जुलाई 30, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुम्ही दयनीय आहात का?

जॉन पायपर

चिप चा प्रश्न

 “पास्टर जॉन, ख्रिस्ती आनंदवाद असे म्हणतो की या जीवनातील आपल्या सर्वात खोल इच्छा केवळ देवच पूर्ण करू शकतो आणि केवळ त्याच्यामध्येच आपण खरोखर आनंदी राहू शकतो. जर देव आपल्याला जगाच्या मागे जाणाऱ्या लोकांपेक्षा अधिक आनंदी करतो, तर पौल असे का म्हणतो की “जर पुनरुत्थान नसेल तर आपण सर्व मानवांमध्ये सर्वात जास्त दयनीय आहोत? (१ करिंथ. १५:१९). आपले जीवन, आजही विधर्मी लोकांपेक्षा अधिक समाधानकारक नाही का?”

उत्तर

मला बायबलमध्ये मूळ असलेले असे कठीण प्रश्न आवडतात. खरं तर, मी त्यावर बोललो आहे. वर्षांपूर्वी, मी कॅमेरूनमधील विक्लिफ लोकांशी याच प्रश्नावर बोललो होतो, म्हणून मी काय म्हटले ते आठवण्याचा प्रयत्न करत होतो. १ करिंथ १५ मध्ये रुजलेला हा खरोखरच महत्त्वाचा आणि चांगला प्रश्न आहे. तर, मी चिपला – आणि आपल्यातील इतरांना – आज मी जिथे विचार करत आहे तिथे आणतो. माझ्याकडे पूर्णपणे समाधानकारक उत्तर आहे की नाही, हे मला माहीत नाही की परंतु माझ्याकडे काही उत्तरे आहेत ज्यांनी मला मदत केली आहे.

वेदनेत आनंद शोधणे

या वेदनादायक जीवनात ख्रिश्चन आनंदाबद्दल सुरुवात करण्यासाठी फक्त एक स्पष्टीकरण. ख्रिस्ती म्हणून आपल्या आनंदाचा एक मोठा भाग म्हणजे पौल रोम ५ मध्ये “आशेमध्ये [आनंद] करणे” म्हणतो. दुसऱ्या शब्दांत, आनंद हा आपण या जगात देवाला जे जाणू शकतो आणि मिळवू शकतो त्यात पूर्ण नाही. आपला आनंद भविष्यात देवाला जे जाणू आणि मिळवू शकतो या आशेत आहे.

तसेच, येथे आपला आनंद हा तेथील आनंदाच्या परिपूर्णतेचा पूर्वानुभव आहे. आणि म्हणून तो आता पूर्ण नाही. आपण काळ्या काचेतून पाहतो आणि आपल्याला अंशतः माहीत आहे, म्हणून आपला आनंद अंशतः आहे (१ करिंथ. १३:९-१२). तो आता मजबूत आहे; तो आता खोल आहे; तो आताच्या दिवसांतून  नेण्यासाठी पुरेसा आहे. पण तेथे तो जे असणार त्याच्या जवळही नाही. म्हणून, रोम. ५:२ म्हणते; “आपण ज्या कृपेमध्ये आहोत, तिच्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. ” याचा अर्थ असा की येणाऱ्या युगात आपण ज्या आनंदाची अपेक्षा करतो तो या युगात काही प्रमाणात मिळतो, परंतु पूर्णतेने नाही.

“आपण आपल्या दुःखात आनंद करतो” तो म्हणतो, “इतकेच नाही, तर संकटांचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर, धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते” (रोम. ५:३-४). म्हणून, आपण असे लोक आहोत ज्यांना आपल्याला आनंदी करण्यासाठी, अद्याप नसलेल्या गोष्टींमध्ये आनंद करण्याचा हा विचित्र भावनिक अनुभव आहे. आताचा आनंद येणाऱ्या युगाच्या आनंदाच्या जवळही नाही आणि त्यातील बराचशा भागाची  आता आपण अपेक्षा करतो.

दयनीय का?

