जुलाई 9, 2025
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आपल्या कटू विचारांपेक्षा चांगले

ग्रेग मोर्स

स्वर्गात स्वागत झालेल्या आणि नरकात टाकलेल्यांमध्ये काय फरक आहे? हा आपल्याशी अधिक संबंधित आणि तातडीचा प्रश्न आहे. अंतिम न्यायाचे दाखल्याद्वारे वर्णन करताना, येशू आपल्याला याचे एक आश्चर्यकारक उत्तर देतो: त्यांचे विचार.

“जेव्हा आपण देवाबद्दल विचार करतो तेव्हा आपल्या मनात जे येते ती आपल्याबद्दलची सर्वात महत्वाची गोष्ट  असते” –  ए.डब्ल्यू. टोझर. येशू तालान्ताच्या दाखल्यामध्ये दुष्ट सेवकासाठी हे किती खरे आहे ते दाखवतो (मत्तय २५:१४-३०). या  दाखल्यात, येशू आपल्याला स्वर्गात स्वागत झालेले लोक  आणि न्यायात टाकलेले लोक यांच्यातील एका फरकाची झलक देतो: देवाच्या चांगुलपणाबद्दलचा त्यांचा विश्वास.  या  हरवलेल्या माणसाच्या कृतींमागे असलेल्या मानसिकतेत तो प्रवेश करतो, त्याच्या आज्ञा न पाळणाऱ्या जीवनाखाली काय विस्कळीत होते ते दाखवणारी एक खिडकी.

त्याचा विचार करताना, स्वतःला असे प्रश्न विचारा जसे की: जेव्हा मी देवाबद्दल विचार करतो तेव्हा माझ्या मनात काय येते?  तो कोण आहे असे मी गृहीत धरतो? तो कशावर प्रेम करतो? तो कशाचा द्वेष करतो? कोणत्या प्रकारची व्यक्ती जगावर राज्य करते? तो चांगला आहे का? तो आनंदी, धन्य, मुक्तपणाने देण्यास तयार आहे की नाही? त्याच्या चांगुलपणावरच्या विश्वासामुळे उपयुक्त जीवन आणि त्यासह स्वर्ग मिळू शकतो किंवा नरक जवळ असलेले निरुपयोगी जीवन मिळू शकते.

प्रवासाच्या शेवटी

मालक शेवटी त्याच्या तीन सेवकांना भेटण्यासाठी त्याच्या लांब प्रवासातून परत आला “व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला” (मत्तय २५:१९). तो जाण्यापूर्वी, त्याने त्यांच्या प्रत्येकाच्या क्षमतेनुसार त्याची मालमत्ता त्यांच्यावर सोपवली होती. त्याने सर्वात सक्षम माणसाला पाच तालांत दिले,  दुसऱ्याला दोन तालांत  दिले; आणि शेवटच्याला एक.  त्याच्या अनुपस्थितीत त्यांच्या कारभाराच्या अहवालावर आता येशू लक्ष केंद्रित करतो. ते त्याच्या परत येण्याबद्दल आणि त्यांच्या मालकाच्या व्यवसायाबद्दल जागरूक राहिले होते का (वचन १३)?

पहिले दोघे मालकासोबत आनंद व्यक्त करतात की, त्यांच्या व्यापाराद्वारे, त्यांनी त्यांच्या मालकाने त्यांना जे दिले होते ते दुप्पट केले. मग डोळे तिसऱ्या सेवकाकडे वळतात. “ज्याला एक तालांत मिळाला होता तोही पुढे आला” (व. २४). पहिल्या दोन नोकरांप्रमाणे तो आनंदाने कामाला निघाला होता का? नाही. त्याने अंगणात खजिना पुरला. पण का? आजच्या अनेक जणांप्रमाणेच: त्याला त्याच्या मालकाचा चांगुलपणा माहीत नव्हता.

त्याला माहीत होता तो देव

सेवकाच्या तोंडातून निघालेले पहिले शब्द लक्षात घ्या: “स्वामी, मी तुम्हाला एक कठोर माणूस म्हणून ओळखत होतो.” पहिल्या दोघांपेक्षा किती वेगळे मूल्यांकन आणि आपल्याला माहीत असलेल्या सत्यामुळे किती विचित्र निष्कर्ष. बरेच मालक त्यांच्या नोकरांच्या देखरेखीखाली अशी मौल्यवान मालमत्ता सोपवतात का? फारो विटा बनवण्यासाठी पेंढा रोखून ठेवतो, परंतु हा मालक तिजोरीतील मौल्यवान रत्ने देतो. तालांत म्हणजे एक नाणे नाही; तो मौल्यवान संपत्तीचा, वीस वर्षांच्या मजुरीचा एक खजिना आहे. म्हणजे मालक त्याला आजच्या मूल्यात आठ कोटी रुपये देतो- आणि फक्त निघून जातो. अशी संपत्ती सांभाळणारा नोकर कोण आहे?

