जुलाई 28, 2026
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आनंदाने वृद्ध होणे

जॉन पायपर

आपण आज वृद्धत्वाबद्दल बोलत आहोत

वृद्ध घाबरलेले असतात – वृद्धत्वाची भीती, निरुपयोगी वाटण्याची भीती, अशक्त शरीराच्या अपमानाची भीती. ते स्वर्गावर विश्वास ठेवत असले तरी मृत्यूचीही भीती बाळगतात. तर संघर्ष असा आहे: तुम्ही जीवन कसे संपवाल – या शर्यतीचा शेवटचा, अज्ञात भाग – अत्यंत नम्रतेने, आणि तेही भयभीत किंवा कटू न होता कसा पूर्ण कराल?

हा एका अनामिक श्रोत्याचा प्रश्न आहे: “पास्टर जॉन, वृद्धत्वाची भीती असलेल्या आणि स्वर्गावर विश्वास ठेवत असतानाही, शक्ती कमी होत असताना किंवा मृत्यूबद्दल घाबरून गेल्याने ज्याला अधिकाधिक निरुपयोगी वाटते अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणाल? हा माझा संघर्ष आहे. एक वृद्ध ख्रिस्ती, त्याचे जीवन भीतीने किंवा कटुतेने नव्हे तर आनंदाने, सन्मानाने आणि ख्रिस्तावरील आशेने कसे संपवू शकतो?”

उत्तर

अज्ञात देशामध्ये

अब्राहामापासून सुरुवात करू या. इब्री लोकांस ११:८ म्हणते, “अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे ‘निघून जाण्यास’ तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही ‘तो निघून गेला”

आपल्या मृत्यूच्या दिवशी आपण पूर्णपणे एकटे असू की, आपल्या आजूबाजूला कोणीही प्रियजन असतील हे आपल्याला माहीत नाही.  आपण इतके सामर्थ्य आणि साधने गमावली असतील की आपण व्यावसायिकदृष्ट्या निरुपयोगी ठरू. तो मोठ्या दुःखाचा आणि वेदनांचा क्षण असेल की नाही आपल्याला माहीत नाही. आपल्याला माहीत नाही की आपला विश्वास स्थिर असेल की त्या दुष्टाशी भयंकरपणे लढत असेल. आपल्याला माहीत नाही की आपले आर्थिक नुकसान झाले असेल की काही जागतिक संकटामुळे आपले साधने नाहीशी झाली असतील. आपल्याला माहीत नाही की स्मृतिभ्रंशाने आपल्या सर्व ख्रिस्ती आठवणी आणि आपल्या शास्त्रवचनातील स्मृती हिरावून घेतल्या असतील की नाही. आपल्याला माहीत नाही की आपण किती वयाचे असू किंवा आपण कुठे राहणार आहोत, आपण अचानक जाऊ की दीर्घकाळानंतर.

आतापासून ते आपण मरण्याच्या क्षणापर्यंत, आपण एका अज्ञात देशात चालत असतो. सुरक्षित वाटण्यासाठी तुम्ही कितीही पावले उचलली तरी, ती या जगासाठी नसतात.

आता आपण ते कसे करावे? आनंदाने, सन्मानाने आणि आशेने आपण त्या अज्ञातात कसा प्रवेश करावा? हा प्रश्न विचारला जात आहे. आणि खरे सांगायचे तर, सन्मानाने ते करणे अशक्य असू शकते.

अपमानात आनंद

प्रेषित पौल शरीराच्या मृत्यूच्या जवळ येत असताना त्याबद्दल काय म्हणतो ते येथे आहे. तो त्याचे वर्णन जमिनीत पेरलेल्या बीजाप्रमाणे करतो: “जे विनाशीपणात पेरले जाते, ते अविनाशीपणात उठवले जाते; जे अपमानात पेरले जाते, ते गौरवात उठवले जाते, जे अशक्तपणात पेरले जाते, ते सामर्थ्यात उठवले जाते ” (१ करिंथ. १५:४२-४३).

आता हेच मी दुसऱ्या शब्दात सांगतो. नाशवंत, अपमान, अशक्तपणा या तीन शब्दांचा हा माझा अर्थ आहे.

नाशवंत: उबदार रेफ्रिजरेटरमध्ये बुरशीने भरलेल्या फळांसारखे कुजणे.

