दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर 

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.

अनुवाद : क्रॉसी उर्टेकर

प्रकरण ११

(मार्क ३)

मला काहीशा आवाजाने जाग आली. अमावास्येची रात्र होती. बाहेर गडद काळोख होता. टेकडीवरच्या घरातून विचित्र जपाचा आवाज येत होता. त्या आवाजामागे काही अशुद्ध शक्ती कार्यरत आहे असे वाटत होते. काही डोळ्यांनी दिसते का याचा मी अंदाज घेतला पण काही दिसले नाही. मी देवाजवळ सुरक्षिततेसाठी विनंती केली व निवांत झोपी गेलो. सुट्टीहून परतल्यापासून अशुद्ध शक्तींसंदर्भात फोलोपा लोकांसाठी आम्हांला खूपच प्रार्थनेचे ओझे येत होते. ते वाढतच होते.

दुसऱ्या दिवशी फुकुराटोचा रहिवासी नसलेला एक भूतविद्याप्रवीण मला आढळला. पीडाग्रस्त लोक त्याच्याकडे जात. त्याचे सारे गाव उध्वस्त झाले होते.

मी त्याला विचारले, “रात्री तू बोलत होतास का?”

“हो.”

“काय करत होतास?” तो काहीतरी पुटपुटला. मला काही समजले नाही. पण त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा असा तर तो नक्कीच नव्हता. पण मी त्याचा छडा लावला.

ओवारापे अलीच्या गुडघ्यासाठी सारा प्रकार चालू होता. त्याची ही जुनाट समस्या होती. काठी घेऊन तो चालत होता. मी त्याच्यावर इंजेक्शन, औषधे व व्यायाम देऊन बरेच उपचार केले होते. त्याच्यात खूप फरक पडला होता. एक दिवस मला तो भेटला. मी म्हटले, “काही फरक?”  त्याने चेष्टेत  मान हलवली. मी म्हटले, “तुला डुक्कर द्यावे लागले असणार.” त्याने खेदाने मान हलवली आणि निघून गेला. डुक्कर यज्ञपशु असतो. माणसाच्या इच्छापूर्तीसाठी रक्त व चरबीचा होम केला जातो व उरलेल्रे सर्व त्या भूतविद्याप्रवीणास मोबदला म्हणून मिळते. आम्ही मार्कांचे शुभवर्तमान भाषांतर करायला घेतले; तिसऱ्या अध्यायात होतो. वाळलेल्या हाताचा माणूस सभास्थानात होता तेव्हाची घटना होती. शब्बाथ दिवशी त्याला बरे करण्याचे सत्कृत्य करून शब्बाथ मोडताना येशूला पकडण्यास धर्मपुढारी टपून बसले होते. त्याने फक्त आज्ञा करताच तो बरा झाला होता. जपतप, मंत्रतंत्र, अंधकाराच्या शक्तींना धमकावणे, डुक्कर मारणे काही नाही. इतके साधे सोपे करूनही परूश्यांना ते पसंत पडले नाही व त्यांनी त्याला ठार करण्याचा कट केला; आणि हा बालजबुलच्या सहाय्याने म्हणजे भूतांच्या अधिकाऱ्याच्या सहाय्याने भुते काढतो असा त्याच्यावर आरोप केला (मार्क ३:२२). हे बोलणे मुळीच समर्पक नव्हते. म्हणून येशूने म्हटले, “सैतान सैतानाला कसा घालवील? आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही”(मार्क ३: २३-२४). आम्ही भाषांतर चालूच ठेवले.

“सैतान स्वत:वरच उठला व त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही. त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही.

त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल” (मार्क ३: २६-२७).  मला वाटले त्यांना स्पष्ट झाले असेल पण ते मख्ख होते. त्यांनी विचारले, “ते वचन कशाविषयी बोलत आहे?”

