नवम्बर 4, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

मिशनरी संदेश कसा जगतात?

ब्रूक्स बसर

घनदाट जंगलात मगरींची शिकार करणे हा एक धोक्याचा खेळ आहे. तुम्ही रात्री जाता, डगमगत्या कनूमध्ये (निमुळती नाव)   भाले (बंदुका नव्हे) घेऊन जाता आणि शेकडो मैलांवर कोणतेही रुग्णालय नसते. हे उत्साह आणि दहशतीचे एक जंगली मिश्रण आहे. जेव्हा मी माझी कनू वल्हवण्यात “पदवीधर” झालो तेव्हा खरंतर मी अस्वस्थ झालो, त्यामुळे मला आता येम्बीयेम्बी (लेखक कार्य करत असलेली जमात) सोबत मगरींच्या शिकारीवर जाणे क्रमप्राप्त होते.

मी कधीही कनूच्या समोर उभे राहून – हो, उभे राहून – मुख्य भाला फेकणाऱ्या शिकाऱ्याच्या क्षमतेच्या जवळही जाऊ शकणार नाही, किंवा मागून (सर्वात सुरक्षित ठिकाण) कनू चालवण्याची जबाबदारी घेण्याची क्षमता माझ्याकडे कधीच असणार नाही. पण मध्यभागी वल्हवणाऱ्या क्रूर-पथकाचा भाग होण्यासाठी मी थोडाफार उपयुक्त ठरलो होतो. त्या पहिल्या रात्री आम्हाला काहीही मिळाले नाही, परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, आम्ही कोणालाही  मिळालो नव्हतो!

आमच्या मिशनरी टीमला येम्बीयेम्बी लोकांना बायबल शिकवण्यासाठी अजून काही महिने बाकी होते आणि टीममधील तिन्ही पुरुषांना माहीत होते की जर आम्ही त्यांच्यासोबत शिकार करण्यास पुरेसे निपुण झालो तर गावातील काही लोक आमचे ऐकतील – अगदी या सर्वात धोकादायक शिकारीतही. आम्हाला ख्रिस्ताबद्दल सांगण्याची तीव्र इच्छा असल्याने आम्ही मगरींची शिकार करण्यास स्वतःला समर्पित केले.

आरामापेक्षा ख्रिस्त

जेव्हा मी आणि माझी पत्नी नीना अजूनही सॅनडीएगोमध्ये राहत होतो आणि परदेशात जाण्याचा विचार करत होतो, तेव्हा आम्ही एकोणिसाव्या शतकातील मिशनरी हडसन टेलरकडून बरेच काही शिकलो. टेलर हा एक दुर्मिळ प्राणी होता जो श्रीमंत पार्श्वभूमीतून आला होता आणि चीनला जाण्यासाठी त्याने सर्व काही सोडून दिले होते. मिशनरी सेवेचा अर्थ काय असेल याची किंमत मोजत, त्याने चिनी भाषा शिकण्यास समर्पित केले. त्याच्या मऊ गाद्यांची जागा कडक फरशीने घेतली. मूलभूत औषध कसे द्यावे हे तो शिकला – हे सर्व परदेशात जाण्यापूर्वी.

टेलर वैयक्तिक सुखसोयींना, सुवार्तेमध्ये अडथळा आणू न देण्याच्या त्याच्या निश्चयामुळे मिशनरी म्हणून उभा राहिला. त्याला जाणवले की पाश्चात्य कपडे आणि वाईट उच्चार मिशनरींना सहजच वेगळे करतात आणि विनाकारण त्यांचा अपमान केला जाऊ शकतो. म्हणून त्याने आपल्या डोक्याचा वरचा भाग मुंडला, चिनी लोकांप्रमाणे केस वाढवले ​​ आणि ते काळे रंगवले  किंवा पोनीटेल बांधले. त्याने चिनी पोशाख स्वीकारला आणि स्वतःला आणि त्याच्या मिशन एजन्सीमध्ये सामील झालेल्यांना कठोर भाषा प्रशिक्षणासाठी समर्पित केले. परिणामी, पन्नास वर्षांहून अधिक काळ “चायना इनलँड मिशन”  संस्कृती आणि भाषा आपलीशी करण्याचे एक सुवर्ण प्रमाण बनले. या क्षेत्रातील त्याच्या नेतृत्वामुळे चिनी आणि हजारो लोकांना पहिल्यांदाच ख्रिस्ताबद्दल ऐकण्याची संधी मिळाली.

