दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा ९.    १ योहान २:१२-१७ स्टीफन विल्यम्स

 

फरक तिसरा – देव आणि जग
•           या जगात आपण उपयोगी पडावे अशी ज्या व्यक्तीची इच्छा असते ती व्यक्ती आपण प्रौढता धारण करावी अशी इच्छा करते. मग
प्रौढता म्हणजे तरी काय ? 
       सामान्यत: जे गांभीर्याने काही घेत नाहीत त्यांना अपरिपक्व म्हटले जाते. याचा अर्थ जी व्यक्ती  गंभीर असते, ती नेहमीच हसण्यावारी
काही नेत नाही, आणि नेहमीच मजा करण्याची वृत्ती नसते.
▫       या व्यक्तीला जीवनाचा अनुभव असतो – जी जीवनाच्या बाबींकडे सुज्ञतेने व आंतरदृष्टीने पाहून मार्ग दाखवू शकते. 
▫        ह्या गोष्टी खरोखर वास्तव आहेत आणि त्या प्रौढ व्यक्तीमध्ये दिसतात. तरीही देवाचे वचन प्रौढतेचा गाभा थोड्या वेगळ्या प्रकारे सादर
करते – प्रौढत्वाची व्याख्या तुम्ही काय करता यावरून केली जात नाही (हा फक्त प्रौढतेचा परिणाम आहे ती व्यक्ती तुमच्या ओळखीची
असेलच असे नाही) 
•         
ख्रिस्ती जीवनातील तिसरा फरक दाखवण्यास योहान सुरुवात करत आहे. त्यापूर्वी तो सांगत आहे की ज्याला प्रौढ होण्याची इच्छा आहे
त्याने जगाविषयी देवकेंद्रित दृष्टिकोन धारण करायला हवा. आणि ख्रिस्ती व्यक्तीने  अशा मानसिकतेचा दावा केला तर त्याच वेळी ते
जगावरही प्रीती करू शकत नाहीत.

शास्त्राभ्यास

देव-केंद्रित असणे हेच ख्रिस्ती जीवन होय

मुलांनो, मी तुम्हांला हे लिहितो, कारण त्याच्या नामामुळे तुमच्या पापांची तुम्हांस क्षमा झाली आहे.  मुलांनो, मी तुम्हांला हे लिहिले आहे कारण तुम्ही पित्याला ओळखता (वचन १२, १३ब)

  • लक्षात घ्या की हे पत्र लिहिण्याचा योहानाचा उद्देश आहे की ख्रिस्ती जनांना सार्वकालिक जीवनाची खात्री द्यावी (५:१३). याआधी आपण आज्ञापालन व आज्ञा मोडणे, आणि प्रीती व द्वेष हे दोन फरक पहिले. आता  योहान देवकेंद्रित असणे व जगकेंद्रित असणे यामधील तिसरा फरक दाखवत आहे.
    ▫         दररोज कोणते विचार तुमचे मन व्यापून टाकतात?
    ▫         यावरून तुम्हाला ओळखता येते की तुम्ही शिष्य आहात की अविश्वासी व्यक्तीप्रमाणे जीवन जगत आहात.
    •           वचन १२-१४ मध्ये ज्या विश्वासी जनांशी योहान बोलत आहे त्यांना उत्तेजन देण्यासाठी तो काव्यात्मक भाषा  वापरत आहे. या
    कळपाला अपराधी भावनेने न भरता उत्तेजन देणे हा त्याचा उद्देश आहे. या गटांचे वर्णन तो मुलांनो, तरुणांनो, बापांनो अशा तीन
    संबोधनांनी करतो.

▫         या पत्रात तो “मुलांनो” हा सर्वसामान्य शब्द पुष्कळदा आध्यात्मिक पित्याप्रमाणे या संपूर्ण गटाला  उद्देशून (२:१,१८,२८) वापरतो. वचन
१२ मध्ये तो केवळ “आत्मिक मुलांना” नव्हे तर संपूर्ण या गटाला उद्देशून लिहीत आहे.
▫         वचन १२ व १३ मध्ये तो मुलांशी बोलताना खऱ्या विश्वासी जनांना उद्देशून बोलत आहे. ते “देवाच्या पुत्राच्या नामावर विश्वास ठेवतात”
(वचन १३).
▫         या लोकांविषयीचे सत्य काय आहे? तर त्यांनी देवाला ओळखल्यामुळे त्यांच्या पापांची क्षमा झाली आहे.
•           ज्या गटाला तो प्रेमाने “मुलांनो” म्हणून संबोधतो; त्यांचे पुढे योहान दोन गटात विभाजन करतो. “बाप” व     “तरुण. ”

परिपक्व बाप

१३ बापांनो, मी तुम्हास लिहितो कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता. १४ बापांनो, मी तुम्हास लिहिले आहे कारण जो प्रारंभापासून आहे त्याला तुम्ही ओळखता.

