दिसम्बर 16, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

जेव्हा आत्मा सावलीत असतो

स्कॉट हबर्ड

गहन आध्यात्मिक अंधाराच्या काळात, देवामधील आनंद आपल्याला एकदा पडलेल्या एका सुंदर स्वप्नासारखा वाटू शकतो. आपण कितीही प्रयत्न केला तरी आपण ती भावना परत मिळवू शकत नाही. गाणे निसटले. प्रकाश कमी झाला. सर्वोत्तम दिवस स्वप्नासारखे राहिले .

आध्यात्मिक अंधार अनेक वेगवेगळ्या छटांमध्ये येतो: दुःख. शंका. दोषी भावना. हानी. कधीकधी आपल्याला तो नेमका कुठून येतो हे माहीत असते. इतर वेळी आपल्याला फारशी कल्पना नसते. मला काही वर्षांपूर्वीचा ऑगस्टचा दिवस आठवतो. आकाशातून स्वच्छ सूर्यप्रकाश खाली पडत असताना, मला माहीत नाही की कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय, अंधार कुठून आला. मला फक्त माहीत होते की तो अंधार आहे.

स्तोत्र ४२ आणि ४३ च्या गायकाला त्या भावनेबद्दल काहीतरी माहिती होती. तो त्याच्या आत्म्याच्या अंधाराची काही कारणे दाखवू शकत होता, परंतु तरीही तो त्याचे प्रश्न हलवू शकत नव्हता. दहा वेळा तो रात्रीत ‘का’ हा शब्द पाठवत होता. त्याचा आत्मा का दुःखी होतो? त्याच्या भावना वाऱ्यातील लहरीसारख्या का उडतात? तो एकटा का हेलकावे खात आहे? आणि जेव्हा त्याचे शत्रू त्याच्याकडे त्यांचा प्रश्न घेऊन येतात – “तुझा देव कुठे आहे?” – तेव्हा तो त्याच्या पूर्वीच्या “आनंदाच्या जयघोषाने” उत्तर देऊ शकत नाही (स्तोत्र ४२:३-४). ते आनंद आता आठवणीसारखे आहेत.

जरी ते काळोखे असले तरी स्तोत्र ४२ आणि ४३ नुसार ते हरवलेल्या आनंदाच्या कथेपेक्षा जास्त सांगतात. ते एका माणसाची कहाणी सांगतात जो अजूनही देवाला “माझा परम आनंद” म्हणून संबोधतो, अगदी त्याच्या स्वतःच्या अति दुःखातही (स्तोत्र ४३:४-५). म्हणूनच, ते अशा आनंदाची कहाणी सांगतात; जो अंधाराच्या विरोधात जगतो आणि लढतो.

जर आपण काळजीपूर्वक ऐकले तर, प्रकाशाची वाट पाहत असताना, त्या प्रकारचा आनंद कसा बोलतो हे आपल्याला ऐकू येईल.

मला आठवते’

आत्म्याच्या अंधारात असलेल्यांना स्मृती शत्रूसारखी वाटू शकते. कदाचित स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्याला आठवत असेल की, आपण एकदा “आनंदाच्या जयघोषाने आणि स्तुतीच्या गाण्यांसह देवाच्या घरी” कसे गेलो होतो (स्तोत्र ४२:४). एकदा – पण आता नाही. आता आपण रडतो (वचन ३). आता आपण विसरून गेलो आहोत असे वाटते (वचन ९). आता प्रत्येक दिवस एक नवीन लाट घेऊन येतो ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते (वचन ७). आणि कालचा आनंद आपल्याला फक्त आपण किती गमावले आहे याची आठवण करून देतो.

फक्त? नाही, ते बरोबर नाही. स्तोत्रकर्त्यासाठी, स्मृती ही शत्रूपेक्षा जास्त आहे. तो त्याच्या पूर्वीच्या आनंदाची आठवण करून देतो तेव्हा त्याला हानी जाणवते.  हो, पण तळमळ देखील:

“हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहांसाठी लुलपते तसा हे देवा, माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तान्हेला झाला आहे; मी केव्हा देवासमोर येऊन त्याचे दर्शन घेईन?”