अपमान: अपमानास्पद आणि दयनीय, ​​डायपर घालून गर्भाच्या स्थितीत गुंडाळलेल्या, स्वतःला मलिन करणाऱ्या म्हाताऱ्या माणसासारखे.

अशक्तपणा: असहाय्य, प्रत्येक गोष्टीसाठी पूर्णपणे इतरांवर अवलंबून. पौलाने त्याच्या काळात मरण्याच्या सामान्य प्रक्रियेचे हे चित्र दिले आहे आणि आपल्या काळात ते खूप सामान्य आहे.

बायबलमध्ये आपल्याला असे कोणतेही वचन दिलेले नाही की ख्रिस्ती जीवन यापेक्षा वेगळ्या प्रकारे संपेल – नाशवंत, अपमानास्पद, अपमानित, कमकुवत. परंतु याचा अर्थ असा नाही की आपल्याला कटुता आणि  आनंदविरहीत जीवनाला बळी पडावे लागेल. आपली प्रतिष्ठा आपल्याला सोडून द्यावी लागेल, परंतु येशूमध्ये आनंद, आशेत आनंद, दुःखात आनंद – यांसाठी  आपण शेवटपर्यंत लढू शकतो.

 “आमच्यावर आलेल्या सर्व संकटांत मला आनंदाचे भरते आले आहे” (२ करिंथ. ७:४).

 “दु:खी मानलेले तरी सर्वदा आनंद करणारे” (२ करिंथ. ६:१०).

 “आपल्या दुःखात आपण आनंद करतो” (रोम. ५:३).

 “माझ्या बंधूंनो, नाना प्रकारच्या परीक्षांना तुम्हांला तोंड द्यावे लागते तेव्हा तुम्ही आनंदच माना” (याकोब १:२).

 “दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे” (२ करिंथ. १२:१०).

 “तुम्ही तुमच्या मालमत्तेची लूट आनंदाने सोसली” (इब्री लोकांस १०:३४).

आणि  अनेक शास्त्रलेखांमध्ये दुःखामध्ये असणाऱ्या आनंदाबद्दल वारंवार सांगितले आहे. सन्मान आपल्याला सोडून द्यावा लागू  शकतो, परंतु आपल्या सर्व अप्रतिष्ठित कमकुवतपणा आणि दुःखात, आपण शेवटपर्यंत आनंदाच्या चांगल्या लढाईत लढताना, प्रेषित पौलासोबत असे म्हणत असल्याचे आढळावे की, “आपल्या सर्व दुःखात” – आपल्या वृद्धत्वाच्या दुःखात – “आपण आनंदाने भरलेले आहोत.”

देवाच्या वचनांवर उभे राहून

आता, आपण ते कसे करावे? आपण ते जसे केले आहे त्याच प्रकारे. जसे आपण सर्व मार्गाने आनंदासाठी लढलो  त्याच प्रकारे: आपण भविष्यातील कृपेच्या विश्वासावर जगतो. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर: दररोज आपण अंथरुणातून उठतो आणि देवाच्या वचनांवर उभे राहतो. देवाची वचने ही आत्म्याची तलवार आहे ज्याद्वारे आपण अविश्वासाची पापे मारतो. देवाच्या वचनांवर विश्वास ठेवणे ही विश्वासाची ढाल आहे ज्याद्वारे आपण दु:खाचे अग्निबाण विझवतो.

म्हणून, जेव्हा एकाकीपणाचा अग्निबाण आपल्या आनंदाला धोका देतो, तेव्हा आपण तो अभिवचन देऊन शांत करतो:

 “युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस तुमच्याबरोबर आहे” (मत्तय २८:२०).

 “[मी] तुला सोडणार नाही किंवा तुला टाकणार नाही” (अनुवाद ३१:६).

 म्हणून आपण धैर्याने म्हणतो, “प्रभू मला साहाय्य करणारा आहे, मी भिणार नाही; मनुष्य माझे काय करणार”  (इब्री १३:६)?

जेव्हा आपल्याला निरुपयोगीपणाच्या भीतीची धमकी दिली जाते, तेव्हा आपण त्या धमकीचा बाण या वचनाने शांत करतो की आपण केलेले थोडेसे चांगले – जरी  आपल्या मृत्युशय्येवर फक्त कुजबुज करून प्रार्थना केली तरी – स्वर्गात विसरले जाणार नाही तर प्रभूकडून त्याचे प्रतिफळ मिळेल (इफिस. ६:८).