  • या समूहात असलेल्या विश्वासीयांना “बाप” म्हटले आहे . ते या समूहाचे आधारस्तंभ आहेत. ते अनेक वर्षे या विश्वासात आहेत. ते आध्यात्मिक प्रौढ आहेत .
    •           योहान त्यांचे वर्णन कसे करतो? त्यांच्या विचारसरणीवरून, ज्ञानावरून किंवा अनुभवावरून नव्हे. त्यांच्या व्यवस्थापन
    कौशल्यावरूनही नव्हे. त्यांच्या ईश्वरविज्ञानाच्या मूलभूत ज्ञानावरूनही नव्हे.
    •           जो प्रारंभापासून आहे त्याला ते “ओळखतात” (स्तोत्र ९०: १,२).
    ▫        हे ख्रिस्तासंदर्भात, १:१ प्रमाणे असेल. पण त्याहूनही विशेष म्हणजे हे सनातन देवाविषयी असणार.
    ▫        योहान म्हणत आहे की खरे प्रौढत्व हे देवाशी खोल व समजदार नातेसंबंधांमध्ये रुजलेले असते.                                                              सार्वकालिकतेच्या जाणीवेने व या युगाशी असलेल्या दुर्बल संबंधातून देवाला ओळखण्याचा हा जुना विश्वासाचा मार्ग आहे.
    तुमच्या  मंडळीतील जुनी मंडळी अशी वागताना तुम्ही पाहात असाल. ते मंडळीच्या कार्यकर्त्यांचे नेतृत्व करत नसतील, पण ते
    परिपक्व असतात – नितांत ख्रिस्तकेंद्रित असतात.

बलवान तरुण लोक

१३ तरुणांनो, मी तुम्हास लिहितो कारण तुम्ही जगाला जिंकले आहे. १४. तरुणांनो, मी तुम्हास लिहिले आहे, कारण तुम्ही बलवान आहा. तुमच्या ठायी देवाचे वचन राहते आणि त्या दुष्टाला तुम्ही जिंकले आहे.

  • त्या परिपक्वतेच्या जुन्या – स्थिर खडकाकडे जाण्याचा मार्ग मोठ्या पल्ल्याचा असून अनेकांनी तुडवलेला आहे. आणि त्या तरुणांविषयी बोलताना योहान हे दाखवून देतो.
    •           त्यांनी “दुष्टाला जिंकले आहे.” पापांची क्षमा सध्या असलेल्या पापाच्या सामर्थ्यापासून मुक्ती प्राप्त करण्याकडे नेते. नीतिमान
    ठरले गेल्यानंतर पवित्रीकरण होत राहिलेच पाहिजे. कारण “तुम्हामध्ये जो आहे तो मोठा   आहे.”   (४:४)
    •           पण तरुणाचे बळ काय आहे? केवळ ताकद आणि शिस्त एवढेच नव्हे तर “देवाचे वचन तुम्हामध्ये राहते.” पुन्हा मुद्दा आहे
    देवकेंद्रित जीवन.
    ▫       दुसऱ्या शब्दात सांगायचे तर भक्कम जुन्या प्रौढतेच्या खडकाकडे जाण्याचा मार्ग फार लवकर सुरू होतो.
    ▫       या जगातील बलवान ख्रिस्ती तरुण पापाशी फलंदाजी करताना देवाच्या वचनाचे ज्ञान प्राप्त  करून सामर्थ्य मिळवतो.
    कालांतराने तो पितृत्व धारण करतो. सार्वकालिक देवाशी त्याचे खोलवरचे नातेसंबंध जडतात.
    •           या मार्गक्रमणाच्या जीवनाचे मूळ देवकेंद्रित असण्यात आहे.

जगकेंद्रित जीवन ख्रिस्ती जीवनाला ठार करते

देवकेंद्रित लोक जगावर प्रीती करत नाहीत

जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठायी पित्याची प्रीती नाही (वचन१५).

  • आज्ञा स्पष्टच आहे की, “जगावर प्रीती करू नका.” योहान “जग” हा शब्द भौगोलिक अर्थाने वापरत नाही. तर देवाने निर्मिलेले जे मानवप्राणी देवाविरुद्ध उभे राहिले आहेत, त्यांच्याविषयी बोलत आहे – जो मानवी      समाज,   नैतिकदृष्ट्या बेशिस्त व बिघडलेला आहे, पापाच्या सामर्थ्याखाली आहे.
    •           जगावर प्रीती करू नका अशी आज्ञा आपल्याला का दिली आहे? (१५). देव तर जगावर प्रीती करतो (योहान ३:१६).
    ▫        तो मुक्तीच्या योग्य हेतूने प्रीती करतो. आपण जगात सहभागी होण्यासाठी प्रीती करतो.
    ▫       तो पाप्यांचे तारण करण्यासाठी प्रीती करतो. आपण पाप्याच्या पापात सहभागी होण्यासाठी प्रीती करतो.
    •           निदान स्पष्ट आहे  – ख्रिस्ती लोकांनी देवावर व बंधुजनांवर प्रीती करायची आहे (२:१०). पण ही प्रीती  जगाच्या प्रीतीने प्रौढ होऊ
    शकत नाही. जगाची प्रीती देवकेंद्रित असणे बिघडून टाकते (मत्तय ६:२४).

