्रखरता कमी केली आणि ते सुवार्तेचे स्थान उदारमतवादी ईश्वरविज्ञान व समाजकार्य यांना दिले.

ऐतिहासिक सर्वेक्षणात हे पाहून आश्चर्य वाटते की सुवार्तावाद्यांच्या आघाताने सामान्यपणे अँग्लिकन चर्च म्हणून संबोधल्या जाणाऱ्या विधिसंस्कारांचा पुरस्कार करणाऱ्या इंग्लंडमधील मंडळ्याही हादरल्या. माझ्याही ख्रिस्तीत्वाचा मूळ धागा मला धर्मजागृती/ प्रॉटेस्टंट चळवळीतील सुवार्तावादी अँग्लिकनमध्येच सापडला. 

प्रारंभीच्या विचारवंतांमधून १८ व्या शतकातील सुवार्तावादी ख्रिस्ती विचारप्रणाली  वाढीस लागली. अॅंग्लिकन मंडळी व इंग्लिश सोसायटीवर तीव्र प्रहार करणाऱ्या क्लॅफम सीअर आणि विल्बरफोर्स, चार्लस सायमन अशा अनेक सुवार्तावादी पुढारी व्यक्तींमुळे  सुवार्तावादी अॅंग्लिकन हे सुवार्तावादी चळवळीचा महत्त्वाचा भाग बनले. चार्लस सायमनने ‘द चर्च मिशनरी सोसायटी’ची स्थापना केली. त्यांनी भारतात  पुष्कळ मिशनरी पाठवले. 

सुवार्तावादींच्या या बालेकिल्ल्यातूनच वेल्स्ली बंधू उदयास आले. सुवार्तावादी अॅंग्लिकनांमध्ये आणखी भर पडली. ते कॅल्व्हिनीय शिक्षण मिळालेल्या प्युरिटन चळवळीचे आणि पुष्कळ लोक तीव्र मतभेद असणाऱ्या ब्रिटनमधील मंडळ्यांचा भाग होते. मंडळीतील व्यवस्थापनाच्या प्रश्नावर तीव्र मतभेद होऊन ते अॅंग्लिकनवाद्यांमधून फुटून निघाले व धर्मसुधारणांच्या विश्वासाशी व प्रॉटेस्टंटांच्या वेगळेपणाशी म्हणजे तारणामधील देवाचे सार्वभौमत्व आणि इतर कृपेसंबंधातील मोलवान सिद्धांतांच्या मुद्द्यांशी ते विश्वासू राहिले. संपूर्ण ऐतिहासिक कालरेषेवर अमेरिकेचे जॉनथन एडवर्डस व इंग्लंडचे जॉर्ज व्हीटफिल्ड यांची नावे महत्त्वाची आहेत.

जर्मनी, हॉलंड व फ्रान्स आणि युरोपच्या इतर भागातील भक्तिमानांची चळवळ धर्मसुधारक व सुवार्तावादी चळवळींची शाखा होती. त्यातील मोरेव्हियन व काऊंट झिन्झेन्ड्रॉफ यांचा प्रकर्षाने उल्लेख करावा लागेल. १७३६ साली मोरेव्हिअनांचा एक पुढारी ऑगस्ट गॉट्लिएब स्पॅन्जेन्बर्ग ज्या जहाजाने प्रवास करत होते. त्याच जहाजावर वेल्स्ली बंधू होते; त्यामुळे त्यांना सुवार्ता समजली व अखेर त्यांचे तारण झाले.

हा सुवार्तेचा वणवा संपूर्ण युरोपभर व आशियाच्या पलीकडेही  पसरला.
१८ फेब्रुवारी १५४६ रोजी मार्टिन लूथरचा मृत्यू झाला. पण जग पूर्वीप्रमाणेच राहणार नव्हते. १५१७ साली युरोपात जे घडले त्याचा संपूर्ण जगावर आघात झाला, त्यात आशियाचाही समावेश होता. तेव्हा जे घडले ती काही क्षुल्लक घटना नव्हती. सर्व तटबंदी मोडून काढण्याचे सामर्थ्य असलेल्या देवाच्या वचनाचा उलगडा होण्याची ती घटना होती. जगभर या आघाताचा प्रतिध्वनी उमटला. देवाच्या जगातील माझ्या कोपऱ्यावरील भूमीवर  झालेल्या आघाताचा मला नम्रपणे व आनंदाने मागोवा घेऊ द्या.

Previous Article

विश्वासी ख्रिस्ती उत्क्रांतीवादावर विश्वास ठेवू शकतात का?

Next Article

देवाने आपले मुख का बनवले

You might be interested in …

सामान्य भक्तीचे शांत सामर्थ्य

स्कॉट हबर्ड ख्रिस्ती या नात्याने आपल्याला फक्त बायबल वाचण्यातच रस नसतो. जे वाचतो ते आपल्याला भावले जावे, त्याने आपल्याला प्रेरणा द्यावी व आपल्याला बदलून टाकावे अशी आपली इच्छा असते. आपण लवकर उठून शास्त्रलेखांच्या पानावरून केवळ […]

वधस्तंभावरचा तो मनुष्य पहा

जॉन ब्लूम हात आणि पायातून खिळे ठोकून त्या लाकडी वधस्तंभावर एक मनुष्य टांगलेला आहे . मानवी इतिहासातील विस्तृतपणे ओळखली जाणारी आणि आदरणीय अशी ही प्रतिमा आहे. कोट्यावधी लोकांनी गेल्या २० शतकामध्ये तिला वंदनीय लेखले आहे. […]