तथापि, टेलरने हे सर्व स्वतःहून शोधले नाही. तो बायबलमधील संदेशकांचे अनुकरण करत होता.

गुरुसारखे मिशनरी

आपला प्रभू आपल्यापैकी एक झाला. त्याने आमचे अन्न खाल्ले आणि आमचे पेय प्याला (लूक ७:३४),त्याला स्थानिक हवामानाचे नमुने माहीत होते (मत्तय १६:२-३), आमच्या वाटेवर चालला (योहान ७:१), आणि सर्व प्रकारे आमच्यासारखे जगला – तरीही पाप न करता (इब्री ४:१५). आपल्या प्रभूने ज्याला परराष्ट्रीयांसाठी मिशनरी म्हणून पाठवले होते, तो पौल म्हणतो ” मी सर्वांना सर्वकाही झालो आहे, अशा हेतूने की, मी सर्व प्रकारे कित्येकांचे तारण साधावे” (१ करिंथ. ९:२२).

आपला तारणहार, तसेच मंडळीच्या इतिहासातील सर्वात महान मिशनरी – पौल, त्यांना पाठवलेल्या लोकांशी इतके समरूप का झाले की त्यांनी सुवार्ता अधिक सुलभ करण्यासाठी विशेषाधिकार, पार्श्वभूमी आणि त्यांचे अधिकार देखील बाजूला ठेवले? सर्व लोकांसाठी सर्व काही बनणे म्हणजे लोकांचे उगाच मन दुखावणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा (कपडे, आराम, अन्न, पसंतीची भाषा, राहणीमान) त्याग करणे. जर लोक अडखळले तर ते स्पष्ट सुवार्तेच्या संदेशावरून असू द्या, संदेश देणाऱ्यामुळे नाही.

या विषयावर विविध मते आहेत आणि मिशनरी दोन्ही बाजूंनी चुका करू शकतात. काही चांगला हेतू असलेले मिशनरी संदेश अधिक मान्य बनवण्यासाठी सुवार्तेचा पाप दाखवणारा संदेश सौम्य करू शकतात. इतर त्यांची पार्श्वभूमी इतकी टिकवून ठेवू शकतात की त्यांच्या संदेशात सुवार्तेच्या वासापेक्षा अमेरिकेचा वास येईल. मी क्षेत्रावर असे मिशनरी पाहिले आहेत जे शिकारी- संकलक लोकांमध्ये राहून शिकार करायला शिकत नव्हते, जे त्यांच्या सभोवतालच्या लोकांकडे नसलेल्या कीटकनाशकाचा स्प्रे फवारल्याशिवाय घराबाहेर पडू शकत नव्हते, किंवा जे त्यांच्या देशाच्या संस्कृतीत अस्वच्छ मानले जाणारे अन्न खात नव्हते.

कायदेशीर आरोग्य समस्यांसाठी कधीकधी असे निर्णय घ्यावे लागतात, परंतु मला अशा मिशनऱ्यांची काळजी वाटते ज्यांना त्यांच्या लोकांचे लक्ष वेधण्यापेक्षा त्यांचे पाय, त्वचा आणि पोट यांची जास्त काळजी वाटते. जर मेंढपाळांना त्यांच्या मेंढ्यांसारखा वास यायला हवा, तर मिशनऱ्यांना त्यांच्या लोकांसारखा वास यायला हवा – लाक्षणिक आणि शब्दशः! हो, जंगली प्राणी तुमचा पाठलाग करू शकतो; हो, तुम्हाला डेंग्यू ताप येऊ शकतो; हो, तुम्हाला पोटाचे आजार होऊ शकतात. पण हे किती गौरवास्पद असेल की, एका दिवशी तुम्ही राजासमोर उभे असाल आणि त्याला असे म्हणताना ऐकाल;  “तुम्ही तुमची त्वचा, तुमचे पोट, तुमच्याकडे असलेले सर्व काही दिले जेणेकरून हे लोक मला ओळखतील.” केवढा सन्मान असेल तो!

