दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

धडा १०. १ योहान २:१८-१९; २२-२३ स्टीफन विल्यम्स

 

ख्रिस्ती विरुद्ध ख्रिस्तविरोधी – भाग १

  • जेव्हा लोक मंडळीची सहभागिता सोडून जातात किंवा जात नाहीत तेव्हा बहुधा कोणती कारणे देतात?
    •           हे मुद्दे संदर्भासाठी लक्षात घेतल्यास कोणाला “ख्रिस्ती आहे” किंवा “ख्रिस्ती नाही” असे घोषित करणे बरोबर आहे का?
    ▫       कोणी म्हणेल की एखाद्याचा सहजपणे न्याय करून प्रत्येकाच्या अंत:करणाला व त्यांच्या हेतूंना  लेबल लावणे सोपे असते, तर
    त्यांचे म्हणणे बरोबरच आहे.
    ▫      उलटपक्षी काही लोक येशूकडे बोट दाखवून म्हणतील की तो तर खोट्या शिष्यांविषयी परखडपणे स्पष्ट बोलला.
    ▫      गंमत म्हणजे त्याच ठिकाणी येशू म्हणाला की “तुम्ही कोणाचा न्याय करू नका” (मत्तय७:१) असेही म्हणाला की “त्यांच्या                         फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल” (मत्तय ७:१६).
    •         येशूचे कोण आहेत आणि येशूचे कोण नाहीत या दोहोमधील महत्त्वाच्या फरकांविषयी योहान चार बाबतीत सादर करत
    असलेल्या फरकापैकी आपण  शेवटचा फरक  पाहात आहोत – ख्रिस्ती आणि ख्रिस्तविरोधक. ख्रिस्तविरोधकाची दोन गुणलक्षणे           दिली आहेत.
    ▫   त्यांची ख्रिस्ती लोकांशी दीर्घकाळ सहभागितेचे संबंध नसतात.
    ▫  त्यांचे ख्रिस्ती सत्याशी दीर्घकाळ नातेसंबंध नसतात.

शास्त्राभ्यास

हे ख्रिस्तविरोध्याचे युग आहे

मुलांनो, ही शेवटली घटका आहे आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले आहे; त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधी उठले आहेत; यावरून आपल्याला दिसून येते की ही शेवटची घटका आहे (:१८.)

  • आपण केलेला अभ्यास तुम्ही आठवला तर समजेल की योहान स्पष्टपणे हा काळ तात्पुरता असल्याचे पुढील प्रकारे दाखवून देतो.
    ▫   २:८ – अंधार नाहीसा होत आहे व ख्रिस्ताने वधस्तंभावर मिळवलेल्या विजयामुळे खरा प्रकाश
    (ख्रिस्ताचा) आता प्रकाशत आहे.
    ▫   २:१७ – आपण या जगावर प्रीती करायची नाही कारण हे जग व त्याच्या वासना नाहीशा होत चाललेल्या या जगाच्या आहेत.
    •       येथे तो सांगत आहे की आपण या “नाहीशा होत चाललेल्या” युगाच्या “शेवटच्या” घटकेत आहोत .
    ▫   शेवटच्या काळाच्या शेवटच्या घटकेचे चिन्ह आहे, ख्रिस्तविरोध्याचा उदय.
    ▫   जरी २००० वर्षे उलटून गेली तरीही  ख्रिस्तविरोधी उपस्थित असणे हे  शेवट जवळ असण्याचे चिन्ह आहे व ते ख्रिस्त पुन्हा येण्यापूर्वी
    असणार.
    •      देवाचे वचन ख्रिस्तविरोधी ही एक व्यक्ती उदय पावेल असे म्हणत आहे. तो सत्ता हाती घेईल आणि स्वत:ला  देवाच्या स्थानी
    बसवील  (२ थेस्सलनी २:५).
    ▫   बायबलच्या शिकवणीप्रमाणे अखेरच्या काळी महासंकट येईल (मार्क १३:२४). शेवट येण्यापूर्वी महान संकटकाळ येईल (योहान
    १६:३३). तसेच अखेरचा ख्रिस्तविरोधी येणार.
    ▫   इंग्रजी भाषांतरात त्या व्यक्तीसाठी ख्रिस्तविरोधी हा शब्द कॅपिटलमध्ये लिहिला आहे. प्रत्यक्ष शरीराने हा ख्रिस्तविरोधी प्रकट                   होण्यापूर्वी इंग्रजी स्मॉल अक्षरात सूचित केलेले अनेक ख्रिस्तविरोधी केव्हापासूनच कामाला लागले असून तो करील तीच कामे ते या         काळात करत आहेत. जागतिक स्तरावर नसली तरी लहान प्रमाणात तीच कामे ते करत आहेत (१ योहान ४:३).

ख्रिस्तविरोधकाची ही चिन्हे आहेत

ते सहभागिता नाकारत असल्यावरून त्यांना ओळखता येईल

आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर ते आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रगट व्हावे म्हणून ते निघाले (:१९).

