दिसम्बर 22, 2024
Expand search form
मराठीमराठीEnglishEnglish

स्थानिक मंडळ्यांसाठी प्रशिक्षण

आमच्या अशक्तपणात आमच्यामध्ये कार्य करण्यास देवाला आवडते

ट्रेवीस मायर्स

गेल्या मार्चमध्ये माझ्यावरचा कॅन्सरचा उपचार संपला तरीही मला खूपच अशक्त वाटत होते. पूर्ण वेळ प्रोफेसर म्हणून माझे काम तसेच माझे घरातील व मित्रांशी असलेले  नातेसंबंध  या सर्व जबाबदाऱ्या पार पडण्यास मी मर्यादित आहे याची प्रखर जाणीव मला झाली. अशक्तपणाचा हा अनुभव कित्येक वेळा मला जरी वैताग आणत होता तरी देवाच्या चांगल्या व कृपाळू योजनेनुसार मला व इतरांना तो फार आशीर्वादाचा ठरला.
१.अशक्तपणा आपल्याला आठवण करू देतो की आपले जीवनच देवावर अवलंबून आहे.
अशक्तपणा आपल्याला आठवण करू देतो की आपले जीवन हे फक्त वाफ आहे, सर्व मानवजात गवतासारखी आहे. आला प्रत्येक श्वास व ह्रदयाचा ठोका हा देवच पुरवतो याची आपल्याला जाणीव होते. त्याने आपले दिवस गणले आहेत (इयोब १४:५, स्तोत्र १३९:१६). तो निर्माणकर्ता आहे व सर्व गोष्टींना आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने  तो आधार देतो, आपल्या ह्या  इवल्याशा उदात्त जीवनाला सुद्धा (इब्री १;३). आपल्या जीवनाचे सत्य आपण गृहीत धरू शकत नाही.

या आठवणीने कृतज्ञता व नम्रता यांचे फळ येते
बहुधा जेव्हा सर्व काही ठीक चाललेले असते तेव्हा देवावर आपण प्रत्येक आणि कोणत्याही गोष्टीसाठी किती अवलंबून आहोत हे विसरण्याचा मोह आपल्याला होतो.(अनुवाद ६:१०-१२). आपला साचवलेला पैसा, गलेलठ्ठ पगार , सेवेतील यश , निरोगी शरीरे किंवा मनमोहक व्यक्तिमत्व हे आपले अभिमान बाळगण्याचे घोडे व रथ ठरू शकतात (स्तोत्र २०:७). जेव्हा आपला अशक्तपणा आपल्याला आठवण करून देतो की आपले जीवन आणि श्वास यासाठी आपण देव आणि त्याचा पुरवठा यावर अवलंबून आहोत तेव्हा याच्या चांगल्या इच्छेने आपण जगत आहोत या जाणीवेने आपल्याला आनंद होतो.

. अशक्तपणा आपल्याला आठवण करून देतो की देव आपल्याला नवी शरीरे देईल.
आपले दुखणे, वेदना आणि असमर्थपणा आपल्या भविष्यातील परिपूर्ण शरीर व आत्मा याकडे निर्देश करतात. आपला एक पाय कबरेत आहे असे तुम्हाला वाटत असेल तर याचीही आठवण करून दिली जाते की तुमचा दुसरा पाय आताच गौरवात आहे. आपल्या कमकुवतपणामुळे आपली पुनरुत्थानाची इच्छा प्रबळ होते. जे आय पॅकर लिहितात: “ आपले नवीन शरीर ..आपल्या नवीन ह्रदयाशी म्हणजे आपल्या नव्या नैतिक आणि आध्यात्मिक स्वभावाशी व चरित्राशी  पूर्णपणे जुळले जाईल. आपला सध्याचा अशक्तपणा ख्रिस्त आपल्याला नवीन शरीर देणाऱ्या दिवसाची इच्छा वाढवत राहतो व ते शरीर कधीही खंगणार नाही  तर सर्व अनंतकाल त्याचा नवेपणा टिकवून ठेवील. ख्रिस्ती आशा हा एक आशावाद नाही जो अंधारात शीळ वाजवत राहतो. तर ती येणाऱ्या गोष्टींची एक खंबीर खात्री आहे कारण देवाने स्वत: आम्हाला अभिवचन दिले आहे.

