नवम्बर 22, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

पवित्र शास्त्रातील पवित्र आत्म्याचे सामर्थ्य

  लेखांक ५                          
                       
‘ सर्व पवित्र लिखाणात देवानं आपला प्राण फुंकला आहे’ (२ तीमथ्य ३:१६)

तारणाचं मूळ केंद्रस्थान कुटुंब. कुटुंबाच्या तारणाचं साधन ‘कुटुंबातली उपासना.’ उपासनेचा प्राण म्हणजे पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्राचा प्राण पवित्र आत्मा. ह्या पुस्तकातून आपण पूर्व भागातील एका तरुणाचं नमुनेदार कुटुंब पाहिलं. कुटुंबातील उपासना, शास्त्र शिक्षण पाहिलं. त्या शास्त्रानं तारण कसं होतं तेही पाहिलं. तारण करण्यास पवित्र शास्त्र समर्थ आहे, असं आपण पाहिलं. पवित्र शास्त्रातलं सामर्थ्य म्हणजे काय? ते कुठून येतं? ते कसलं आहे? म्हणजे त्याचं स्वरूप कसलं आहे ? याचा आज आपण विचार करू.
त्यासाठी आजच्या प्रतिकाचा काळजीपूर्वक अभ्यास करू. म्हणजे या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळून त्यावर लख्ख प्रकाश पडेल.
पहा तर हे प्रतीक: ‘सर्व लिखाणामध्ये देवानं आपला प्राण फुंकला आहे.’

(१) ‘ सर्व पवित्र लिखाणामध्ये’– नास्तिकपणानं, बेपर्वाईनं भरलेल्या या अन्यायी जगात जे शब्द आपण फार काळजीपूर्वक जतन केले पाहिजेत, ते ‘सर्व लिखाण’… लिहिलेली प्रत्येक बाब, प्रत्येक काना, मात्रा, अक्षर, शब्द, शब्दसमूह, वाक्ये, कलम, अध्याय, संपूर्ण पवित्र शास्त्र, यामध्ये देवाच्या प्राणाची फुंकर आहे. शास्त्राचा अमका भाग तेवढा देवानं दिलेला आहे आणि इतर माणसाचा भाग आहे असा त्याचा अर्थ नाही. जुना करार असो, नवा करार असो, त्यातलं कोणतंही पुस्तक असो, त्यामधला कोणताही छोटामोठा भाग असो. त्या प्रत्येकामध्ये, ‘सर्वांमध्ये’ देवानं आपला प्राण फुंकला आहे.

(२) ‘ देवानं …फुंकला आहे’ – लिखाण माणसानंच लिहिलेलं. लिखाणाचा देह ही माणसाची कृती. पण त्या लिखाणाचा प्राण देवाचा आहे. पवित्र शास्त्रातला खरा लेखक देव आहे. लिहिण्याचं काम माणसाचं. पण प्राण घालण्याचं काम देवाचं. देवच पवित्र शास्त्राचा कर्ता आहे. म्हणूनच तो तारणाचाही कर्ता आहे.

(३) ‘फुंकला आहे.’ ह्या शास्त्रवचनापाठीमागं एक मनोमय प्रतिमा आहे. शास्त्रामधलं एक चित्र आहे. ते हे: देवानं माणसाला उत्पन्न केलं. कसं केलं? माती घेतली, त्याची आपल्या  स्वत:प्रमाणं प्रतिमा घडली. आणि तिला निर्जीव पाहून तिला प्रीतीनं जवळ घेतलं. ओठाला ओठ जुगवले. तिचं चुंबन घेतलं. असा तिच्यात प्रीतीनं प्राण घातला. अन् मग मनुष्य जिवंत प्राणी झाला. तेच चित्र इथं आहे. शास्त्र लिहिलं माणसानं. पण ते प्रेत आहे. निर्जीव कलेवर आहे. देवानं त्या कलेवराला प्रीतीनं घेतलं, आणि त्यात आपला प्राण, आपला आत्मा, पवित्र आत्मा फुंकला. अन् मग संपूर्ण शास्त्र जिवंत झालं. त्यातलं अक्षर अन् अक्षर  देवानं त्यामध्ये आपल्या फुंकरानं घातलेल्या प्राणानं … आत्म्यानं… आता जिवंत आहे. तारण करण्यासाठी समर्थ आहे.

१. देवा तुझं शास्त्र आत्माच जिवंत,
  जिवंत मी प्रेत वाचतो ते ॥
२. खेळू दे खेळू दे वारे अंगभर
 फुटो झराझर देही काटा ॥
३. वाचता वाचता पडू दे रे कानी
आत खोल मनीं तुझी वाणी ॥
४. जुगव जुगव ओठी तुझे ओठ
फुंक रे आकंठ प्राण तुझा॥
५. करी रे जिवंत सामर्थ्य संपन्न  
दिलाने प्रसन्न तारलेला ॥

Previous Article

कौटुंबिक उपासनेत पवित्र शास्त्राचे स्थान

Next Article

पवित्र शास्त्राचं कार्य

You might be interested in …

देवाने तुम्हाला आठवणी दिल्या आहेत कॅथरीन बटलर

जी ठिकाणे आपल्याला विसरून जातात आणि ज्या क्षणांची इतर कोणी फिकीर करत नाही त्यांच्याशी आठवणी आपल्याला बांधून ठेवतात. नुकतेच मी आमच्या शाळेचे मासिक वाचत असताना असेच विचार मला पछाडू लागले. हडसन नदीच्या किनाऱ्याला असलेले गुलाबाचे […]

स्वत:ची सुधारणूक किती ख्रिस्ती आहे? मार्शल सीगल

आपले नव्या वर्षाचे कितीतरी निर्णय सपशेल पडतात कारण ते येशूच्या नावामध्ये केलेले नसतात. आपण ते आपल्याच नावामध्ये करतो – आपल्याच सामर्थ्याने, आपल्या अटींवर, आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी. फेब्रुवारीपर्यंत ते अपयशी ठरतात कारण ते आपल्यावरच – स्वत:वर- […]