  • योहान मानवी व्यक्ती म्हणून ख्रिस्तविरोधकाची ओळख करून देत आहे एक तत्त्व म्हणून नव्हे – त्या आपल्यापासून फार दूर धोक्याच्या जागी नव्हे तर जवळच असणाऱ्या व्यकती आहेत. त्या मंडळीचा भाग आहेत!
    •           योहानाच्या काळच्या ज्या ह्या लोकांचा तो संदर्भ देत आहे ते खोटे शिक्षक असून त्यांनी अखेर ती मंडळी सोडली आहे. कारण ते
    मंडळीतील लोकांना शिष्य करू शकले नाहीत. म्हणून ते मंडळी सोडून गेले आहेत.
    •           तरी या वचनात नमूद केलेली तत्त्वे केवळ सोडून जाणाऱ्या खोट्या शिक्षकांना लागू नाहीत तर सामान्यपणे धीराने  धरून
    राहण्याचे बायबल आधारित सत्य सांगते. ही चिकाटी म्हणजे कोणाला तरी किंवा कशाला तरी धरून  राहण्याचे तत्त्व सांगते. येशू
    मार्क ४:१६-१९ मध्ये याविषयी बोलतो.
    •           योहानाचा १९ व्या वचनातील दावा पाहा:
    ▫       “ते आपले नव्हते” हा स्पष्ट फरक आहे. “आपले” म्हणजे जे देवाचा पुत्र येशूवर विश्वास ठेवतात ते (१ योहान ५:१३) मग “ते” या
    गटाचा भाग नाहीत हे स्पष्टच आहे.
    ▫       योहान आपल्या या विधानाचे कारण देत आहे. येशूवर विश्वास असण्याचे लक्षण हे सांगते की “ते आपल्याबरोबर राहिले असते.”
    ▫       विश्वासी व्यक्तीचे लक्षण आहे की ते आपल्या बंधुजनांवर प्रीती करतात (१ योहान २:९-१०), हे  मोघम म्हटलेले नाही. तर तुम्ही                आपल्या ख्रिस्ती कुटुंबाला सोडून जाणाऱ्यांपैकी नसता. हे तत्त्व ज्या ख्रिस्तविरोध्यांना उद्देशून योहान बोलत आहे त्यांना  व                         “नियमित” विश्वासी जनांना अशा प्रकारे लागू आहे.

▫                 जे स्वत: ख्रिस्ती असल्याचा दावा करतात पण ख्रिस्ती सहभागितेची इच्छा बाळगत नाहीत अशांविषयी येथे काय म्हटले आहे?
۰         मंडळीने लोकांना वाईट वागवल्याचे अगदी खरे खरे किस्से असले तरी बहुधा जी पापे उघड होऊ नयेत असे वाटते त्यावर लोक                         पांघरूण घालण्यासाठी सबबी सांगतात. आणि त्यांना कल्पना असते की अशा परिस्थितीत सहभागितेत राहिल्याने ते अस्वस्थ राहतील                (योहान ३:२०-२१).
۰         यामुळे आपल्याला परिवर्तनाविषयी अधिक चांगले समजते व दृढ होते – तुम्ही ख्रिस्ती कुटुंबात जन्मला म्हणून तुम्ही ख्रिस्ती नसता.
किंवा  तुम्ही “निर्णय घेतला”  किंवा एक “विशिष्ट प्रार्थना केली” म्हणून तुम्ही ख्रिस्ती नसता. तुमच्या अंत:करणाचे खरोखर परिवर्तन
झाल्याचे भक्कम लक्षण दीर्घकाळ विश्वासूपणा.
•         आपल्या मंडळीत खोटे शिक्षक किंवा खोटे विश्वासी आहेत असा विचारही किती भीतीदायक व दुर्बल करणारा वाटतो. पण आपल्या
दाव्याचा समारोप करताना योहान याबाबत असलेल्या देवाच्या सार्वभौम कृपेचे स्मरण  करून देतो.
▫   देव अविश्वासी व्यक्तीचेही अंत:करण हलवून सोडतो.
▫   देव त्याच्या सार्वभौमत्वाने त्यांना बाहेर जाऊ देतो, यासाठी की त्यांना आपण कोण आहोत याची जाणीव व्हावी.

ते जे सत्य नाकारतात त्यावरून ते ओळखता येतात

येशू हा ख्रिस्त आहे हे जो नाकारतो त्याच्या शिवाय कोण लबाड आहे? जो पित्याला व पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. जो कोणी पित्याला नाकारतो त्याला पुत्र लाभला नाही, जो पुत्राला स्वीकारतो त्याला पिता लाभला आहे (वचन २२,२३).

