दिसम्बर 21, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

तू सत्याचे वचन नीट सांगणारा , लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी , असा स्वत:ला सादर करण्यास होईल तितके कर.
(२ तीमथ्य २:१५).

WE Believe Bibleदेवाच्या वचनाचा  विश्वासूपणे व संदर्भाला धरून उपदेश करणे ही पाळकीय कार्याची मुलभूत अपेक्षा आहे. सुवार्तेच्या सर्व सेवेकऱ्यांना हा आदेश दिलेला आहे. पवित्र  आत्म्याच्या कार्याद्वारे ख्रिस्त आपली मंडळी उभारतो व रुपांतर करण्याचे त्याचे साधन आहे ख्रिस्ताच्या वचनाचे सत्य.

लव्ह महाराष्ट्रचा दृष्टांत असा आहे की पाळकांना व मंडळीच्या नेत्यांना साधने बहाल करणे. त्यामुळे ते ते देवाच्या वचनाच्या भागाचे ख्रिस्ताला उंचावत स्पष्ट रीतीने स्पष्टीकरण करू शकतील ज्यामुळे देवाचे लोक देवाच्या आत्म्याद्वारे भक्ती , पवित्रीकरण व सेवा करण्यास उद्युक्त होतील.

  • ज्या मंडळ्या यासाठी उत्सुक आहेत त्या पाळक व पुढारी यांच्यासाठी आपल्या विभागात एक कार्यक्रम आयोजित करतील.
  • आमचे निपुण शिक्षक तेथे प्रवास करून उलगडात्मक शिक्षणाची सत्रे चालवतील.
  • शिक्षकांच्या प्रवास खर्चाचा भार आम्ही वाहू , आयोजनाचा खर्च आयोजक मंडळी  करील.
  • तुमच्या विभागामध्ये प्रशिक्षण सत्र चालवण्याची तुमची इच्छा असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.