जनवरी 15, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तुमच्या जीवनात सर्व सुरळीत का नाही?

ग्रेग मोर्स

तुम्ही सुखी आहात का? तुम्ही समाधानी आहात का?

तुम्ही तुमच्या मुलीबरोबर प्राणी पहायला जाता आणि काचेतून गोरिलाला पहाता. तुम्ही त्याला पाहता आणि तो तुम्हाला पाहतो. तुम्हा दोघांच्या जीवनात खूप काही फरक आहे का? तो एका दिवसातून दुसऱ्या दिवसाकडे जात असतो, एका खाण्यापासून दुसऱ्या खाण्याकडे – जंगल काय आहे? तुम्ही एका करमणुकीपासून दुसरीकडे जात राहता एका पापाचा घास घेऊन दुसऱ्याकडे वळता- खरे सुख आहे तरी काय? जसे काही तुम्ही आनंदाच्या बागेच्या बाहेर राहत आहात.

तरीही तुम्ही मानव आहात, गोरिला नाहीत. तुमचा पिंजरा म्हणजे तुमच्या निवडीमुळे तुम्ही केलेला तुरुंग. पण जेव्हा तुम्ही जीवनाचा विचार करायला थांबता; तेव्हा तुम्ही बुडायला लागता. – खरे सुख काय आहे? हेच सर्व आहे का? कदाचित तुम्ही तरुण होता तेव्हा कदाचित जीवन अधिक उजळ होते. कदाचित तुम्ही आणि भविष्य अगदी गाढे दोस्त होता. पण आता तुम्ही कमी आणि कमी आनंदाने बोलता. त्यालाही कळत नाही तुम्ही नक्की काय शोधताय आणि तुम्ही दोघेही आता ते ओळखू शकत नाही.

तुम्ही सुखी आहात का? तुम्ही समाधानी आहात का? नाही? मग व्यर्थ शोधत का राहता?
का?
“जे अन्न नव्हे त्यासाठी दाम का देता? ज्याने तृप्ती होत नाही त्यासाठी श्रम का करता” (यशया ५५:२)

तुमचे उसासे देव शब्दात मांडतो. जी भाकर नाही त्याच्यासाठी तुम्ही पैसे खर्च करता. ज्याने समाधान मिळत नाही त्यासाठी कष्ट करता. तुम्ही वाळू चावता, तुम्ही वाऱ्याचे पीक काढता; किती शक्ती, किती वेळ, किती समर्पण ज्यातून काही मिळत नाही त्यासाठी. तुम्ही वाईट खरेदी करत आहात , जे पचवता येत नाही ते खात आहात.
स्वर्ग आणि पृथ्वीचा प्रभू विचारत आहे : का?

पाण्यासाठी  वाळवंटात खोदण्याचा आग्रह तुम्ही का करता? प्रकाशासाठी तुम्ही गुहेत का प्रवेश करता? असे निर्बुद्ध जगणे , अथक याद्या, डोळे दुखेपर्यंत पाहणे का करता? – या सर्वांनी कधी तुमचा जीव सुखात डुबून गेला आहे का? हे जे जीवन तुम्ही तुमच्यासाठी निवडले आहे त्यातून तुम्हाला काय मिळते?

तुमचे निर्णय तुमचे ओठ कोरडे ठेवतात, देवाच्या आमंत्रणासाठी एका तहानेने तुमची तयारी करत.

“अहो तान्हेल्यांनो, तुम्ही सर्व जलाशयाकडे या, जवळ पैसा नसलेले तुम्ही या; सौदा करा, खा; या, पैशावाचून व मोलावाचून द्राक्षारसाचा व दुधाचा सौदा करा” (यशया ५५:१).

या तृप्त व्हा. या आणि सुखी व्हा. या. देवाचे फर्मान आहे. फक्त या.

आपल्या शोधात

स्वर्गाचा देव तुमच्या जीवनाचे अस्पष्ट हुंदके ऐकतो आणि प्रतिसाद देतो. तुमचे मुख रेतीने भरण्याचे सोडून द्या; पाण्याकडे या.  तुमचे ह्रदय जगाने विषमय करण्याचे थांबवा. या आणि द्राक्षारसाने ते आनंदित करा. जे तुम्हाला अधिकच भुकेले बनवते त्यासाठी कष्ट का करता? तुम्ही खरी भाकर, पाणी, द्राक्षारस, आणि दूध सेवन करणार नाही का? आनंद , जीवन, अर्थ, हेतू- या गोष्टींमध्ये तुम्हाला रस नाही काय?