  • जर आपण एकदम २२व्या वचनाकडे गेलो तर योहानाच्या मनात एक विशिष्ट गट असल्याचे लक्षात येते. इफिसच्या मंडळीत एक गट असा होता की जो येशू हा ख्रिस्त आहे हे नाकारत होता.
    ▫   हे केवळ येशू या मानवाला नाकारणे नव्हते तर जुन्या करारातील भाकितांप्रमाणे आलेला तो मशीहा असल्याचे ते नाकारत होते.
    ▫   येशू मानवधारी असल्याचे नाकारणे व त्रेकत्व नाकारण्याबद्दल योहान बोलत आहे. पण योहान  ४:२,३ मध्ये नाकारण्याविषयी स्पष्ट
    केले आहे: ते येशू हा
    ۰   पहिले म्हणजे देवाचा पुत्र व त्र्यैक्यातील दुसरी व्यक्ती असल्याचे नाकारत होते.
    ۰   दुसरे म्हणजे मानवी देह धारण करून आलेला देव आहे हे ते नाकारत होते.
    •           कोणताही लोकगट येशूचे मानवधारी होणे, त्याचे मानवपुत्रत्व किंवा त्र्यैक्यत्व नाकारत असेल तर तो केवळ माथेफिरू गट नसून              ख्रिस्तविरोधी आहे. अशा नाकारण्याबद्दल योहान वचन २३ मध्ये काय दावा लावतो पाहा: तुम्ही पुत्राचा कोणताही गुणविशेष                    नाकारला, तो पूर्ण देव व पूर्ण मानव असल्याचे नाकारले तर तुम्हाला  पिता लाभलेला नाही
    ▫       पण येशूने म्हटल्याप्रमाणे पुत्राला पाहणे म्हणजे पित्याला पाहणे (योहान १४:८-९ व १:१८).
    •          जो कोणी सहभागिता सोडून जातो तो प्रत्येक ख्रिस्त देव असल्याचे किंवा तो मानवधारी झाल्याचे नाकारणारा  असतो असे नाही.              सहभागिता सोडून जाण्याविषयी पौल येथे एक व्यावहारिक तत्त्व सांगत आहे.
    ▫       ते थोडा काळ राहतील, कालांतराने त्यांना ख्रिस्तावरील प्रीतीपेक्षा पाप अधिक प्रिय वाटू लागेल.
    ▫      हळूहळू त्यांच्या चुका उघड होऊ लागतील व ते देवाच्या वचनाशी तडजोड करू लागतील, फक्त कृतीनेच नव्हे तर तोंडाने कबूल
    करण्यानेही.
    ▫     जे मंडळी सोडतात ते बहुधा सुवार्तेसंबंधीचे किंवा नैतिक संबंधातील सत्य नाकारू लागतात. उदाहरणार्थ लोकांनी काहीही केले              तरी देव त्यांच्यावर प्रीती करतो, किंवा तुम्ही अविश्वासी व्यक्तीसोबत विवाह केला तरी देव त्याची पर्वा करत नाही, किंवा                          समलिंगत्व हे पाप नाही, इ.

चर्चेसाठी प्रश्न

  • ख्रिस्ताचे त्र्येकत्वाचे पैलू किंवा ख्रिस्ताचे देवत्व नाकारतात असे ख्रिस्ती म्हणवणारे काही लोकगट सांगा. त्यांना आपण कसे वागवावे? (२ योहान ९-११)
    •           मंडळीशी विश्वासूपणा याचा अर्थ एखाद्याने आपला पंथ किंवा आपली विशिष्ट मंडळी सोडू नये असा होतो का?  योहान कोणत्या
    संदर्भात बोलत आहे?
    •           पौल आपण विश्वासात आहोत का याची परीक्षा करा असे म्हणतो (२ करिंथ १३:५,६). चिकाटीने धरून राहणे  हे पूर्णपणे देवाचे
    काम आहे का? दीर्घकाल विश्वासूपणा जतन करण्याचे काही मार्ग कोणते?

 

Previous Article

तुम्ही सुखी असल्याचे ढोंग करीत आहात का? लेखक : मार्शल सैगल

Next Article

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस

You might be interested in …

छिन्नविछिन्न जीवनातून देव काय करू शकतो

स्कॉट हबर्ड काही दु;खे इतकी खोल असतात आणि इतका काळ टिकतात की ती  सहन करणाऱ्यांना या जीवनात तरी सांत्वन मिळेल याबद्दल निराशा वाटू लागते. त्यांच्या दु:खाला त्यांनी कितीही मोठी चौकट टाकली तरी सर्व कडांतून अंधार […]

माझ्या पापाने तेथे त्याला धरून ठेवले

ग्रेग मोर्स उत्तम शुक्रवारी जगातला सर्वात दु:खद दिवस साजरा केला जातो. त्याच्या तोंडावरून रक्ताचे ओघळ वाहत होते. त्यांच्या निर्मात्याच्या डोक्यामध्ये मोठाले काटे घुसवले गेले. ज्या मुखाद्वारे विश्व अस्तित्वात आणले त्यामधून आता वेदना व कण्हणे ऐकू […]

पवित्रतेची सुरुवात येशूच्या जवळीकतेमधून होते

स्कॉट हबर्ड पापाशी झगडा करताना, विश्वासासाठी युद्ध करतांना कधीकधी मला वाटते की पवित्रतेचा पाठलाग काही समीकरणानी  मिळाला असता तर! [क्ष मिनिटांचे बायबल वाचन] + [य मिनिटांची प्रार्थना] x [ आठवड्यातले झ तास] = पवित्रपणा आणि […]