तर, १ करिंथ १५ मध्ये समस्या निर्माण करणारे मुख्य शब्द येथे आहेत. संदर्भ असा आहे की पौल ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले गेले आहे की नाही याबद्दल बोलत आहे. तो १ करिंथ १५:१४-१७ मध्ये म्हणतो, “आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ. आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो; कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले; पण मेलेले उठवलेच जात नाहीत तर मग त्याने त्याला उठवले नाही कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही; आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्ही अजून आपल्या पापांतच आहात..” – म्हणजेच, आम्ही देवाचे खोटे साक्षीदार आहोत, देवाबद्दल खोटे बोलणारे आहोत – “कारण आम्ही देवाविषयी साक्ष दिली की त्याने ख्रिस्ताला उठवले, जर मेलेले उठवले जात नाहीत हे खरे असेल तर त्याने त्याला उठवले नाही.” आणि मग १ करिंथ १५:१७-१८: “जर ख्रिस्त उठवला गेला नाही, तर तुमचा विश्वास व्यर्थ आहे आणि तुम्ही अजूनही तुमच्या पापात आहात. आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे. ”

हे खरोखरच महत्त्वाचे आहे. याचा अर्थ होईल की “ख्रिस्ती जन नरकात गेले आहेत. जे ख्रिस्तामध्ये झोपी गेले आहेत ते नष्ट झाले आहेत. ते नरकात गेले आहेत.” “जर ख्रिस्तामध्ये आपल्याला फक्त या जीवनात आशा असेल, तर आपण सर्व लोकांपेक्षा सर्वात जास्त दयनीय कसे असू शकतो?” (१ करिंथ. १५:१९). आणि प्रश्न असा आहे की, इतरांपेक्षा जास्त आनंदी असलेले ख्रिस्ती सर्वात जास्त दयनीय कसे असू शकतात? हाच प्रश्न आहे. आणि मी विचारत आहे, पौला, तू असे का म्हटलेस? आणि पौल असे का म्हणतो याची कारणे येथे आहेत. मला वाटते की मला चार करणे येथे दिसतात.

१. भ्रम असलेले जीवन दयनीय आहे.

स्पष्टपणे, पौल असा विश्वास करतो की भ्रमाचे जीवन दयनीय आहे, जरी तो आनंदी भ्रम असला तरी. आपण या जीवनात जे अनुभवत आहोत ते दुसऱ्यामध्ये कमी-अधिक प्रमाणात आनंदी असेल असे  नाही. तर दुसऱ्यामध्ये अस्तित्वातच नाही असे सिद्ध होते. जर ख्रिस्त मेलेल्यातून उठला नाही, तर जिवंत ख्रिस्तामधील माझा आनंद  हा जिवंत ख्रिस्तामधील  आनंद नाहीच. जिवंत ख्रिस्त नाही, आणि म्हणूनच मी जिवंत ख्रिस्तामध्ये आनंद अनुभवत नाही. मी पूर्णपणे मूर्ख आहे. मी मूर्ख आहे.

पौलाचा पहिली खात्री, अशी की हे खरे नाही. ख्रिस्त उठवला गेला आहे. आणि त्याची दुसरी खात्री अशी आहे की जर तो उठला नाही तर तो एक भ्रम आहे. आणि तो एक प्रचंड भ्रम आहे – ही सर्वात दयनीय गोष्ट  आहे हे स्पष्ट आहे. तर,  पहिले कारण आहे: एक भ्रामक जीवन, पूर्ण भ्रमात जगलेले जीवन, दयनीय आहे.

२. निरर्थक दुःख दयनीय आहे.

पौलाचे जीवन दयनीय असेल कारण त्याने स्वेच्छेने इतके दुःख स्वीकारले जे तो टाळू शकला असता. त्या दुःखांना पौलाच्या ख्रिस्तातील आनंदाने टिकवून ठेवले होते. त्याच्या जीवनात दुःखांनी आनंद निर्माण केला नाही. म्हणून, जर पुनरुत्थान नसेल तर ते दुःख पूर्णपणे निरर्थक होते.

३. रिकाम्या आशा दयनीय आहेत.
येणाऱ्या युगाच्या पारितोषिकासाठी आपण येथे स्वतःला अनेक सुखांपासून वंचित ठेवतो. येशू म्हणाला, “ माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. (मत्तय ५:११-१२).