“येशू स्वत: विषयी बोलत आहे. तो जे त्याच्या हक्काचे आहे ते घेण्यास येत आहे. बलवानाने त्याची मालमत्ता घेतलीय. येशू जो त्याच्याहून बलवान, तो येईपर्यंत ती त्याच्या ताब्यात असणार. ती हस्तगत करण्यापूर्वी त्या घरावर ताबा घेतलेल्याला बांधल्यावर तो आपल्या हक्काचे ते हस्तगत करील. “हंSS. अस्सं.” पण अजून त्यांना समजलं नव्हतं.

“पूर्वी तुम्ही जेव्हा शत्रुंना लढा द्यायचा तेव्हा त्यांची लूट घ्यायला तुम्ही त्यांना बांधायचा ना?”

“नाही. आम्ही वस्तू लुटायचो. पण आम्ही त्यासाठी जात नव्हतो तर आम्ही त्यांना ठार करायलाच जात होतो.”

त्यांना हे समजणे अवघड जात होते कारण नि:शस्त्र करणे नव्हे तर त्यांना नष्ट करणेच माहीत होते.

ते सगळे परस्परांना ओळखत असत. त्यांना माहीत असे की गुन्हेगाराला जिवंत सोडले तर तो नक्कीच आपल्यावर उलटून आपला सूड घेईल. म्हणून या वचनात आम्हाला दुसरी उपमा वापरणे आवश्यक होते.

अविआमे अली म्हणाला, “त्या अजगराला आम्ही पकडतो ना तसे असते. अजगर फार धोकादायक असतो.

त्याने डुक्कर जरी पकडले, तरी आधी तो त्याची हाडे मोडतो. तो अत्यंत ताकदवान असतो. म्हणून अजगराची   शिकार करताना आम्ही आधी त्याला बांधतो.”

फोलोपा नेहमीच सापांविषयी बोलत असतात. त्यांच्या दंतकथांमध्ये त्याचा नेहमी अधर्माशी संबंध लावला जातो.  फोलोपांना हे अजगर व साप भिऊन त्यांच्या वस्तीपासून दूर राहातात. कारण ते त्यांची शिकार करतात व सर्व मिळून वाटून मेजवानीसारखे खातात. अविआमे अली पुढे बोलू लागला.

“अजगर तुमची हाडेच तोडतो. तो हुशार असतो. त्याला जंगलाची वाट कळते, प्राण्यांचा माग कुठे कसा काढायचा ते कळते. तोंड उघडे ठेऊन तो दबा धरून बसतो. सावज पकडले की त्याचा प्राण जाईपर्यंत त्याला पिरगळतो व त्याची हाडे पार मोडतो. मग पाणी पिऊन येतो व ते पाणी बाहेर पडू नये म्हणून डोके व शेपूट उभे ठेवतो. मग ते पाणी त्या सावजावर ओकतो. त्यामुळे त्याला ते सावज गिळायला सोपे जाते. अजगर पाणी प्यायला गेल्यावर आम्हाला एखादे मृत सावज अजगराने मारल्याचे त्याच्या बेढब आकारावरून ओळखता येते. त्याने ते अर्धवट गिळताच आम्ही त्याला धरतो. आम्हाला अजगरही मिळतो आणि सावजही मिळते. “मी चवीने अवीयामेचे ऐकतहोतो. पण बलवान मनुष्यासह बांधण्याशी याचा काय संबंध  लागतो ते कोडे मला अजून सुटले नव्हते. तो बोलत होता.

“आम्ही दिवसा अजगराची शिकार करतो. विळख्यात डोके खुपसून ते झोपतात. आम्ही काही पाने कमरेला खोचतो, तोंडात वेली पकडतो व पावलांची चाहुल लागावी म्हणून पाने तुडवल्याचा आवाज करतो. तो विळख्यातून डोके वर काढून कोणते जनावर आलेय ते पाहू लागतो. त्या महत्त्वाच्या क्षणी आम्ही हल्ला करतो. कमरेस खोचलेल्या त्या पानांनी त्याचे हाताच्या पकडीत धरलेले डोके झाकतो व तोंडात धरलेल्या वेलींनी ते करकचून बांधतो.