फांदी झाडातूनच का येते? घरट्यातच अंडे का असते? मासा पाण्यातून का येतो या प्रश्नाची उत्तरे तुम्ही अनुभवाने देऊ शकता. हे सुख फक्त देवातच जर मिळते तर ते तुम्हाला नकोय. आता हे काळजीपूर्वक ऐका. माझे लक्षपूर्वक ऐका आणि उत्तम ते खा; तुमचा जीव पौष्टिक पदार्थांचे सेवन करून संतुष्ट होवो. “कान द्या, माझ्याकडे या; ऐका, म्हणजे तुमचा जीव वाचेल; आणि मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन” (यशया ५५:२-३,६).

देव तुमचा स्वीगी ड्रायव्हर होऊन तुमच्यापर्यंत जेवण आणेल  पण जर तुम्हाला त्याच्याबरोबर जेवावे लागणार असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये असेल ते खाल. गर्व बोलतो. तुमच्या निर्मात्याचा आनंदी सेवक होण्यापेक्षा  तुमच्या दु: खी जीवनाचा राजा होणे तुम्हाला बरे वाटेल. तुम्ही त्या “धन्याच्या आनंदात प्रवेश” करणार नाही, कारण धनी हा शब्द तुम्हाला खुपतो. तुम्ही एदेनेकडे परत जाण्याचा दुसरा मार्ग शोधाल. तुम्ही सर्व हलकी मजा चाखली आहे आणि तरीही स्वर्ग तुमच्या पुढे खुला असताना तुम्ही त्यात प्रवेश करणार नाही; कारण त्याचा प्रवेश करायला मुजरा करावा लागतो आणि तो क्रूसाइतका जड आहे.

दुसऱ्या शब्दांत, आपण पापी आहोत. देव हे फक्त अमाधानी लोकांनाच नाही तर जे अधर्मी आहेत त्यांना देऊ करतो. “पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल. परमेश्वरप्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा; तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा” (यशया ५५: ६,७).

आपल्याला फक्त चांगल्या सुखाची गरज नाही; आपल्याला विपुल क्षमेची, न्याय आणि समाधानाची गरज आहे. तुम्ही असमाधानामध्ये देवाशिवाय सुख शोधता हेच फक्त सुवार्ता हाताळत नाही तर  तुम्ही देवाशिवाय सुख शोधता या तुमच्या आज्ञाभंगालाही हाताळते. पण  प्रभू येशू कायमसाठी परमानंद देत राहत नाही तर तो आपला अखेरचा मृत्युदंड थोपवतो. 

अलोकिक बुद्धिमत्ता

तुमचे भूतकाळातले (किवा सध्याचे) व्यभिचार, खोटेपणा, चहाड्या, राग किंवा दारूबाजीचे जीवन यांचा आणि तुमचा सुख शोधण्याशी काय संबंध आहे? सर्वच. न्यायत्व हे पाप्यांना धार्मिकांच्या वारशामध्ये येऊ देते. ज्या तुम्ही नरकाची पेरणी केली ते तुम्ही स्वर्गाची कापणी करू शकता का?

देवाची थट्टा होणे शक्य आहे का? देव तुम्हाला सुखी कसे करू शकतो? त्याच्या दयेने, क्रोधाने नव्हे. याचे स्पष्टीकरण खालील वचने देतात. “कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत; माझे मार्ग तुमचे मार्ग नाहीत, असे परमेश्वर म्हणतो. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गांहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनांहून उंच आहेत” (यशया ५५: ८,९).

तुमचे कृपेचे आणि दयेचे विचार जंगलाच्या वाटेवर एक एक इंच पुढे जातात. देवाच्या कृपेचे विचार सराफिमांच्या वरती उच्च ठकाणी राहतात. त्याच्या सुवार्तेच्या दयेचे आणि क्षमेचे मार्ग आपल्यापुढे  एका टेकडीवरच्या क्रुसाच्या तुळईवर टांगलेले आहेत. दुसऱ्या शब्दांत सुवार्ता ही मानवाची नव्हे तर देवाची अलौकिक बुद्धिमत्ता आहे. न्यायत्व

व दया कसे चुंबन घेतात हे आपल्याला समजतच नाही. मानव स्व:च्या क्षमेसाठी मार्ग काढू शकतच नाही, देवाच्या कुटुंबात त्याला कसे दत्तक घेतले जाईल याचे स्क्प्नही तो पाहू शकत नाही. देवामधल्या ज्या सुखाचा आपण विचारही केला नव्हता तो आपल्याला बहाल केला आहे.

