फ़रवरी 5, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पवित्र शास्त्रातील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य

  लेखांक ५                          
                       
‘ सर्व पवित्र लिखाणात देवानं आपला प्राण फुंकला आहे’ (२ तीमथ्य ३:१६)

तारणाचं मूळ केंद्रस्थान कुटुंब. कुटुंबाच्या तारणाचं साधन ‘कुटुंबातली उपासना.’ उपासनेचा प्राण म्हणजे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्राचा प्राण पवित्र आत्मा. ह्या पुस्तकातून आपण पूर्व भागातील एका तरुणाचं नमुनेदार कुटुंब पाहिलं. कुटुंबातील उपासना, शास्त्र शिक्षण पाहिलं. त्या शास्त्रानं तारण कसं होतं तेही पाहिलं. तारण करण्यास पवित्र शास्त्र समर्थ आहे, असं आपण पाहिलं. पवित्र शास्त्रातलं सामर्थ्य म्हणजे काय? ते कुठून येतं? ते कसलं आहे? म्हणजे त्याचं स्वरूप कसलं आहे ? याचा आज आपण विचार करू.
त्यासाठी आजच्या प्रतिकाचा काळजीपूर्वक अभ्यास करू. म्हणजे या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळून त्यावर लख्ख प्रकाश पडेल.
पहा तर हे प्रतीक: ‘सर्व लिखाणामध्ये देवानं आपला प्राण फुंकला आहे.’

(१) ‘ सर्व पवित्र लिखाणामध्ये’– नास्तिकपणानं, बेपर्वाईनं भरलेल्या या अन्यायी जगात जे शब्द आपण फार काळजीपूर्वक जतन केले पाहिजेत, ते ‘सर्व लिखाण’… लिहिलेली प्रत्येक बाब, प्रत्येक काना, मात्रा, अक्षर, शब्द, शब्दसमूह, वाक्ये, कलम, अध्याय, संपूर्ण पवित्र शास्त्र, यामध्ये देवाच्या प्राणाची फुंकर आहे. शास्त्राचा अमका भाग तेवढा देवानं दिलेला आहे आणि इतर माणसाचा भाग आहे असा त्याचा अर्थ नाही. जुना करार असो, नवा करार असो, त्यातलं कोणतंही पुस्तक असो, त्यामधला कोणताही छोटामोठा भाग असो. त्या प्रत्येकामध्ये, ‘सर्वांमध्ये’ देवानं आपला प्राण फुंकला आहे.

(२) ‘ देवानं …फुंकला आहे’ – लिखाण माणसानंच लिहिलेलं. लिखाणाचा देह ही माणसाची कृती. पण त्या लिखाणाचा प्राण देवाचा आहे. पवित्र शास्त्रातला खरा लेखक देव आहे. लिहिण्याचं काम माणसाचं. पण प्राण घालण्याचं काम देवाचं. देवच पवित्र शास्त्राचा कर्ता आहे. म्हणूनच तो तारणाचाही कर्ता आहे.

(३) ‘फुंकला आहे.’ ह्या शास्त्रवचनापाठीमागं एक मनोमय प्रतिमा आहे. शास्त्रामधलं एक चित्र आहे. ते हे: देवानं माणसाला उत्पन्न केलं. कसं केलं? माती घेतली, त्याची आपल्या  स्वत:प्रमाणं प्रतिमा घडली. आणि तिला निर्जीव पाहून तिला प्रीतीनं जवळ घेतलं. ओठाला ओठ जुगवले. तिचं चुंबन घेतलं. असा तिच्यात प्रीतीनं प्राण घातला. अन् मग मनुष्य जिवंत प्राणी झाला. तेच चित्र इथं आहे. शास्त्र लिहिलं माणसानं. पण ते प्रेत आहे. निर्जीव कलेवर आहे. देवानं त्या कलेवराला प्रीतीनं घेतलं, आणि त्यात आपला प्राण, आपला आत्मा, पवित्र आत्मा फुंकला. अन् मग संपूर्ण शास्त्र जिवंत झालं. त्यातलं अक्षर अन् अक्षर  देवानं त्यामध्ये आपल्या फुंकरानं घातलेल्या प्राणानं … आत्म्यानं… आता जिवंत आहे. तारण करण्यासाठी समर्थ आहे.

१. देवा तुझं शास्त्र आत्माच जिवंत,
  जिवंत मी प्रेत वाचतो ते ॥
२. खेळू दे खेळू दे वारे अंगभर
 फुटो झराझर देही काटा ॥
३. वाचता वाचता पडू दे रे कानी
आत खोल मनीं तुझी वाणी ॥
४. जुगव जुगव ओठी तुझे ओठ
फुंक रे आकंठ प्राण तुझा॥
५. करी रे जिवंत सामर्थ्य संपन्न  
दिलाने प्रसन्न तारलेला ॥

Previous Article

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

Next Article

पवित्र शास्त्राचं कार्य

You might be interested in …

असहाय, गरजू असे चर्चला या लेखक : जॉन पायपर

ख्रिस्ती लोक एकत्रितपणे दर आठवडी भक्तीला जमतात ही साजेशी व सुंदर गोष्ट आहे. जेव्हा आपण असे करतो तेव्हा त्र्येक देवाच्या ज्ञानाचे जे सत्य आहे आणि येशू ख्रिस्तामध्ये देव आपल्यासाठी जो आहे त्या ठेव्यामुळे जी खोलवर […]

गव्हाणी

वनीथा रिस्नर माझ्या मैत्रिणीच्या घरी काचेची प्लेट काउंटरवर ठेवण्याची धडपड करताना माझ्या हातातून ती पडली व फुटली. माझे हात नीट चालत नाहीत त्यामुळे मला काय करता येते आणि नाही याचा अंदाज येत नाही. मला तिला […]

 धर्मजागृतीमध्ये नक्की काय घडले?

   संकलन – लीना विल्यम्स प्रोटेस्टंट धर्मजागृती हे रोमन कॅथोलिक चर्चच्या संपूर्ण ताबा ठेवणाऱ्या एकाधिकारी व दुरुपयोगी राजकारभाराविरुध्द  युरोपमध्ये दूरवर (व्यापक) पसरलेल्या ईश्वर परिज्ञानाचे (तत्त्वाचे) बंड होय. जर्मनीमध्ये मार्टिन लूथर,  स्वित्झर्लंडमध्ये अलरीच झ्विन्गली आणि फ्रान्समध्ये […]