या अविश्वसनीय संधीबद्दल उत्तर देताना, नोकर त्याच्या कृतघ्नतेसाठी सबब देतो “महाराज, मी जाणून होतो की, तुम्ही कठोर माणूस आहात; जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करता व जेथे पसरून ठेवले नाही तेथून गोळा करता” (मत्तय २५:२४). त्याला वाटले की तो एका कठोर मालकाला, एका हट्टी मालकाला, एका कठीण धन्याला ओळखतो.

त्याचा मालक – जो पृथ्वीवरील कोणत्याही मालकापेक्षा उदार दिसतो – तो या दासाच्या दृष्टीने खरोखरच राखत  होता, देत नव्हता; काढून घेत होता, गुंतवणूक करत नव्हता; फायदा घेत ​​होता, समृद्ध करत नव्हता. आपण मालकावर आळशीपणाचा आरोप देखील ऐकतो – तो स्वतःचे हात घाणेरडे करत नव्हता. आपण कधीकधी आपल्या स्वतःच्या पापांचा आरोप देवावर करत नाही का, तसेच या “आळशी” सेवकाने केले (वचन २६).

म्हणून, त्याने त्याच्या मालकाला एका महाकाय माशीसारखे पाहिले, जो नफ्याच्या अपेक्षेने त्याचे लोभी हात चोळत होता. त्याचे घर बांधणाऱ्या गुलामांना चेहरा नव्हता. या सेवकाने गाढवावर स्वार होण्यासाठी वाकायला हवे होते  का? तो काय  धान्य तुडवण्यासाठी बैल होता का? या मालकाचे जू सोपे नव्हते किंवा त्याचे ओझे हलके नव्हते.

अखेर, त्याची दुष्टता गर्भावस्थेतच गुंडाळली गेली. “म्हणून मी भ्यालो व तुमचा तालांत  मी जाऊन जमिनीत लपवून ठेवला  होता ” (व. २५). अशाप्रकारे, त्याला एक देव माहीत होता ज्याचे भय बाळगावे, पण त्याने त्याचे ऐकले नाही. या माणसाला त्याच्या मालकाची इच्छा माहीत होती आणि तो आज्ञाभंग करून अपयशापासून आळशीपणे लपण्याचा विचार करत होता. त्याने आपला तालांत  निसर्गाच्या तिजोरीला समर्पित केला. त्याच्या मालकाने दिवाळखोर होण्यापेक्षा फायदा गमावणे चांगले होते. “पाहा, ते तुमचे तुम्हांला मिळाले आहेत” (व. २५).

ज्या देवाला तो ओळखत नव्हता

ज्याला तो ओळखत होता असे त्याला वाटले तो असा देव होता : एक कठोर आणि कठोर मालक ज्याची उदारता नफ्यासाठी ढोंग करत होती. तो त्या मालकाला ओळखत नव्हता जो त्याच्या गुरांना चांगले चारत होता.  ज्याने इतर दोन दासांची सेवा आनंदाने स्वीकारली.

१. जो प्रशंसा करण्यास उत्सुक होता अशा मालकाला तो ओळखत नव्हता.

या उताऱ्यात जोर देण्यात आला आहे की दोन विश्वासू सेवक त्यांच्या मालकाचे काम करण्यासाठी “लगेचच गेले” (वचन १६-१७). मी कल्पना करतो की ते उत्साहाने पुढे जात आहेत. खरोखर, मी? मला अशा प्रकारे माझ्या धन्याची सेवा करायला मिळते? आणि त्याच उत्साहाने त्यांनी त्यांच्या मालकाला विश्वासूपणाने केलेल्या व्यापाराचे फळ दाखवले: “हे घ्या तुमचे पाच तालांत, स्वामी, आणखी पाच!”

आणि मालक कसा प्रतिसाद देतो? त्याच्या डोळ्यात पित्यासारखी ती समाधानाची चमक असल्याने, तो त्यांना आनंदित केल्याशिवाय पुढे काही करू देणार नाही: “‘शाबास, भल्या व विश्वासू दासा” (वचन २१, २३).

