दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

३० वर्षापूर्वी स्थापन झालेली  लव्ह महाराष्ट्र ही संस्था बहुतांशी  मराठी भाषिक असलेल्या  महाराष्ट्रातील स्थानिक मंडळीच्या समृध्दीसाठी निर्माण केली गेली. मागील वर्षांमध्ये तिचा विस्तार भारतातील इतर भागांमध्येही पोचला आहे.

आमचा दृष्टान्त

बहुतांशी मराठी असलेली महाराष्ट्रातील स्थानिक मंडळी बायबलमध्ये शिकवलेला देवाचा हेतू पूर्ण करत असल्याचे पाहणे .

(मत्तय २८:१९-२०)

आमचे सेवाकार्य

‘लव्ह महाराष्ट्र’ ही संस्था पाळक सुवार्तिक व आदिक्षित सभासदांसोबत पुढील बाबींसाठी कार्य करेल ;

  • त्यांना दृष्टांत पोचवणे ; मध्यस्थीची प्रार्थना, नियमित मासिकाचे वर्गणीदार, कार्यक्षेत्राचा अहवाल व वैयक्तिक शिष्यत्व यांद्वारे.
  • प्रशिक्षण देणे; निवड करून सत्रांमध्ये, आणि साधारणपणे परिषदा व सत्रांमध्ये
  • सुसज्ज करणे; योग्य पुस्तकांच्या प्रकाशनाद्वारे , विकासासाठी कार्यक्रमांचे आयोजन व निवडक प्रकल्पात सहकार्य देऊन.
  • प्राथमिक वैद्यकीय कौशल्यांमध्ये (फर्स्ट एड) प्रशिक्षण देण्यासाठी एल एम स्वयंसेवक डॉक्टरांची निवड करून त्यांना उपलब्ध करून देईल.