दिसम्बर 3, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

छिन्नविछिन्न जीवनातून देव काय करू शकतो

स्कॉट हबर्ड

काही दु;खे इतकी खोल असतात आणि इतका काळ टिकतात की ती  सहन करणाऱ्यांना या जीवनात तरी सांत्वन मिळेल याबद्दल निराशा वाटू लागते. त्यांच्या दु:खाला त्यांनी कितीही मोठी चौकट टाकली तरी सर्व कडांतून अंधार पसरू लागतो.


कदाचित तुम्ही त्या संतापैकी असाल ज्यांचा वाटा दु:खाच्या भूमीत आहे. “देवाला शाप दे आणि मरून जा” (इयोब २:९ पं.र.भा.) असा  तुमच्या पत्नीचा कडू सल्ला तुम्ही घेतलेला नाही आणि देवाच्या कृपेने घेणार नाही.  तुमचा विश्वास साधासुधा नाही. तुम्हाला माहीत आहे की  देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये सार्वकालिक दयेने वागवले आहे. तुम्ही त्याला शाप देऊ शकत नाही.

तरीही इयोबासोबत तुम्ही तुमच्या जीवनाच्या पडलेल्या घराकडे पाहता जेथे कितीतरी इच्छा मरून पडलेल्या आहेत. आणि मोहरीच्या दाण्यापेक्षा विश्वास मोठा असला तरी झालेली छिन्नविछिन्नता या जगात तरी दुरुस्त होणार नाही असे तुम्हाला दिसते.

यामुळेच देव जेव्हा अशा संतांशी रोम ८ मध्ये बोलतो तेव्हा त्यांना तो इथे बारकाईने ढगामागची सोनेरी कड  पाहायला लावत नाही, त्याऐवजी तो जीवनापेक्षाही एक फार मोठी चौकट देतो.

कण्हणारी शरीरे, कण्हणारी पृथ्वी

जेव्हा आपण रोम ८ चा विचार करतो तेव्हा आपल्याला संपूर्ण अध्यायात  विजयी कर्ण्यांची मालिकाच दिसते. “दंडाज्ञा नाही,” “अब्बा बापा,” “ सर्व गोष्टी कल्याणासाठी,” “आपल्याला प्रतिकूल कोण असणार?” “विशेष विजयी.” पण जरी पौल आपल्याला ख्रिस्ती जीवनाच्या आनंदाची उंची दाखवतो तरी तो ख्रिस्ती दु:खाची खोलीसुद्धा दाखवतो. कारण  रोम ८ मधील डोंगरावरचे गौरव हे खोल आणि हताश दरीच्या कण्हण्यातून उदयास आले आहे.

आपल्याला ठाऊक आहे की सबंध सृष्टी आजपर्यंत कण्हत आहे व वेदना भोगत आहे…इतकेच केवळ नाही तर आपण  आपल्या शरीराच्या मुक्तीची वाट पाहत असता आपल्या ठायी कण्हत आहोत (रोम ८:२२-२३). ही पृथ्वी कितीही सुंदर असली तरी एखाद्या मातेप्रमाणे पाठीवर पडून नव्या जीवनाच्या रडण्यासाठी असहायतेने वेदना सोसत आहे.

आणि ख्रिस्ताचे कितीतरी  आशीर्वाद मिळालेले आपण, देवाचे लोक या जगात घरापासून दूर गेलेल्या लहान मुलांप्रमाणे आपल्या पित्याची वाट पाहत  अडखळत चालतो. आणि वाट पहाताना “ आपण …कण्हतो.”

आपण कण्हतो कारण आपण दुसऱ्या आदामाची मुले ही सहन करणार आणि पहिल्या आदामाच्या मुलांप्रमाणे मरणार …मातीला माती, राखेला राख. आपण कण्हतो कारण आपले पाय व फुप्फुसे निकामी होतात, कारण आपले डोळे अंधुक होतात , कारण अर्धांगवायू आपल्याला पंगू करतो आणि अल्झायमर आपल्या प्रिय जणांचे चेहरे पुसून टाकतो. आपण कण्हतो कारण सांप्रतच्या या  जगाची क्लेश आणि छळणूक जीवनात भयानक अनुभव देतात  (रोम ८:३५) जसे आपल्या कमजोर खांद्याना न पेलवणारे ओझे. आपण कण्हतो कारण आशा थांबली गेल्याने आपले ह्रदय अस्वस्थ होते आणि आजार कधीकधी अखेरचा वाटू लागतो (रोम ८:२४-२५). आपण कण्हतो कारण  “सांप्रत काळाची दु:खे … आपला प्रिय येशूला अंधुक करतात (रोम ८: १८). असे कण्हणे आपण सामान्य लेखू नये. काही वेळा संत इतके गोंधळलेले, तणावात, कमजोर असतात की प्रार्थना करायला तोंड उघडतात पण बाहेर शब्द पडत नाही. “कारण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही”  (रोम ८:२६ पं.र. भा.). मग आपण एका विसंगत कण्हण्यात लपेटलेले  असताना, स्तब्धतेत पुढे जीवनाच्या क्षितिजाकडे  पहातो. तथापि  “ही सत्तर – ऐंशी वर्षे आपल्या आशेची, आनंदाची करण्यापासून आपण आपल्याला जपावे. कारण पौल सांगतो, “आपल्यासाठी जो गौरव प्रकट होणार आहे त्याच्यापुढे सांप्रत काळाची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो  (रोम ८:१८). या खोल कण्हणाऱ्या जगात गौरव येत आहे.