२. जो कायमचे देऊन टाकतो अशा  देवाला तो ओळखत नव्हता.

शेवटी, या सेवकाची एका कंजूष देवाची कल्पना किती खोटी आणि मूर्ख होती. मला आश्चर्य वाटते: मालकाने स्वतःच्या फायद्यासाठी तालांत दिले नव्हते, तर त्यांच्यासाठी दिले होते. त्यानी ते कायम राखावे म्हणून दिले. निष्ठावंत कारभाऱ्यांनी त्यांचे तालांत राखावे व त्यांची वाढ करावी अशी रचना प्रभुने केली होती.

तो नालायक सेवक हा धडा कठीण पद्धतीने शिकला: “तर तो एक तालांत त्याच्यापासून घ्या आणि ज्याच्याजवळ दहा आहेत त्याला द्या” (मत्तय २५:२८). तो असे म्हणत नाही की, “ज्याने मला पाच तालांत दिले त्याला तो द्या.” आता तालांत ज्याच्या मालकीचे आहेत, त्यावर पुढील ओळीत पुष्टी केली आहे: “कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल ” (वचन २९). प्रवासापूर्वीपासून, या मालकाने त्यांना श्रीमंत करण्याच्या उद्देशाने ते  दिले होते. त्याचा आनंद – “शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा!” – त्याला जे मिळाले त्यात नव्हता, तर त्यांनी जे मिळवले त्यात होता. हा तुमचा कठोर आणि कंजूष देव आहे का?

३. जो अधिक देण्यासाठी देतो अशा धन्याला तो ओळखत नव्हता.

“तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन” (मत्तय २५:२१, २३); असे तो चांगल्या सेवकांना सांगतो.  त्या नम्र शब्दांकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. पाच तालांताच्या सेवकाने त्याच्या व्यापारातून आणखी एक आयुष्यभराचे मूल्य मिळवले.

तुम्ही तुमचे जीवन आणि तुमच्या मालकीचे सर्वस्व देवासमोर वेदीवर ठेवले आहे का? सुवार्तेसाठी तुम्ही कुटुंब किंवा संपत्ती सोडली आहे का? येणाऱ्या देशाकडे पाहून तुम्ही या जगात तुमचे जीवन तुच्छ मानले आहे का? तुमचा व्यापार कमी, पण तुमची बढती मोठी आहे. योसेफ तुरुंगात अधिकार चालवत असताना होता तसे स्थिर राहा: लवकरच, तुम्ही नवीन स्वर्ग आणि नवीन पृथ्वीवर अधिकारी म्हणून उभे राहाल; तो तुम्हाला पुष्कळ गोष्टींवर नियुक्त करेल. या जगात ख्रिस्तासाठी आमचे सर्वात मोठे काम म्हणजे पुढील जगात ख्रिस्तासाठी आमच्या खऱ्या कामाची लहान सुरुवात आहे.

४. त्याला विस्तृत  आनंदाचा देव माहीत नव्हता.

खऱ्या मनाच्या लोकांना मालकाची शेवटची टिप्पणी ऐकताना दुष्ट सेवकाला काय वाटले? “तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो” (व. २१, २३). दुष्ट सेवकाला हे माहीत नव्हते की ह्या  मालकाचा आनंद म्हणजे आनंदाचा देश आहे. तो त्याला एक कठोर माणूस, दुःखी माणूस मानत होता, परंतु तो सर्व माणसांत सर्वात आनंदी आहे. “तुमचे आनंद मागे सोडून माझ्या आनंदात प्रवेश करा!” किंवा, “माझा आनंद तुमच्यामध्ये असावा व तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी तुम्हांला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत” (योहान १५:११). या देवाच्या हाताखाली  काम करा. येथे विश्वास ठेवण्यासाठी देव आहे. येथे एक देव आहे जो त्याच्या सेवकांना कायमचे आनंदी करू शकतो.

तो हसरा चेहरा लपवतो

जर त्याने या मालकाच्या हृदयातील आशीर्वादावर विश्वास ठेवला असता, की मालक परतल्यावर खरोखरच त्याला बक्षीस देणार आहे  आणि त्याच्या स्वतःच्या आनंदात त्याला सामील करणार आहे, तर परिस्थिती किती बदलली असती. समस्या त्याच्या मालकात नव्हती; समस्या त्याचे हृदय होते. समस्या त्याच्या क्षमतांची नव्हती; समस्या त्याच्या आळसात होती. मालकाच्या मूल्यांकनाने तो एक दुष्ट, आळशी, अविचारी सेवक असल्याचे सिद्ध केले (मत्तय २५:२६-२७). शेवटी, त्याला बाहेरील अंधारात टाकले गेले. खोटे बोलणारे पापी जाळ्यात अडकतात.