हे अशा माणसाचे शब्द नाहीत जो आठवण करतो आणि निराश होतो. हे अशा माणसाचे शब्द आहेत जो आठवण करतो आणि आशा करतो. त्याला माहीत आहे की तो आनंद पुन्हा त्याचा आनंद बनू शकतो. त्याहूनही अधिक, हे अशा माणसाचे शब्द आहेत जो कुठेतरी, खोलवर, अजूनही देवाला आपला आनंद म्हणून ओळखतो. नाहीतर तो देवासाठी आणि फक्त देवासाठीच तहानलेला, मागणारा आणि वेदना सहन करणारा का असेल? जॉन पायपर लिहितात,

“एक ख्रिस्ती, त्याच्या दुःखाचा काळ कितीही गडद असला तरी, तो कधीही देवामधील आनंदाशिवाय राहत नाही. माझा अर्थ असा आहे की त्याच्या हृदयात आनंदाचे बीज राहते, कदाचित, फक्त चांगुलपणाची आठवण असलेली चव आणि चांगुलपणा जाऊ देण्याची इच्छा नसणे.”

चांगले दिवस आठवत असताना जर तुमच्यातील कोणताही भाग देवासाठी कण्हत असेल तर ते लहानसे बीज जाऊ देऊ नका. आठवणीला उत्कंठेची सेवा करू द्या आणि उत्कंठेला आशा निर्माण करू द्या की फक्त भूतकाळच नाही, तर भविष्याला तुमच्या आनंदाचे ओरडणे ऐकू येईल.

‘मी जाहीर करतो’

अंधारात अडकलेले विश्वासणारे स्तोत्रकर्त्याचा दुःखद प्रश्न सहजपणे पुन्हा पुन्हा विचारू शकतात:

“हे माझ्या जिवा, तू का खिन्न झालास? तू आतल्या आत का तळमळत आहेस? देवाची आशा धर; तो मला दर्शन देऊन माझा उद्धार करतो, म्हणून मी त्याचे पुनरपि गुणगान गाईन.”

कदाचित तुम्हाला पुढे दुःखाशिवाय काहीही दिसत नसेल. कदाचित आजचा अंधार तुमच्या सर्व उद्यावर सावली टाकत असेल. तर तुम्ही कसे घोषित करू शकता, “मी पुन्हा त्याची स्तुती करेन”? केवळ जेव्हा तुम्ही “मी” वर कमी आणि “त्याच्यावर” जास्त लक्ष केंद्रित करता.

स्तोत्रकर्ता देवाबद्दल कसा बोलतो ते ऐका, जरी त्याचा आत्मा इतका निराश झाला असला तरी. तो ज्याला प्रार्थना करतो तो फक्त “देव” नाही तर “जिवंत देव,” “माझा देव,” “माझ्या जीवनाचा देव,” आणि “माझा खडक” आहे (स्तोत्र ४२:२, ५-६, ८-९). तो कदाचित दूरचा वाटेल, पण हा देव अजूनही “माझा देव” आहे.

 ख्रिस्तामध्ये तुमच्यासाठी तो  तसाच आहे का? जर असेल, तर त्याच्या कराराची वचने तुम्हाला जाणवत नसली आणि त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास संघर्ष करत असला तरीही ती तुमच्यावर विसावलेली आहेत. तो अजूनही “त्याच्या अढळ प्रीतीला आज्ञा देतो” की ती तुम्हाला धरून ठेवेल, तुम्हाला राखेल आणि तुम्हाला त्याच्या चांगल्या काळात, भरपूर स्तुतीच्या दिवसांत घेऊन जाईल (वचन ८). कारण त्याने येशूमध्ये म्हटले आहे, “मी तुझ्यावर प्रेम करीन,” तुम्ही अंधारात म्हणू शकता, “मी पुन्हा तुझी स्तुती करेन.”

अर्थात, काही अंधार आपल्याला इतका उजाड करतो की आपल्याला समजत नाही की आपण देवाला “माझा देव” म्हणू शकतो का. आपण विचार करू की  तो माझा आहे का? की हा अंधार मी त्याला ओळखत नाही याचा पुरावा आहे? शंका घेणाऱ्यांनो, येशू ख्रिस्त  आणि त्याचे अभिवचन तुमच्यासमोर ठेवा. हो. तुमच्या पापाशी लढा आणि तुमच्या अविश्वासाशी लढा. पण तुमच्या अंधारलेल्या आत्म्यात राहू नका. त्याच्या दयेचा विचार करा. त्याच्या गुणांचा विचार करा. आणि कालांतराने, आत्मा तुम्हाला “देवा” पासून “माझ्या देवाकडे” आणि “मी पुन्हा त्याची स्तुती करू शकतो” पासून “मी करेन” पर्यंत घेऊन जाईल.