या आठवणीने विश्वासाने आशेचे व धीराचे फळ धरले जाते
रोम ५:१-५ म्हणते जे संकटात आनंद करण्याचे शिकले आहेत ते परीक्षेमध्ये टिकून राहतील, देवावर विश्वास धरून ख्रिस्तासारखे होण्यात वाढत जातील. कारण ते देवाने क्रूसामध्ये  केलेल्या समेटाकडे  मागे पाहतात व ख्रिस्त येईल तेव्हा  होणाऱ्या त्यांच्या पूर्ण व शेवटच्या सुटकेकडे पुढे पाहतात. रोम ८:२५ म्हणते देवाच्या आत्म्याच्या कार्यामुळे जे सृष्टी यथास्थित होईल अशी आशा धरतात ते त्यांच्या वतनाची धीराने वाट पाहतात.

३.अशक्तपणा आपल्याला आठवण करून देतो की आपण क्रोधाला पात्र आहोत पण आपल्याला कृपा मिळाली आहे.

सर्व निर्मितीमध्ये आपलाही समावेश आहे. खंगणे, वेदना आणि कमकुवतपणा भोगण्याचे कारण आपल्या पहिल्या आईवडिलांनी पाप केले (रोम ८:१८-२१) आणि आपण प्रत्येकाने आपल्या अगणित पापांमुळे या जीवनात हे थोडे  दु:खसहनच नव्हे पण  वैयक्तिकरित्या देवाचा योग्य  क्रोध आपल्यावर ओढून घेतला आहे (रोम ३:२३). गौरवाच्या भारासाठी (२ करिंथ ४:१७) नाही तर क्रोधाच्या भारासाठी आपण लायक आहोत.
तरीही या जगात व आपल्या जीवनात देवाच्या चांगल्या देणग्यांची रेलचेल आहे. आणि आपल्या ख्रिस्ती जनांना देवाची सर्वात उत्तम देणगी म्हणजे ख्रिस्त मिळाला आहे जो आमचे जीवन व अनंतकालाची संपत्ती आहे. देवाच्या यथार्थ न्यायापासून आपली सुटका झाली आहे, आपल्याला मुक्ती मिळाली आहे, देवाने आपली क्षमा केली आहे , त्याच्याशी आपला समेट झाला आहे, त्याच्या कुटुंबात आपल्याला दत्तक घेतले आहे. किती अमाप ही दया !
या आठवणीने दया आणि सहानुभूतीचे फळ धरले जाते
जे अशक्त आहेत त्यांच्यावर देवाने केलेल्या करुणेची व त्यांच्यासाठी असलेल्या देवाच्या सहनशीलतेची त्यांना आठवण करून दिली जाते व इफिस ४:३२-५:२ नुसार चालण्यास आत्म्याचे सहाय्य मिळते. “एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा. आणि देवाने ख्रिस्तामध्ये क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा. प्रिय मुलांप्रमाणे देवाचे अनुकरण करणारे व्हा, आणि ख्रिस्ताने जशी आमच्यावर प्रीति केली तसे प्रीतीमध्ये चाला, त्याने आमच्याकरिता मधुर सुगंध असे देवाला अर्पण व यज्ञ केला.”

 ४.अशक्तपणामुळे देवाच्या प्रेमळ आणि सुद्न्य पुरवठ्यावरील आपला विश्वास शुद्ध केला जातो.

देवाच्या आत्म्यापासून आपल्याला कोणीही विभक्त करू शकत नाही हा अनुभव जसजसा आपण घेतो तसे आपण आज्ञापालन शिकतो. परिस्थिती कितीही कठीण झाली तरी देव आपल्याला कधीही सोडणार नाही किंवा टाकणार नाही (यहोशवा १:९; इब्री१३:५). आपल्या परीक्षांचे आपल्याला आकलन होत  नसले तरी सर्व समयी तो काय करत आहे हे त्याला नक्की ठाऊक असते हे आपण शिकतो. म्हणून आपल्या पुढ्यात जे येते त्याच्याविषयी आपण कमी प्रमाणात तक्रार करतो. आपला तारणारा व प्रभू हा आपल्या मार्गात जे काही आणतो त्याच्याशी थोड्या सातत्याने  अधीन होण्यास आपण शिकू लागतो. आपल्या ताठ माना जरा लवचिक होऊ लागतात. आपण देवाच्या ज्ञानात व कृपेत वाढू लागतो (२ पेत्र ३:१८).

पार्कर म्हणतात, ”आध्यात्मिक प्रौढता म्हणजे येशुद्वारे आपले त्र्यैक देवाशी असलेले, कसोटीस उतरलेले नाते आहे.   विश्वासी तसेच अविश्वासी या दोहोंना ते जवळ करते आणि कळकळ, सहानुभूती , प्रेमळपणा, काळजी,
सुज्ञता, अंतर्दृष्टी, पारख व सामंजस्य या गुणांतून हे नाते त्यांना दाखवले जाते.”