जगावर प्रीती करणे म्हणजे क्षणभंगुर भ्रष्टतेवर प्रीती करणे

कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्याची वासना व संसाराची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीतशी होत आहेत; पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्वकाळ राहतो (१ योहान १६,१७).

  • जग कशाचे बनले आहे? संस्कृतीच्या व्याख्येखाली येणारी दुष्कृत्ये नव्हे. (लैंगिकता, धन, करमणूक इ.) योहान या विषयाच्या अंतर्यामाच्या गाभ्यात शिरत आहे. जग त्याच्या वासनांनी भरलेले आहे. (प्रखर इच्छा)
    ▫   वचन १६ – देहाची वासना – यात फक्त लैंगिक वासना येत नाहीत तर देवकेंद्रित नसणाऱ्या सर्व वासनांचा त्यात अंतर्भाव होतो.
    तुमच्या जीवनातील अशा काही वासनांची नावे तुम्ही सांगू शकाल का?
    ▫   वचन १६ – डोळ्यांची वासना – आपल्या बाहेरील गोष्टींचे मोह ज्यांचा आपल्या आत पगडा असतो, चांगल्या गोष्टींसाठीही तीव्र इच्छा
    असेल पण ती स्वार्थी हेतूंसाठी असेल. याचे काही उदाहरण ?
    ▫   संसाराची फुशारकी – बढाई, अभिमान – तुमचे जे आहे त्यावरून एवढेच नव्हे तर तुमच्या धार्मिकतेवरूनही तुमची उच्च गणले
    जाण्याची इच्छा. पटकन आपल्या चुका मान्य करायची तयारी नसते. सतत आपली पाठ थोपटली जावी असेच वाटणे.
    •       निदान काय? वचन १६ – या इच्छाच देवापासून नाहीत. त्यांचा शेवट सार्वकालिक जीवनात नाही. तुम्हाला आपली गुंतवणूक कोठे
    व्हावी असे वाटते? देवकेंद्रित प्रौढत्वात की जगकेंद्रित भ्रष्टाचारात?

चर्चेसाठी प्रश्न

  • जग मंडळीतही असू शकते का?
    आपल्या जीवनाची तपासणी करा. तुम्ही देवाला समर्पित असण्यापेक्षा कामातच व्यस्त आहात का?
    ▫   तुमच्या करमणुकीत व्यग्र आहात का? ती तुमच्याकडून देवाचा वेळ हिसकावून घेते का?
    ▫   तुम्ही आपल्या धनाकडे कसे पाहता? देवाच्या राज्यापेक्षा स्वत:वरच तुम्ही अधिक पैसे खर्च करता का?
    ▫   आपले करियर, संसार, यशप्राप्ती याबद्दल विचार करा. तुम्ही स्वत:मध्ये की देवामध्ये गुंतलेले आहात?

 

 

 

Previous Article

सेवक असलेल्या नेत्याची पाच चिन्हे  लेखक: जॉन ब्लूम

Next Article

तुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का? लेखक : मार्शल सैगल

You might be interested in …

तुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत काय?                                             लेखक : जॉन ब्लूम

  तुम्हाला कृपादाने देण्यात आली आहेत. ती कोणती आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे का? ती किती अमोल आहेत ह्याची कल्पना तुम्हाला आहे का? त्याची योग्य गुंतवणूक करण्यासाठी देवाने ती तुम्हाला दिली आहेत. आणि त्यांचे कारभारीपण […]

कृपा आणि वैभव: ख्रिस्ताच्या देहधारणाचे तिहेरी गौरव –  लेखांक २

स्टीव्ह फर्नांडिस अ) त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव आपण आता ख्रिस्ताच्या देहधारित व्यक्तित्वामधील तिहेरी गौरव पाहणार आहोत. पहिले म्हणजे त्याच्या व्यक्तित्वाच्या रचनेतील गौरव . येशू त्याच्या देहधारणामुळे पूर्णपणे एकमेव अपवादात्मक व्यक्ती असा घडला गेला. याचा अर्थ […]

हेन्री मार्टिन

(१७८१-१८१२) लेखांक १७ पलटणीतील काही ब्रिटिश सैनिकांचा भारतीय स्त्रियांशी विवाह झाला होता. तर काही केवळ विवाहबाह्य संबंध ठेऊन त्यांच्याबरोबर राहात होत्या. अशांची दुरावस्था जाणून त्यांना आध्यात्मिक स्पर्श व्हावा म्हणून त्याने हे खास काम केले होते. […]