गौरव  येणार

यामुळे आपण ज्यांना आशा नाही त्यांच्यासारखे कण्हत नाही. कारण ही जन्मभर चालणारी दु:खे ह्या प्रसूतीवेदना आहेत (रोम ८:२२), मृत्यूच्या वेदना नाहीत. “ ही सांप्रत काळची दु:खे” गौरवात संपतील, गर्तेत नाही. आणि जे गौरव येणार आहे ते इतके भव्य असेल की या जगाचे सर्व दु:ख, आपल्या शरीराचे कण्हणे आणि या भग्न पृथ्वीचे कण्हणे  दुप्पट केले तरी त्यांच्याशी त्याची तुलना होऊ शकणार नाही.

नवी शरीरे

देवाचे प्रिय मूल म्हणून तुमची ओळख ही या कमकुवत दु:खभरित जीवनाच्या शरीराखाली दडलेली आहे. इतर कोणत्याही शरीराप्रमाणे तुमचेही शरीर मोडते. तुमचे जीवन इतर जीवनांसारखेच या जगाच्या काट्यांमध्ये पडते, रक्ताळते. खरं तर जसे बघे लोकांनी येशूला “ताडन केलेले, पिडलेले, प्रहार केलेले” असे लेखले  (यशया ५३:४), तसेच तुम्हीही कापायच्या मेंढरासारखे गणलेले (रोम ८:३६) असे दिसत असाल. नैसर्गिक डोळ्यांना तुम्ही देवाने सोडून दिलेले असे दिसत असाल. कदाचित तुम्हालाही तसेच दिसत असाल.

पण हे कायमसाठी नाही. एक दिवस आता तुमचे खरे अस्तित्व, जे सध्या दडलेले आहे  (कलस्सै ३:३) ते दिसेल. त्यानंतर देवाचे पुत्र प्रकट केले जातील (रोम ८:१९). देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता होईल (रोम ८:२१)

आपले  दत्तकपण म्हणजे आपल्या शरीराची मुक्ती प्रकट होईल  (रोम ८:२३.) देवाचे मूल म्हणून तुमचा दर्जा फक्त विश्वासाच्या डोळ्यांनाच दिसणार नाही पण साध्या डोळ्यानाही. हे मरणाला सोपलेले शरीर जेव्हा तुम्ही टाकून द्याल आणि अविनाशी, समर्थ, गौरवी असे उठले जाल (१ करिंथ १५:४२,४३). तेव्हा तुम्ही खऱ्या रीतीने त्याचे मूल असे दिसाल.

अखेरीस तुम्ही पाहाल की या छिन्नविछिन्न जीवनाच्या तुकड्यांना गौरव काय करू शकते. जसा आजारी लोकांवर आपल्या प्रभू येशूचा हात;  तसे गौरव हे तुमचे भग्न, अंध , कुष्ठरोगाचे, पंगू असे शरीर उभारील आणि बऱ्या होऊ न शकणाऱ्या सर्व जागा निरोगी करील. गौरव ह्याच मलमाची तुम्हाला गरज होती पण ती इथे कधीच मिळू शकली नाही. कारण खुद्द गौरवच  तुम्हाला स्वत:च्या हाताने स्पर्श करील आणि त्याचे व्रण आपले व्रण कायमचे नष्ट करतील (प्रकटी २१:४)

नवी पृथ्वी

त्याचे व्रण आपले व्रण नष्ट करतील – पण फक्त आपलेच नाही. सृष्टी सुद्धा गौरवासाठी वाट पाहत आहे. तिची सध्याची भग्नता ही आपल्या भग्नतेचा परिणाम व आठवण आहे. सृष्टी ही व्यर्थतेच्या स्वाधीन आहे. ती नश्वरतेच्या दास्यात आहे  (रोम ८:२०-२१). पण ती मुक्ततेसाठी किती आतुर आहे. देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे (रोम ८:१९).