जेव्हा आपल्या क्षमता, सामर्थ्य आणि सौंदर्याचा होणारा तो दुःखद ऱ्हास पूर्णपणे निरर्थक आहे या विचाराने आपल्याला ग्रासले जाते, तेव्हा आपण या विचाराच्या तीक्ष्ण बाणाला एका अभिवचनाद्वारे शांत करतो: की हा क्षय प्रत्यक्षात “आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते ” (२ करिंथ. ४:१६–१७). हे मुळीच निरर्थक नाही.

“देवाची वचने ही आत्म्याची तलवार आहेत, ज्याद्वारे आपण अविश्वासाची पापे मारतो.”

जेव्हा आपल्याला आपला विश्वास अपयशी ठरेल अशी भीती दिली जाते, तेव्हा आपण त्या बाणाचा आवाज या वचनाने शांत करतो की “ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम सुरू केले तो ते पूर्ण करेल” (फिलिप्पै. १:६). त्याने तुम्हाला धरले आणि म्हणूनच तुम्ही त्याला धरू शकता.

आणि ही अनेक अभिवचने सैतान आपल्यावर सोडलेल्या प्रत्येक अग्निमय बाणाशी जुळतात. अशाप्रकारे आपण वृद्धत्वाच्या सर्व अपमानातून आनंदासाठी लढतो.

दैनंदिन जवळीक

प्रिय वृद्ध मित्रा, मी ८० वर्षांचा आहे आणि हे सर्व माझ्यासाठी अगदी खरे आहे.

तर, आपण देवाशी जवळीक निर्माण करू या. आपण प्रभूला नेहमीच आपल्यासमोर ठेवू या (स्तोत्र १६:८). आपण दररोज शास्त्रवचनांद्वारे त्याच्या वैभवाचे दर्शन नव्याने लक्षात आणू या. त्याच्या आनंदाच्या नदीतून आपण दररोज पिऊ या, ज्यातून तो आपल्याला देण्यास खूप उत्सुक आहे (स्तोत्र ३६:८). आपण दररोज स्वतःला आठवण करून देऊ या की तो या जगाने देऊ केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा श्रेष्ठ खजिना आहे (मत्तय १३:४४). आपण पेत्राला विचारलेल्या “तू माझ्यावर प्रेम करतोस का?” (योहान २१:१७) या प्रश्नाचे, मोठ्याने उत्तर देऊ या, “मी तुझ्यावर प्रेम करतो. मी तुझ्यावर प्रेम करतो, येशू.” चला, आपण प्रत्येक पापाचा नाश करू या आणि आपले अंतःकरण शुद्ध ठेवू या. “जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील” (मत्तय ५:८).

आणि जोपर्यंत आपण करू शकतो, तोपर्यंत आपण इतरांनाही हेच करण्यास मदत करू या. देवाला जाणून घेणे म्हणजे हेच आहे.

Previous Article

तुमची दाने तुम्ही पुरून ठेवली आहेत का

You might be interested in …

प. शास्त्राचा उपयोग: चांगल्या कामासाठी तयारी

लेखांक ७                       आपण पाहिलं की पवित्र शास्त्र वाचणाऱ्याला चांगल्या कामाकरता तयार करण्याचं काम करतं. आता ते काम पवित्र शास्त्र कसं करतं ते पाहू. विश्वासी व्यक्तिमध्ये चांगलं काम कोणतं ते पाहू. मार्क ७:३७ मध्ये एका चिमुकल्या […]

देव त्याचे वैभव उघड करतो

डेव्हीड मॅथिस बेथलेहेम हे परिपूर्ण शहर ठरणार होते. प्राचीन इस्राएलमध्ये या शांत पण आशादायक जन्मासाठी यापेक्षा चांगले स्थान नव्हते. हा  राजेशाही वारस,  एका दुर्लक्षित गावात वाढणार होता पण राजधानीत मरणार होता. तसे हे छोटे शहर […]

आध्यात्मिक धोक्यांबद्दल जागरूक असा

जॉन ब्लूम जागरूक न राहणे हे आपल्या जिवांसाठी नाशकारक आहे.  हा नाश रूपकात्मक अथवा आभासी किंवा काव्यात्मक नाही – तर खराखुरा नाश आहे. आपण ख्रिस्तामागे चालत असताना कोणत्या संकटांना तोंड द्यावे लागणार हे प्रेषित पौलाला […]