जीवनाचा सुगंध

जेव्हा आम्ही येम्बीयेम्बी लोकांना शुभवार्ता सांगितली, तेव्हा गावात एक गंभीर फूट पडली. सुवार्तेमुळे. असे ते अनेकदा घडते. गाव जवळजवळ अर्ध्यात दुभागले. काहींनी “पूल असलेला पुरुष” जो ख्रिस्त त्याच्या संदेशावर विश्वास ठेवला; तर काहींनी “पूर्वजांचे मार्ग” निवडले. पण कोणत्याही येम्बीयेम्बीने आमचे त्यांच्यावर प्रेम असल्याचे नाकारले नाही. मलेरियाने ग्रस्त असताना, पुन्हा पुन्हा उलट्या होत असताना, आमच्याकडे काहीही त्राण राहिले नव्हते तेव्हा त्यांनी आमच्या लहान घराबाहेर उभे  राहून हे  ऐकले होते. त्यांनी पाहिले होते की त्यांना नेहमी होणाऱ्या फोडांचा त्रास नीनालाही होत होता.

काही गोष्टी चांगल्या प्रकारे सांगता येत नाहीत; जोपर्यंत तुम्ही तेच अन्न खात नाही, त्याच घरात झोपत नाही आणि देवाने तुम्हाला ज्या लोकांमध्ये ठेवले आहे त्यांच्या वाटेवर चालत नाही. तुम्ही लोकांना सांगू शकता की तुम्ही त्यांच्यावर प्रेम करता आणि त्यांच्यासाठी एक अविश्वसनीय संदेश आहे. परंतु प्रामाणिकपणाचा शिक्का म्हणजे तुम्ही सर्वकाही सोडायला तयार आहात का?

विश्वासणारे कधीही माघारी जाणार नाहीत. आम्ही शिक्षण देत असताना, शिष्यत्व शिकवत असताना, बाप्तिस्मा देत असताना आणि शास्त्रवचनांचे भाषांतर करत असताना पुढील आठ वर्षांत चर्च वाढले आणि परिपक्व झाले. अखेर भाषांतर पूर्ण केल्यानंतर, आम्ही वडील आणि डीकन यांच्या हातात चर्च सोपवले. नऊ वर्षांनंतर, परतीच्या प्रवासात, आम्ही आनंदाने भारावून गेलो होतो. आमच्या पाठी कदाचित पूर्वीसारख्या तरुण नसतील आणि कासवाच्या थंड सूपाने त्याची चमक कधीच गमावली होती. परंतु चर्च अजूनही विश्वासू असल्याचे पाहणे, प्रशिक्षणाबाबत वडिलांशी बोलणे, तरुणांना सत्य शिकवले जात आहे हे ऐकणे आणि दोन हजार वर्षांपासून ख्रिस्ती लोकांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या सुवार्तेच्या पुनरुथानाच्या उत्सवासाठी एकत्र येणे किती मोठा आनंद असतो.

Previous Article

माझे संघर्ष वैयक्तिक आहेत की सैतानाकडून

You might be interested in …

जे केवळ दु:खच बोलू शकते वनिथा रिस्नर

दु:खाइतके दुसरे काहीही आपले लक्ष वेधून घेऊ शकत नाही. वेदनेकडे दुर्लक्ष करणे कठीण असते – फक्त ते सहन करणाऱ्यांसाठी नाही तर ते पाहणाऱ्यांसाठी सुद्धा. आपले डोळे आणि ह्रदय आपोआपच दु:खासाठी स्वत:ला बंद करून घेतात. ख्रिस्ती […]

सर्वोच्च त्याच्या गुडघ्यावर

ग्रेग मोर्स सेवेची मानसिकता “तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे, व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला, व त्याने आपली बाह्यवस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कंबरेस […]

आपला देव ऐकतो

डेव्हिड मथीस जो सर्वसमर्थ, विश्वाचा देव त्याच्याशी बोलण्याचे आपल्याला आमंत्रण आहे. तो केवळ महान समर्थ नव्हे तर सर्वसमर्थ आहे. सर्व सामर्थ्य त्याचे आहे आणि त्याच्या नियंत्रणाखाली आहे. आणि त्यानेच तुम्हाला निर्माण केले आहे व तुमचे […]