या धड्यामुळे आपण स्वत;ला  इतरांपेक्षा मोठे किंवा कमी न मानता, जसे आहोत  तसेच मानण्याचे शिकतो.
अनेक प्रकारचे दुर्बल विश्वासी जन आहेत: आजारी, अपंग, वृध्द , गरीब, बुद्धीमंद, हलकी कामे करणारे, समाजाने बाजूला टाकलेले (ज्यांना कमी दिले आहे त्यांच्याकडून कमी अपेक्षा केली जाते). मला जे अत्यंत सहनशील , काळजी घेणारे व सुद्न्य लोक भेटले आहेत ते यापैकी एका वर्गात मोडतात. देवाशी असलेल्या त्यांच्या नात्याची कसोटी झालेली आहे व त्यांचे शील शुध्द केले गेले आहे.
आमचा अशक्तपणा आम्हाला आठवण करून देतो की आध्यात्मिक प्रौढत्वाचे चिन्ह हे जग ज्याला उंचावते त्या प्रकारच्या पात्रतेमध्ये नाही उदा. वक्तृत्वाची पात्रता, उत्पादन क्षमता. “ परंतु ज्ञानांस लाजवण्यासाठी देवाने जगातील जे मूर्ख ते निवडून घेतले आणि बलवानांस लाजवण्यासाठी देवाने जगातील जे दुर्बल ते निवडून घेतले  (१ करिंथ १:२७). म्हणून अशा लोकांकडे आपण जाऊ या. फक्त त्यांची सेवा करण्यासाठीच नव्हे पण त्यांच्याकडून शिकण्यासाठी. देव त्यांच्या जीवनात कसा कार्य करत आहे ते शिका. त्यांच्या मर्यादांपलीकडे त्यांच्यामध्ये असलेल्या ख्रिस्ताला पहा. ते देवाचा चांगुलपणा, कृपा व गौरव याची किती आनदाने साक्ष देतात ते ऐका.

अशक्त जन जगाला जिंकतील

संपूर्ण बायबलमध्ये आपण पाहतो की देवाला आपले लक्ष त्याच्याकडे असावे हे आवडते.आणि ते जरी अशक्त आणि मर्यादित असले तरी त्यांच्याद्वारे कार्य करून त्यांचा त्याच्यावरील विश्वास वाढावा अशी त्याची इच्छा आहे. वांझ सारा, राहेल, सबबी देणारा मोशे, गिदोनाचे थोडके सैन्य,, कुमारी किशोरवयीन मरिया, कोळी असलेला पेत्र, असे अनेक इतर आणि वधलेला कोकरा खुद्द येशू हे सर्व आपल्याला हेच दाखवून देतात की ही सौम्य कोकरेच अखेरीस विजय पावतील आणि जग जिंकतील.

महान व उपरोधिक कृसाचे ज्ञान हेच आहे की हेच आहे की देव जे मूर्ख अशक्त , नीच ,लज्जास्पद  ते निवडतो आणि जे बलवान त्यांना लाजवून त्यांचे गर्विष्ठ तोंड बंद करतो.आम्हाला शुभवर्तमानचे सत्याची आठवण करू देण्यासाठी आणि त्याच्यारचा विश्वास शुध्द करण्यासाठी  देव आमचा कमकुवतपणा निवडतो.

Previous Article

वधस्तंभाचा अभिमान

Next Article

तो आपले अश्रू पुसून टाकील

You might be interested in …

हे जग सोडण्यास भिऊ नका

ग्रेग मोर्स जुने संत मरणासंबंधी बोलताना जे मी ऐकतो त्यामुळे कदाचित तुम्हालाही माझ्याप्रमाणे अस्वस्थ वाटेल.“ जो मरणासाठी तयारी करत नाही तो मुर्खाहून मूर्ख आहे. तो वेडा आहे.” चार्ल्स स्पर्जन यांनी सुरुवात केली.  “मान्य आहे” डॉ. […]

तुमचे जीवन कंटाळवाणे नाही जॉन ब्लूम

कधीकधी आपल्याला वास्तवाच्या उपचाराचा डोस मिळण्याची गरज असते – एक जाणीव असायला हवी की वास्तव हे आपल्याला वाटते त्यापेक्षा खूप अद्भुत आणि साहसपूर्ण आहे. आपला एक विचित्र कल असतो की आपण आपले अस्तित्व, इतरांचे अस्तित्व […]

उगम शोधताना

लेखक : नील अॅन्डरसन व हयात मूर अनुवाद : क्रॉसी उर्टेकर एका नव्या भाषेत बायबलचे भाषांतर करताना अचूक शब्द व त्या लोकगटाला समजेल अशा अर्थाचा मेळ घालताना देवाचा अद्भुत हात कसा चालवतो याचे प्रत्यक्ष वर्णन […]