आनंद

देवाच्या योजनेत मुख्य भाग देवाच्या पुत्राचा आहे. त्याने आपला एकुलता एक पुत्र मानवी देहामध्ये पाठवला, आपण जगू न शकणारे परिपूर्ण जीवन तो जगला. तुमचे मरण तो मरण पावला आणि तुमच्या कबरेतून तो उठला. तुमच्यावर असणारा देवाचा क्रोध त्याने सोसला, यासाठी की ख्रिस्ताला योग्य असलेला स्वर्ग तुम्हाला मिळावा.

देवाने हद्दपार केलेल्या लोकांचे आपल्या कराराने स्वागत केले. त्याने भाकीत केले की, “मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करीन, म्हणजे दाविदाला देऊ केलेले अढळ प्रसाद तुम्हांला देईन” (यशया ५५:३); आणि ते अभिवचन देत असताना दुसऱ्या लोकांना तो म्हणतो, “पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल” (यशया ५५:५)

यानंतर शेकडो वर्षांनी एक माणूस त्याच्या पायावर उभा राहिला आणि तहानेल्या लोकांना देवाचे आमंत्रण त्याने पुन्हा देऊ केले. “कोणी तान्हेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील”  (योहान ७:३७-३८).

येशू त्याच्याकडे येणाऱ्या सर्वांना आमंत्रण देतो. जगाच्या पापाकरिता वधला गेलेला तो देवाचा कोकरा आहे. जेव्हा त्याला उंचावले गेले तेव्हा पाप्यांना आपल्याकडे ओढून घेणारा हाच पुरुष आहे.

ख्रिस्ताचे समर्पण करण्याच्या अटी जेव्हा तुम्ही स्वीकारता तेव्हा देवाच्या लोकांना देऊ केलेला परमानंद तुमच्याकडे येईल. या सार्वकालिक कराराची पूर्ती सृष्टीवर ओसंडून वाहील. “ तुम्ही आनंदाने निघाल, शांतीने मिरवत जाल; पर्वत व टेकड्या तुमच्यापुढे जयघोष करतील; वनातील सर्व वृक्ष टाळ्या वाजवतील” (यशया ५५:१२). आणि नव्या स्वर्गात आणि नव्या पृथ्वीत  “परमेश्वराचे नाव होईल” (यशया ५५:१३).

तुम्ही तहानेले आहात का? पाण्याकडे या. त्याने तुम्हाला क्षमा करण्याचे, तृप्त करण्याचे, स्वत:चे खासगीचे लोक म्हणून  दत्तक घेण्याचे वचन दिले आहे. तुमचे नाव मोठे होण्याकरता जगणे, जगाशी तुमचे तृप्ती न करणारे संबंध, अश्लील फिती पाहणे सोडून द्या. आणि देवाला कायमसाठी त्याच्या सानिध्याच्या आनंदात तुम्हाला नेऊ देत. तुमचा आनंद त्याच्या गौरवासाठी, अनंतकाळ होऊ दे.

Previous Article

ख्रिस्ती व्यक्तीसारखी योजना करा

You might be interested in …

देवाला अंधाराची भीती नाही

मार्शल सीगल “कारण जे काही देवापासून जन्मलेले आहे ते जगावर जय मिळवते; आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास” (१ योहान ५:४). या जगात इतका भरपूर अंधार आहे की तो आपल्या कोणाचाही थरकाप […]

आपण ख्रिस्तजयंतीच्या भावनांसाठी धडपडतो

मॅट चँडलर पुन्हा एकदा या ख्रिस्तजन्मदिनी युद्ध सुरू होणार. नाताळ सुखाचा जावो म्हणायचे की मेरी ख्रिसमस? पण खर्‍या विश्वासीयांसाठी खरे आव्हान यापेक्षा अगदी पूर्ण निराळे असते. ती लढाई आपल्या हृदयासाठी, आपल्या आनंदासाठी आणि आपल्या भक्तीसाठी […]