“तुमचा नेम कधी चुकतो का?”

“एकदा इसापासून आम्ही थोडे लांब होतो. तो झाडावरच्या अजगराला पकडत होता. त्याच्या हाताला पान लवकर लागले नाही. तेवढ्यात तो अजगर त्याच्या गळ्याला विळखा घालून पिळू लागला. इसाच्या घशातून आवाजही फुटेना एवढी त्याने ताकद लावली होती. इसाजवळ वेळ खूप थोडा होता. त्याने प्रसंगावधान राखून झाडावरून उडी मारली व आमच्याकडे धाव  घेतली. तिघांनी मिळून त्या विळख्यातून त्याची सुटका केली.”

“तुम्ही त्या अजगराला मारले?”

“अखेर पान त्याच्या डोक्याला बांधले. ती बांधण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण केली की मग तो काही करू शकत नाही. आम्ही काठीला एका बाजूला डोके व उरलेले शरीर पिळे घालून गुंडाळून त्याला खांद्यावर टाकून घरी आणतो.” काही क्षणात हे बलवान जनावर एखाद्या गांडुळासारखे दुर्बल बनते. बलवान माणसाला बांधावे तसे. मग त्याचे कुऱ्हाडीने डोके कापतात व जेवणासाठी पुढचे सोपस्कार सुरू होतात.

बायबल खोलीत आम्ही अभ्यास करत असलेला शास्त्रभाग सुस्पष्ट होत होता. फोलोपा माणसाला बांधत नाहीत पण ते सापाला बांधतात. ते नेहमीच या लढ्यात जिंकतात. त्या वचनातील अशुद्ध आत्म्यांचा अधिपती व अजगर यांत त्यांना साम्य आढळले का? नक्कीच. अजूनही आम्ही रात्रीचे भूतविद्याप्रवीणांचे आवाज ऐकताना आमचे रक्त गोठून जाते.

पण फोलोपांसाठी त्याहून बलशाली शक्ती आली होती आणि ती या शक्तीला बांधणार होती.

 

 

 

 

 

 

 

Previous Article

पडली, मोठी बाबेल पडली पील वॉरन

Next Article

फिलदेलफिया येथील मंडळीला संदेश सॅमी  विल्यम्स

You might be interested in …

आत्म्याचे फळ  स्टीफन विल्यम्स

   (लेखांक १) “आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ; प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही” (गलती ५:२२,२३). ख्रिस्ती व्यक्ती ही “कृपेमध्ये वाढत” जाते. जर तुम्ही सजीव मानव असाल […]

अधीरता म्हणजे नियंत्रण करण्यासाठी युद्ध

मार्शल सीगल अधीर किंवा उतावीळ असणे हे एक वाईट पाप आपल्या सर्वांमध्येच असते आणि आपल्याला त्याचे समर्थन करायला आवडते – आम्ही थकलो होतो, आम्ही व्यस्त होतो. आमचं दुसरीकडे लक्ष होतं, मुलांचा फार गोंधळ चालू होता. […]

देवाचे सार्वभौमत्व आणि आमची जबाबदारी – भाग २ लेखक: जेरी ब्रिजेस

जेरी ब्रिजेस  ( १९२९ -२०१६) हे गेल्या काही दशकातील नामवंत ख्रिस्ती लेखकांपैकी एक आहेत. त्यांची अनेक पुस्तके जगप्रसिद्ध झाली असून अनेकांना त्यांच्या ख्रिस्ती वाटचालीत खोल मार्गदर्शन करणारी ठरलेली आहेत. त्यांच्याशी जवळून परिचय असणाऱ्यांची साक्ष आहे […]