‘मी आव्हान देतो’

“मी आठवण करतो” हे आपल्याला आपल्या मागे असणारा आनंद दाखवते; “मी जाहीर करतो” आपल्यासमोरील आनंदाला धरून ठेवतो. पण आजचे काय? आता काय? अंधकारमय आनंद आज दुपारबद्दल कसा बोलतो? एका शब्दात, “‘मी आव्हान देतो.”

अंधार किती हट्टी असू शकतो हे मी जाणतो म्हणून, स्तोत्रकर्त्याने आपल्या निराश झालेल्या आत्म्याला या दोन स्तोत्रांमध्ये तीन वेळा देवावर आशा ठेवण्यास सांगितले, या सत्यापासून मी धैर्य घेतो (स्तोत्र ४२:५, ११; ४३:५). रात्रीच्या वेळेप्रमाणे आत्म्याचा अंधार सहसा हळूहळू नाहीसा होतो. पहाट टप्प्याटप्प्याने येते. आणि ते असेच करते कारण कमकुवत, अडचणीत सापडलेले, मोहात पडलेले, दुःखी विश्वासणारे यांच्या निराशेला आव्हान देण्याचे धाडस करतात.  मार्टिन लॉईड-जोन्सने एकदा या उताऱ्यावर उपदेश केला होता, “स्वतःला आव्हान द्या, आणि इतर लोकांना आव्हान द्या, आणि सैतानाला आणि संपूर्ण जगाला आव्हान द्या आणि या माणसासोबत म्हणा: ‘मी अजून त्याची स्तुती करेन'”

पण आपण किती काळ आव्हान द्यावे? आपल्याला माहीत नाही. देव त्याच्या मुलांशी वैयक्तिकरित्या व्यवहार करतो, एका महिन्यानंतर एका, एका वर्षानंतर दुसऱ्या, एका दशकानंतर दुसऱ्या किंवा त्याहून अधिक काळाच्या अंधाराला दूर करतो. परंतु येशूच्या नावाने, आपल्याला हे माहीत आहे: अंधाराला वश होण्यापेक्षा आयुष्यभर अंधाराला आव्हान देणे चांगले आहे. कारण जे आव्हान देतात आणि आव्हान देत राहतात त्यांना  जे हवे ते सापडेल. आणि ज्याची त्यांना इच्छा आहे तो कधीही निराश करणार नाही.

प्रिय संता, एक दिवस, देव त्याचा प्रकाश आणि त्याचे सत्य पाठवेल आणि ते तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातील जिथे स्तुती हा तुमचा खोल आणि दैनंदिन भाग असेल. कारण देव तुमचा खोल आणि दैनंदिन आनंद असेल – तुमचा “परमानंद” (स्तोत्र ४३:३-४). तुमचे अश्रूंचे गाण्यांमध्ये आणि तुमच्या रात्रीचे दिवस उजाडण्यात रूपांतर होईल. आणि स्वप्नासारखा अशक्य वाटणारा आनंद पुन्हा तुमचा होईल.

Previous Article

मिशनरी संदेश कसा जगतात?

Next Article

कोणत्याही हाताने मेंढरांना चारा

You might be interested in …

ख्रिश्चन फ्रेड्रिक श्वार्टझ्

( १७२६-१७९८) लेखांक  १२                            पुढील घटनेचा भारताशी संबंध असल्याने ती येथे नमूद करणे आवश्यक वाटते. प्रशियातील सोनमर्ग गावी १७२६च्या ॲाक्टोबर अखेरीस शेवटच्या घटका मोजत असलेल्या एका तरुणीने आपल्या पतीला व पाळकाला बोलावले. आपले बाळ त्यांच्या […]

धडा २.  १ योहान १:२-३ जिवंत सहभागिता – स्टीफन विल्यम्स

  शुभवर्तमानाचा उद्देश काय आहे? ▫         तारण, क्षमा, सार्वकालिक जीवन, देवाचे गौरव ▫         सहसा हीच उद्दिष्टे नजरेसमोर येतात आणि तीच सत्य व परस्पर संबंधित आहेत. पण योहानाच्या  मनात या शुभवर्तमानाची            […]