तर, माझ्या वाचकांनो, देवाबद्दल तुमचे काय मत आहे? जेव्हा आपण भाकरी मागतो तेव्हा तो आपल्याला साप देतो का? जेव्हा तुम्ही अडखळता तेव्हा तुमच्यावर झडप घालण्यासाठी तो गरुडाच्या डोळ्याने पाहत आहे का? तो कंजूष, निर्दयी, स्वार्थी आहे का? तुमच्यावर जास्त कर आकारून तुम्हाला उद्याच्या गुलामगिरीत बळकटी देण्यासाठी तो फक्त शिधा पुरवतो का? तुमचे जीवन कसे उत्तर देते?

जर आपण त्याच्याबद्दल उच्च विचार केला तर तो उच्च आहे. जर आपण त्याच्याबद्दल चांगले विचार केले तर तो चांगला आहे. जर आपण त्याला कमी लेखले तर तो नेहमीच आपल्याला सुधारणार नाही. “दयावंताशी तू दयेने वागतोस, सात्त्विकाशी सात्त्विकतेने वागतोस;  शुद्धांशी तू शुद्ध भावनेने वागतोस, कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस, (स्तोत्र १८:२५-२६).

तुमच्यापैकी काही जण त्याची सेवा करत नाहीत कारण तुम्ही त्याला ओळखत नाही. काहींनी कठीण आणि कटू परिस्थितीमुळे तो कठोर आणि कटू आहे असे वाटण्यास स्वत:ला  फसवले आहे.

आणि परिपूर्ण उद्देशपूर्ण प्रश्न येतो: हा तुमचा चांगला धनी आहे का? हे संतांनो, सैतान आत्ताच देवाला तुमच्यापैकी काहींबद्दल विचारत आहे – “हा ‘विश्वासू सेवक’ खरोखरच त्याची सचोटी राखतो का? तो विनाकारण देवाची भीती बाळगतो का? त्याच्या आरोग्याला स्पर्श कर, तिच्या प्रजननक्षमतेला स्पर्श कर, त्याच्या पैशाला स्पर्श कर, आणि ते तुझ्या तोंडावर तुला शाप देतील.”

आमच्या वाळवंटांपेक्षा किंवा कल्पनांपेक्षा पलीकडे  हा धनी किती चांगला आहे – आणि त्याने ते कायमचे सिद्ध केले. कसे? आम्हाला त्याची मालमत्ता देऊन, गुलगुथाचा लांब दूरचा प्रवास करून, त्याचे आशीर्वाद टिकवून ठेवण्यासाठी, आमचे कर्ज फेडण्यासाठी, वधस्तंभावर मरून. धनी  केवळ त्याची मालमत्ताच आपल्याला देत नाही – तर तो स्वतःला आपल्यासाठी अर्पण करतो. वधस्तंभावर, येशूने देवाच्या चांगुलपणाला आपल्या कोणत्याही पृथ्वीवरील परिस्थितीपेक्षा उंचावले.  देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला” (रोम ५:८).

तर,  संतानो धीर धरा
तुम्ही ज्या ढगांना खूप घाबरता ते दयेने मोठे आहेत
आणि फुटतील ते
तुमच्या डोक्यावर आशीर्वादांचा वर्षाव करून.
दुर्बळ विचाराने प्रभूचा न्याय करू नका,
पण त्याच्या कृपेसाठी त्याच्यावर विश्वास ठेवा;
त्याच्या पूर्वयोजनांमागे त्याचा  हसरा चेहरा लपला आहे.

 (विल्यम काउपर)

Previous Article

मानवी ज्ञानाचे दारिद्र्य

You might be interested in …

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो…”

“जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” योहान ७:३८. येशूने असे म्हटले नाही की,जोमाझ्यावर विश्वास ठेवतो त्याला देवाच्या परिपूर्ण आशीर्वादाचा अनुभव येईल. तर जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यातून त्याला जे काही […]

उगम शोधताना लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर  

एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन करणारी सत्यकथा.  अनुवाद : क्रॉसी उर्टेकर   प्रकरण ६ वे परिश्रमांचा […]