म्हणून, आम्ही सूड घेण्याचा आणि लोकांना प्रतिकार करण्याचा आनंद नाकारतो. जगात जुळवून घेण्याच्या सोयींचा आम्ही त्याग करतो. आम्ही ते नाकारतो. का? कारण आम्हाला विश्वास आहे की ते स्वर्गात आम्हाला भरपाई मिळेल . याचा अर्थ असा की आम्ही सौदा केला की स्वनाकाराचे बक्षीस पुनरुत्थानात मिळेल आणि पुनरुत्थान नाही आणि सौदा अयशस्वी झाला.

४. खोटे संदेष्टे दयनीय आहेत.

त्याने ते म्हटले याचे चौथे आणि शेवटचे कारण येथे आहे. हे त्याच्या शब्दांवरून थेट येते: “जर ख्रिस्त आणि आपण मेलेल्यातून उठवले गेलो नाही तर . . .” येथे पौल नास्तिकतेबद्दल बोलत नाही. तर तो नरकाबद्दल बोलतो – की आपण नरकात इतरांपेक्षा वाईट शिक्षा भोगू कारण आपण फक्त चूक केली नाही; आपण सक्रियपणे देवाचे चुकीचे प्रतिनिधित्व केले आहे.

बऱ्याचदा, मी या प्रकरणातील युक्तिवाद अशा प्रकारे वाचला आहे की, “बरं, जर मेलेल्यातून पुनरुत्थान झाले नाही, तर संपूर्ण बायबलचा धर्म खोटा आहे. देव नाही.. चला खाऊ, पिऊ आणि आनंद करू या.” पौल असे करत नाही. तो असा युक्तिवाद करत नव्हता. तो म्हणतो, “जर ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले नाही, तर देव मला नरकात पाठवणार आहे कारण मी सर्वांना सांगत आहे की हा त्याचा पुत्र आहे आणि तो मेलेल्यातून उठवला गेला आहे. आणि मी खोटा संदेष्टा आहे, आणि म्हणूनच मी सर्व लोकांपेक्षा सर्वात वाईट शिक्षा भोगण्यास पात्र आहे, कारण मला सर्वात वाईट शिक्षा मिळणार आहे.”

सर्वात जास्त दयनीय

तर, मी थोडक्यात सांगेन – ते येथे आहे: जर पुनरुत्थित ख्रिस्त नसेल, आणि विश्वासणाऱ्यांचे पुनरुत्थान आणि नंतर सार्वकालिक पारितोषिक आणि आनंद नसेल, तर . . .

१. ख्रिश्चन जीवन एक भ्रम आहे.

२. स्वेच्छेने दुःख सहन करणे वेदनादायकपणे निरर्थक आहे.

३. स्वर्गातील आशा व्यर्थ आहे आणि आपण त्यावर आपला सर्व आत्म-त्याग करणे हास्यास्पद आहे.

४. जिवंत ख्रिस्तासाठी बोलण्याचा कोणताही प्रयत्न हा एक भयानक घोटाळा आणि खोटी भविष्यवाणी असेल, जी  आपल्याला इतरांपेक्षा नरकाला अधिक पात्र ठरवेल. आणि त्या कठोर शिक्षेखाली आपण नष्ट होऊ.

म्हणून आपण सर्व लोकांपेक्षा सर्वात दयनीय ठरले जाऊ.

Previous Article

तुमच्या मुलांना देवावर प्रेम करणे सोपे करा

You might be interested in …

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

  एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा. अनुवाद : क्रॉसी उर्टेकर प्रकरण १४ लूक ११ […]

नव्या वर्षात पदार्पण करताना…

उच्च डोंगरावर चढ.  यशया ४०:९ प्रत्येक विश्वासी व्यक्तीला जिवंत देवाची तहान हवी आणि देवाचा डोंगर चढून त्याला तोंडोतोंड पहायची आस लागायला हवी.  डोंगराचा कडा आपल्याला साद घालत असताना फक्त दरीच्या धुक्यातच तृप्त राहण्याची गरज नाही. […]

देवाला तुमचा कमकुवतपणा हवा आहे वनिथा रीसनर

मी शूर नाहीये. नुकतेच मी कोणाला तरी शौर्य आणि धाडस यातला फरक सांगताना ऐकले. त्याने म्हटले, शौर्य म्हणजे कठीण परिस्थितीला न भीता सामना देणे; तर धाडस म्हणजे तुम्हाला भीती वाटली तरी कठीण परिस्थितीला सामना देणे. […]