आपल्या बरोबरच सृष्टीही गर्तेत खाली जाईल आणि रूपांतर होऊन पुन्हा उठेल. तीसुद्धा बिजाप्रमाणे उगवून कल्पनेपलीकडे सुंदर होईल. तिची मुक्तता व गौरव आपला  प्रतिध्वनी होईल. आणि दोन्हीही ख्रिस्ताचा प्रतिध्वनी होतील (रोम ८:२१). तोपर्यंत ही सृष्टी रूपांतरासाठी कण्हत आहे. देवाच्या मुलांच्या गौरवाचे प्रतिबिंब  होण्यासाठी दु:ख भोगत आहे.

सृष्टी त्या दिवसाकडे पाहत आहे जेव्हा तिचे दगड हे सोन्याचे रस्ते बनतील. जेव्हा तिच्या झाडांना आपल्याला आरोग्य देणारी फळे येतील , जेव्हा प्रत्येक पक्षी गाणे गाईल आणि प्रत्येक फूल ख्रिस्तामधील देवाच्या प्रीतीचा सुगंध दरवळून टाकील.

गौरव हे इथे आहेच

तर गौरव हे देवाच्या राजासनाकडून एखाद्या नदीप्रमाणे या जगाकडे वेगाने येत आहे. कोकऱ्याच्या दीपाच्या प्रकाशासारखे, यहेज्केलाच्या खोऱ्यातल्या आत्म्यासारखे ते येत आहे  आपल्या सर्व दु:खांसाठी एक कबर खणण्या साठी . आणि तरीही आता या कण्हणाऱ्या युगात त्या गौरवाची हमी आपल्यामध्ये जगते आणि आपल्यामध्ये वस्ती करते.

जर ख्रिस्त तुमचा आहे तर देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो (रोम ८:९).  ज्या आत्म्याने ख्रिस्ताला उठवले व गौरवी केले त्याच आत्म्याने तुमच्या ह्रदयात घर केले आहे (८:११). त्याचे अस्तित्व हेच अभिवचन आहे की तुमच्या कण्हण्याचे गौरवात रूपांतर होईल  (रोम ८:२३,३०.). आणखी एक अभिवचन असे  की हे गौरव आताही तुमच्या कण्हण्यामध्ये प्रवेश करू शकते – जेव्हा तुम्ही आत्म्यानुसार चालता ( रोम ८:५).  तुम्हाला गौरवाच्या अमर ह्रदयाचा ठोका ऐकू येतो – जेव्हा जेव्हा तुम्ही देहाची कर्मे मारून टाकता (रोम ८:१३). तुमच्या ह्रदयाच्या वेदनांना “आब्बा” म्हणून प्रतिसाद देता किंवा मोठ्या हानीमध्ये सुद्धा तुम्ही ख्रिस्तावर प्रीती करता तेव्हा नोहाप्रमाणे येणाऱ्या गौरवाची जैतुनाची फांदी तुम्ही हातात धरता.

काही दु:खे जीवनाची सर्व चौकट व्यापून टाकतात. काही जखमा या जगात कधीच पूर्ण बऱ्या होत नाहीत. काही आशा आपल्या मागे येतात पण गर्तेत थोपवल्या जातात. पण गौरव येत आहे आणि या गौरवाचा आत्मा आताही आपल्यामध्ये कायमचा मित्र म्हणून राहतो. आणि या सांप्रतकाळाची  दु:खे कितीही उंच, विस्तीर्ण, खोल, लांब, असली तरी त्यांची  या गौरवाशी तुलनाच होऊ शकत नाही.

Previous Article

देव तुम्हाला क्षमता देईल

Next Article

उधळ्या पुत्रांच्या पालकांसाठी सात उत्तेजने

You might be interested in …

पुनरुत्थानदिन अजून येत आहे

मार्शल सीगल “जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू” ( १ करिंथ १५:४९) इतके पुनरुत्थानदिन साजरे केल्यानंतर – ज्यांनी येशूला खरेखुरे मरताना पाहिले ते काय सहन करत […]

मला क्षमा कर आणि क्षमा करण्यास मदत कर

मार्शल सीगल जर तुम्ही तुमच्या मुलांना प्रभूची प्रार्थना शिकवत असाल तर कोणती ओळ जास्त समजवून सांगण्याची गरज आहे? “हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या […]